समीर धर्माधिकारी - भाग १

Submitted by दीपांजली on 21 March, 2008 - 01:53

समीर धर्माधिकारी :
samir.jpg

एक यशस्वी मॉडेल , अभिनेता ! मुलींच्या भाषेत बोलायचं झालं तर ' मराठी हंक '!
आज वर अनेक सुप्रसिध्द जाहिराती , हिंदी मराठी टी व्ही मालिका , चित्रपट केल्या नंतर अता समीर producer बनून येत आहे ' निरोप ' हा मराठी चित्रपट घेऊन !
समीर ला आमची कॉलनी खूप वर्षां पासून म्हणजे तो अगदी शाळेत असल्या पासून ओळखते ! तो आमच्या कॉलनी मधे रहायचा नाही पण त्याचे अनेक जीवा भावचे मित्र , त्याची बायको ' अपर्णा ' हे सगळे खास लोक आमच्या कॉलनी मधले !
त्यामुळे अगदी अभिनव विद्यालयाच्या गणवेशातला समीर , विचित्र आवाजाच्या पिवळ्या मोपेड वरून आवाज करत येणारा कॉलेज मधला समीर , दिवसें दिवस जास्तच stylish होत गेलेला समीर हा विक्रम गृह योजने मधल्या बर्‍याच लोकांना ( विशेषत : मुलींना ) चांगलाच लक्षात आहे !
माझा अत्ये भाऊ ( समीर च्या भाषेत ' बंड्या ') आणि समीर हे अगदी खास दोस्त ! त्यामुळे समीर आमचा अगदी family friend! पूर्वी सारखाच आजही तो तितकाच down to earth आहे .
मायबोली साठी मुलाखत देणार का विचारल्यावर कुठलेही आढे वेढे न घेता समीर ने त्याच्या busy schedule मधून लगेच appointmnet दिली . इतकच नाही तर पत्रकारांच्या गराड्यातून बाजुला येउन तब्बल दोन तास त्यानी मायबोलीच्या मुलखती साठी दिलखुलास गप्पा मारल्या , त्या बद्दल त्याचे मायबोली तर्फ़े धन्यवाद.

