भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅलर्जी असेल तर ती जाते का हे माहित नाही पण हायपोअ‍ॅलर्जेनिक डॉग ब्रीड्स असतात बरेच. त्यांचे केस गळणे कमीत कमी असते. डॉग घरी आणताना ते बघूनच आणावे. माउई चे ब्रीड तसेच आहे. गोल्डन रिट्रिवर वगैरे चे भयंकर गळतात. अतिप्रेमळ कुत्रे असतात ते अगदी पण केस खूप जास्त गळतात. त्यामुळे मेन्टेनन्स जास्त.

ओडीन चे पण भरपूर गळतात
पण आता लक्षात आले आहे की ती एक सायकल आहे
ठराविक काळाने गळतात
विशेषतः सिजन चेंज होताना गळतीचे प्रमाण वाढते
आमच्याकडे तर विशेष काळजी घ्यावी लागते कारण माझ्या मुलाला बाळदमा आहे, तयामुळे आधी घरात भुभु आणण्यालाच प्रचंड विरोध झाला होता
आता आम्ही एक व्हॅक्युम क्लिनर आणला आहे
त्याने सोफे, गाद्या आणि फारशी साफ करतो
केर काढून अजिबात उपयोग नाही, ते इतके हलके असतात की वर वर उडत राहतात
त्यामुळे क्लिनर मस्ट आहे
आणि एक दोन दिवसातून त्याला स्लीकर ब्रश ने छान विंचरून काढतो
त्यात बरेचसे केस मिळतात की ते टाकून द्यायचे की झालं
तरीही केस इकडे तिकडे, कपड्यावर, उशीवर मिळतात
त्याकडे चक्क दुर्लक्ष करायचं

धन्यवाद मैत्रेयी.
हो आशुचँप ताई च्या lab चे पण केस खुप गळतात. केर काढताना तर मोठेमोठे पुंजके असतात. तेंव्हा ती बोलली होती की त्यांचा shredding period असतो. अशी एक ही जागा नाहीये त्यांच्या कडे जिथे त्याचे केस नाहीयेत. मी तिकडे असताना मला सारखा खोकला आणी घसा खवखवणे होत होते. सो मला नेहमी असे वाटायचे की बाकीचे लोक यासाठी काय करतात.
माझ्या आईला सूद्धा दम्या चा त्रास आहे म्हणून आम्ही कोणताही पेट नाही पाळला आजपर्यंत.

कुरियर वाल्या पासून कोणीही आलं तरी कुतूहलाने बघत बसतो निवांत >>> आमचा चिकू ओडीनचा जत्रेत हरवलेला भाऊ आहे ह्या बाबतीत. भुभु पेक्षा ससाच जास्त आहे तो.
4D3CC80A-BDC1-43C0-BFE3-6290741189A4.jpeg4720A8D7-1C55-4CA9-9285-9D413042AE3A.jpeg

आमचा चिकू ओडीनचा जत्रेत हरवलेला भाऊ आहे ह्या बाबतीत. भुभु पेक्षा ससाच जास्त आहे तो.>>> लॅब्राडूडल ट्रेट आहे. आमची कोकोपण कुणी जवळ आलं तर लांब पळते. सुरक्षित अंतरावर जाऊन मग भुंकत बसते. दारावरची बेल वाजली की जोरात भुंकत दाराकडे न जाता समोरच्या जिन्याकडे जाते, जिन्याच्या लँडींग वरून मग जीव खाऊन, मागचा पाय झेप घेण्याच्या आवेशात घासून ओरडत रहाते. पण कोणी तिच्या जवळ आलं की मागच्या मागे छू!

चिकूला सगळ्यांच्या जवळ जायचच असत. फक्त कसलाही मोठा किंवा अचानक आवाज झाला की घाबरगुंडी उडते त्याची. लहान असताना तर फॉल मध्ये वाळलेली पानं रस्त्यालगत उडताना दिसली की त्याला कुठे पळू आणि कुठे नको व्ह्यायच.. हल्ली नाही घाबरत वाळलेल्या उडणार्‍या पानांना :ड
तो माणसं आणि छोटे पक्षी सोडून सगळ्यांवर भुंकत बसतो.

हे पब्लिक आरश्यात किंवा काचे मध्ये स्वतःचेच प्रतिबिंब बघून भुंकतात का? फार मजा वाट्ते तेव्हा.

आमच्या कडे डॅशीऊड असल्याने बेल वाजायचा अवकाश किंवा सिनेमात बेल वाजली तरी जोरात भुंकणॅ. आवा ज इतका जोरात शरीराच्या मानाने कि जर्मन शेपर्डच आहे असेच वाटा वे बाहेरच्याला.

