गिरनार पौर्णिमा.

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 July, 2019 - 13:45

गिरनार पौर्णिमा.
*************
शुभ्र चांदण्यात
लख्ख पायवाट
रुपे पावलात
पसरले ॥

व्यापून नभास
शुभ्र पूर्ण चंद्र
भरला आनंद
पर्णो पर्णी ॥

दूरवर कुठे
गुरूंची शिखर
पदपदावर
परी भेट .॥

भोवती लहरी
वायूच्या नाचती
जणू की सांगती
चाल पुढे ॥

घडले दर्शन
पुण्य आरतीत
दाटे अंतरात
उजेड तो ॥

कुणी दिली भेट
कळे ना कुणास
विक्रांत पूर्वेस
सूर्य झाला॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनिम्याऊ धन्यवाद >>>>> मी कधीच कविता वाचत नाही >>>>>> मी कविता सोडून काहीच वाचत नाही Happy

रूपे पावलात पसरले..
अप्रतिम. दिवसाच्या सुरुवातीला अगदी प्रसन्न वाटले ही कविता वाचून.