अनाथ , गतिमंद मुलासाठी संस्थेची चौकशी

Submitted by पीनी on 22 April, 2021 - 07:27

आमचे एक नातेवाईक काही दिवसांपूर्वी अचानकपणे वारले. आता त्यांचा मुलगा एकटा पडला आहे. (वडील काही वर्षांपूर्वी गेली, आई नुकतीच गेली, हा एकुलता एक आहे)

तो साधारण 28-30 वर्षांचा आहे. पण थोडा गतिमंद प्रकारचा आहे. अपंग नाही, मतिमंद नाही, 10 वी झालेला आहे. व्हाट्सअप्प वापरता येते, गूगल सर्च करता येते. पण व्यवहार ज्ञान नाही. नोकरी केली नाही, लोकांमध्ये मिसळला नाही. तब्येत बरीच नाजूक आहे.

त्याच्या एका नातेवाईकांकडे त्याची राहण्याची व्यवस्था करावी असा विचार सुरू आहे. आणि त्याच्या आईवडिलांच्या पैशाचे ट्रस्ट करावे, ज्यात इतर काही नातेवाईक असतील असे ठरत आहे.

प्लॅन B म्हणून - इतर कुठल्या संस्था अशा मुलांना मदत करतात का? काही पैसे देऊन त्याच्या राहण्या खाण्याची व्यवस्था करणे, वेळप्रसंगी औषधोपचार,  आणि एखादे काम शिकवून त्याचा रोज वेळ जाईल आणि थोडे का होईना पैसे मिळतील अशी व्यवस्था होईल का?
संस्था पुण्याजवळची असल्यास सर्व नातेवाईकांना बरं पडेल.

त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी काही पैसे ठेवले आहेत, पण जर त्याने अर्थाजन केले तर त्याला ते आयुष्यभर पुरेल.

कृपया पर्सनल कमेंट्स नको. प्रत्येक जण आपापल्या परीने त्याच्यासाठी करणार आहेत. पण इतर कोणी आयुष्यभर जबाबदारी घेण्यापेक्षा तो कुठल्याच नातेवाईकावर अवलंबून राहिलाच नाही तर त्याच्यासाठी कदाचित जास्त योग्य राहील का, या विचारातून संस्थेचा पर्याय बघत आहोत.

अशा संस्था माहित आहेत का? त्या खात्रीच्या असतात का? (पेपर मध्ये ज्या बातम्या येतात, की किडनी विकली वगैरे त्यामुळे संस्था नकोच असा एक विचार आहे)

त्याला घरीच ठेवायचे म्हणले तर काय शिकवता येईल?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असाच प्रश्न मलाही माझ्या एका नातेवाइकासाठी विचारायचा आहे
त्याचे वय ४१वर्षे, शिक्षण भरपूर झालेय (be आणि mba ).
लग्न झाले होते, बायको दुसऱ्या माणसासोबत पळून गेली, तिने दुसरे लग्न केले.
मानसिक रुग्ण आहे. लग्न झाले तेव्हा उपचाराने ठीक झाला म्हणून लग्न केले होते पण बायकोने धोका दिल्याने आजार पुन्हा बळावला.
लहानपणी आई वडिलांनी अत्यंत(करू नये इतके )लाड केले आहेत. त्याचाही परिणाम असेल की जगात वागता आले नाही आणि मानसिक आजार जडला.
लग्न झाले तेव्हा कॉलेज मध्ये शिकवत होता
आता काहीही कमवत नाही, वडिलांचे pension येते, स्वतः चे घर आहे, घरात बंद करून घेतले आहे स्वतःला, खाणे पिणे डबा लावला आहे, सर्व व्यवस्था बहिणी बघतात. पण आता बहिणींचे वय होत आले आहे.
एखादी संस्था असेल तर त्याच्या property तुन येणारे पैसे वापरून त्याची व्यवस्था outsource करायची आहे.
पुन्हा dr कडे नेण्याचे सर्व प्रयत्न फसले आहेत, हिंसक होतो.
एरवी तसा धोकादायक नाही. खातो पितो आणि रिकामा बसून राहतो

(सॉरी पिनी धागा hyjack केलं पण समस्या सारखी वाटली म्हणून इथेच प्रश्न विचारला.)
संस्था नांदेड किंवा पुणे येथे असेल तर बरे होईल, ह्या भागात सर्व नातेवाईक आहेत
अशी संस्था जी ह्या माणसाची काळजी घेईल, शक्य असेल तर medical treatment देऊन पुन्हा माणसात आणेल, नातेवाईक प्रयत्न करून थकले आहेत, कुणालाही दाद देत नाही, मनुष्यबळ जास्त नाही त्यामुळे व्यवस्था लावण्यापलीकडे काही करता येत नाहीये
तो बरा होऊन मार्गाला लागावा अशी सर्वांची इच्छा आहे

किल्ली , हायजॅक वगैरे नाही काही. अशा संस्थाबद्दल माहिती गोळा करण्यासाठी हा धागा आहे.
अजून कोणी त्यांच्या नातेवाईंसाठी विचारले तरी चालेल.

