लाल बटण

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

अनेकदा एखादी चांगली गोष्ट अनुभवली किंवा वाचली की ती अनेक रुपांनी मनात पिंगा घालते. 'ग्लास बीड गेम' प्रमाणे त्या गोष्टीचे वेगवेगळे दुवे सर्वत्र दिसु लागतात. काही दिवसांपुर्वी TED वर Rory Sutherland यांचे Life lessons from an ad man हे talk ऐकले:
http://www.ted.com/talks/lang/eng/rory_sutherland_life_lessons_from_an_a...

त्यांची शैली अ‍ॅडमॅन ला साजेशिच आहे. गंभीर विचार अतिशय मिश्कीलपणे मांडले आहेत. Shredies चा किस्सा तर काय वर्णावा. पण सगळ्यात प्रकर्शाने लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे लाल बटणाची. आपल्या घरात भिंतीवर जर एक लाल बटण असेल की जे दाबल्याने आपले पन्नास डॉलर्सचे सेव्हींग होते तर आपण तसे सेव्हींग नक्कीच केले असते. पण इतकी सोपी सुविधा नसल्याने आपण ते करत नाही. या उलट एखादी गोष्ट विकत घेणे, किंवा पटकन काहीतरी तोंडात टाकणे हे मात्र ते लाल बटण दाबण्याइतके सोपे असल्यामुळे केल्या जाते.

अशा इतर किती गोष्टी असतील ज्या आपण केवळ unfriendly interface मुळे टाळतो? माझे कितितरी programs मी अधिकच त्या दृष्टिने पाहु लागलो. संगणकीय गोष्टींबाबतच बोलायचे झाल्यास मायबोलीवरच एकएक सोय उपलब्ध झाल्यावर संभाषण साधणे किती सुकर झाले ते दिसतेच. मग इतर ठिकाणी का तसा प्रयत्न करु नये? 'चिपर बाय द डझन' ची आठवण होऊन गेली.

आळस उर्फ inertia या प्रकारावर हे लाल बटण मत करु शकेल. ते जरी कुठे जोडलेले नसले तरी त्याच्या नुसत्या असण्याने मदत होऊ शकेल. व्यायम करायचा आळस? दाबा लाल बटण आणि व्हा सुरु.

पण बहुदा आपण अनेक गोष्टि कठीण असतात म्हणुन देखिल त्यांच्याजागी लाल बटण वापरतो. लायसन्स हवे आहे? दाबा लाल बटण. पोलिसाने पकडले, दाबा लाल बटण. कागद पटकन सरकवुन हवा आहे, दाबा लाल बटण. अनेक ठिकाणी केवळ थोडे थांबल्याने जरी काम होत असेल तरी, दाबले लाल बटण. गर्दीत भोंगा वाजवतो तसे. पुढचा गादी आणि उश्या घेऊन रस्त्यावर आलेला नाही हे दिसत असले तरी केवळ आपल्यालाच पुढे जायचे असल्याप्रमाणे जे भोंगे वाजतात ते या लाल बटणाप्रमाणेच. म्ह॑णजे बहुदा आपल्याला आधि म्हंटलेल्या लाल बटणाबरोबरच एक हिरवे बटण देखिल ठेवायला हवे. नको तेंव्हा चुकिचे लाल बटण दाबु नये म्हणुन.

प्रकार: 

मस्त आहे लेख.

आळस उर्फ inertia या प्रकारावर हे लाल बटण मत करु शकेल.

मला प्रचंड गरज आहे ह्या लाल बटणाची