समीर धर्माधिकारी - भाग २ (अंतिम)

Submitted by दीपांजली on 31 March, 2008 - 02:33

मुलाखत - भाग १

दीपाली : समीर , तू फ़िल्म्स मधे येण्या आधी एक यशस्वी मॉडेल होतास . तुला नवीन असताना टिका कारां कडून 'Model turned actor' ना नेहेमी ऐकायला मिळणारी टिका ऐकावी लागली का ?
समीर : सुदैवाने सत्ता नंतर असं कधी झालं नाही . बाकी Model turned actors बद्दल म्हणशील तर exception is every where! पूर्वी जेंव्हा ऍड फ़िल्म्स मधे मॉडेल्स ना फ़क्त ramp वर चालण्या सारखेच काम करायला लागायचं तेंव्हा models हे खरच फ़क्त दागिन्यां सारखे शोभेची निर्जिव वस्तू वाटायचे ! पण आज काल च्या ऍड फ़िल्म्स चं रुप पण बदललय , Looks बरोबर चांगला अभिनय पण पहायला मिळतो . आज कालचे models मुळीच ठोकळेबाज राहिले नाहीत असं मला वाटत . मला स्वत : ला मॉडेल आणि actor दोन्ही असल्याचा नेहेमी फ़ायदाच झालाय ! sam1.jpg
आज जे काही थोडं फ़ार यश मिळावलय त्याची सुरवात मॉडेलिंग मुळेच झाली होती , जो काही मी आज आहे त्यात माझ्या मॉडेलिंग background चा खूप मोठा वाटा आहे हे मी कधीच विसरणार नाही !
दीपाली : समीर , तू जेंव्हा एखादा चित्रपट निवडतोस तेंव्हा कुठल्या गोष्टींना महत्त्व देतोस ?
तुला स्वत : ला कोणत्या actors चे चित्रपट पहायला आवडतात ?
समीर : फ़क्त एखाद्या गोष्टीला preference देतो असं म्हणू शकत नाही कारण एखादी film जेंव्हा दिसायला आणि ऐकायला चांगली वाटते तेंव्हा ते team work शिवाय शक्य नसते . त्या साठी प्रत्येक team member ची कामगिरी तितकीच महत्त्वाची असते . तरी पण मी जेंव्हा एखादी film स्वीकारतो तेंव्हा मी script, director आणि character या तीन गोष्टींना महत्त्व देतो . या तिन्ही गोष्टी एकत्र असणं फ़ार महत्त्वाचं आहे ! कारण एखाद्या चांगल्या गोष्टीतली characters जर weak असतील तर ती film करताना मजा येणार नाही , Characters चांगली लिहिली पण मूळ कथानकात च दम नसेल तर चांगला director सुध्दा काही करु शकणार नाही ! आणि अर्थात च जर कथा - characters चांगली असूनही जर director च चांगला नसेल तर चांगल्या कथेची वाट लागेल ! Good team + Good Story + Strong characters हे सगळे जेंव्हा एकत्र मिळते तेंव्हा ऍक्टर ला पण काम करायला मजा येते आणि प्रेक्षकांना पहाताना पण ! sam2.jpg
मला लहानपणा पासून अमितभ बच्चन , कमल हसन , संजीव कुमार यांचे चित्रपट पहायला आवडतात . मधुबाला वर तर मी खूप प्रेम करायचो , अजुनही करतो ! आमिर खान चा अभिनय , choice of movies अप्रतिम आहे .
गोविंदा मला प्रचंड आवडतो ! जसे लोक म्हणतात की अमिताभ किंवा किंग खान एकच होऊ शकतो तसं माझं अगदी ठाम मत आहे कि गोविंदाही फ़क्त एकच होऊ शकतो !
मराठी मधे अरुण सरनाईक आवडतो .
दीपाली : Well said, समीर ! पण मला सांग तुला स्वत : ला करण जोहर style मसाला चित्रपटां च्या यशा बद्दल काय वाटतं , अनेक मोठे मोठे stars केवळ अशा बॅनर मधे घुसण्या साठी पदरी पडेल तो काहीही value नसलेला role सुध्दा करण्यात धन्याता मानतात ! तुला असा मोठ्या बॅनर चा चित्रपट मिळाला पण तू अत्ता सांगितलेल्या तिन्ही गोष्टी तुला weak वाटल्या तर तू नाकारशील का ?