मेड धोबी बिगबास्केट वाला आला की जीव खाउन भुंकायचे व समो र उभे राहायचे. बिग बास्केट सामानातले लेग पीस दिले की चिरुटासारखे तोंडात घेउन मागे जाउन पांघरुणात बसायचे. झाला किस्सा.

ते ना हीतर मेड आली की ग्लुको ज बिस्किट चा पुडा घेउन त्याची जीव खाउन संरक्षन करायचे. म्हण जे ओरडा आर्डा करून तिला जवळ येउ द्यायचे नाही. त्यामुळे आम्ही पण बाजू बाजून घे नाहीतर नाही झाडलेस तरी चालेल सांगतो. आमच्याकडे कुत्र्याचाच काय तो कचरा होतो. तो कधीही पटकन साफ होतोच नो इशू.

इथे नवीन आलो तेव्हा शेजा र्‍यांची वाभरट लहान मुलगी समो र ही लिफ्ट का ती लिफ्ट करत नाचत होती. तर ह्या बाई भुंकत जोरात पळ्त तिच्या समोर शेपटी हलव त उभ्या. ती ले डीज व मुलींना काहीच करत नाही व जन्मात कद्धी कुणाला चावलेली नाही. पण ते ह्यांना माहीत नाही.
मुलीचा तमिळ बाबा भयंकर चिडला व भांडण झाले. तेव्हा पासून आजता गायत शेजार्‍यां शी बोलणे नाही.

काय मस्त धागा आहे हा! टोटल स्ट्रेसबस्टर. ओडीन आणि माऊई तर अगदीच घरातले वाटायला लागले आहेत. बाकी सगळी बाळं पण अगदी क्यूट.

आशुचँप, सुंदर भूभू आहे. खोड्या पण आवडल्या.
प्रतिसाद वाचते हळूहळू.
मस्तं धागा आहे.

चिकू पण छान आहे
एकदम कापसाचा गुंडा.
लहान मुलांची एकदम 2 टोकं असतात.एक म्हणजे भुभु 1000 फुटावर असेल तरी घाबरायचं दुसरं म्हणजे कोणत्याही साईझ च्या भुभु ला हात लावायला जायचं.
मी घाबरणे कॅटेगरीत लहानपणा पासून होते.पण 'कुत्रा पाहून धावायचं नाही, तो आपल्या डबल वेगाने धावतो' असं लहानपणी पासून शिकवलं आहे सर्वांनी. आता हा धागा वाचल्यावर प्रत्येक भुभु शी प्रेमाने बोलते.
मुलीच्या गायन क्लास च्या बिल्डिंग मध्ये एक दणकट भुभु आहे(तो टॉम अँड जेरी मध्ये बाहेर असतो तसा, बहुतेक बुलडॉग.)
तो भुंकायला लागला की आम्ही त्याला सांगतो, बघ रे.आम्ही तुझ्या ओळखीचे आहे.मग वास घेऊन शांत बसतो. दिसायला मस्त आहे तो भुभु

ओडीन खुन्नस तर कोणालाच देत नाही
त्याला उलट म्हणतो बाबा रे निदान एका तरी व्यक्तीला भीती वाटू देत तुझी, जरा तरी अग्रेसिव्ह वाट
पण नाहीच, कोणीही आलं की हे येड हॅ हॅ करत, तोंड पघळत जातं शेपटी हलवत
जे बेसिकलीच भुभुज ना प्रचंड घाबरतात तेच फक्त ओडीन ला घाबरतात, बाकी ग्राउंड वरची अनोळखी बारकी पोरे पण खुशाल त्याला येऊन थोपटतात, मानेवर हात फिरवतत्
कुणाला नाराज करत नाही सहसा
त्याच्या तंद्रीत असेल आणि खेळण्याच्या मूड मध्ये असेल तर मग पळत असतो कानात वारा गेल्यासारखास पण एरवी अत्यंत निरुपद्रवी
गार्ड डॉग म्हणून तर शून्य मार्क आहेत त्याला
कुरियर वाल्या पासून कोणीही आलं तरी कुतूहलाने बघत बसतो निवांत
कोणावर म्हणजे कोणावर भुंकत नही
भुंकतो फक्त आमच्यवर, त्याला खेळायचं असताना खेळलो नही, दुर्लक्ष केलं तरच

ह्यातला शब्द न शब आमच्या एलोन साठी लागु .
मी तर म्हणते त्याला माहितीच नाहीये कि त्याची ताकत किती आहे ते

