Survival story - भाग 3

Submitted by Abhishek Sawant on 27 February, 2021 - 01:23
Thrill

आम्ही प्रार्थना केली की याच्या पेक्षा परिस्थिती वाईट होऊ नये आणि tent मध्ये शिरलो.>>>
Tent मध्ये गेल्यानंतर काही तास सुरळीत गेले असतिल तेवढ्यात एक कानाचे पडदे फाडणारा, अंगाचा थरकाप उडवणारा आवाज झाला. असे वाटत होतं की कोणीतरी बॉम्ब ब्लास्ट केला की काय. मी tent च्या कापडा मधून काय दिसतय का ते बघू लागलो तर एक लख्ख प्रकाश आमच्या tent च्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर केंद्रित झाला होता. बाजूच्याच jhadavar विज पडली होती. मी मनातल्या मनात आकाश ला चार सणसणीत शिव्या घातल्या. कारण मी जेव्हा ही शक्यता बोलून दाखवली तेव्हा तो माझ्या भित्रेपणा वर हसला होता.
मी मनात त्याला दोष देत होतो तेवढ्यात त्या झाडाची अर्धवट जळालेली फांदी आमच्या tent वर पडली. Tent प्लास्टिक चा असल्याने तो जळू लागला. पण आमचे नशीब चांगले होते की ती फांदी तेवढी मोठी नव्हती की आम्हाला काही इजा होईल. फांदीचा मार माझ्या पायाला सौम्य लागला होता. आमच्या tent थोड्या अधिक प्रमाणात आम्हाला वाचवले होते. पण पावसामुळे आग विजू पर्यंत tent ला भगदाड पडले होते. म्हणजे या वादळी रात्री मानवी वस्ती पासून दूर आमचा एकुलता एक निवारा पण नाहीसा झाला होता. आम्ही महत्त्वाच्या गोष्टी tent मधून उचलल्या आणि रात्र काढण्यासाठी जागा शोधू लागलो. त्या मिट्ट काळोखात डोळ्यात बोट घालून पण काहीच दिसत नव्हते. जेव्हा जेव्हा विज चमकत होती त्या प्रकाशामध्ये आम्ही वाट काढत होतो. तेवढ्यात आकाश ला आठवले की येताना बीच पासून अर्धा एक किमी वर आम्ही एक मोठा दगड पहिला होता तो दगड आणि बाजूच्या दगडातील जागे मुळे एक गुहे सारखी जागा तयार झाली होती. त्यामुळे आम्ही तिथे रात्र काढायची ठरवली. रात्रीचे 11 झाले होते आम्ही निघालो पण मला ही भीती वाटत होती की आम्ही काळोखात हरवलो तर जाणार नाही ना.
कारण जंगलात कोणतेही landmarks नसतात आणि या वादळात आणि काळोखात आम्हाला दिशेचा पण गोंधळ झाला असता. पण आम्हाला कुठेतरी आश्रय घेणे गरजेचे होते कारण वीज अंगावर पडण्याचे चान्सेस जास्त होते जर आम्ही झाडांखाली किंवा उघड्यावर थांबलो असतो तर. आम्ही भीतीने मोबाईल ही बाहेर काढला नाही कारण तोही भिजून खराब झाला असता.
मला खूप थंडी वाजत होती आणि अंधारात त्या चिखलात ओबडधोबड पायवाटेवरून चालणे अशक्य वाटत होते. आम्ही किमान अर्धा तास तरी चाललो असेन पण आम्हाला काही तो दगड दिसत नव्हता. आम्हाला वाटले की पावसामुळे आणि अंधारात आपला वेग कमी झाला असेल म्हणून आम्ही चालत राहिलो. अजून अर्धा तास गेला तरी आम्ही तिथे पोहोचलो नाही तेव्हा आम्हाला कळले की आपण जंगलात भरकटलो आहे.
आता मात्र आम्हाला दोघांना पण भिती वाटायला लागली कारण आम्ही जंगलाच्या एकदम अनोळखी भागात होतो आणि इथे माणसांचा वावर जास्त नसणार आणि याचाच अर्थ इथे जंगली प्राणी असणार. मग मी आकाश ला सांगितले की आत्ता आपण बाहेर पडायचा प्रयत्न केला तर आपण आणखी भरकटले जाऊ त्यामुळे आपण सकाळ व्हायची वाट बघू.
