राष्ट्रपती विशेष रेल्वेगाडी

Submitted by पराग१२२६३ on 26 June, 2021 - 15:53

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 25 जून 2021 रोजी विशेष रेल्वेगाडीतून प्रवास केला. राष्ट्रपतींनी रेल्वेगाडीतून प्रवास करण्याची प्रथा अलिकडील काळात अतिशय दुर्मिळ झालेली आहे. यंदाही तब्बल 15 वर्षांनंतर भारताच्या राष्ट्रपतींकडून दौऱ्यासाठी रेल्वेगाडीची निवड केली गेली होती. आपल्या मूळगावी परौख येथे जाण्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्ली ते कानपूर असा 438 किलोमीटरचा प्रवास रेल्वेगाडीने केला. अलिकडील काळात भारताच्या राष्ट्रपतींनी केलेला तो सर्वाधिक लांबचा रेल्वे प्रवास ठरला. दिल्ली सफदरजंग रेल्वे स्थानकावरून राष्ट्रपतींसाठीची खास रेल्वेगाडी सुटणार असल्यामुळे संपूर्ण स्थानक टापटीप ठेवण्यात आलेले होते. मात्र यंदा राष्ट्रपतींच्या रेल्वे प्रवासासाठी प्रथमच त्यांच्यासाठी तयार केलेल्या खास डब्यांचा वापर केला गेला नाही.

कोरोनाच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या सेवेला दाद देऊन त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच देशात या काळात थंडावलेल्या पर्यटन व्यवसायालाही चालना मिळावी आणि रेल्वेच्या प्रवासी संख्येत पुन्हा वाढ व्हावी या हेतूंसाठी राष्ट्रपतींनी असा प्रवास करावा यासाठी रेल्वे मंत्रालयाने विनंती केली होती, असे उत्तर रेल्वेच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

सविस्तर या लिंकवर वाचता येईल.
https://avateebhavatee.blogspot.com/2021/06/blog-post_27.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताचे राष्ट्रपती कोण आहेत हे तरी १३०, कोटी लोकसंख्येला माहीत असेल का?
किती तरी कोटी लोकांना राष्ट्र पती कोणाला म्हणतात आणि ते कोण आहेत हे पण माहीत नसेल.

तुमचे रेल्वे प्रवासाविषयी आणि त्यातील बारकाव्यांसाठी लेख वाचतो. तुम्ही बर्याच महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध रेल्वे गाड्यांविषयी खूप छान लिहिले आहे.

किती छान! कधी सगळं नॉर्मलला येतंय आणि पुन्हा एकदा रेल्वेचा प्रवास करता येईल असं वाटलं!

नॉर्मल ल येणे म्हणजे.
रेल्वे गाडीची प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता २००० असेल तर ६००० प्रवासी गाडी मधून प्रवास करणारे असेल पाहिजेत.
तेव्हा नॉर्मल झाले म्हणता येईल.
संडास ,बाथरूम सर्व प्रवासी लोकांनी गच्च भरलेली पाहिजेत.
रेल्वे च्या रूफ वर पण प्रवासी पाहिजेत
ड्रायव्हर केबिन मध्ये दहा वीस प्रवासी पाहिजेत च पाहिजेत.

रेल्वे च्या रूफ वर पण प्रवासी पाहिजेत>>
ड्रायव्हर केबिन मध्ये दहा वीस प्रवासी पाहिजेत च पाहिजेत. >> हे असं आपल्या भारतात होतं का..? महाराष्ट्रात तरी पाहिलं नाही.

ते हे तेच ना जे पाच लाख पगारात पावणेदोन लाख कापून जातात म्हणाले म्हणे?>>>
नाही. ५०% म्हणजे अडीच लाख कापले जातात म्हणे.
https://www.ndtv.com/india-news/president-ram-nath-kovind-says-i-get-rs-...

मी ही भारे प्रेमी ! ! फार मिस करतेय ... कधी एकदा झुकझुक गाडीत बसतेय असं झालंय.... आमचे एक स्नेही होते त्यांच्या मुलाचं स्वप्न होतं रेल्वेतच नोकरी करायची ... रेल्वे इजिनियर काॅलेजमधून डिग्री घेतली व नोकरीत लागला. ब्रिटीशमधली कुठलीतरी रेल्वेची परीक्षा पास होणारा तो पहिला भारतीय होता. मोठ्या पोस्टवर असेल .. बरीच वर्षे झाली घरचे नाव बबलो ... खरं नांव आठवत नाही आडनाव शर्मा लखनऊचे होते ....त्याच्यासाठी स्पेशल कोच असेल असं वाटतं .. स्मरणरंजन!

राष्ट्रपती नी प्रवास करून काय होणार.
भारतीय रेल्वे खूप मागास आहे.
मुंबई लोकल मध्ये प्रचंड गर्दी असते
अजुन त्या वर उपाय नाही.
प्रवासी गाडी मध्ये आरक्षण ला काही किंमत नाही आरक्षित डब्यात अनारक्षित प्रवासी खूप असतात कसलेच नियंत्रण नाही
सुखकारक प्रवास भारतीय रेल्वे देवू शकत नाही..
शेजारी बांगलादेश,पाकिस्तान,आणि आफ्रिकेतील गरीब देशात असणाऱ्या सुविधा आणि भारतीय रेल्वे मध्ये असणाऱ्या गैर सोयी ह्या मध्ये खूपच कमी अंतर आहे.

हे माहीत नव्हते, माहितीबद्दल धन्यवाद.

@ Hemant 33
सुखकारक प्रवास भारतीय रेल्वे देवू शकत नाही..
>>>>
बिलकुल नाही हं. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून आमच्याकडे कोणी कधीच कोकणात जाण्यासाठी खाजगी बसचा पर्याय वापरला नाही.
अर्थात आपलेच खाजगी वाहन असेल तर गोष्ट वेगळी..

मुंबई लोकल मध्ये प्रचंड गर्दी असते
>>>
मी नेहमी ऑफिसला जाताना विंडी सीट, ती सुद्धा वार्‍याच्या दिशेची, आणि त्यातही कडेला डोके ठेऊन झोपायची सोय असेल अशीच पकडून बसायचो, आणि झोपून निवांत प्रवास करत होतो. बरेचदा तर झोपायचा मूड नसल्यास ट्रेन रिकामी असूनही दारावर ऊभे राहायचो. त्यात वाशीच्या खाडीवरून ट्रेन जाताना तर एक वेगळेच सुख.. त्यातही पाऊस आला तर सुखाची परीसीमा Happy सगळे मिस करतोय Sad

सांगायचा मुद्दा हा की प्रॉब्लेम रेल्वेचा नसून गर्दीचा आहे, गर्दीच्या नियोजनाचा आहे. मग त्यामुळे तुम्हाला रस्त्यांवरही ट्राफिक मिळणार, ध्वनी आणि वायू प्रदूषण मिळणार, आजूबाजूला बकाल झोपडपट्ट्या दिसणार, दोन तास पाऊस पडताच तुमचे रस्ते तुंबणार, त्यात रेल्वेचे ट्रॅकही बुडणार.. हे सगळे प्रॉब्लेम आहेतच, आणि ज्या कारणास्तव आहेत त्यांचा फटका रेल्वेलाही बसत आहे. तर एकट्या रेल्वेला दोष देण्यात काय अर्थ आहे? सारी सिस्टीमच सुधारणे गरजेचे आहे.