एक होता अवचट ...भाग ३

Submitted by सुर्या--- on 22 June, 2021 - 07:46

मागील भाग पाहण्यासाठी
भाग १ https://www.maayboli.com/node/79319
भाग २ https://www.maayboli.com/node/79338

बाजारातून घरी येताना भुरकटरावांना अवचट च्या व्यवसायाविषयीचा कानोसा लागलेला असतो.
भुरकटराव :- (घरात येता येता ) अहो देवी... एकलत का?
मीनाक्षीदेवी :- (किचन मधून हॉल मध्ये येत ) काय झालं?
(शाम्भवी भुरकट रावांच्या हातातून सामानाची पिशवी घेताना, त्यांना पाणी देते ).
भुरकट राव :- (पाणी पिता पिता ) त्या खुळ्या अवचटची प्रगती पाहिलीत का? आज दुकान चालू करतोय असं ऐकलंय...
मीनाक्षीदेवी :- अच्छा हो का?... चला चांगलं झालं...
आपल्याला हार फुले घरपोच देईल तो.
भुरकट राव :- घरपोच कश्याला हवेत? येता जाता घेता येईल...
मीनाक्षीदेवी :- काही नको हा येता जाता...
तुम्ही जाता बाहेर आणि कधी नाहीच आणायला जमलं तर कोण जाईल बाहेर?
भुरकट राव :- अस्स का... बरं ठीक आहे.... सांगा त्यालाच मंग...

शाम्भवी शांतपणे tv पाहण्यात मग्न असते.

इकडे पहिल्यांदाच फुले आणि सामान आणायला गेलेले पवळ्या आणि अवचट रवीच्या दुकानाजवळ येताच रवी आणि त्याचे मित्र अवचट चे गुलाल उधळून स्वागत करतात. फटाक्यांच्या माळा लावल्या जातात. फुटलेले डब्बे, टेबलं, टाळ्या वाजवून अवचट चा जयजयकार चालू होतो.
मित्रप्रेमाने भारावलेला पवळ्या आणलेल्या फुलांमधूनच थोडी थोडी फुले काढून अवचटवर उधळतो. जल्लोष चालू होतो. येणारे जाणारे जमतात. चौकात अश्या प्रकारे famous झालेला अवचट नाचू लागतो. त्याच्या तालात ताल मिळवत सर्वच मित्र गलका करून धम्माल मस्ती करतात.
ट्रॅफिक, हॉर्न चे आवाज, ओरडण्याचा आवाज, फटाक्यांचा आवाज, लोकांची गर्दी यांमुळे थोड्याच कालावधीत बघ्यांची गर्दी जमते. याच गर्दीतून वाट काढत भुरकटराव पुढे येऊन अवचटला विचारतात.
भुरकटराव :- काय अवचटराव... आज काय विशेष? नाच गाणं धम्माल मस्ती चालू आहे?

रव्या मध्येच सांगू लागतो

रव्या :- आज अवचट च्या दुकानाचा उदघाटन समारंभ आहे.
भुरकट राव :- (इकडे तिकडे पाहत ) काय रे अवचट... कुठे आहे तुझं दुकान?
अवचट :- (रव्याच्या दुकानाकडे हात दाखवत ) अण्णा रव्याच्या दुकानाच्या समोरच्या जागेत हार फुलांचा धंदा चालू करतोय.
भुरकट राव :- ( आ.. वासून, डोळे विस्फारून ) अरे कुठे आहे दुकानातले सामान? मला दिसत कस नाही?

सर्व जण फुलांची पिशवी शोधू लागतात.
पवळ्या डोक्याला हात लावून तोंड लपवतो.
अवचट तोंड बारीक करून नाराज होत खाली बसतो.
आनंदाचे वातावरण एका क्षणातच नाराजीत बदलते.

भुरकटराव :- (अवचट च्या खांद्यावर हात ठेऊन ) अरे आनंद साजरा करावा, पण आधी व्यवस्थित planning तर करा ना.
पूजा नाही, कोणाला आमंत्रण नाही, पहिल्या दिवसाच्या विक्रीसाठी माल नाही. असा कसा तुमचा धंदा चालेल?