समीर : मोठे बॅनर , Big money याचा मोह कोणाला पडत नाही ? मला स्वत : ला कुछ कुछ होता है पहाताना सॉलीड मजा आली होती , तसा चित्रपट मिळाला तर मी अगदी धावत जाईन ! पण केवळ चोप्रा - जोहर बॅनर आहे म्हणून त्यांचा प्रत्येक चित्रपट काही कुछ कुछ होता है किंवा धूम 2 सारखा असेलच असं नाही !
माझ्या स्वत : पुरतं बोलायचं झालं , तर फ़क्त पैशा साठी म्हणून एखादं काम केलं तर त्यात काम आणि पैसा दोन्हीची मजा येत नाही . चांगल्या कामा बद्दल माणसानी अगदी हावरट असावं ! म्हणजे पैसे चांगले तर सगळ्यांनाच हवे असतात पण चांगले काम + चांगले पैसे असं दोन्ही असेल तर च खरी मजा येते गं !
दीपाली : Wow , अगदी पॉलीटिकली करेक्ट बोलतोस हं समीर !
समीर : ( खळखळून हसत ) But I really mean it!
दीपाली : समीर , आज काल च्या जमान्या मधे फ़िल्म्स मधे येण्या साठी अभिनया बरोबरच Well built, 6 pack abs असणं must आहे का ? अगदी किंग खान सारखे अभिनेतेही नव्या जमान्याच्या मागणी प्रमाणे नव्याने body sculpting वर मेहनत घेताना दिसतात ! तुला काय वाटतं , तुला जे roles मिळाले त्यात तुझ्या looks, physique चा जास्त वाटा होता कि टॅलेंट चा ?
समीर: Well, मी म्हणेन कि My personality is an extra asset with me. पण फ़क्त looks,physique मुळे कोणी चांगला अभिनेता बनत नाही ! फ़क्त दिसण्याच्या जोरावर कोणीच काम देणार नाही !
दीपाली: अभिनया बरोबर ,Item songs मधे special appearance करायला आवडेल कि नाही ?
समीर : अर्थात , एकदम मजा येइल मला करायला मिळालं तर ! अत्ता मी produce करत असलेल्या film मधे तशी situation नाही पण पुन्हा कधी तशी situation मिळाली तर मला स्वत : ला Item song करताना screen वर पहायला खूप आवडेल ( हसत ).
दीपाली : समीर , गेल्या वर्षी आलेल्या ' ओम शान्ति ओम ' मधे श्रेयस तळपदे चा शाह रुख ला म्हणतो कि ' मखिजा ' surname के साथ तू कभी superstar नही बन सकता . तुला काय वाटतं , खरच कपुर किंवा खान अशा surname मुळे एखाद्या actor च्या भोवतीचं वलय वाढतं का ? निदान इतर new comers पेक्षा त्यांचा struggle सोपा होतो का ?
समीर : हो , तसा फ़रक नक्कीच पडतो , म्हणजे जर एखाद्या new comer ला break मिळवण्या साठी दहा पायर्‍या चढाव्या लागत असतील तर याच्या सात पायर्‍या आधीच चढून झालेल्या असतात इतका फ़रक नक्कीच पडतो ! पण super star बनायला त्यालाही पुढच्या तीन पायर्‍या अटळ च आहेत !
शिवाय तो ' कपुर ' नुसता कपुर असून चालत नाही तर तो हिन्दी फ़िल्म्स मधल्या सुप्रसिध्द राज कपुर च्या खानदानातला कपुर असेल तरच , नाही तर त्यालाही 1 to 10 पायर्‍या चढाव्या लागतातच ( खळखळून हसत ).
खान super stars मधे शाहरुख हा कुठलीही फ़िल्मी background नसताना अगदी शून्यातून सुरवात करून स्टार झालाय हा आदर्श सगळ्यांनी समोर ठेवावा !
आपल्या मराठीतलच पहा , मराठी लेखकां मधे ,' देशपांडे ' खूप सापडतील , पण पु . ल . देशपांडे एकच आहेत !
तसच कुठलाही कपुर काही राज कपुर होईल च असं नाही किंवा कुठलाही खान आमिर किंवा शाहरुख बनेलच असं नाही ! थोडक्यात संघर्ष कोणालाच चुकलेला नाही !
दीपाली : समीर , मराठीचा विषय काढलास म्हणून विचारते , हिंदी चित्रपटां मधे मराठीतून अनेक स्टार अभिनेत्री आल्या ! पण मराठी अभिनेत्यां मधून मात्र म्हणावे तसे super stars हिंदी सिनेमाला दिले नाहीत ! आणि तसं पहायला गेलं तर टॅलेंट ची मराठी अभिनेत्यां मधे कधीच कमी नव्हती , नाही !
