पुणे तेथे काय उणे ?

Submitted by ऱोहि on 22 March, 2021 - 11:59

ऐन करोना काळात आम्ही पुण्यात शिफ्ट झालो. शिफ्ट व्हायची तयारी तशी होती पण लेकीला शाळा बघायला वेळच मिळाला नाही.
आलो ऑगस्ट मधे तेंव्हा मिड इयर म्हणून चांगल्या शाळा ऍडमिशन देईनात. कसे बसे एका नवीन शाळेत घालून वर्ष सुरु केलं. हे वर्ष असं तास जातंय पण आता
पुढील वर्षाच्या विंडो कधीच बंद झाल्या. हव्या त्या शाळेसाठी अजून किती वर्ष प्रयत्न करत राहायचे ?
कुठल्या शाळेचे कसे review आहेत हे बघायला सुद्धा शाळा उघड्या नाहीत. आपण कसे काही न ठरवता पुण्यात आलो याचा पश्चाताप होत आहे .
मुलीचे तब्बल २ वर्ष वाया घातले या जाणिवेने guilt येतंय.
मी खराडी मधे रहाते. मला लेकीसाठी बिशप स्कूल हवी होती. सध्या करोना मुले काही सीट्स कमी झाल्या असतील का? चौकशी केली पण कुणी उत्तर देत नाहीये.
मुलगी आता ३ मधे जाईल . कुणी चांगल्या शाळांची माहिती देईल का ? मला लाखो रुपये खर्च करायची मनापासून इच्छा नाहीये.

ह्या सध्याच्या परिस्थिती मध्ये आऊटडोअर गेम्स कुठे चालू असतील ह्या भागात तर त्याचीही माहिती हवी आहे. घरी बसून अबॅकस, पियानो classes कुणी घेते का
आणि त्याचा खरंच मुलांना फायदा होतो का ?

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

HDFC School बघा.. अजून एक DY PATIL पण आहे. टिंगरे नगर च्या तिथे. मांजरी ची ट्री हाऊस चांगली आहे. ट्री हाऊस ने गेलः पूर्ण वर्षभर ऑनलाईन तास ऊत्कृष्ट पध्दतीने घेतले आहेत. या वर्षी पण प्रत्यक्ष शाळेत जाणे हा प्रकार नसल्याने थोडी लांबची शाळा पण चालू शकेल.
तसेच मुलीच्या शाळेजवळ घराला प्राधान्य द्या. आपण पुरवास करू शकतो परंतू लहान मुलांना घराजवळच्या शाळेचा कंफंर्ट देणे महत्त्वाचे

माझा मुलगा HDFC school मध्ये आहे. ती चांगली शाळा आहे. मगरपट्टा रोड वर आहे. खराडी वरून बस सुद्धा आहे शाळेची. तिकडे जागा मिळन्याचे चान्सेस आहेत.

फेसबुकवर Pune parents schools product reviews नावाचा ग्रूप आहे.... तिकडे बरीच माहिती मिळू शकेल.
तो किंवा असे अनेक ग्रूप आहेत "pune kids" वगैरे जिथे तुम्ही म्हणताय तश्या ऑनलाईन हॉबी क्लासेस, स्पोर्ट्स कॅम्पस वगैरेचे बरेच अपडेट्स येत असतात!

https://adhyapann.com/courses/

इथे ऑनलाईन क्लास असतात.

शाळेसाठी parentree वेबसाईट पहावी. त्यात शाळेची बरीच माहिती मिळेल. प्रश्न पण विचारता येतात.

धन्यवाद प्राजक्ता , प्रवीणप
HDFC ची फीस खूप आहे असं ऐकलं मी . त्यामुळे मी बिशप सारखे ऑपशन्स बघत होते.
त्यात म्हणे ते स्पोर्ट्स मध्ये इंटरनॅशनल लेवल ला पाठवतात.
स्वरूप ग्रुप चांगले आहेत जॉईन केले , सियोना ग्रुप जॉईन केला