फॅमिली मॅन 2 (with spoilers)

Submitted by सान्वी on 7 June, 2021 - 06:07

सध्या वेबसिरीज च्या धाग्यावर या सिरीजची सुरू असलेली चर्चा लक्षात घेता यावर नवीन धागा काढते आहे. येथे स्पॉईलर सकट चर्चा करू शकता. ज्या मंडळींची अजून बघून व्हायची आहे त्यांनी पूर्ण झाल्यावरच या धाग्यावर या.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला ते दोघे अरेस्ट होतात तो एपिसोड प्रचंड आवडलाय.
आणि उमियाळ चे पात्र पण.
तुरुंगातला सर्व गैरसमज एपिक आहे.

मला एकच कळत नाही, इतके हल्ले होतात, इतकी माणसं मरतात तरी यांना एक बुलेटप्रूफ वेस्ट का दिले जात नाही? की ते कधी वापरायचे आहे यावर काही नियम असतील?

हो तो अरेस्ट होण्याचा सीन भारीये आणि त्यात त्यांचा व्यायाम Lol
काही काही सिली मिस्टेक्स प्रचंड खटकल्या पण, ज्या अपेक्षित नव्हत्या.
जसं की हे लोक कामाच्या ठिकाणी बागेत उभे असल्या सारखे सिगरेटी ओढत बसलेत ,आठवा राजीला पकडण्यापूर्वीचा सीन. केवळ एक मुलगी एवढ्या सगळ्या इंटेलिजन्स च्या लोकांना नाकी नऊ आणते तेव्हा. ते जरा पटणेबल नाही वाटले.
अजून एक म्हणजे जेके आणि मुथु विमानाच्या ठिकाणी तपास करायला जाताना ,. जिथे खूप धोका असणारे हे माहीत असूनही सोबत टीम न नेता फक्त दोघेच कसे काय जातात? तिथे पण जनरल इन्वेस्टिगेशन असल्यासारखे आरामात वाट पाहत बसतात वॉरंटची.

आणि शेवटी तो पोलिस जेव्हा वॉचमन बनून पाण्याचं सांगायला येतो तेव्हा पण साजिद मुद्दाम ओळखू यावा म्हणून त्याच्या समोर येतो का? आत का थांबत नाही?

तिसरा सिझन असणार बहुतेक कारण मेजर समीर जिवंत आहे अजून. मला तर साजिद पण मागच्या भागात मारामारीत मेला होता असं वाटलं. आठवत नाही नीट परत बघावं लागेल लास्ट सिझन लास्ट एपिसोड.

मला एकच कळत नाही, इतके हल्ले होतात, इतकी माणसं मरतात तरी यांना एक बुलेटप्रूफ वेस्ट का दिले जात नाही? की ते कधी वापरायचे आहे यावर काही नियम असतील?>>>I swear you stole my thoughts
आणि इतकं casual जातात terrorist ना पकडायला jevha कळत ki राजी is from Rebel ग्रुप फुल्ल प्रोटेक्ट करून जात येत नाही या त्यांना
BTW Dhriti kashane marate कल्याण ला मला नाही samajla

कल्याण ने सुरा सदृश प्रकाराने तिचे हात सोडवून तो खिश्यात टाकलेला असतो बॅक पॉकेट ला.
ती जेव्हा कल्याण सोडणार नाहीच, यातून दुसरा मार्ग नाही अशी खात्री होते तेव्हा त्याला तो चाकू काढून मारते. कदाचित मनोज बाजपेयीने फोन ट्रॅकिंग चा वेळ काढायला आणि तिच्यात आणि त्या मुलात प्रेमाबद्दल संशय निर्माण करायला ते 'प्रेम म्हणजेच ताकद, प्रेम म्हणजेच वीकनेस' वालं भाषण दिलं नसतं तर तिला ही आयडीया आली नसती, त्याला हात सोड वगैरे म्हणायची.
मुलगा खरंच गुंतलेला आहे तिच्यात. पण मिशन म्हणजे मिशन. त्यामुळे रेटून न्यायचा प्रयत्न करत होता. तिने थोडं अजून इमोशनल हाताळलं असतं तर कदाचित तिला सोडलं पण असतं.