पण बरेचसे मराठी अभिनेते character roles किंवा कॉमेडी करताना दिसतात ! Hero material value किंवा स्वत : च्या नावा वर गर्दी खेचणारे मराठी अभिनेते त्या मानाने कमी का ? तुला काय वाटतं , कुठे कमे पडतात मराठी मुलं ?
समीर : ( हसत ) तुला सांगू का दीपाली , अग आपल्या मराठी रक्ता मधे एक गुण च आहे कि आपण फ़ार लवकर सुखवस्तु बनतो . जॉब confirm झाल्यावर एकदा आणि मग थेट retirement चे पेढे द्यायचे अशी पूर्वी मराठी लोकांची एक tendency च होती ! खूप वेगळ्या field मधे जाऊन struggle करण्याचे वृत्ती च कमी होती ग सामान्य मराठी माणसात ! शिवाय looks, physique अशा गोष्टीं कडेही जास्त लक्षचे द्यायची नाहीत लोक !
पण अता मात्र हळु हळु चित्रं बदलतय ग ! अत्ताच्या पिढीला समजलय कि इतक्या लवकर आपण सुखवस्तु झालो तर का sss ही खरं नाही !( खळखळून हसत )Infact मला वाटतं कि मराठी सिनेमाचा प्रेक्षक सुध्दा बदलतोय , आज निरनिराळ्या multiplex मधे लोक मराठी सिनेमाला सुध्दा हिंदी सारखीच गर्दी करायला लागले आहेत !
हिंदी सिनेमा किंवा मराठी सिनेमा अशा कॅटॅगरीच हळु हळु कमी होत आहे . भाषेची पर्वा न करता फ़क्त चांगला subject, चांगला सिनेमा पहायला आजच्या प्रेक्षकांना आवडु लागलाय !
आपल्या मराठी सिनेमालाच हिंदी सिनेमा सारखे ग्लॅमर लवकरच पहायला मिळेल अशी आशा करायला हरकत नाही .
अता तूच म्हणातेस तसं मायबोली वर येणार्‍या निरनिरळ्या देशातल्या लोकांचच उदाहरण घे , इतर देशां मधे राहूनही तुम्ही मराठी सिनेमा मधे ineterest घेताच ना ? मग तो दिवसही दूर नाही जेंव्हा मराठी सिनेमाचे सुध्दा world premiere होतील !
हिंदी मराठी दोन्ही सिनेमां मधे चांगले मराठी ऍक्टर्स तू म्हणातेस त्या 'Hero-superstar' पदावरही ही लवकरच दिसतील ! मी या बाबतीत नशीबवान ठरलो .. कि अत्ता पर्यंत मला जे काही roles मिळाले ते 'Hero material वाले मिळाले ( हसत )
दीपाली : समीर , तुला हिंदी फ़िल्म्स मधे आणि मराठी film industry मधल्या work culture मधे काय फ़रक वाटला ? हिंदी मधले co stars मराठी पेक्षा खूप वेगळे होते का ?
समीर : आपल्या मराठी film industry मधे अगदी घरगुती वातावरण असतं गं ! आपला अवाका अजुन तरी खूप छोटा आहे , अगदी कमी budget मधे देखील खूप सुंदर सुंदर चित्रपट बनतात , खूप आपलं वाटतं मराठी मधे काम करताना !
अर्थात हिंदीची मजा पण वेगळीच आहे . तिथे professionalism जबरदस्तं आहे . लोक इतके professional असतात , आपलं जेवढं काम आहे ते करून आपापल्या van मधे जाऊन बसणे पसन्त करतात . मराठी सारख्या Set वर एकमेकांशी intereactions फ़ारशा होत नाहीत . तरीही माझ्या सगळ्याच co stars बरोबर काम करताना मजा आली .
विद्या बालन बरोबर काम करण्याचा अनुभव चांगला होता . अजुनही अधून मधुन sms वर गप्पा होतात .
रवीना , शमिता शेट्टी were fantastic co stars.
आणि तुला अजुन एक नाव सांगतो , अगं ' राफ़्ता राफ़्ता ' मधे शक्ति कपुर बरोबर काम करताना काय सॉलीड धमाल आली म्हणून सांगू ! I swear त्या माणसाचा sense of humour जबरदस्तं आहे ! सत्ता मधे अतुल कुलकर्णी , रेनकोट मधे अजय देवगण बरोबर काम करतानाचा अनुभव खूप छान होता .