अशा लोकांसाठी बँक , कंपनी वगैरे मध्ये जॉब्स मिळू शकतात असे ऐकले आहे. कोणाच्या माहितीत अशा जाहिराती आल्या तर कळवा. तसंच
http://www.disabilityjobs.gov.in/ हे सरकारने काढले आहे. पण तिथे आता काहीही जॉब नाही.

पिनी, वाईट वाटले. माहिती तर काही नाही पण लवकर काहीतरी सोय होवो.

किल्ली, खूप काळापुर्वी डॉ. आनंद नाडकर्णी यांचे नाव ऐकले होते. ते मानसिक रुग्णांवर उपचार करतात इतकेच ऐकले होते. बाकी माहिती नाही. त्याबद्दल काही माहिती मिळाली तर पहा.

केया. जीवनज्योत संस्था का, भुसारी कॉलनी मधे आहे पुण्यात.
कामायानी सोसायटी (संस्था) पण आहे गोखलेनगर पुणे येथे. गुगलवर माहिती असेल संपर्क असेल. पण या संस्थेचे नाव चांगले आहे. तुम्हाला नक्कीच काहीतरी मदत होईल.

माहिती तर काही नाही पण लवकर काहीतरी सोय होवो. -- + १२३४५६७

सर्वांना धन्यवाद.

हा मुलगा मतिमंद नाही, गतिमंद आहे. Slow आहे. याला स्वतःची रोजची कामे करता येतात. लोकांशी बोलता येते, फोन करता येतो. सांगितल्याप्रमाणे पैशाचाही व्यवहार करता येतो. पण एकटा असला तर कोणी फसवू शकेल. कामं चटकन शिकू शकणार नाही, थोड्या चुका होतील. कमवण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, थोडं फार इंडिपेंडन्ट होण्यासाठी अजून काही करता येईल का अशी चाचपणी सुरू आहे.

मतिमंद मुलांसाठी बऱ्याच संस्था आहेत , पण तिथे फोन करण्याचा धीर झाला नाही. या मुलासाठी काही वेगळे पर्याय मिळू शकेल का ते बघत आहे .

असो. पण तिथेही कॉल करून पहाते. तिथेही काही पर्याय मिळूनही जाईल.

Piku you were right.. जीवन ज्योत च आहे संस्थेचे नाव.. आता च जाऊन आले ..

>> मतिमंद नाही, गतिमंद आहे. Slow आहे. स्वतःची रोजची कामे करता येतात. लोकांशी बोलता येते, फोन करता येतो. सांगितल्याप्रमाणे पैशाचाही व्यवहार करता येतो. पण एकटा असला तर कोणी फसवू शकेल.

Psychotherapist / Psychologist यांची मदत होऊ शकेल (?)

एक सुचवावेसे वाटते. गतिमंद आहे तर वृद्धाश्रमासारख्या ठिकाणी नोकरी आणि रहाण्याची सोय किंवा गतिमंदांसाठीच्या ग्रुप होममधे नोकरी आणि रहाण्याची सोय असे काही होवू शकेल का? म्हणजे कामात व्यस्त रहणेही असेल आणि सुरक्षितता देखील असेल. दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणार्‍या संस्थेतही अशाच प्रकारे काम आणि रहाण्याची सोय झाल्यास सुरक्षित वातावरणात काम , रहाणे साध्य व्हावे.

लहानपणी आई वडिलांनी अत्यंत(करू नये इतके )लाड केले आहेत. त्याचाही परिणाम असेल की जगात वागता आले नाही आणि मानसिक आजार जडला.>>> >>> नाही किल्ली.त्याने फक्त वर्तन समस्या उद्भवू शकतील. मानसिक आजारात मेंदूतील केमिकल लोचा जास्त कारणीभूत असतो.बाकीचे घटक त्याला सपोर्टिव्ह असतात.

पुन्हा dr कडे नेण्याचे सर्व प्रयत्न फसले आहेत, हिंसक होतो.>>>>> अशावेळी एखाद्या रिहॅब सेंटरमधे ,सर्वांनुमते ठेवा.वाईट वाटेल.पण त्याच्या दृष्टीने चांगले होईल.सेंटरची माणसे न्यायला येतात.तिथे काउंसिलिंग्,औषधे यांनी फरक पडतो.
खाणे पिणे डबा लावला आहे,>>> त्याने स्वतःने चालू केला आहे की नातेवाईकाने? त्याने स्वतःने डब्याची व्यवस्था केली असेल तर फार चांगले आहे.

