फॅमिली मॅन 2 (with spoilers)

Submitted by सान्वी on 7 June, 2021 - 06:07

सध्या वेबसिरीज च्या धाग्यावर या सिरीजची सुरू असलेली चर्चा लक्षात घेता यावर नवीन धागा काढते आहे. येथे स्पॉईलर सकट चर्चा करू शकता. ज्या मंडळींची अजून बघून व्हायची आहे त्यांनी पूर्ण झाल्यावरच या धाग्यावर या.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ओह मी खालची ओळ नीट वाचलीच नाही
मला काही कळेना म्हणलं निखिल ला कधी कोणी ओलीस धरलं
मग परत पोस्ट वाचली तेव्हा उलगडा झाला

पण इतका वेळ ते उघडेच का बसून राहतात

तो कपडे घालायला हलू देत नाही बहुधा, ते फोन करतील किंवा आणि काही स्मार्ट मूव्ह करतील या भितीने.अर्थात त्याला त्यांच्या अंगावर कपडे टाकून घाला असं सांगता आलं असतं.
(आमच्याकडे याच मुद्द्यावर चर्चा झालेली आठवते Happy )

जे.के उर्फ शारीबची मराठी मुलाखत Happy
https://youtu.be/SnxpEHyaLrM
जेके ला मराठी करणे शारीबची आयडिआ होती, मुळात ते कॅरॅक्टर बंगाली होतं पण त्याला मराठी भाषेची सवय असल्य्॒मुळे चेंज केलं !

मलाही तो कल्याण/सलमान थोडा ईशान खट्टर सारखा वाटला Happy >>>>तो मुलगा CLOSEUP च्या जाहिरातीत येतो .
actor Abhay Verma For those who've watched The Family Man 2, you might know actor Abhay Verma as Kalyan, the boy-next-door who Srikant Tiwari's daughter Dhriti falls in love with,

झाली बघून. काही अ आणि अ प्रकार होतेच पण मजा आली बघायला. शेवटचे ३-४ भाग तर फारच ग्रिपिंग.
मनोज वाजपेयीने काय क्लास काम केलंय! सार्कॅजम, डॅड जोक्स टाइप विनोद, आय्टी जॉब चे बोअरडम, मिशन मधला हायपर फोकस आणि कामातली एक्सायटमेन्ट , मुलीला किडनॅप केले गेल्यावर दिसणारा टेन्शन मधला "बाप" सगळेच सीन्स फार मस्त!
समन्था मला खूपच आवडली. तिच्या इन्टेन्स एक्स्प्रेशन्स आणि बॉडी लॅन्ग्वेज मुळे ती इतक्या लोकांना (पुरुषांना) धोपटते ते बिलिव्हेबल वाटते अ‍ॅक्चुअली! बाकीचेही एरवी कधी न पहिलेले तमिळ अ‍ॅक्टर्स मुथू, भास्करन, सेल्वा वगैरे बघायला मस्त वाटले. गोष्ट ऑथेन्टिक वाटते जास्त.
सुची मात्र फार इरिटेटिंग झाली या सीझन ला. सारखं आपलं ते वाकडं तोंड. तेही ती काउन्सिलर ला म्हणते की माझेच गिल्ट आहे, श्री पूर्ण प्रयत्न करतोय इ. पण तिच्या वागण्यात ती त्यालाच गिल्ट द्यायचा प्रयत्न करतेय असे वाटते. अरविंद च्या कॅरेक्टर ला का घेण्यात आलेय हा क्वस्चन मार्क तसाच राहिला. लोणावळा हाही कदाचित फुसका बारच निघण्याची शक्यता आहे.
बाय द वे, प्रत्येक एपिसोड च्या शेवटी वेगवेगळी ( रेलेवन्ट लिरिक्स !)गाणी आहेत एंड क्रेडिट ला. काही काही अगदि लक्षात राहतात. लक्षात आले का कुणाच्या?

सुची मात्र फार इरिटेटिंग झाली या सीझन ला. सारखं आपलं ते वाकडं तोंड. तेही ती काउन्सिलर ला म्हणते की माझेच गिल्ट आहे, श्री पूर्ण प्रयत्न करतोय इ. पण तिच्या वागण्यात ती त्यालाच गिल्ट द्यायचा प्रयत्न करतेय असे वाटते. >>> अगदी.
आपला नवरा काय काम करतो ते तिला माहिती आहे. तरी त्याचे घरी नसणे, खोटे बोलणे यावरून सतत चिडचीड करते. त्याने जॅाब बदलला तरीही तेच.

त्या बासू ला लायन किंग दाखवायला हवा Happy मुफासा म्हणतो ना सिंबाला - " I'm only brave when I have to be. Being brave doesn't mean you go looking for trouble."
टेररिस्ट हल्ल्याची खात्री असताना तिथेच मीटिंग ला जाणे हा मूर्खपणा आहे शूरपणा नव्हे!

