डिस्कव्हरी: खतरनाक रोडवरचा प्रवास!

Submitted by निमिष_सोनार on 27 July, 2021 - 04:54

हिमाचल प्रदेशातील मनाली ते लेह हे अंतर तीन सेलिब्रिटीज् (संग्राम, वरुण आणि मंदिरा) एकेका अनुभवी ड्रायव्हरला सोबत घेऊन ट्रक चालवत नेतात, आणि त्यांना दिलेला सामान ठरलेल्या ठिकाणी डिलिव्हरी करतात, हे बघायला खूपच थरारक वाटते.

समुद्रसपाटीपासून अंदाजे 6000 फूट, पासून ते अंदाजे 14000 फूट उंचीवर पोहोचतात.

इंडियाज डेडलीएस्ट रोड्स (भारतातील खतरनाक/प्राणघातक रस्ते) सिझन एक मधील एपिसोड एक, दोन आणि तीन मध्ये आपण "डिस्कव्हरी प्लस" वर बघू शकता. बरीच भौगोलिक माहिती मिळते. ज्ञान वाढते.

पर्वतावरील कडेकपारीतील खाचखळगे, चिखल, दगड, पाणी यांनी भरलेले (बहुतेक सगळे अरुंद) रस्ते, दरड कोसळण्याची भिती आणि हिमनद्यांमुळे कधीही आक्रमक होऊ शकणारे आणि मोठमोठ्या ट्रक्सला सुद्धा पाण्याच्या प्रवाहाने दरीत ढकलून देण्याची क्षमता असणारे धबधबे यांची सतत डोक्यावर टांगती तलवार, धुक्यामुळे 50 मीटरच्या पुढचे न दिसणे, उंचीमुळे ऑक्सिजनची कमतरता असे सगळे अडथळे पार करत या तिघांना आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचताना बघणे म्हणजे खूप वेगळा अनुभव ठरतो.

आणि हे सगळे कॅमेरात शूट करून ते आपल्यापर्यंत क्रिस्प एडिटिंग करून पोचवणे हे खरंच रिस्की काम आहे. संपूर्ण टीमचे कौतुक वाटते. तुम्हाला रियल लाईफ मधील थरारक असे काही बघायचे असेल तर हा कार्यक्रम नक्की बघू शकता!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदीरा ही कंटाळवाण्या क्रिकेटला क्रिस्पी बनवण्यासाठी आणलेली कलाकार होती. आणि अचानक तिचे हिमाचलमधले ट्रक ड्राइविंग एपिसोड ही कल्पना कुणाला सुचली त्याला नमस्कार. भारी आहे.

>>> समुद्रसपाटीपासून अंदाजे 6000 किमी पासून ते अंदाजे 14000 फूट उंचीवर पोहोचतात. >>>

काही तरी गफलत होते आहे.
६००० फूट म्हणायचे आहे का?

६००० फूट, बरोबर आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. मूळ लेखात तसा बदल केला आहे.