Submitted by राजेंद्र देवी on 6 May, 2021 - 12:43
कल्पांत
किती चिता धडधलेल्या
अजून किती श्वास अडकलेले
दशदिशा फाटलेल्या अन
किती घरात काळोख दाटलेला
आटले माणुसकीचे झरे
मरती माणसे की जनावरे
थिजली नयने, थिजली मने
काय नियतीच्या मनात
कोण जाणे, कोण जाणे
किती उजाड झाली घरे
डोक्यावरती गिधाड फिरे
ना आता जगण्यासारखे उरे
कल्पांत आला आहे खरे
राजेंद्र देवी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सध्याची बिकट परिस्थिती
सध्याची बिकट परिस्थिती मांडलीयं कवितेत..!
वाईट वाटले. विदारक वर्णन.
वाईट वाटले. विदारक वर्णन.
हम्म, परिस्थिती अशीच आहे ,
हम्म, परिस्थिती अशीच आहे , काळजी घ्या हाच महामंत्र