ऋतुपर्ण घोष बरोबर काम करतानाचा अनुभव तर फ़ारच वेगळा ! ऋतु फ़क्त बंगाली किंवा English मधे बोलतो , त्याच्या set वर चं culture पण वेगळच असायचं , मजा आली मला रेनकोट करताना ! रेनकोट च्या सेट वर दोन दिवसांच्या schedule मधे ऐश्वर्या राय ची काम करण्याची पध्दतही पहायला मिळाली , खूप professional, जबरदस्तं dedicated आहे ती .
दीपाली : समीर , तुझ्या सध्या चालु असलेल्या projects विषयी सांगशील ?
समीर : मी आणि आप्पुनी बनवलेल्या निरोप बद्दल तर सुरवातीला सांगितलच ! आमच्या home production च्या पहिल्याच चित्रपटाची नुकतीच Poona International film Festival निवड केली गेली . यात एकुण आठ films निवडल्या गेल्या , त्यात ' निरोप ' ने ही स्थान मिळवलं . पंधरा आणि सोळा जानेवारीला screening shows झाले . sam3.jpg
नवीन कामा मधे सध्या NDTV imagine वर राजश्री productions ची ' मै तेरी परछाई हूं ' ही long running serial पण चालु आहे .
दीपाली : समीर , एक प्रेक्षक म्हणून तुला स्वत : ला ' ये जो है जिन्दगी , मालगुडी डेज , नुक्कड अशा limited भागांच्या serials आवडतात कि सध्या चालु असलेल्या कधी न संपणार्‍या डेली सोप मालिका ?
समीर ( हसत ): Well, you just can't compare them with what we are doing now a days ! Very honestly, this is right from the bottom of my heart statement. तो जमानाच फ़ार वेगळा होता .
अत्ताच्या या मोठ्या serials वर्ष भर छान चालतात पण नंतर बहुतेक प्रेक्षकांना किंवा मालिका बनवणार्‍यांनाच कंटाळा येतो ! अर्थात तरीही प्रेक्षक या मालिका पहाणं काही सोडत ते नाहीत ( खळाखळून हसत .)
अगदी आठ दहा वर्षं तेच तेच चालु असलं तरी प्रेक्षक वर्ग आहेच ! प्रेक्षक बहुदा कथानका पेक्षा त्यातल्या characters वर प्रेम करतात . अशी characters वर्षानुवर्षं चालु ठेवणे हे पण एक skill च म्हणायला पाहिजे ! जोवर असे प्रेक्षक आहेत तोवर अशा serials बनणे काही थांबणार नाही हे मात्र नक्की !
दीपाली : तू अत्ता करत आहेस ती ' मै तेरी परछाई हूं ' पण long running च आहे ना ?
तुला अशा मालिकां मधे अभिनय करताना monotonous वाटतं नाही का ?
समीर : तशी ही मालिका नुकतीच सुरु झाली आहे . अत्ता तरी मजा येतेय , ही माझी पहिलीच long going serial आहे , त्यामुळे monotonous वाटतं कि नाही हे अत्ताच नाही सांगू शकणार !
दीपाली : पुन्हा एकदम पॉलीटिकली करेक्ट !
समीर ( हसत ): तू हा प्रश्न मला एक वर्षांनी विचारलास तर कदाचित मी तुला उत्तर देउ शकीन .
दीपाली : समीर , आगामी फ़िल्म्स मधे आम्हला समीर धर्माधिकारी कुठल्या प्रकारच्या भूमिकां मधे पहायला मिळेल ? मराठी heros मधे सहसा कमी पहायला मिळणारा hunk look तुझ्या कडे आहे , अता home production मधे उतरला आहेस तर तुझा Hunk look कॅश करायचा काही प्लॅन आहे कि नाही , तुझ्या fans ना ( विशेषत : मुलींना ) याचं उत्तर ऐकायला आवडेल .
समीर : ( खळखळून हसत ) हो , नक्की आवडेल गं , पण अर्थात च चांगल्या films करत असताना . Future plans बद्दल सांगायचं तर film production मधे नक्कीच काम करायचय . चांगल्या films बनवायच्या आहेत . अभिनेता म्हणून वर्षाला एक तरी चांगली film झाली पाहिजे ज्यात मला आणि प्रेक्षकांनाही आनंद मिळाला
पाहिजे .