राजी फॉर्मलिन ची चिमुकली बाटली घेऊन इतक्या मोठ्या माणसाचे अवयव सडण्यापासून टाळत असते तेही इतके दिवस हे गंमतीदार आहे. कदाचित ती शंभरावी बाटली वगैरे असेल वापरलेली तर माहित नाही.
मुळात तो तुकडे वाला प्लॅनच भंगार होता.
पळून एनीवे जायचंच होतं, उमियाळ ला तोवर तो पत्ता पण माहित नव्हता.
थेट जाता आलं असतं.

मला तर साजिद पण मागच्या भागात मारामारीत मेला होता असं वाटलं. आठवत नाही नीट परत बघावं लागेल लास्ट सिझन लास्ट एपिसोड.>>>नाही फक्त मुसा मरतो साजिद तेथून निघून जातो
BTW Dhriti kashane marate कल्याण ला मला नाही samajla>>>मला वाटते तिथली फ्रेम ची काच तोडून ती त्याला मारते

फ्रेम ची काच का?
मी पण नीट बघायचा प्रयत्न केला. पण जरा अंधार आहे.

हो फ्रेमच्या काचेनेच मारते ती ..
मनोज वाजपेयीचे काम एकदम आऊटस्टॅंडींग..त्याचे त्याच्या मुलाबरोबरचे संवाद , त्याचे आणि तळपदेचे संवाद, प्रसंगाला सुट होतील अशा दोन चार शिव्याही फार धम्माल उडवून देतात..
मला राजीचे सुरूवातीचे हावभाव साधारण बाहुबलीतल्या तमन्ना सारखे भासत होते..पण नंतर तीचे कॅरेक्टर छान पकड घेतं..
सुचीचं आणि अरविंदचं कॅरेक्टर फार पकाऊ वाटलं.
मुत्थूही आवडला..

डोन्ट बी मिनिमम गाय ने सायलेन्सरची आठवण करून दिली. त्याची धुलाई करतो तोच क्लायमॅक्स होता माझ्यासाठी. पैसे वसूल.

फार भयंकर इरिटेटिंग प्राणी होता तो Happy
मुळात अगदी इतके नाही, पण याच्या ६०% इरिटेटिंग अनेक प्राणी कंपनीत पाहिलेत. त्यामुळे याचे पात्र अगदीच खरे वाटले.
निदान काही महिने त्या नोकरीमुळे श्रीकांत ला नवी चांगली कार तरी घेता आलीय.
सूचि चे वन पीस चांगले आहेत.
मुलगा फारच गोड आहे. 'कटप्पा सो गया :)'

या प्रकारचे मलाही भेटलेत, भेटतात. वरच्या प्रतिसादात अवांतर वाटेल म्हणून किस्सा खोडला. परत देतो विषय निघालाच आहे तर.

एक आयटीतलं जोडपं होतं. भारतात परतल्यावर घर बांधायचं म्हणून नेटवरून हजारो प्लान डालो केले. आर्किटेक्ट कडे जाऊन त्याचं डोकं खायचे. समोरच्याला थोडं काही समजत असेल यावर विश्वासच नाही. नऊ आर्किटेक्ट्स सोबत त्यांचं जमलं नाही. दहावा नेमका माझा मित्र होता. दुबईवरून आलेला. अतिशय इरसाल आणि पक्का पुणेरी. यांचं काम घेतो म्हणाला. पण जेव्हां यांची मेथड पाहिली तेव्हां त्याने फॅमॅ प्रमाणेच शाब्दि़क धुलाई केली. अपमान तर एव्हढा प्रचंड केला की पुढच्या आर्किटेक्टकडे मान खाली घालून गेले असतील.