दीपाली : समीर सर्व प्रथम ,' निरोप ' हा तुझा Home production चा पहिला मराठी चित्रपट
लवकरच प्रदर्शित होतोय , त्या बद्दल मायबोलीकरां तर्फ़े तुझं अभिनंदन आणि शुभेच्छा !
समीर : सर्वांना धन्यवाद !
दीपाली : समीर , खूप गप्पा मारायच्या आहेत , अगदी तुझ्या मॉडेलिंग च्या दिवसां पासून !
पण लवकरच ' निरोप ' प्रदर्शित होतोय , तेंव्हा रसिक प्रेक्षांना सर्व प्रथम निरोप बद्दल काही सांगशील ?
समीर : खर म्हणजे निरोप च्या कथानका विषयी अत्ताच काही सांगितलं तर सगळी मजा जाईल . म्हणून कथानका विषयी काही सांगत नाही , पण रसिक प्रेक्षकांना थिएटर ला पहाताना नक्कीच आनंद मिळेल असा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलाय ! निरोप मधून आम्ही मराठी चित्रपट प्रेमीं साठी कोकणातल्या अतिशय निसर्गरम्य भागाचे दर्शन घडवलय . अपर्णानी ( सुप्रसिध्द कॅमेरा वुमन अपर्णा धर्माधिकारी ) यात कॅमेरा न करता Chief assistant director आणि production च्या महत्त्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत . मुख्य दिग्दर्शकाची जवाबदारी सचिन कुंडलकर ने पार पाडलीये , त्याच्या बरोबर मी या पूर्वी रेस्टॉरंट हा मराठी सिनेमा केला होता . कलाकारां मधे माझ्या बरोबर देविका दफ़्तरदार शिवाय एक फ़्रेंच अभिनेता , सायरिल ' दिसतील . निरोप च्या निमिताने माझी पहिली स्वनिर्मीती ही मराठी सिनेमाच असेल हे माझं स्वप्नं पूर्ण होत आहे , प्रेक्षकांना ते आवडेल अशी आशा करतो ! samir2.jpgदीपाली : जरुर समीर , सर्व मराठी रसिकांचा भरपूर प्रतिसाद नक्कीच मिळेल अशा आमच्या कडून शुभेच्छा !
समीर : धन्यवाद !
दीपाली : समीर , मॉडेलिंग ते producer, तुझा अत्ता पर्यंतचा प्रवास कसा झाला हे ऐकायला
आमच्या मायबोलीकरांना नक्कीच आवडेल . आपल्या गप्पांची सुरवात अगदी सुरवाती पासून केली तर चाले ना ?
समीर : हो , अगदी नक्की !
दीपाली : समीर , तुझ्या family background, education बद्दल थोडं सांगशील ?
समीर : हो , मुळात मी अगदी typical middle class, working class कुटुंबात वाढलो .
माझे वडिल टेल्को मधे होते आणि मी पण Engineering संपवून decent job करत होतो .
पण जॉब करत असताना मग अचानक मला असं वाटायला लागलं कि आपण engineer च्या जॉब पेक्षा ऍक्टर जास्त चांगले होउ शकतो ( हसत ).
दीपाली : अचानक ?
समीर : हो , खरच मी आयुष्यात कुठलीच गोष्ट अशी well planned केलीच नाही .
सुरवातीला मी हे ऍक्टिंग चं प्रेम पण एवढं seriously घेतलं नाही पण जेंव्हा seriously घ्यायला सुरवात केली तेंव्हा मात्र नोकरी सोडली आणि अभिनयातच career करायचा निश्चय केला .
दीपाली : पण समीर , मुळात तुला अचानक या profession बद्दल आकर्षण वाटायला काय कारण घडलं ? शाळा - कॉलेज मधे असताना कधी अभिनय , fashion shows केले होतेस का ?
समीर : नाही ग , अजिबात नाही ! Infact, कॉलेज मधे असताना मी फ़िल्म्स करण्या बद्दल कधीच फ़ॅंटसाईज केलं नव्हतं. तसा विचारही केला नव्हता आणि ramp shows पण करत नव्हतो .