काळ walk ला गेलो होतो तर एक १००% अनोळखी म्हणजे कधी walk ला समोरून गेले नसतील . हा त्यांच्या जवळ गेला तर त्यांनी फक्त हात उचलला तर आमचं येडं गेलं लगेच लाड करून घ्यायला

a8e9b6bb-7687-487c-8c9b-abb2d065eb80.jpg

आता ह्या साईझ च्या प्राण्याने स्वतःच्या इमेज सारखे वागावे कि नाही

20201017_202000.jpg
हे आमचे बाळ. तसे पाळण्यातले नाव डस्टी आहे पण हाक मात्र माऊ, चिकू, चिमणे अशीच मारतो Lol
(मोबाईलवरून अपलोड केलाय पण खूप प्रयत्न करूनही फोटो आडवाच अपलोड होतोय Uhoh )

छान आहेत एलोन आणि डस्टि.एलोन खातेपिते घर का आहे.हा क्लास मधला भुभू
IMG_20210307_125041.jpg
याची शेपटी ऑपरेशन करून कापली आहे का?शेपटीचा काय त्रास होतो, कापायला का लागते?
साधाच आहे, बुलडॉग नाही.बुलडॉग म्हणजे गालाला स्किन लोंबते ते भुभु ना?

आज हा धागा वाचणे फार महाग पडले मला. गॅसवर शिजायला ठेवलेले मटण करपले.काळे ठिक्कर पडले भांडे.असो.
नवीन पाहुणे स्वीट आहेत.
डस्टीच्या पोझने तो मार डाला. गोड आहे.

मी चिकूचे फोटो 10-12 वेळा तरी पाहिले - नक्की खरे भूभू आहे की Soft toy आहे? ?? विचारात पडलेली बाहुली Happy Happy

देवकी च्या पोस्ट वरुन वाटले की या धाग्यावर आधी एक Disclaimer टाकावा. Wink
हा धागा adiction करणारा आहे.

लेग पीस चिरुटसारखे तोंडात >> अमा Lol लिफ्ट वाल्या शेजारणीचा किस्सा पण मजेशीर आहे Happy
बेल वाजायचा अवकाश किंवा सिनेमात बेल वाजली तरी जोरात भुंकणॅ. आवा ज इतका जोरात शरीराच्या मानाने कि जर्मन शेपर्डच आहे असेच वाटा वे बाहेरच्याला. >>> हे सेम माउईची आठवण झाली.
चिकू भारी क्यूट आहे! असं क्यूट भुभू आणि त्यात फ्रेन्डली म्हणजे बेस्टच ! डस्टी पण गोंडस आहे.
एलॉन Happy जवळ आला तर त्याच्याकडे बघून पटकन वाटणार नाही तो लाड करण्यासाठी जवळ आलाय!
अमांच्या मेड च्या किस्स्यावरून आठवलं, माउई लहान असताना मेड ला घाबरायचा तिच्या त्या ब्रूम आणि वॅक्यूम मुळे. त्यामुळे खच्चून ओरडत सुटाय्चा. पण आता ती भिती गेली. आता माव्या तिच्या मागे मागे फिरत असतो नुसता. तशी आमची मेड दिसायला पण अगदी क्यूट, बाहुली सारखी आहे. तिने लाड करावे असे त्याला वाटत असावे. हा अगदी क्यूट पपी फेस करून तिचे निरीक्षण करत जवळ जाऊन बसतो ती जाईल तिथे. ती घाबरत वगैरे नाही पण उगीच लाड वगैरे पण नाही करत. Happy एकदा मग बहुधा फ्रस्ट्रेट होऊन अटेन्शन साठी तिने भरून ठेवलेला पिशवीतला कचरा तिची पाठ वळताच सगळा बाहेर काढला होता Lol त्यामुळे आता त्याला ती आली की दुसर्‍या खोलीत घेऊन जातो आम्ही Happy

स्वीटी ला नेहमी बिल्डिंगच्या बाहेर जायचे असते. आज दुपारी फिरायला निघालो तर बाई बाहेरच निघाल्या. मग गेलो पण साडेचार म्हटले तरी उन्हे होतीच. मग थोडे फिरून सावलीत आणले थोडे फिरून परत. आता डोके उशीवर ठेवून झोपणे चालले आहे. मला इथून उठून मिक्सर लावायचा इडली दोश्याचे पीठ वा टायला पण ती उठेल म्हणून इथेच बसले आहे.

माउई च्या खोड्या मस्त असतात. ओडिन तर काय हिरोच आहे.