सूचि चे वन पीस चांगले आहेत. >> नेहमी अशा वाक्यांनी थक्क होतो. Lol
दोनच डोळे दिलेत देवाने. अभिनय बघायचा की सबटायटल्स वाचायचे की पोरांना फोनचा आवाज कमी करायला सांगायचा इतकी अवधानं असताना ड्रेस, दागिने टिपणे हे खरोखर कौशल्याचे काम आहे.

मुलीचा अपहरण होतानाचा पांढरा फुलाफुलांचा कोल्ड शोल्डर टॉप पण गोड आहे.
सूची चा मागच्या सिझन मध्ये नोकरी लागल्यावर एक ओलिव्ह ग्रीन लाँग ट्युनिक विथ मरुन ट्राउजर्स होता तो पण छान होता. )इथल्या बायकांना नक्की आठवत असेल.) असे वेगळे रंग एकत्र कॅरी करणे कमी जणांना शोभून दिसते.

श्रीकान्त तिवारीची सटकली तर तो शुन्य मिनिटात त्याच्या झिन्गुर पसली सिन्गल हड्डी बॉसच्या कानात सण्ण्णकन मारणार हे पहिल्या मिनिटापासुन जाणवत होत.... आणि जेव्हा ते घडत तेव्हा "आखिर वो पल हि आ गया "अस होत.
जेल मधला गोन्धळ ए पी क होता..जेके तिथेही फ्लर्टिन्गचा चान्स सोडत नाही.
सुचीचा वॉर्डरोब फार छान आहे, दोन्ही पोरही श्रीकान्त तिवारी इतकीच अतरगी आहेत, बाकी पहिला सिझन खुप ग्रिपिन्ग वाटला होता.
७५ % तामिळच असल्याने एक मिनिट स्क्रिन सोडता येत नाही.
सामन्थाने अर्जुन कपुर अ‍ॅक्तिन्ग केलिये मठ्ठ ...बाकी फायटिन्ग सिन एकच नबर ,रोलसाठी केलेले ट्रान्सफॉर्मेशन भारि आहे.

मला हा ही सीझन आवडला.
नवर्याला फक्त समंथा आवडली, बाकी सगळं बोर होतयं म्हणाला Wink

कल्याण ने सुरा सदृश प्रकाराने तिचे हात सोडवून तो खिश्यात टाकलेला असतो बॅक पॉकेट ला.
ती जेव्हा कल्याण सोडणार नाहीच, यातून दुसरा मार्ग नाही अशी खात्री होते तेव्हा त्याला तो चाकू काढून मारते. कदाचित मनोज बाजपेयीने फोन ट्रॅकिंग चा वेळ काढायला आणि तिच्यात आणि त्या मुलात प्रेमाबद्दल संशय निर्माण करायला ते 'प्रेम म्हणजेच ताकद, प्रेम म्हणजेच वीकनेस' वालं भाषण दिलं नसतं तर तिला ही आयडीया आली नसती, त्याला हात सोड वगैरे म्हणायची.
मुलगा खरंच गुंतलेला आहे तिच्यात. पण मिशन म्हणजे मिशन. त्यामुळे रेटून न्यायचा प्रयत्न करत होता. तिने थोडं अजून इमोशनल हाताळलं असतं तर कदाचित तिला सोडलं पण असतं.>>>हो ते मला समजलं तिवारी चं बोलणं तिला ट्यूब पेटवत and she used that tecties
BTW Dhriti kashane marate कल्याण ला मला नाही samajla>>>मला वाटते तिथली फ्रेम ची काच तोडून ती त्याला मारते>>>हो मला एकदा वाटलं हे कारण त्या खिडकी कडे कॅमेरा नेला होता

मुळात राजीच्या भावना बोथट झाल्यात.
तिचे expressions माठ नाही वाटले , तिचा चेहरा निर्विकार वाटतो कधी कधी..