मनोज वाजपेयीने काय क्लास काम केलंय! सार्कॅजम, डॅड जोक्स टाइप विनोद, आय्टी जॉब चे बोअरडम, मिशन मधला हायपर फोकस आणि कामातली एक्सायटमेन्ट , मुलीला किडनॅप केले गेल्यावर दिसणारा टेन्शन मधला "बाप" सगळेच सीन्स फार मस्त!
<<<
+ १
मनोज वाजपेयी सिरीयसली आजच्या काळातला बच्चन आहे (पण अंडररेटेड !)
या लेव्हलचे अ‍ॅक्टर्स फार कमी आहेत बॉलिवुड्मधे.

श्रीकांत ला त्याच्या ताब्यातल्या गुन्हेगाराला बोलते करण्यासाठी काहीतरी बनावट पीळ किस्से सांगायची सवय असते. ते आधीच्या सीझन मधे पण दाखवलंय. यात तो समन्था ला तसलं सांगायचा प्रयत्न करतो. ती शांतपणे ऐकून घेते , मग स्वतःची पण कहाणीही सांगते अन फक्त म्हणते- "माझी स्टोरी खरी आहे" श्रीकांत चे एक्सप्रेशन तेव्हा बघण्यासारखे आहे Happy तेवढ्यातच तो समजून चुकतो की ही बोलणार नाही. मस्त सीन होता तो.

येस ! काही काही मोमेन्ट रिपिट बघायला पण मजा आली, जेल मधला सिन एकदम भन्नाट आहे,त्याच्या बॉसला थोबाडवतो तेव्हा थेअटर मधे असा सिन असता तर टाळ्या ,शिट्ट्या सगळ वाजल असत दणदणुन!!
फोमो,रोलो... मग $%& फिसकन हसुच येत तो फ्र्स्टेट झाला की, त्याच्या आणि सुचित काही विषेश बॉन्डीन्ग पहिल्या भागातही वाटल नव्हत इथे तर अजुनच ऑफ वाटत तरी पहिला सिझन खुप मस्त होता , सगळे धागेदोरे निट विणुन शेवटाला एक हाय पॉइन्टला येवुन सन्पतो तस दुसर्‍यात होत नाही.

मुलगा खरंच गुंतलेला आहे तिच्यात. पण मिशन म्हणजे मिशन. त्यामुळे रेटून न्यायचा प्रयत्न करत होता. तिने थोडं अजून इमोशनल हाताळलं असतं तर कदाचित तिला सोडलं पण असतं.
>>> आवरा... जे स्क्रिप्ट मधेच नाही ते कसे होणार? हे म्हणजे आनंद मधे राजेश खन्ना ला अमेरिकेला नेले असते वाचला असता टाईप झाले..

त्यातच ती लोणावळ्याला गेलेली असते तेव्हां तिच्यात आणि अरविंद मधे काय होतं हे दाखवलेलं नाही.
>>> ते कसे दाखवतील... आता वेब सिरीज पण सेन्सर होतात ना... सिम्पल आहे वन नाईट स्टँड होतो त्यांच्यात.. thats why she feels guilty...

Dhriti काचेनेच मारते. सलमान खिडकीकडे बघतो आणि त्याला समजतं की तिने काच तोडलाय. तेव्हाच ती त्याला मारते

चरप्स,
नो किडींग,
पण खरंच रमेश देव चे चांगल्या प्रॅक्टिस मध्ये कमावलेले पैसे वापरून आनंद ला अमेरिकेत न्यायला हवे होते Happy
मग तो परत येईल तेव्हा अमिताभ रहस्यमयरित्या गायब झालेला असेल.मग हा आनंद जीवावर खेळून या रहस्याचा शोध लावून मुख्य कल्परीट(शब्द गुगल इंडिक वर लिहिता येत नाहीये घाईत) मिसेस डीसा नर्स ना अटक करेल
झाला एक विक्रम भट्ट चा पिक्चर तयार. Happy

फॅमिली मॅनच्या दुसर्या सिझनमध्ये जो बॉसला मारण्याचा सिन दाखवलाय.. तसाच सेम प्रकार माझ्या एका ऑफिसमध्ये घडला होता.. ती अलौकीक घटना याची देही,याची डोळा पाहण्याचं अहोभाग्य मला लाभलं होतं..

काही लोकं मोठ्या हुद्यावर गेले की, स्वत:ला ब्रम्हदेव समजू लागतात आणि हाताखालच्यांना गुलाम... मग अशा महाभागांना कुणीतरी असा भेटतोच..मग बरोबर शेपूट घालून गप्प बसतात.. त्याच्यामूळे आमचं तिथे काम करणं फार सुसह्य झालं होतं.. काही लोकांना तो मुलगा तर क्रांतीकारीच वाटला होता..

Hi people ultimate spoiler Rahul Gandhi is the Executive Producer!!! See everything in that context. He lost his father due to this issue. I hope he got closure when raji dies. This bit is in the end titles.

ओह खरंच का
मग फार भावनिक वाटत एडेल हा एपिसोड बघताना.

