"दीदी ए दीदी अग उठना मला भीती वाटतेय ...अदिती खुप ओरडत होती जिवाच्या आकांताने पण गळ्यातुन आवाजच येत नव्हता असे वाटत होते कुणी तरी छातीवर बसून गळा गच्च पकडला आहे.."
हि कथा आहे अदिती ची..12 वर्षाची ..पण पप्पांची बदली एक खेड्यात झाली आणि एकुलती एक असल्यामुळे पप्पांची इच्छा तिने बाहेर चांगल्या शाळेत शिकावे.म्हणून
तिला हॉस्टेल ला जावे लागले ,झाला प्रवेश एकदाचा नाही नाही वाटत होते तरीही दुसरा काहीही उपाय नव्हता .
पप्पा जात असताना खूप रडली घरी यायचे म्हणुन पप्पांच्याही डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या त्यांनाही वाईट वाटत होते,
पण नाईलाज होता..आणि हॉस्टेल च्या मॅडम नात्यातल्याच असल्यामुळे जास्त काळजी करायचा प्रश्न नव्हता.
तसे हॉस्टेल ठीकठाक होते मैत्रिणी हि झाल्यात...दिवस छान हसत खेळत जाऊ लागले..पप्पा अधुन मधुन भेटायला येत..
बऱ्याच मुली होत्या हॉस्टेल ला जवळपास 70-75 आठवी पासून ते सिनिअर कॉलेज पर्यन्त.हॉस्टेल वर च्या मजल्या वर होते आणि खाली ऑफिस व मॅडमचे निवासस्थान.
प्रत्येक हॉस्टेल सारख्या इथंही खूप रंजक भयकथा फेमस होत्या होस्टेल बाबतीत.
होस्टेल चे नियम ही खूप कडक असायचे सर्व मुलींनी 5 वाजता उठायलाच हवे उठून खाली आल्यावर प्रार्थना व हजेरी होत असे .क्वचितच असे होत की कुणी मुलगी गैरहजर राहिली कारण शिक्षा कडक होत असे मग लहान मोठी बघितले नाही जायचे. जेवण सर्वांनी आपापल्या रूम मध्ये करावे किंवा कॉमन टेरेस वर.पण जेवण झाल्यावर लगेच टेरेस लॉक होत असे.पण रुळली अदिती तिथे ही.सगळ्यात लहान आणि गोड म्हणून सर्वांची लाडकी पण झाली.
हॉस्टेलचे पहिलेच वर्ष होते वर्ष बघता बघता निघून गेले आता वार्षिक परीक्षा चालू होणार होत्या अचानक बेल वाजली रात्री सहसा असे होत नसे खूप महत्त्वाचे असल्याशिवाय आणि फक्त मोठ्या मुलींची मीटिंग होत असे पण आज चक्क मॅडमनी खाली बोलवले कॉमन मीटिंग साठी सर्वांना.
इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यात परीक्षा कधी पर्यंत,पेपर कसे गेलेत. मग मॅडम बोलल्यात आज वेगळ्याच कारणासाठी ही मीटिंग घेते आहे घाबरवण्याचा हेतू नाही आहे फक्त सावध करायचे आहे, विषय असा आहे की मार्च - एप्रिल हे महिने होस्टेल मध्ये काळजी घ्यायची. वॉशरूम खालच्या मजल्यावर असल्याने तिथं एकटी दूकटे कुणीही जायचे नाही ,कुणी आवाज दिला तरी उठून सरळ तिच्या सोबत चालायला नाही लागायचे आजूबाजूला कुणाला उठवायचे मग ग्रुप करून जायचे ..बरंच काही बोलल्यात मॅडम.
मोठ्या मुलींनी अदिती व तिच्या वयाच्या मुलींची काळजी घ्यायची मोठया मुलींच्या रूम मध्ये 1 किंवा 2 लहान वर्गाच्या मुलींना शिफ्ट केले गेले.
अदिती व तिच्या मैत्रिणी खूप घाबरून गेल्या ऐकलं तर बरच काही होते होस्टेलबाबत पण स्वतः मॅडम अस बोलत आहे म्हटल्यावर गुढ वातावरण निर्माण झाले.
पण मुली घाबरून गप्प बसतील त्या कसल्या? ग्रुप करून बसायच्या ते पण भुताच्या गप्पा ऐकायला अनुभव ऐकायला काही खरे तर काही मीठ मिरची लावलेले..अदिती तर त्यात ऐकायला सगळ्यात पुढं.
असाच कुणाचे अनुभव ऐकत ,घाबरत परीक्षा संपल्यात आता हॉस्टेल बऱ्यापैकी खाली झाले पण अदिती आणि तिच्या वर्गातील मुलींचा 1 पेपर राहिला होता आणि काही कॉलेजच्या मुली होत्या. भीती तर वाटत होती मुलीही खूप कमी होत्या पण आजची रात्र मग उद्या शेवटचा पेपर म्हणून अदिती स्वतःला समजवत होती.
