एक होता अवचट --- भाग २

Submitted by सुर्या--- on 22 June, 2021 - 01:04

मागील भाग पाहण्यासाठी
भाग १ https://www.maayboli.com/node/79319

अवचट चौकामध्ये न्हाव्याच्या दुकानात गाणी ऐकत, गप्पा मारत बसलेला असतो. तिकडून मीनाक्षीदेवी भाजी घेऊन समोरून जात असतात. जाता-जाता त्यांचं अवचट कडे लक्ष जात. मीनाक्षीदेवी अवचट ला आवाज देतात. (आता सासूबाईंनी आवाज दिलाय म्हंटल्यावर आपला सलमान खान शांत कसा राहील)

अवचट आनंदाने हसत हसत मीनाक्षीदेवींजवळ जातो.

मीनाक्षीदेवी:- कधीपासून तुझा उद्योग सुरु करतोय?

अवचट:- (आता काय उत्तर द्यायचे असं तोंड करून विचार करू लागतो)

"नानी ... त्यासाठीच रव्याकडे बसलो होतो. त्याचाच दुकान घ्यायचा विचार आहे... "

मीनाक्षीदेवी:- बरं चल... मला मदत कर, तेव्हढी कांद्याची पिशवी घरी पोचवून दे.

अवचट:- (खुश होत) द्या नानी ... मी घेतो पिशवी... तुम्ही चला पुढे...

(याच बहाण्याने शाम्भवीला पाहायला भेटेल म्हणून अवचट कांद्याची पिशवी घेऊन शाम्भवीच्या घरी पोहोचतो.)

कांद्याची पिशवी खाली ठेवत इकडे तिकडे पाहत असतानाच शाम्भवी तिथे येते. अवचटकडे पाहून पुन्हा ती तिच्याच नादात टीव्ही चालू करून पाहू लागते.

अवचट मनोमनी खुश झालेला असतो. या ना त्या बहाण्याने पाय रोवून तिथेच थांबण्याचा आणि शाम्भवी समोर स्मार्ट बनण्याचा केविलवाणा प्रयत्न तो करू लागतो.

अवचट:- नानी ... आणखी काय मदत लागली तर सांगा... (मीनाक्षीदेवी काहीतरी बोलून

थांबायला लावतील अशी अशा बाळगून तो बोलू लागतो)

चला .. मी येऊ का नानी ?

मीनाक्षीदेवी:- (मदतीबद्दल कसलीही पुष्पसुमन न उधळता) चाललास का? ... बरं जा मग... आणि दुकान चालू झाल्यावर तेव्हढं हार फुले आणत जा ...

आता मीनाक्षीदेवींच्या तोंडून असं आमंत्रणच मिळाल्यावर अवचट मनातून तर भरून आलाच, पण त्याच डोकं आता जागेपणीच वेगवेगळी स्वप्न रंगवू लागला. काहीतरी वेडावाकडा चेहरा करून, डोळे एकटक वाकडे फिरवून तो स्वप्नात रमला सुद्धा.

मीनाक्षीदेवी:- (जोरात आवाज देत) काय रे अवचट काय झालं?

असं का तिकडे पाहतोस? जागा आहेस कि झोपलास रे?

अवचट:- (आता मीनाक्षीदेवी आपल्यावर काहीतरी हास्यविनोद करून शाम्भवीसमोर हसु करतील म्हणून सावध होत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत) हो...नानी तुम्ही सांगा फक्त, मी आणून देत जाईन.

तिकडे शाम्भवी अवचटचा वेंधळेपणा पाहत मनातच हसत असते.

मीनाक्षीदेवी:- (शाम्भवीला) अवचट हार-फुलांचा Business चालू करतोय....

शाम्भवी ऐकूनही फारस लक्ष देत नाही.

(मीनाक्षीदेवीची बडबड चालूच असते.) चांगला पोरगा आहे. आपल्याला नेहमी मदत करतो. पण काय करणार, परिस्थितीने बिचारा गरीब आहे. होईल आता ठीक. हळूहळू business मध्ये कमावेल.

(घरातील काम आवरता आवरता त्यांची बडबड चालूच असते.)

अवचट मित्रांसोबत रव्याच्या दुकानात गप्पा मारता मारता पेपर वाचत बसलेला असतो.

पेपरमध्ये चीनमधील नवीन आजार corona (कोविड -१९) बद्दल माहिती दिलेली असते. एव्हाना चीनमधील कोरोना बऱ्याच प्रमाणात फैलावलेला असतो. तसेच भारतातसुद्धा केरळमध्ये काही रुग्ण मिळालेले असतात.

अवचट:- च्या मारी ह्या चिन्यांच्या ... काय खायला भेटत नाय ह्यांना, वटवाघूळ पण खातात.

रव्या:- अरे त्यांना काय खायला नाय पुरत . मागे कसल्या कॉम्पिटिशन होत्या, तेव्हा विंचू, झुरळ, साप असं खूप काही ठेवलं होत.

पवळ्या :- मी असं वाचलंय, आपल्याकडे नाय होणार कुणाला त्रास. आपल्या वातावरणात corona नाही टिकू शकत.