दीपाली : समीर , तुझ्या येणार्या सर्व projects साठी आणि ' निरोप ' साठी पुन्हा एकदा शुभेच्छा ! आमच्या maayboli.com कम्युनिटी विषयी कधी ऐकलं आहेस का ?
समीर : अपर्णा कडून ऐकलं होतं . पण अजुन मी स्वत : आलो नाही मायबोली वर .
दीपाली : एकदा तरी जरुर भेट दे मायबोलीला , आणि बाकी काही नाही वाचलेस तरी My crushes BB नक्की पहा , celibrity crushes मधे तुझं नाव बरेचदा दिसेल .
समीर : wow, अशी पण चर्चा चालते का , जरुर येइन मग एकदा ( हसत ). Crush list मधे माझं नाव लिहिणार्‍या मुलींना आणि माझ्या इतर fans ना मना पासून धन्यवाद !
दीपाली : समीर , समारोप करण्या पूर्वी कॉफ़ी विथ करन style rapid fire questions विचारु का ?
समीर : अरे जरुर , Please go ahead !
दीपाली : ठिक आहे समीर , you all set?
समीर : Yes!

दीपाली : First Crush
समीर : The nurse who picked me up after my birth , that was the first time when I said "wow what a babe!"( हसत )
दीपाली : Khan in Bollywood ?
समीर : आमिर .. अर्थात !
दीपाली : Best physique ?
समीर : ह्रितिक !
दीपाली : Best figure?
समीर्: सोनाली बेन्द्रे & शिल्पा शेट्टी ! But Sonali looks more natural, so सोनाली बेन्द्रे !
दीपाली : मराठी सिनेमा मधला सर्वात सुंदर चेहरा ?
समीर : जयश्री गडकर इन Black & white !
दीपाली : हिंदी सिनेमातला सर्वात सुंदर चेहरा ?
समीर : अर्थात मधुबाला !
दीपाली : Very Well done समीर ! अता काही पर्याय असणारे प्रश्न आहेत , तुझा आवडता पर्याय तू निवडायचास .

दीपाली : Small screen or Big Screen?
समीर : Big screen of course !
दीपाली:मराठी चित्रपट / हिंदी चित्रपट ?
समीर : चांगले चित्रपट !
दीपाली: मधुर भांडारकर चा आगामी / ऋतुपर्ण घोष चा आगामी ?
समीर : मधुर भांडारकर चा अगामी !
दीपाली : मॉडेलिंग कि अभिनय ?
समीर : दोन्हीची भेल पुरी किंवा रगडा पुरी म्हण हवं तर !
दीपाली : Best looking actor in today's marathi cinema, पर्याय : अंकुश चौधरी / श्रेयस तळपदे / सुबोध भावे / समीर धर्माधिकारी
समीर : Well, अंकुश !
दीपाली:मला वाटलं तू म्हणाशील ' समीर '!
समीर : तो पर्याय तुम्ही सगळ्यांनी निवडा ( हसत )
दीपाली: दादा कोंडके / लक्ष्या / अशोक सराफ़ / मकरन्द अनासपुरे / भरत जाधव
समीर : दादा कोंडके आणि लक्ष्या !
दीपाली: पुण्याच्या मुली कि मुंबईच्या मुली :
समीर : बस का , अर्थात पुण्याच्या मुली यार !