सूचि चे वन पीस चांगले आहेत. >> नेहमी अशा वाक्यांनी थक्क होतो. Lol
दोनच डोळे दिलेत देवाने. अभिनय बघायचा की सबटायटल्स वाचायचे की पोरांना फोनचा आवाज कमी करायला सांगायचा इतकी अवधानं असताना ड्रेस, दागिने टिपणे हे खरोखर कौशल्याचे काम आहे.>>>हाहाहाहा हो पण काम कमी आहे तिला या पार्ट मध्ये तो मुत्थु फर्स्ट time पहिला किती रिअल acting आहे त्याची आणि तो जो मरतो शूट आऊट मध्ये त्याला ट्रीबुट देतात what a scene it is

सामन्थाने अर्जुन कपुर अ‍ॅक्तिन्ग केलिये मठ्ठ>>>ऐय्या नाही रे तिचा राग मग तिची स्टोरी सांगतानाच scene छान केला आहे तिने ती पहिल्या चोराला मारते तो scene ऑल गुड या

ती तुकडे वाल्या माणसाला मारते त्या पूर्वी तिच्या चेहऱ्यात व्यवस्थित ट्रॉमा चे भाव आहेत.
किंवा तिला सगळे मिळून माश्याच्या जाळ्यात पकडतात तेव्हाचे भावही.
तो चेल्लाम माणूस भारी आहे.कुठूनही प्रकट होत असतो.
मिलिंद सारखा सच मेरे यार है लावत असतो आणि तो गेल्यावर हे लोक त्याच्या जागेवर ते गाणं लावून दारूचा ग्लास ठेवतात त्या सीन ला मला खूप रडू आलं.
मागच्या सिझन ला पाशा अकाली मारला होता, या सिझन ला मिलिंद.पुढच्या सिझन ला झोया बरी होऊन काहीतरी पराक्रम गाजवेल. ते मेडल रिटायरमेंट नंतरच मिळेल वगैरे खरंच असं होतं का?
राजी तो बस मधला माणूस, हा मॅनेजर यांना बराच फायदा घेऊ देऊन मग मारते.थोडं आधीच मारता आलं असतं.बहुधा तिचं शरीर, डोळे सगळं एकाच फायनल मिशन साठी जिवंत ठेवल्या सारखं, त्याला इजा झालेली आता तिच्या खिजगणतीतही नाहीये.

राजी तो बस मधला माणूस, हा मॅनेजर यांना बराच फायदा घेऊ देऊन मग मारते.थोडं आधीच मारता आलं असतं.बहुधा तिचं शरीर, डोळे सगळं एकाच फायनल मिशन साठी जिवंत ठेवल्या सारखं, त्याला इजा झालेली आता तिच्या खिजगणतीतही नाहीये.>>>>नाही ग ती सहन करत असते त्यांना कारण काही केलं तर पोलीस मागे लागणार जे तिला नको असतं पण शेवटी मारतेच ती दोघाना
हो तो मिलिंद मरतो tevha पण तिवारी chi acting fab आहे किती stone हार्ट असतात हे लोक

स्टोन हार्ट कसा काय? रडत असतो तो सुचिला कॉल करून. आणि त्या माठ सुचिला काहीच कसं कळत नाही . नवरा रडतोय ते, का ती तसं दाखवत नाही? एवढे वर्ष झालेत लग्नाला, एवढं तरी कळायला हवं. वाईट वाटले तेव्हा . झोयाला मिस् केले यावेळी तिला पुढील सिझन मध्ये पहायला आवडेल.

मला कोण समंथा माहितही नव्हते, एक क्राइम पेट्रोल कॅटॅगरी साइड अ‍ॅक्ट्रेस खूपच चांगलं अ‍ॅक्टिंग करतेय इतकीच माझी प्रतिक्रिया, कोणी स्टार असेल माहित नव्हतं Happy
लुपहोल्स आहेत सिरीज मधे पण एंटरटेन्मेन्ट म्हणून आवडली !
मनोज वाजपेयी आणि त्याची टायमिंग्ज भारी !

Pages