त्याच गर्दी मध्ये एका कोपऱ्यात मीनाक्षीदेवी आणि शाम्भवी हे सर्व पाहत असतात. घटनेच गांभीर्य ओळखून शाम्भवी कुणालाही न सांगता रिक्शाने जाऊन station जवळून 5 kg फुलांची व्यवस्था करते.
मीनाक्षीदेवींना फुले घेऊन पुढे सारत पूजेच्या तयारीसाठी मदत करू लागते.
मान खाली घालून अश्रू गाळत बसलेला अवचट या सर्वांपासून अनभिज्ञ् असतो.
शाम्भवी, रवी, मीनाक्षीदेवी आणि इतरांच्या मदतीने टेबलं वर फुले पसरवून गणपती बाप्पाच्या फोटोसमोर दिवा लावून हळद कुंकू चे ताट तयार करते.
अगरबत्तीचा सुगंध पसरताच गढूळ झालेले वातावरण सुगंधाणे फुलून येते. मागे वळून पाहताच अवचट आश्चर्यचकित होतो. आ.. वासून डोळे विस्फारून शाम्भवी कडे पाहताना त्याला स्वतःचीच लाज वाटते. शरमल्यासारखे करून तो मागे जाऊ लागतो. तोच मीनाक्षीदेवी त्याला आवाज देऊन बोलावतात.
त्याच्या हातावर पन्नास रुपये टेकवून त्याला संध्याकाळी दोन हार घरी पोहोचते करायला सांगतात.

अवचट :- पहिल्या order चे पैसे देवासमोर ठेवून पाया पडतो. शाम्भवी जवळ जाऊन तिला मनपूर्वक धन्यवाद देतो.
मीनाक्षीदेवी आणि भुरकट रावांना हात जोडून त्यांचे आभार मानतो.

भुरकटराव :- चला अवचट आता यापुढे काही घाई गडबड न करता व्यवस्थित लक्ष देऊन काम कर. यशस्वी होशील.
(पाठीवर थाप मारत भुरकटराव, मीनाक्षीदेवी आणि शाम्भवी तेथून निघून जातात.)

अवचट व त्याचे मित्र पूजा करून हार बनवून व्यवस्थित मांडणी करतात. पेढे प्रसादाला ठेवतात. पवळ्या अवचटच्या आईला काहीतरी कामानिमित्त चौकात घेऊन येतो. ती अजूनही या सर्व घटनेपासून अनभिज्ञ् असते.

अवचट ची आई :- काय रे पवळ्या ... मला कश्यासाठी आणलय इथे?
(अवचट कडे पाहत) अवचट तू इथे असताना पवळ्या ने मला कश्याला इकडे आणलय रे?

रवी :- (पुढे येत) मावशी, आपल्याकडे पूजा ठेवले. या इकडे...
अवचट ची आई:- गणपती बाप्पा समोर फुल वाहून पाया पडते.
(अवचट तिच्या हातावर पेढा ठेवतो)
कुणाचा रे दुकान चालू केलाय?
पवळ्या ... तू करतोय का? कधी पासून चालू करतोस?

पवळ्या :- न्हाय ... मावशी...
हा दुकान तुमचाच हाये...
(अवचट ची आई गोंधळात पडते)

अवचट :- (पुढे येत, आईच्या हातात पैसे देत पाया पडतो.)
आई.. आज शिव्या नको, आशीर्वाद दे.
हि पहिली कमाई तुझ्या हातात ठेवतोय.

अवचट ची आई आनंदाने गहिवरून येते.
डोळ्यांत आनंदाश्रू दाटून येतात. आपला पोरगा स्व मेहनतीने काहीतरी करतोय याचा अभिमान उराशी बाळगून अवचट च्या डोक्यावरून हात फिरवत त्याला आणि पवळ्या ला आशिर्वाद देते.

मेहनत कर पोरा , मोठा हो ...

पुढील भाग पाहण्यासाठी
भाग ४ https://www.maayboli.com/node/79365

Group content visibility: 
Use group defaults

मला वाटलं अनिल अवचट किंवा सुभाष अवचट यांच्याबद्दल आहे की काय!>>> जुन्या अलबेला चित्रपटाचे नायक मास्टर भगवान यांचे आडनाव पालव असेच होते. तुम्ही त्यांच्या नात्यातील आहात का?