दीपाली : मग तुला तुझा 'Hero material look', physique यामुळे मिळणारे मुलींचं special attention हे तर कारण नव्हतं ?
समीर ( हसत ): हो , ते एक कारण होतच ! म्हणजे रस्त्यानी जाणार्‍या दहा
मुलीं पैकी किमान तीन - चार तरी मागे वळून पहायच्या तेंव्हा वाटायचं खरं कि Yes, I have got some charm in me! पण सर्वात आधी मला मॉडेलिंग मधे येण्या साठी प्रोत्साहन देणारी होती माझी बायको , अपर्णा ! अप्पुनी खूप support केलं त्या वेळी , म्हणून माझ्या career ला सुरवात झाली . ती मला नेहेमी म्हणायची कि ,Samir, u have got charm, u carry urself so well, why don't you try modeling? तिनी खरच इतकं छान सपोर्ट केलं कि I just decided, कि बास अता मात्र हे seriously घ्यायचच आणि मग अर्थातच त्या साठी मुंबई गाठली .
दीपाली : म्हणजे सुरवात अपर्णामुळे झाली तर ! समीर , अपर्णा स्वत : उत्तम camera person आहे , तुझे सुरवातीचे portfolios पण तिनेच केले का ?
समीर : नाही , आम्ही जेंव्हा भेटलो तेंव्हा अप्पु commercial artist होती . आम्ही दोघं जेंव्हा गप्पा मारायचो त्या अगदी भिन्न भिन्न विषयांवर असायच्या ! मी एकदम technical बोलायचो , ती मात्र खूप artistic बोलायची , आमच्या गप्पा मारायच्या भाषा पण वेगवेगळ्या असायच्या . मी इंग्रजाळलेलं मराठी बोलयचो आणि ती मात्र हुजुरपागेची असल्याने शुध्द मराठी बोलायची ! नंतर माझं मराठी पण हळु हळु तिच्या मुळेच सुधारलं असं म्हणायला हरकत नाही . Anyways, तर मी जो पहिल्यांदा पैसे देउन portfolio करून घेतला तो बंटी प्रशान्त कडून. नंतर अगदी सहज किंवा time pass म्हणून amature artists चा एक फ़ॅशन शो केला . माझ्या सुदैवाने मला योग्य त्या वेळी योग्य व्यक्ती भेटल्या . त्या show मधे पाहून मला पुण्याच्या राजेश बॅनीं नी पहिला commercial break दिला . तो माझा खरा पहिला commercial show होता , मला खरच ramp walk साठी पैसे मिळणार होते !
दीपाली : मग अजुनही आठवतो का पहिल्या ramp show चा पहिला outfit ?
समीर : हो , अर्थात ! मी शेरवानी घातली होती ,I still have it with me, gifted by the designer because we had one prize for it. राजेश बॅनीं बरोबर मी खूप ramp shows केले , ते नेहेमी सांगायचे कि जर modelling मधे career करायचं असेल तर मुंबईला जायला हवं ! त्यांनी माझ्या हातात एक दिवस चक्क एक print out दिली ज्यात मुंबईच्या काही लोकांचे पत्ते दिले होते , कि हे घे आणि सगळ्यांना contact कर ! मुंबई मधे माझ्या खूप चांगल्या मित्रा कडे ,' बंड्या ' कडे राहिलो . त्यानी पण मला खूप सपोर्ट केलं . खरच , या काळात मला अगदी एन्जल्स भेटत गेले , मी स्वत : ला या बाबतीत खूप भाग्यवान समजतो ! बंड्या नंतर ' मन्सूर राज ' यांच्याकडे काही दिवस भाड्यानी राहिलो , मग मात्र हळु हळु पैसे साठवून मुंबई मधे स्वत : चं घर घेतलं .

