अभ्यास केला पण भोकात गेला

Submitted by सिद्धेश्वर विला... on 3 June, 2021 - 08:00

अभ्यास केला पण भोकात गेला

शिकून काय झाले

मोठ्या मोठ्या पदव्या मिळूनही

ओझे तसेच राहिले

लहानपणी मी खिडकीतून

मुले खेळताना बघितली

हाती पुस्तक धरूनही

वीतभर फाटत राहिली

साहेब साहेब करूनहि माझे

कल्याण नाही झाले

पुस्तक माथी मारूनही

माझे बालपण हरवले

आज छकुला निरागसपणे

अहोरात्र खेळत राहतो

मी मात्र इथं कामावरती

दिवसभर चोळत राहतो

चोळण्यासाठी जन्म नव्हे हा

हे कळतेय मजला आज

स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी

अंगी असावा लागतो माज

=============================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

Group content visibility: 
Use group defaults

स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी
अंगी असावा लागतो माज
>>>>>

वाह क्या बात है.. मस्त
माज हा शब्द मला खटकतो, यमकासाठी आला असेल, पण हिंमत लागते असे जगायला हे खरेय..

छान

शालेय सोडून इतर परीक्षा स्कॉलरशिप वगैरे बंद कराव्यात

आता कळायला लागले. पण आता उशीर झाला आहे. कविता रिलेट झाली. मी ह्यावर एक विनोदी स्फुट लिहिले होते. एकानेही पाठिंबा दिला नाही. इथे आहे . https://www.maayboli.com/node/75468