क्युट आहे सगळी नवी बाळं!
माउई आणि ओडिन तर हिरोच आहे या धाग्याचे. त्यांचे किस्से फार गोड आहेत.
काल एक फिल्ड ट्रिप होती तर ग्रुपसोबत दोन गुणी भूभू देखील आले होते. त्यांच्या ब्रीडची नावे विसरले. त्यातली ८ वर्षांची भूभूकन्या खूप फ्रेंडली होती. भला मोठा देह पण डोळे इतके प्रेमळ आणि बोलके की बस्स! खूप लाड करुन घेतले. दुसरा ४ वर्षांचा भूभू जरा लाजरा होता. 'तुम्ही दुरुन गप्पा मारा आणि मी आईला चिकटून पिटुकली शेपूट हलवेन ' असे होते.

कॉलेजात कुत्रा चावला होता. तेव्हापासून कुत्र्याची भिती वाटते मला. कुत्रा-मांजर आवडते परंतु भिती वाटते.

डस्टी सुपर क्युट!

माउई सगळेच चोर दरवडेखोर असल्यासारखे जोरजोराने भुंकत बसतो त्यांच्यावर. त्याला शांत केलं गोंजारलं तरी ते लोक घरात आहेत तोवर तिरसट म्हातार्‍यांसारखं स्वतःशीच गुरगुर करत बसतो थोड्या थोड्या वेळाने. >>>> Biggrin

चिकू किती गोड आहे .
डस्टी माऊ cute आहे एकदम.
मला जर्मन shefherd ची भिती वाटते. पण एलोन अगदी प्रेमळ आहे असे वाटते.

सगळे नवीन भूभू आणि माऊ सदस्य गोड आहेत.

इथे अमेरिकेत डॉग टीव्ही म्हणून एक कुत्र्यांसाठी 24 तास चॅनेल आहे. त्यांचं नेटफ्लिक्स Proud

त्यात म्हणे डॉग्जसाठी खास बनवलेले कार्यक्रम असतात.
म्हणजे इथे लोक पोरं स्क्रीन addict झाली म्हणून काळजी करतात त्यात आता या चार पायांच्या पोरांनाही स्क्रीनची सवय लावा.
खास डॉग्जसाठी आईस्क्रीम, टीव्ही वगैरे पाहिल्यावर आमच्या इथे लवकरच डॉग्जचं प्रीस्कुल निघणार अशी माझी खात्री झालेली आहे. गोड प्रकरण आहे एकंदरीत.

>>>>>>>>>>तोवर तिरसट म्हातार्‍यांसारखं स्वतःशीच गुरगुर करत बसतो थोड्या थोड्या वेळाने. >> हाहाहा Lol Lol

अरे खूप दिवसांनी आले इकडे! किती गमतीजमती मस्त मस्त! सगळी गोंडस बाळं ती!

आज गंमत झाली म्हणून इकडे लिहायला आले. आमच्या मंकीने आज पहिल्यांदा शिकार केली Happy एक चिमणा पक्षी (बिचारा) तोंडात पकडून आणला. किचनच्या दरवाजातूनच दिसलं मला म्हटलं अज्जिबात घरात घेणार नाही. काचेतून बघितलं तर त्या पक्षाने थोडि फडफड केली आणि मंकीने सोडला त्याला. आम्ही चिडवत होतो की पाखरू पकडलंस बेट्या पण काय करायचं त्याचं तुला माहितच नाही Proud
आणि आमची सॅमी बर्‍याचदा मार डाला पोझिशन मधे बसते अगदी माधुरीच्या पोज सारखी नेहेमी फोटो काढायचा राहूनच जातो. ती एक तिची आवडती आणि एक पाय वर करून रामदेव बाबा पोजिशन पण. दोन्हीचे फोटो काढायलाच हवे या धाग्यासाठी. Lol

आमच्या मंकीने आज पहिल्यांदा शिकार केली Happy एक चिमणा पक्षी (बिचारा) तोंडात पकडून आणला. किचनच्या दरवाजातूनच दिसलं मला म्हटलं अज्जिबात घरात घेणार नाही. >>> अगं तुला गिफ्ट म्हणून ते घरात आणत असेल तो. Happy सोडुन दिलं हे ही मजेशीर.
पक्षी पकडला म्हणजे मंकी चं ग्रॅजुएशन झालं म्हणायचं आता Happy
माव्याला जन्मात असलं काही जमेल असेलसं वाटत नाही. हल्ली खारी आणि लहान सहान पक्षी खूप येतात तर त्यांच्यावर भुंकत नुसता धाव धाव धावतो बॅकयार्डात. ते कुठले त्याच्या टप्प्यात येतायत Happy झाडावर बसून त्याची गंमत पहातात.

Pages