अपराधी कोण? - भाग 3

Submitted by ShabdVarsha on 18 April, 2021 - 03:54
 ShabdVarsha

अपराधी कोण ? (भाग 3 )

"दादा "
साहिल फोन ठेवताच त्याला दादा म्हणून कुणीतरी आवाज देत आहे असं ऐकू येतं.तो वळून बघतो
"मानवी तू अशी अचानक?"
"का नको यायला हवं होतं का?"
"अरे !!! नाही तुझंच घर आहे तु केव्हा ही ऐवू शकते."
यावर मानवी हसते व ते दोघेही घरात जातात.
मानवी मयंगची लहान बहीण सहा महिन्यापूर्वीच तिचे लग्नं झाले होते.मानवीला जसा मयंग तसाच साहिल.
मानवी व साहिल घरात जातात.
"मानवी तू केव्हा आली?"
"तु बघीतले तेव्हाच आली आई."
"असं अचानक काही बोली नाही येणार आहेस असं."
"तुम्ही सर्व तेच विचारताय. तुम्ही तर नाही येत कुणी मग मीच आली."
"चांगलं केलंस आली तुझ्या बाबांना देखील बर नाही ये छान वाटेल त्याना तुला भेटून."
"काय बाबांना बर नाही? तुम्ही हे मला आता मी इथे आले तेव्हा सांगताय, म्हणजे मी आज इथे आली नसते तर मला माहीतच झाले नसते."
मानवी थोडी रागातच बाबांच्या रूमकडे निघून जाते.
"बाबा"
"मानवी तू कधी आलीस बाळा ?"
"आताच आली बाबा."
"तुला साहिलने कॉल केला का?"
"नाही मला कोणी कॉल केला नाही मीच आली मला कोण सांगतं आता इकडे काय झालं ते."
"असं नाही ये मानवी बेटा तुला नको उगाच टेन्शन म्हणून नाही सांगितलं बघ सध्या शशांक पण इथे नाही ये म्हणून बाकी काही नाही."
"बर बर ते सर्व ठीक आहे .पण तुम्हाला काय झालं हो असं अचानक ?"
"काही नाही ग, जरासा घाबरा झालो होतो. बाकी काही ही झालेलं नाही मला."
तितक्यात आई बाबांना जेवण घेवून जातात.
"बाबा तुम्ही जेवण करा मी मयंग दादाला भेटून येते."
"हो"
"दादा"
"काय रे कुठे आहेस ?"
"हो आहे इथेच." मयंग रूम मध्ये एका खुर्चीवर शांत डोळे मिटून पडलेला होता.
"इथे इतका शांत का बसलाय? साहिल दादा आलाय तरी."
"तुला साहिलने बोलावलं का ?"
"नाही."
"चल दादा बाहेर आईने जेवायला बोलवलंय."            
"मनू शशांक कसा आहे गं?"
"मला काय विचारतोय माझ्यापेक्षा जास्त माहीती असते तुला त्याची."
"नाही एवढ्यात आमचं बोलणं नाही झालं."
"तो मस्त आहे लवकरच येण्याचा प्रयत्न करतो असं बोलाय."
"अच्छा."
ते दोघे जेवणासाठी जातात.
साहिल, मानवी व मयंग जेवण करतात. आई व मानवी थोडे काम आवरून बाबांच्या रूम मध्ये जातात.
इकडे मयंग व साहिल मयंगच्या रूममध्ये जातात.
"मयंग काय झालंय सागशिल?. "
"बाबां बद्दल बोलतोय का?"
"हो" मयंग क्षणभर शांत बसतो.नंतर बोलू लागतो.
"मीच अपराधी असावा बाबांच्या या अवस्थेचा माझ्यामुळे झालंय हे."
"हो तुझ्यामुळेच झालंय हे,मयंग मला तुझ्यासारख्या मुलाकडून असली अपेक्षा नव्हती."
"म्हणजे तुला बाबांनी सर्व प्रकार सागितला. माझा अंदाज खरा ठरला बाबांनी मला नको तो प्रकार करतांना बघीतले. मी अपराधी आहे त्यांचा."
मयंगला अश्रू अनावर होतात.
"मयंग तुला तस करत असतांना एकदा पण आई बाबांचा विचार नाही आला का? तुला माहीत आहे ना तुच सर्व काही आहे त्यांच्यासाठी तरीदेखील असा विचार तुझ्या मनात आलाच कसा. तु सतत इतरांना म्हणायचा जीवन आपल्या मस्तीत जगायचं त्या दिवशी हे तु कसं विसरलास."
साहिल आता रागात दिसत होता.