असेच काही दिवस जातात. अवचट हार-फुलांचा व्यवसाय चालू करण्याची बातमी पूर्ण परिसरात पोहोचलेली असते. त्यामुळे जो भेटेल तो अवचट ला येता जाता टोकत असतो. त्यामुळे अवचट सुध्दा काहीसा बैचेन असतो.

अवचट:- (पवळ्याला, चिंताग्रस्त होऊन) पवळ्या रे... जाम बुरा फ़सलोय बाबा...

नानी ला खोट बोललो, खरं पण त्यांनी सगळीकडे बोम्ब केले...

आता काहीतरी करावच लागेल, नाहीतर आपलं काही खर नाही बुवा ...

पवळ्या :- हो रे... शाम्भवी ला विसरावं लागेल म्हणजे ...

अवचट:- गप्प रे.. (थोडा ओरडुनच)... जरा डोकं चालवं आणि सांग पुढे काय करायचं ...

पवळ्या :- (थोडा उत्साहाने) मला एक आयडिया सुचले.

(अवचट ध्यान देऊन ऐकू लागतो)

आपण चौकातच रव्याच्या दुकानाला लागून हार आणि फुले विकायला चालू करूयात का?

दादरहून फुले आणायची आणि इकडे हार बनवून घरोघरी पोहोचवायची.

अवचट:- (आनंदाने) आयडिया चांगली आहे. पण फुले आणेल कोण? जागा कुठे आहे फुलं ठेवायला? हार कोण बनवणार? घरोघरी पोचवायला आपल्याकडे माणसं आहेत का?

दोघांमध्ये चर्चा जुंपलेली असते. रव्या दुरूनच कामात व्यस्त असला तरीही कान दोघांच्या बोलण्याकडे लावून असतो.

एव्हाना दुरून कानावर पडलेल्या गोष्टी तो प्रत्यक्षात एकात असल्यामुळे तो हि उत्साहात चर्चेत भाग घेतो.

रवी:- अव्या... तू माझ्या दुकानाच्या बाजूला स्टॅन्ड उभा कर, त्याला हार लावू शकतोस. इकडेच एका कोपऱ्यात हार बनवायला टेबल लाव.

झालं... अवचटचा जागेचा प्रश्न मार्गी लागला होता.

मित्रांकडूनच १०,०००/- रुपयांची जमवाजमव करून अवचटने हार-फुलांचा व्यवसाय चालू करण्याचा निर्धार केला.

दुसऱ्याच दिवशी तात्पुरता वापरासाठी जुना टेबल शोधून आणला. रवीच्या दुकानाच्या एका कोपऱ्यात, रस्त्यालगत टेबल उभा करून पुढच्या बाजूला दोन बांबू उभे करून त्याला आडव्या पट्ट्या मारल्या.

अवचटला व्यवसाय चालू करण्यासाठी आता फक्त एका दिवसाचा अवधी उरला होता.

घरात काहीही न सांगता अवचट त्याच्या आई ला surprise देणार होता. संध्याकाळी पहिल्या दिवसाची कमाई आईच्या हातावर ठेवून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला टिपायचा होता. सकाळीच पवळ्या आणि अवचट हार-फुले आणायला दादरला गेले. चौकशी करता करता फुलांच्या मार्केट मध्ये पोहोचले. पूर्ण मार्केट पालथा घातल्यावर दोघांनाही कळून चुकले कि आपल्याला यायला उशीर झाला आहे. wholesale चा मार्केट संपला आहे. आता मिळतील तर रिटेल च्या किंमतीत. व्यवसाय चालू करण्याच्या पहिल्याच दिवशी भ्रम निरास झाला होता. परंतु व्यवसाय चालू करण्याची उत्कट इच्छा, रात्रभराच जागरण, आणि आईला संध्याकाळी surprise देण्याचे योजिलेले सर्व नियोजन व्यर्थ घालवण्यापेक्षा, मिळेल त्या किंमतीत थोडा कमी माल विकत घेऊन व्यवसायाचा शुभारंभ करायचा असा ठाम निर्णय घेऊन अवचट थोडी फुले, पाने, धागा, सुई, दुर्वा, तुळस, पिशव्या आणि रद्दीचे पेपर्स असा सर्व सामान घेऊन येतो. इकडे रवी सुद्धा अवचटसाठी ठेवलेल्या राखीव जागेची स्वच्छता करून ठेवतो.

पुढील भाग पाहण्यासाठी
https://www.maayboli.com/node/79355

Group content visibility: 
Use group defaults

याचा तिसरा पण भाग असेल ना? छान चाललीय कथा.
नानी च्या ऐवजी नाणी झालेय ते. मला वाटले की अवचट नाणी ( चिल्लर ) गोळा करतोय.

( माझ्या कडे बरीच जमा आहे. Proud ) असतात असे अवचट सारखे शाईनिंग मारणारे विनोदवीर.

पहिल्या भागातच अशुद्ध लिखाण खूप असल्याने मधूनच सोडून दिले. स्टोरी टेलिंग मधे कधी भूतकाळ, कधी चालू वर्तमानकाळ कधी रिती असं झाले आहे.