दीपाली : समीर , मग या स्ट्र्गल नंतर तुला सर्वात पहिल्यांदा posters, cut outs मधे झाळकवणारी यशस्वी ऍड कोणती होती ?
समीर ( हसत ): रेड लेबल व्हिस्कीची ऍड ! खरं तर माझी ती तिसावी वागिरे ऍड होती पण लोकां मधून ' माझा चेहेरा म्हणजे रेड लेबल चा मॉडेल ', असे समीकरण पटवून देणारी ही पहिली यशस्वी ऍड होती .
त्या नंतर मग Raymond मधेही confirmation मिळालं ! रेमंड मुळे पण मला खूप लोकप्रियता मिळाली .
दीपाली : अगदी बरोबर समीर ! Raymond ची तुझी ऍड खूप लोकप्रिय झाली होती .
पण मला सांग जेंव्हा common man समीर चा स्टार मॉडेल समीर झाला आणि कर्वे रोड ला तुझी पोस्टर लागायला लागली तेंव्हा लोकांच्या कशा प्रतिक्रिया मिळायच्या ? विशेषत : मुलींचे mid night calls वगैरे अचानक वाढायला लागले कि नाही ? त्या काळातला एखादा तुला लक्षात राहिलेला किस्सा मायबोलीकरांशी share करशील ?
समीर : हो , जरुर ! अगं खूप छान छान लक्षात रहाणारे किस्से आहेत त्या काळातले . एक किसा सांगतो तुला , जो खरच खूपच memorable आहे . माझा अगदी लहानपणी पासून चा मित्र , त्याच्या लग्नाच्या खरेदीला गेला होता आणि अचानक lift बन्द पडली , लिफ़्ट मधे नेमकं माझं पोस्टर पाहून तो एकदम ओरडलाच , " हा तर माझा बालमित्र ! मग काय , त्याचा फ़ोन आला , कि प्लिज मला आणि माझ्या बायकोला येउन दहा मिनिटं तरी भेटच यार , that will be the best wedding gift for me ! मी त्याल म्हंटलं ," अरे भाऊ, अत्ता तर मी जाम अडकलोय , पण रात्री वेळ असला तर जरुर तुला फोन करीन . मग त्या रात्री त्याला आणि त्याच्या बायकोला कॉफ़ीचं केळवण दिलं , आणि ते दोघे इतके खूष झाले म्हणून सांगू ! माझ्या बालमित्रा साठी माझं भेटणं हे इतकं exciting असु शकतं हे पाहून खूप आनंद झाला ! ते feeling खरच खूप memorable होतं ! विद्या बालन बरोबर मी 1-2 ad films केल्या होत्या . त्यातली ' गोली कि हमजोली ' ही फ़ॅमिली प्लॅनिंग ची एक जाहिरात पण खूप memorable आहे , त्या ऍड ला बक्षिसही मिळालं होतं . सुरवातीला या ऍड साठी पटकन कोणी models तयार होत नसत पण आमच्या ऍड ला
award मिळाल्या नंतर every one wanted to act in that ad film. अशा खूप छान छान आठवणी आहेत कधीच विसरु शकणार नाही अशा . काही अचानक जागृत झालेले मित्रही आहेत , तर अजुनही अगदी हक्काने ' सम्या '
म्हणून हाक मारणारे बंड्या , रोहित , रणजित सारखे genuine friends पण आहेत . माझ्या fans मधे कधीच कोणी त्रास देणारे fans नव्हते .
काही तर अगदी day 1 पासून माझ्या अत्ता पर्यंतच्या कामा बद्दल आठवणीने प्रतिक्रिया देणारे genuine fans ही आहेत .
कधी कधी मुली कुठुन कुठुन mobile numbers शोधून काढतात आणि वर्षाला कमीत कमी एक दोन तरी sms आठवणीने करतातच .
दीपाली : समीर , ऍड्स करत असताना तू काही गाजलेल्या t.v. serials पण केल्यास , तो अनुभव कसा होता ?
समीर : It was wonderful experience. मी दामिनी , नुपुर , रेशीमगाठी या सगळ्या serials मी खूप enjoy केल्या , लोकांनीही माझ्या कामाला खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या . त्या नंतर मला मिळालेला सर्वात मोठा break होता मधुर भांडारकर चा सत्ता !
दीपाली : समीर , सत्ता तुला कसा मिळाला ? मधुर भांडारकर सारख्या दिग्दर्शका
बरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता , ते ऐकायला नक्कीच आवडेल .
समीर : सत्ता मला अगदी शिस्तीत screen test देउन मिळाला . मधुर भांडरकर च्या assistant ने माझे photo पाहून screen test ला बोलावलं आणि त्या नंतर पंधरा दिवसांनी मला result कळवला कि ," तू ही फ़िल्म करतोयेस " मधुर बरोबर काम करतानाचा अनुभव फ़ारच सुरेख होता . सुरवातीला त्याच्या बरोबर काम करण्याचा मी जरा धसकाच घेतला होता . पण मग मी ठरवलं कि जे काही काम आहे ते मन लाऊन करीन , इमानदारीने करीन . मधुर ची एक खूप छान क्वालिटी आहे कि तो कधीही stardom वर जात नाही . इतरां इतकाच तो मी नवखा असूनही माझ्या कामा वरही focus करायचा !
मधुर कलाकारांनी खूप स्वातंत्र्य देतो , ही पण त्याची खासियत आहे ! त्याची सर्वात जबरदस्तं क्वालिटी म्हणजे तो एक अप्रतिम narrator आहे ! त्याची narration ची style च फ़ार जबरी आहे , No one can beat him ! लोकां साठी माझा सत्ता मधला रोल एक धक्काच होता . कारण अत्ता पर्यंत मी फ़क्त बर्या पैकी next door किंवा glamerous असे roles केले होते . सत्ता मधला रोल मात्र चक्क ग्रे शेड मधला होता !
पण मला विवेक चौहान चा रोल करताना खूप मजा आली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मधुर बरोबर काम करण्याचा मौल्यवान अनुभव मिळाला !
दीपाली : समीर , हिंदी मधे तू सत्ता , रेनकोट सारखे off bit चित्रपट केलेस , ते करताना risky नाही का वाटलं ?
समीर : Off bit सिनेमा वगैरे काही नसतं गं ! सिनेमा एक तर चांगला असतो किंवा वाईट , बाकी कुठली कॅटॅगरी काही खरी नाही ! आपण हिंदी सिनेमा मधे उगीचच अशा कॅटगरीज आखून ठेवल्या आहेत !
फ़क्त item songs, super stars घेतले म्हणून प्रत्येक चित्रपट काही शोले सारखा यशस्वी होत नाही .
या उलट ' लगान ' सारखे लोकांच्या दृष्टीने off bit विषयां वरचे चित्रपट in bit विषय असलेल्या चित्रपटां पेक्षा चांगला व्यवसाय करतात . आज कालचा प्रेक्षक ही खूप बदललाय , चांगले आणि realistic विषय ते समजु लागले आहेत , which is really helping good film makers! पूर्वीच्या films वर नाटकाचा खूप प्रभाव होता , त्यामुळे त्या वेळचे चित्रपट अता पहाताना आजच्या पीढीला appeal होतीलच असे नाही . मला स्वत : दिलिप कुमार च्या देवदास पेक्षा शाह रुख खानचा देवदास खूप आवडला . आज काल आपल्या films चे patterns हळु हळु बदलत आहेत , Overall सिनेमा खूप natural tone ला गेलाय ! ऍक्टर्स खूप सहजतेनी वावरतात आणि कॅमेराही खूप easily वावरतो !
आणि जरी हे film pattern बदलले तरी पण जुने विचार मात्र अजुनही टिकून आहेत .