"मला सांग काय कमी आहे तुझ्याकडे? आई ,बाबा ज्याच्यासाठी तुच सर्वकाही आहेस.
मानवी सारखी जीव ओवाळून टाकणारी बहीण आणि मी व शशांक सारखे मित्र.तुला कसच काही नाही वाटलं रे!!!! तुझ्या नंतर काय होईल आमचं एकदा पण विचार नाही आलास?"
"असं नाही ये साहिल गेल्या चार महिन्यापासून मी तुमच्याचसाठी जगत आहे."
मयंगला खूप काही बोलायचं होतं परंतू त्याचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते.
"मग सांग ना त्या दिवशी का आमच्याशी बोलला नाही. शशांकला पण काही सागितलं नाही."
"रश्मी त्या दिवशी भेटली होती."
"काय? कुठे ?"
"कंपनीच्या गेटवर मी घरी येत असतांना."
"ती काही बोली का तुला? तु मला का नाही सांगितलं?"
मयंग पुढे काही बोलणार तोच तिथे मानवी जाते.
"साहिल दादा, मयंग दादा तुम्ही कायम भेटतात तरीदेखील आज पण तुम्ही दोघंच बसलाय.मी इतक्या दिवसांनी आली आहे,तुम्हाला माझ्याशी काही बोलावं नाही वाटत का? काळजीचं नाही माझी तुम्हाला."
मानवी पुढे मयंग कसातरी स्वत:ला सावरतो.
"मयंग दादा काही झालंय का ? तु रडलाय ना ? "
"नाही मनू काहीच नाही झालं मी ठीक आहे."
"मग तुझे डोळे का लाल आहे? खोटं बोलू नकोस." 
"अगं काल त्याची झोप झाली नाही म्हणून झाले असतील.बाकी काही नाही."
"नक्की ना साहिल दादा."
"हो "
"मग ठीक आहे.
"मग साहिल दादा घरी सर्व कसे आहेत ?"
"मजेत आहे सर्व,तु घरी चल आई आठवण काढते तुझी."
"ठीक आहे नक्की येईल सांग काकूंना तसं."
"मानवी बराच वेळ त्या दोघांशी गप्पा करते."
"बर मानवी मला आता निघायला हवं आई आज घरी एकटीचं आहे."
"काका कुठे गेले?"
"त्यांना जरा काम होतं त्यांनी फोन करूण सांगितलंय घरी यायला उशिर होईल असं."
"थांबला असतास आज इथे."
"नाही नको मयंग उद्या येतो परत हव तर थांबतो उद्या इथेच,आज जाव लागेल."
"बर ठीक आहे दादा पण अजून थोडावेळ थांब सायंकाळचा चहा घेवून मग जा."
"ओके"
ते तिघे हॉलमध्ये जातात तिथे आईशी बोलत बसतात. यातच सायंकाळचे सहा वाजतात.
"मी चहा ठेवते सर्वासाठी ."
"हो मानवी ठीक आहे. मी पण तुमच्या बाबांकडे जाऊन येते."
"हो आई ठीक आहे." 
"मयंग उद्या शशांक येतोय."
"काय म्हणजे तु त्याला सर्व सांगितलं?"
"हो कालच मानवी आली तेव्हा बाहेर मी त्याच्याशीच बोलत होतो. का नको होतं का सांगायला? तो आता या घरचा जावई झाला आहे म्हणून का?"
"नाही तसं नाही तो त्या आधी आपला बेस्ट फ्रेंड आहे. नंतर जावई पण मनू ही इथे आहे आणि त्यात त्याचं काम झालं नसेल तरी तो सर्व सोडून येईल तस घडयला नको.तो ज्या प्रोजेक्टसाठी मुंबईला गेलाय तो त्याच्यासाठी खूप महत्वाचा आहे."
"झालंय त्याचं काम, मला आता निघाव लागेल त्या आधी मला तू वचन दे यापुढे तु असला विचारदेखील करणार नाही."
"नाही मी वचन देतो."
"दादा चहा घे."
"हो " साहिल चहा घेतो .
"येतो मी मानवी उद्या येईल परत काळजी घे बाबांची."
"हो दादा सावकाश जा."

क्रमशः
- शब्दवर्षा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा छान आहे, फक्त एक सुचवायचे होते.
धाग्याच्या नावातच 'भाग क्रमांक' टाकलात तर शोधायला सोपे होईल.
उदा. अपराधी कोण? - भाग ३

@विक्षिप्त मुलगा
धन्यवाद
तुम्ही सांगितल्या प्रमाने बदल केलाय.