दीपाली : Great choices समीर , शेवटचा choice तर फ़ार च चांगला होता !
समीर : अर्थात च ( खळखळून हसत !
दीपाली: बर , अता करण सारखं कॉफ़ी हॅंपर नाही पण मायबोली तर्फ़े तुला ही e-flowers!
psp3.gif
आणि वेळात वेळ काढून दिल खुलास गप्पा मारल्या बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद !
समीर : Any time ! It was my pleasure , दीपाली ! Thank you!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसर्‍या भागाची वाट बघत होतो. छान मनमोकळी मुलाखत. हा चेहरा ओळखीचा होता, पण नाव माहित नव्हते.
या क्षेत्रात मराठि माणुस इतका लोकप्रिय आहे, हे वाचून छान वाटले.

किती वेळा त्याला खळखळून हसवलेस Happy

दिपाली, भाग २ आणखी छान लिहिला आहेस.

खर तर ' खो खो ' हा शब्द वापरायचा होता , जो अजुन विनोदी वाटत होता.
या बाबतीत इंग्रजी बरं असतं, 'laughs', smiles हे रीमार्क्स कसे सहज वाटतात :))

सही!! हा भाग फारच छान झालाय! मस्त sense of humor and wit आहे की समीरकडे.. मजा आली वाचायला!

आणि काय खतरा फोटो टाकलेस! ऑफिसमधे काम करायचंय गं!! Wink

डिजे,मुलाखतीचा हा भाग मस्त झालाय... मजा आली वाचायला.. आणि या गप्पांमधुन पुन्हा एकदा मनमोकळा
समीर दिसला..

मुलाखतीचा हा दुसरा भाग एकदम मस्त......... तो बाईकवरचा फोटो एकदम खत्तरनाक!!

त्याला पहिल्या आणि दुसर्‍या भागाची लिंक पाठवली असशीलच तू. नुसते प्रतिसाद वाचूनच त्याला त्याचं फिमेल फॅन फॉलॉविंग (चपखल मराठी शब्द सुचला नाही) समजेल. फक्त माझा प्रतिसाद वाचला तरी बस्स् .......... :))

चांगले प्रश्न विचारले, तशीच समीरची उत्तरेही समर्पक. छान मुलाखत.

DJ मस्त झालीये मुलाखत .. आणि ह्या समीर धर्माधिकारी ने पण अगदी प्रॅक्टीस केल्यासारखी उत्तरं दिली आहेत ..

पण छान वाटलं मुलाखत वाचायला ..

आणि हो, पुणेकर मुलांना पुण्याच्या पोरीच जास्त आवडतात हे मुंबईकर उत्तर वाचून आनंद झाला .. Lol

मस्त झाली आहे मुलाखत.

: Best looking actor in today's marathi cinema, पर्याय : अंकुश चौधरी / श्रेयस तळपदे / सुबोध भावे / समीर धर्माधिकारी
समीर : Well, अंकुश !
दीपाली:मला वाटलं तू म्हणाशील ' समीर '!
समीर : तो पर्याय तुम्ही सगळ्यांनी निवडा ( हसत )

<< एकदम हजरजबाबी उत्तर आहे हे Happy

मस्तआहे हा भाग पण, अजुन काही प्रश्न हवे होते शेवटी rapid fire मध्ये अस वाटते..

छान झालीये मुलाखत.

अगदी अगदी सशल, ते पुण्याचे मुले हेच टीपीकल उत्तर देतात.... नवीन काही अपेक्षा न्हवतीच पुण्याच्या मुलाकडून. दुसरे म्हणजे बायकोला खुष करायला चांगले उत्तर.

(मुंबईच्या मुलींना कुठे पुण्याची मुले आवडतात ... काही अपवादात्म्क पुणे मुले आहेत!)

दुसरे म्हणजे बायकोला खुष करायला चांगले उत्तर.
मुंबईच्या मुलींना कुठे पुण्याची मुले आवडतात ... काही अपवादात्म्क पुणे मुले आहेत
<<< lol manu.. शांत हो, असु दे कि त्याचा choice त्याला पाहिजे तसा, तेरे को क्यूं मिर्ची लगी Happy
बर्‍याच अपवादात्मक पुणेरी मुलां कडून बरेचदा हे उत्तर मिळालेलं दिसतय तुला :D:D, दिवे घे .