जंगलाच्या या भागात अतिशय गर्द झाडी होती. जेमतेम उभा राहण्याची जागा होती आणि साप विंचू यांची पण भिती त्यामुळे आम्ही कितीतरी वेळ तसेच उभा राहिलो. विजेचा प्रकाश पडला की आम्ही आजूबाजूचा परिसर बघायचे पण प्रत्येक वेळी तो परिसर काही वेगळा दिसायचा. दोन तासानंतर पासून बंद झाला पण वारा तसाच होता आणि आम्ही भिजलेले असल्याने वाऱ्या मुळे खूपच थंडी वाजत होती. आम्ही कशीबशी रात्र काढली सकाळी सकाळी सूर्य उगवल्यावर आम्ही आजूबाजूला पाहायला सुरुवात केली.
आम्ही कुठे आहे काही कळायला मार्ग नव्हता पण काल येणारा समुद्राचा आवाज आता येत नव्हता म्हणजे आम्ही समुद्रापासून खूप लांब आलो होतो. त्यावेळी मूड हलका करण्यासाठी आम्ही जोक केले मी discovery चॅनल वर लागणार show Man vs Bear Grills मधल्या नायका सारखाच बोलून हसू लागलो. पण आता आम्हाला माहिती होत की आपल्याला कोणत्या दिशेने जायच आहे. पण आम्ही रात्र जागून काढली होती त्यामुळे आम्हाला तो थकवा जाणवत होता.
रात्रीच्या गोठवणारी थंडी नंतर सूर्याची किरणे थोडा आराम देत होती. जंगलाच्या या भागात निसर्गाचे वर्चस्व दिसत होते. अतिशय दाटीवाटीने उगवलेली झाडं पालापाचोळा फांद्या यांनी झाकलेली जमीन मोठेमोठे कोष्टी किड्यांची जाळी आम्हाला चालायला अडथळा निर्माण करत होती. सूर्याच्या position वरुण आम्ही आमची दिशा ठरवली आणि चालू लागलो. तब्बल दोन ते तीन तास चालल्या नंतरही आम्हाला ओळखीचे असे काहीच दिसले नाही. मोबाईल ऑन करून बघितला तर दोघांच्याही मोबाईलची रेंज नव्हती.
इतके चालल्या वर सुद्धा आम्ही कुठेच पोहोचलो नाही तेव्हा मला संशय आला मग मी चालता झाडाच्या फांद्या वैगेरे तोडून खून तयार करून ठेवत चालू लागलो. आणि थोडे चालल्यानंतर आमच्या लक्षात आले की आम्ही एकाच ठिकाणी गोल गोल फिरतोय. मी ऐकले होते की जंगलात हरवलेले लोक असेच एकाच लुप मध्ये फिरत असतात तेव्हा मला वाटायचं की किती बावळट लोक असतिल एकाच ठिकाणी कसे फिरत असतात पण मी आज ते स्वतः अनुभवत होतो.
जंगलात प्रत्येक झाड हे प्रत्येक वेळा बघितले तर निराळेच दिसते. आतामात्र आमची हालत खराब झाली होती वीकेंड ची ही ट्रिप आता आम्हाला महागात पडत होती. आमच्या कडचे पाणी संपले होते जे काही थोडे खायला शिल्लक राहिले होते ते पण खायची इच्छा नव्हती. आणि रात्रीच्या थंडी नंतर जे ऊन आम्हाला आल्हाददायक वाटत होते तेच आता असह्य झाले होते. घामाच्या धारा लागल्या होत्या आणि त्या आमच्या शरीरातील पाणी आणखी कमी करत होत्या.
एव्हाना सकाळचे 11 वाजले होते एक दिवस आणि एक रात्र आणि एक रात्र अशी ट्रीप आता दुसरा पण दिवस खाते की काय असे वाटू लागले.....
क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

1. मला माहिती नाही लेखा मध्ये images कसे insert करायचे त्यामुळे मी प्रतिसादांच्या section मध्ये अपलोड करेन.
2. माझा जुना मोबाईल खराब झाल्यामुळे जास्त फोटो नाहीयेत instagram वर पोस्ट केलेल्या फोटो पैकी मी काही इथे अपलोड करतो.Screenshot_20210227-114359_Instagram.jpg

का कुणास ठाऊक तुम्ही तुमच्या प्रत्येक लेखनात cinematic liberty घेताय असं जाणवत रहातं. जर खरचं सत्यकथा असतील तर लेखनच्या शैलीत थोडे बदल करुन पहा...कंटेंट मात्र छान असतो.

मस्त

सर्वांचे धन्यवाद. काही अडचणींमुळे पुढचा भाग लिहिता नाही आला. लवकरच पुढचा भाग येईल.