To be continued... (क्रमशः)
मुलाखत - भाग २ (अंतिम)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीर धर्माधिकारीची मुलाखत म्हंटलं कि मी टपकलेच Happy वाट बघतेय पुढच्या भागाची...

हो, टाकते लवकरच पुढचा भाग.

डिजे,छान चालू आहेत गप्पा.. समीरने अगदी मनमोकळी उत्तरं दिलेली दिसत आहेत..
समीरचा मुलाखतीच्या सुरूवातीचा फोटो सही आहे...:) रेमंडवाला आहे का?
मुलाखत कुठे घेतलीस?मुंबईत की पुण्यात?

मयुरेश,
पुण्यात च घेतली मुलाखत.
खूप छान गप्पा मारल्या समीर ने, पुढच्या भागात अजुन interesting गप्पा आहेतः)

सही चाललय डीजे. मस्त, सहज बोलतोय समीर. तुझे प्रश्न पण नेमके आहेत. टाक लवकर पुढचा भाग.

अजिबात बोर नाही झाली वाचताना.. तु ह्या समीरवर जास्तच फिदा वगैरे आहे असे वाटते वाचून Happy

Lol bee.. any doubt ! :):)

..पहिला फोटो कसला जबरीये Happy
मस्त चालल्यात गप्पा, आणि म्हणूनच छान वाटतय वाचायला. आने दो.

सही............... मस्त ग दिपांजली............ आणी त्याची रेशिमगाठी मस्तच.... शिवाय नुपुर मी फक्त तो होता म्हणुन बगायचे Happy

हेच.. आपलं.. हाच का समीर धर्माधिकारी!!
समीरला आगामी चित्रपटांसाठी ढीगभर शुभेच्छा.
डी जे, छान चाललयं, येऊ द्या पुढचं.

सम्याचं नाव वाचल्यावर मस्त वाटलं. त्या दोघांच्या struggle च्या सुरूवातीच्या काळात पाह्यलंय ते कशाकशातून गेलेत ते. अप्पीने खरंच खूप सॉलिड सपोर्ट केलंय त्याला.
अप्पी आहे गं ऑर्कुटवर माझ्या लिस्टमधे. तिला लिंक स्क्रॅप करून ठेव किंवा मी टाकते.