छे ग मला कसली मिर्ची लागतेय ग... पुण्याचे लोक काही का म्हणोत ग. मुद्दा हाच की हेच टीपीकल उत्तर अपेक्षीत होते नी आंनद झाला कारण अजून'ही' मुंबईच्या मुली 'उभे' करत नाही पुण्याच्या मुलांना हेच सिद्ध झाले ह्या वाक्याने. मग हेच गुळमळीत उत्तर देणार ना पूणेरीमुलगे. Happy
आणि अजून मुंबई 'ओस' नाही पडली ग बाई मुलांच्या बाबतीत. अपवादात्म्क मुले ही 'मार' खावून सरळ झाली ह्या गटात मोडतात. आता 'मार' कसा खल्ला ह्या डीटेलात उगीच नको जायला. Happy
बरे ह्याच्यावर पुण्याचा कोणी 'विट्ठल' बाजू घेवून लढणार असेल तर लढा बाई. मला उगाच वाद नको हां. Happy

असो, बरे चांगली घेतलीस मुलाखत हां.

बरे ते नेहमीचेच दिवे लालटेन घ्या वगैरे वगैरे.

डिजे,
मिरची लागली गं बरोबर. Happy
बाकी मुलाखत मस्त. सम्या जसा आहे तसा बरोबर पकडलायस.
BTW अप्पिच्या तोंडून कधी ऐकलंयस का त्यांची भेट कशी झाली ते. ती अजूनही मस्त रंगवून सांगू शकेल. I am sure!

आणि हो परत एकदा कळलं ना डिजे मुंबईच्या मुली किती अतिशहाण्या, superficial असतात, स्वत:ला कोणीतरी फार मोठं समजतात ते.

आता घ्या दिवे आणि वाद तर मुळीच नकोत.

Thank you, सर्वांना .
समीर च्या चाहत्यांच्या भावना पोचवल्या समीर पर्यंत Happy
लोपा,
हो ग, more interesting-naughty questions अजुन भरपूर विचारायला हवे होते रॅपिड फायर मधे, काही नंतर आठवले, काही मायबोली च्या बाळबोध रुपाला शोभेनासे होते..काही दोन तासा पेक्षा जास्त वेळ होउन गेला म्हणून समीर चा जास्त अंत न पाहता आवरते घेतले:)
अज्जुका,
ऐकायलाच पाहिजे अपर्णा कडून :), समीर कडून ऐकलं होतं मागे काही तरी, एकदम फिल्मी पहला प्यार style Happy
अगं मनु,
कोणीच वाद घालत नाहीये .ज्याची त्याची पसंती:), पण कोणाला कोण आणि का आवडावं या मागचं कारण कशाला शोधत बसायचं उगीच Lol

काय धम्माल मुलाखत घेतली आहेस गं.....!! मज्जा आली वाचून. माझ्या डोळ्यासमोर अगदी चित्र उभं राहिलं.

समीर धर्माधिकारी माझा पण अतिशय आवडता आहे.....!!

मने बस्स बर का Happy समीर धर्माधिकारी बद्दल चाल्लय ना बोलणं ? त्याला मुंबईच्या मुली उभे करणार नाहीत असं म्हणतेस की काय!! बास की आता, दिसतय ना वरच्या कमेन्ट्स मधे Happy

कॉफी विथ डीजे एकदम मस्त वाटले. मी समीर धर्माधिकारी हे नाव ऐकुन आहे कधी बघितले नाही त्याचे काम.
समीरने सगळी उत्तरे एकदम व्यावसायिक कलाकारासारखी (polytically correct) दिली आहेत.
मुलाखत वाचायला आवडली. या मुलखतीसोबतच त्याची सकाळ मधली पण मुलाखत वाचली त्यामुळे ती वाचल्यावर समजते की त्याने इथे किती दिलखुलास गप्पा मारल्यात ते.

Deeps, छान झाली आहे ग मुलाखत. मला तर तुझ्यातला मुलाखत घेण्याचा talent एकदम आवडला. तुझा नवा पैलू दिसला. तुला त्यात करियर करायला हरकत नाही.

मने, कोल्ह्याला द्राक्षं तर आंबट नाही न? Happy

छान घेतली आहे मुलाखत. Happy
विचारलेले प्रश्न अगदी योग्य आणि त्यावर उत्तर देखील हजरजबाबी.
रॅपिड राउंड आवडला.
पॉलिटिकल उत्तरे Happy