"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

Submitted by पाषाणभेद on 20 June, 2021 - 03:35

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_boras...

येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे.

सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.

सदर पुस्तक आपण विनामूल्य स्वरूपात "वैरी भेदला" विनोदी वगनाट्य येथून किंवा ई साहित्य प्रतिष्ठान - नाटक विभाग येथील नाटक विभागातून डाऊनलोड करून वाचावे.

"वैरी भेदला" या पुस्तकासाठी आपणास कोणतेही मूल्य देण्याची गरज नाही. हे पुस्तक विनामूल्य आहे. आपण ते वाचावे आणि आपल्या ओळखीच्या वाचकांत विनामूल्य वाचनास देण्याचे करावे ही विनंती.

हे ई पुस्तक वाचल्यानंतर आपण तीन मिनिटात तीन गोष्टी करू शकतात.

1. आपणास हे पुस्तक कसे वाटले ते फोन, व्हाटस अ‍ॅप मेसेज किंवा ईमेल करून लेखकाला कळवू शकतात.
2. ई साहित्य प्रतिष्ठानला ईमेल करून हे पुस्तक कसे वाटले ते सांगावे.
3. आपले मित्र तसेच सर्व मराठी लोकांना या पुस्तकाबद्दल आणि ई साहित्य प्रतिष्ठानबद्दल सांगा.

कळावे.

आपला,
पाषाणभेद उर्फ सचिन बोरसे
982Three4O2554

(ता.क.: सदर पुस्तक मिपा, मायबोली व ऐसीअक्षरे येथील वाचक तसेच येथील संचालक, सभासद यांना अर्पण केले आहे. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन पाभे.
गवळणींपर्यंत वाचले. मस्त आहे. शीला, मुन्नी, शब्बो Proud

छान

अभिनंदन