डिजे, तो पहिलाच फोटो पाहून हम होश खो बैठे. आता होश आल्यावर मुलाखत वाचेन. I am jealous on you. :)) btw, परत एकदा विचारतेय, राहिलेली मुलाखत घेण्यासाठी asst. म्हणून ने की मला तुझ्या बरोबर. माईक पकडून बसेन......... तेवढच डोळेभरून दर्शन. :))

धन्यवाद सर्वांना..
पुढचा भाग लवकरच टाकतेच आहे.
मुलाखत जरा मोठी झाली, record केलेला शब्द न शब्द ऐकून त्याचं देवनागरीकरण करणे lengthy आहे पण ASAP टाकतेय पुढचा भाग.
मंजु,
lol.. next time समीर ला भेटले तर तुला आणि इतर चाहत्यांना भेटायची परवानगी घेउन मगच भेटेन Happy
तोपर्यंत समीर चा नवीन सिनेमा बघः)
अज्जुका,
अपर्णा आहे माझ्याही orkut friends मधे.
निरोप ची सुरवात छान housefull झाली म्हणे Happy

छान मोकळी झालीये मुलाखत. फोटोपण मस्त.

पहिला भाग छान जमलाय. प्रश्नही चांगले विचारले आहेस.मला बर्‍याचदा समीर धर्माधिकारी आणि अतुल श्री मध्ये खूप साम्य वाटतं. खूप खूप वर्षापूर्वी भेटलेय समीर धर्माधिकारीला आमनेसामने. जेव्हा त्याची आई भारती विद्यापिठाच्या जवळ घरात मेस चालवायची त्याकाळी. छान आहे त्याची पर्सनॅलिटी.

छान सुरु आहे मुलाखत. Happy
पुढचा भाग येवु दे.
परवाच्या लोकसत्ता मध्ये "निरोप" चा रिव्यु आला होता.
चांगला आहे आणि वेगळा अस लिहिल होत Happy

आयला, हाच का तो समिर धर्माधिकारी???? ग्रेट!
च्यामारी जाहिरातीतला "हा" असा "पुणेरी" असेल असे वाटत नाही अजिबात! Proud
चालूद्या........ ऑल दी बेस्ट!
सगळी फिल्ड मराठी लोकान्नी गाजवली की कशी कॉलर ताठ होते ना?

शिल्लक मुलाखत वाचायची फार उत्सुकता आहे. लवकरात लवकर टायपायचे कष्ट घ्या.

अनेक दिवसांनी मराठी माणसाची मराठीमधे मुला़खत वाचायला मिळाली... समीरला त्याच्या पहिल्या मराठी चित्रपट निर्मितीसाठी शुभेच्छा! मराठी चित्रपटाची पूर्व्-श्रीमंती पुन्हा बहारास येवो ही सदिच्छा! आम्हा प्रवासी भारतीयांसाठी मायबोली हे खरोखर वरदान आहे... ज्यांच्या डोक्यात ही कल्पना आली आणि ज्यांनी ही प्रत्यक्षात साकारली त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद!
मुलाखतीच्या पुढच्या भागाची वाट पाहात आहे.

आशिष दामले
वरीष्ठ सल्लागार, मानवाधिकार आयोग, अफगाणिस्तान

डिजे एकदम रंगलिय बर का मुलाखत... पुढचा भाग लवकर येवु दे! समिरला "निरोप" साठि शुभेच्छा!

मस्त जमलिये मुलाखत, पुढचा भाग कधी?

दीपा,
छान चलल्या आहेत गप्पा! लवअकर वाचायला मिळुदे पुढ्चा भाग.
आरती

समीरच्या चाहत्यांसाठी....
NDTV Imagine वर 'मैं तेरी परछाई हुं' या सिरीयलमध्ये तुम्हांला समीरचा अभिनय बघायला मिळेल.

म्हणजे रस्त्यानी जाणार्‍या दहा
मुलीं पैकी किमान तीन - चार तरी मागे वळून पहायच्या तेंव्हा वाटायचं खरं कि Yes, I have got some charm in me!>>>>> --- बाकिच्य्या ६-७ मुलि married अस्तात का त्याना समिर अवदत नाहि? Happy

'मैं तेरी परछाई हुं' मि बघ्ते कधि कधि

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य सुन्दर आहे, त्याला आणखि सुन्दर बनवुया....!!!!!
Donate Eye - Bring Light to Blind...!!!