ह्या व्यक्तीची बहीण अधून मधून भेटायला जाते तेव्हा हा दार सुद्धा उघडत नाही, का आलीस निघून जा वगैरे एवढंच बोलतो. सध्या तरी घरात एकटाच राहतो. कधी कधी नातेवाईक दोघे तिघे जातात आणि घराची साफसफाई करून येतात
त्याने कशालाच हात लावलेला नसतो
कुणी आलं की room मध्ये कोंडून घेतो
डबा नातेवाईकांनी लावला आहे, डबेवाला दाराजवळ डबा ठेवून जातो.

वर पीनीने म्हटल्याप्रमाणे माझाही एक नातलग आहे.सद्ध्या त्याचे आईवडील हयात असले तरी म्हातारपणाकडे झुकलेले आहेत.त्यांचे नातलग असे फारसे नाहीत.जे आहेत तेही लांब आहेत आणि म्हातारे आहेत.त्या मुलाला ,त्याच्या आजारावरील उपयोगी ठरणार्‍या काही गोळ्यांची अ‍ॅलर्जी असून तो एकटा राहू शकणार नाही.आताही त्याला एकटे रहायची भीती वाटते.पुढे तू कसे करणार म्हटले तर पुढचे पुढे म्हणतो.अर्थात ते फक्त वेळ मारून नेण्यासाठीम्हणतो हे तितकेच खरे.पैशाची अजिबात ददात नाही.पण ते समजायला मेंदू नाही.मतीमंद नाही.
त्याच्या आईने तर त्याला सांगून ठेवलेय की आम्ही गेलो तर तू या मूठभर गोळ्या खा,पण आमच्यानंतर राहू नको.
आई व्यवहारी आहे,पण वडील आंधळी माया करतात.आई त्याला भाजी किंवा बँकमधे पाठवायचे म्हणते त्यावेळी वडील म्हणतात मी आणतो.आज आईवडील चालतेफिरते आहेत.त्यांच्यानंतर याचे काय करायचे हा खरंच मोठा प्रश्न आहे.

पुन्हा dr कडे नेण्याचे सर्व प्रयत्न फसले आहेत, हिंसक होतो>>>>>>
डॉक्टरकडे न्यायची गरज नाही. डॉक्टरांना केस समजावून सांगा. आणि प्रिस्क्रिप्शन घ्या.
माझा अनुभव सांगतो. तो काहीना काही खात पीत असेलच. त्यातून औषध त्याच्या नकळत द्या. मी हा उपाय केला आणि
पेशंटच्या वागणुकीत हळू हळू सुधारणा होत गेली. करून तर पहा. कारण ह्यावर औषध हाच एकमेव उपाय आहे. दुसरा कुठलाही नाही . आणि त्याला माणसात ठेवा. कुठेतरी सोडून देऊ नका !

आईगं! देवकी, वाचतानाही कसेतरीच झाले ! त्या पालकांच्या काळजीची तर कल्पनाही करु शकत नाही.

माणसे नाहीत जवळची फारशी सोबत राहण्यासारखी, म्हणून तर.
बहिणीच आहेत ज्या सर्व व्यवस्था पाहत आहेत, त्याची म्हातारी आई सुद्धा सोबत राहायला घाबरते ( वय ८० च्या जवळ, तिला दिसत नाही आता डोळ्याने, परवलंबी झालीये, ती मुलींकडे राहते )
पण बहिणींच्या ही काही न काही कौटुंबिक समस्या आहेत ज्यामुळे मर्यादा येतात
जमेल तितकी काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत

त्याच्या आईने तर त्याला सांगून ठेवलेय की आम्ही गेलो तर तू या मूठभर गोळ्या खा,पण आमच्यानंतर राहू नको.>>> Sad

<< त्याच्या आईची तर इच्छा आहे की मुलगा आपल्याआधी जावा.वाईट वाटतेय पण काय करणार? >>

------- वाईट वाटले.... Sad

काहीच करता येणार नाही का? छोट्या व्यावसायांत मदत ?