राहुल गांधी एक्झ्युकेटिव प्रोड्युसर हे नाव मी पण वाचलं. पण एपीची जी कामं जसं प्रत्येक एपिसोडची कंटिन्युटी राखणं वगैरे फुल टाईम जॉब आहे. या गोष्टी कन्सिडर करता, राजकारणी राहुल गांधी प्रोड्युसर नसावेत.

तसंच गांधी फॅमिलीने राजीव गांधीच्या मारेकर्यांची ऍटलिस्ट नलिनीची फाशी टाळण्याची विनंती ऑफिशिअली केली होती. त्यामुळे क्लोजरचा इश्यू नसावा असं वाटतं.

Executive Producer does not do actual production job .There is a huge team for that. The fund the production and approve concept. Yes original killers were pardoned so an emotional release is needed . But makes you think that family first lost mrs Gandhi to an attack and Rajiv Gandhi to another attack which literally changed the children's lives. Otherwise they would have the lives of privileged children . I have seen Rahul Gandhi at the funeral of his father. Really a small boy . Thinking of them as people not politicians.

https://movieweb.com/the-family-man-marriage-indian-cinema/#:~:text=Afte....

हल्लीच वाचलेला सुरेख लेख . मालिका पाहिली तेव्हा संसारापेक्षा करिअरला अधिक महत्व देणारी , त्यावरून नवऱ्याशी भांडणारी नायिका नाही म्हटलं तरी खुपलीच .. त्यात नायक साहजिकच जास्त जवळचा वाटतो , बरीचशी मालिका त्याच्या दृष्टीकोनातून असल्याने , देशासाठी जीव वगैरे धोक्यात घालणारा असल्याने ... त्यामुळे नायिका किंचित त्रासदायक वाटत होती .. पण हा लेख वाचल्यानंतर आपला पाहण्याचा दृष्टीकोन चुकत होता असं वाटलं .

पण युट्यूब वरच्या कमेंट्स वरून शितावरून भाताची परीक्षा करायची तर बहुसंख्य प्रेक्षकांनी करिअरला आपल्या संसारापेक्षा जास्त महत्व देणाऱ्या , नवऱ्याकडून त्याने आपल्याही करिअर , महत्वकांक्षांना त्याच्या करिअर एवढंच महत्व द्यावं ही अपेक्षा करणाऱ्या , त्यावरून भांडणाऱ्या आणि हो , नवऱ्यासोबतच्या नात्यात दुरावा , ताण निर्माण झाल्यानंतर बाहेर अफेअर / वन नाईट स्टँड करणाऱ्या नायिकेला भयंकर टॉक्सिक वगैरे ठरवून टाकलं आहे .

https://movieweb.com/the-family-man-marriage-indian-cinema/#:~:text=Afte....

हल्लीच वाचलेला सुरेख लेख . मालिका पाहिली तेव्हा संसारापेक्षा करिअरला अधिक महत्व देणारी , त्यावरून नवऱ्याशी भांडणारी नायिका नाही म्हटलं तरी खुपलीच .. त्यात नायक साहजिकच जास्त जवळचा वाटतो , बरीचशी मालिका त्याच्या दृष्टीकोनातून असल्याने , देशासाठी जीव वगैरे धोक्यात घालणारा असल्याने ... त्यामुळे नायिका किंचित त्रासदायक वाटत होती .. पण हा लेख वाचल्यानंतर आपला पाहण्याचा दृष्टीकोन चुकत होता असं वाटलं .

पण युट्यूब वरच्या कमेंट्स वरून शितावरून भाताची परीक्षा करायची तर बहुसंख्य प्रेक्षकांनी करिअरला आपल्या संसारापेक्षा जास्त महत्व देणाऱ्या , नवऱ्याकडून त्याने आपल्याही करिअर , महत्वकांक्षांना त्याच्या करिअर एवढंच महत्व द्यावं ही अपेक्षा करणाऱ्या , त्यावरून भांडणाऱ्या आणि हो , नवऱ्यासोबतच्या नात्यात दुरावा , ताण निर्माण झाल्यानंतर बाहेर अफेअर / वन नाईट स्टँड करणाऱ्या नायिकेला भयंकर टॉक्सिक वगैरे ठरवून टाकलं आहे .

श्रीकांत आणि सूची यांचे लग्न झालेच कसे असेल असा प्रश्न पडतो. त्यांचे स्वभाव वेगळे, दोघे वेगळ्या पार्श्र्वभूमीचे.
त्यांचे सूर कधीच जुळले नसतील असे वाटते पण तरी लग्न होऊन दोन मुले होतात आणि मग त्यांच्यातील अंतर निर्माण होते असे पटत नाही.
असो. मालिका आणि त्यातले कलाकार जबरदस्त.
तळपदे तर _/\_/\_/\_!

तळपदे तर _/\_/\_/\_! >>> अगदी अगदी आणि त्याचे मराठी उच्चार अचुक वाटले, मराठी नसावा बहुतेक म्हणून जास्त कौतुक वाटलं. असेल मराठी मातृभाषा तर सवय असेल.

Pages