पण त्या पेपर च्या आदल्या रात्री अदितीला काही केल्या झोपच येईना मग थोडा अभ्यास करू म्हणुन वाचत बसली .तिच्या बेड समोर गॅलरी मधून दुसऱ्या रूम मध्ये जायला थोडी जागा होती आणि पलीकडे काही बेड होते. ही आपली अभ्यास करत आहे अचानक समोरून कुणी गॅलरीतुन दुसऱ्या रूम मध्ये गेलं 1-2 सेकंद ची गोष्ट असेल तिला वाटलं भास आहे आपण सारखं तेच बोलत असतो ऐकत असतो म्हणून.पण पुन्हा त्या रूम मधून गॅलरी मध्ये कोण तरी गेले.आता अदिती ला भीती वाटायला लागली सर्व रूम मधल्या मुली ही झोपलेल्या होत्या.आणि त्यातून सावरते ना सावरत तोच आता अचानक बाहेर पैंजण चा आवाज यायला लागला कुणी गॅलरी मध्ये येरझारा घालत होते.हीने पुस्तक राहू दिले आणि घाबरून डोक्यावर पांघरून घेऊन पडून राहिली.तेवढयात अचानकपणे तिच्यावर एक हात आला ओरडणार तेवढ्यात तिचा हाताने तोंड दाबले ,ती मोना दीदी होती ती इशाऱ्याने बोलली शांत पडून राहा.असंच पडून होत्या दोघही अचानक शांततेत हसायचा आवाज आला आणि आवाज घुमला मी अभ्यासाला बसते हुम्म हिहीहीही आणि जोरजोरात पुस्तकाची पान पलटवायचा आवाज यायला लागला...रात्री ची भयाण शांतता त्यात ते सर्व विचित्र आवाज हृदय बंद पडायचे तितकं बाकी होते.रात्र संपतच नाही की काय वाटत होते त्यातच झोप लागली आणि अचानक कुणी छातीवर बसून गळा आवळत आहे असा वाटायला लागलं ओरडला तर आवाज निघत नव्हता.अचानक डोळे उघडले कुणीही नव्हतं एव्हाना मोना दि पण झोपून गेलेली पुन्हा डोळे मिटायला च भीती वाटत होती पण झोपली पुन्हा आणि परत तसाच अनुभव.
असच घाबरत घाबरत रात्र काढली पांघरून डोक्यावर घेऊन पण टक्क जागून .
सकाळी उठली तेव्हा कुठं जीवात जीव आला आणि आपण अशी रात्र काढली याचा आश्चर्य वाटत होते नाही तर सकाळचं होणार नाही ह्या रात्री ची असे वाटत होते रात्री.
सकाळी कुणाशीच बोलावसं वाटत नव्हते फक्त पेपर देऊन घरी पळून जाऊ इतकंच वाटत होते. सकाळी आवरून थोडा पेपर चा अभ्यास करू म्हणून पुस्तक शोधु लागली तर सापडतच नव्हते तितक्यात समोरच्या रूम मधून एक मुलगी आली तिलाही तसाच अनुभव आला रात्री पण तिने ज्या मुलीला ला उठवले त्यांना तस काहीच जाणवलं नाही .मग खर होत की भास काहीच उमजत नव्हते तिला.पण अदितीच पुस्तक सापडलं कुठं जिथं रात्री पान पलटवायचा आवाज येत होता .काहीच कळत नव्हते तिला काय झाले.
पण तिचा लास्ट पेपर झाला पप्पा आले आणि ती घरी गेली आणि लहान असल्याने घरी कुणी विश्वास करणार नाही आणि होस्टेल ला राहायचे नाही म्हणून खोटं बोलतेय असा बोलतील घरचे म्हणून कुणाला सांगितलं नाही.
"हा अनुभव माझ्या एक मैत्रिणीचा आहे तिने एकदा कॉलेजमध्ये भुतांच्या अनुभव हा विषय निघाला असतांना आम्हाला सांगितला होता.
माझे हे पहिले लिखाण आहे जिथं चुकले असेल कंमेंट करून सांगाल प्रयत्न केला आहे काही सांगायचा.
तिने तिच्या मैत्रीणी आणि त्या होस्टेल चे खूप किस्से सांगितले आहेत त्यावर लिखाण चालू आहे."
भयंकर अनुभव
भयंकर अनुभव
थरारक..
थरारक..
भयानक अनुभव ...!!
भयानक अनुभव ...!!
पुढील लेखनास शुभेच्छा ..!!
भयानक आहे... छान लिहीताय..
भयानक आहे...
छान लिहीताय..
भयानक अनुभव...पुलेशु!
भयानक अनुभव...पुलेशु!
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
सांशक होते काही तरी लिहायचा प्रयत्न केला .डोक्यात खूप काही असतं किंवा काही ऐकलेले अनुभव असतात किंवा काही घडलेल्या आणि मनाला भिडलेल्या घटना पण अजून उतरवले नाही कधी लिखाणात पण तुमचे प्रतिसाद सकारात्मक आहेत तर नक्कीच प्रयत्न करेन.
भयंकर !!
भयंकर !!