सहकारी तत्वावर चालणारे एक मॉडेल आमच्याकडे आहे, रिसायकलिंगची एक चेन आहे. सात -आठ ठिकाणी ते रिसायकलींग होणार्‍या वस्तू स्विकारतात. अनेकांना तिथे ( ७० -८० तरी असतील) जॉब मिळतात. प्लॅस्टिकच्या/ काचेच्या बाटल्या लोक आणतात, हे लोक त्या स्विकारून, मोजून (पाचाच्या पटीत |||| |||| |||| ... प्रत्येक रेघ पाच दर्शवते) कागदावर लिहीतात. लोकांना रिसायकलींचे पैसे मिळतात (अर्थात त्यांनी वस्तू विकत घेतांना ते दिलेले असतात), या लोकांना ८ तासांचा जॉब मिळतो, ते प्लॅस्टिक/ काच पुन्हा रिसायकल होत वापरांत येते, त्याचे पैसे मिळतात, त्या पैशातून यांचे पगार होतात. खूप पैसे मिळत नसतील पण किमान रोजगार मिळतो. बर्‍यापैकी एकाचे तर चालते. या लोकांना सहज काम करता येते. काही चुका झाल्या (तशा त्या होत नाहीच) तरी कुठेही आभाळ कोसळत नाही. त्यांच्यासाठी आणि समाजासाठी हे लोक कामात व्यस्त असणे आवश्यक आहे....

आम्हाला दर ४ महिन्याला साधारण २५- ३० $ रिसायकलींग मधून मिळतात. पैसे न घेण्याचा पर्याय असतोच.

त्यांच्यासाठी आणि समाजासाठी हे लोक कामात व्यस्त असणे आवश्यक आहे....... अगदी खरे आहे.त्या मुलाच्या झेरॉक्स चे दुकान काढून द्या वगैरे सांगितले होते.पण ते राहतात त्या तिथे असे काही शक्य नाही.छोटे कोर्स करायचे म्हणत होते.मध्येच करोना आलाय.जिममध्ये, टाईपिंगच्या क्लासमध्ये जात होता.ते सध्या थांबले.नंतर चालू होईलही.
पण मुख्य प्रश्न आईवडलांनंतर काय हा आहे.बरे एखाद्या संस्थेत ठेवलाच तर त्याला रस्त्यावर काढणार नाहीत कशावरून?

तो मुलगा पहिल्यापासून असा नव्हता.खूप आनंदी होता.अभ्यासात फारसा चांगला नाही पण ठीक होता.

मी बऱ्याच संस्था , पुनर्वसन केंद्र इथे चौकशी केली. कोणाकडेही त्याला काम करता येईल आणि थोडेफार पैसे कमावता येतील अशी सोय नाही.
राहणे- खाणे- पिणे याचे २२-२५००० प्रति महिना. वेळप्रसंगी औषधे , टेस्टस वगैरे खर्च वेगळा.हा खर्च परवडण्यासारखा नाही.

गूगल करून अजूनही काही ठिकाणी चौकशी करेन.

कोणाच्या ओळखीने एखाद्या बँक, कंपनी, संस्था वगैरे ठिकाणी नोकरी मिळाली तर बघत आहे. कोणाकडे काही रेफेरन्सबसेल तर कळवा.

@स्वाती2,
गतिमंदांसाठीच्या ग्रुप होममधे नोकरी आणि रहाण्याची सोय असे काही होवू शकेल का? >> असेच काहीसे शोधत आहे. पण अशा ठिकाणी नोकरी मिळण्यासाठी ओळखीशिवाय पर्याय नाही असे वाटत आहे.

@ मंजूताई, यांना कॉल केला. वर लिहिले आहे तेवढा खर्च, नोकरी वगैरे नाही.

@उदय,
किती चांगली व्यवस्था आहे. मला अजून असे काही मिळाले नाही.

पीनी, नागपुरला संद्न्या संवर्धन संस्था आहे तिथे विचारले असते पण सध्या बंद आहे.
उदय म्हणतात तसं तिथे काम मिळू शकलं असतं. माझ्याकडे रद्दी घ्यायला मुले यायची.

नक्की आठवत नाही पण एका मासिकात लेख वाचला होता. बहुदा चाकणला एक कंपनी आहे (workshop सारखं काही) तिथे फक्त अश्याच गतिमंद मुलांना नोकरी देतात.

दुर्दैवाने आत्ता मदत होईल असे तपशील अजिबातच आठवत नाहीयेत.

Navoday rehabilitation centre ही अशी एक संस्था आहे नाशिकला. तुम्ही कॉन्टैक्ट करु शकता 9867077449

Navoday rehabilitation centre ही अशी एक संस्था आहे नाशिकला. तुम्ही कॉन्टैक्ट करु शकता 9867077449

आइ वडिलाच्या पैशाचे ट्रस्त कसे करतात म्हणे ? trust करायला १०,१२ लोक लागतात , शिवाय त्याचे ऑदित व्हावे लागते.

एखाद्या नातेवाइकाने ते पैसे व मुल सम्भाळणे , असेच करता येईल

पुण्याला सहकार नगर जवळ प्राजक्ता कोळपकर यांच्या कडे चौकशी करून बघा
आम्ही मागे गेलो तेव्हा काही मुले राहायला होती.. आता आहे कि नाही हे बघावे लागेल
चांगले आहे .

प्राजक्ता - ९८८१९०७२४१

http://prafoundation.com/