इंग्रजीत लेखन

Submitted by एविता on 20 February, 2021 - 00:53

नमस्कार,

प्रश्न१) मी गेले सात महिने मायबोलीची सभासद आहे. इथे मिळणाऱ्या प्रेमाने मी अगदी भारावून गेले आहे. बऱ्याच छान मैत्रिणी आणि मित्र इथे मिळाले. अगदी जिवलग असल्यासारखे. मला ते नक्कीच बरोबर उत्तर देतील अशी आशा करते.
आपण इथे इंग्रजीत लिहू शकतो का? हा प्रश्न खरं म्हणजे अप्रस्तुत आहे पण तरीही विचारते.
इथले बरेच सभासद अमेरिकेत आणि युरोपात राहतात आणि इंग्रजी त्यांना अनभिज्ञ नाही. बऱ्याच लोकांचं शिक्षण देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झालं असेल आणि काही वेळा आपले विचार व्यक्त करण्यासाठी इंग्रजी भाषेचा वापर अगदी सहजगत्या करत असतील. शिवाय इथे बऱ्याच कथा अशा आहेत ज्यात सढळ हस्ते इंग्रजी वाक्यांचा इंग्रजी वर्णमालेत वापर केला आहे. तर, पूर्ण कथा इंग्रजीत लिहिली तर चालेल का?

तसं नसेल तर मायबोलीची इंग्रजी बहीण आहे का? तिचं असं काही वेगळं संकेतस्थळ आहे का जिथे इंग्रजीत लेख लिहिता येईल?

प्रश्न२) विचारपूस करायची असेल तर माझी विचारपूस ह्याचा वापर कसा करायचा असतो ते अजून कळाले नाही. उदा. माझ्या विपु मध्ये ललिताने प्रतिसाद पाठवला आहे. तिला उत्तर देताना तिच्या विपुत जायचे आहे का? की माझ्या विपुतच उत्तर द्यायचे असते? कृपया कळवा.

थँक्स टू ऑल.

Group content visibility: 
Use group defaults

संकेत स्थळाच्या निर्मात्यांचा उद्देश असा होता की , परदेशस्थ सदस्यांची मराठी लेखनाची वाचनाची ' उपासमार' व्हायची ती दूर व्हावी. मायबोली चालू झाली तेव्हा मराठी लेखनासाठी जालावर कोणताही फोरम नव्हता. शिवाय मराठीच्या विकास, प्रसारासाठी फार मोठे दावे न करता अनुषंगिक ऐतिहासिक पाउल हि होते . मराठीतून व्यक्त होण्यासाठी मंच मिळण्याची फार मोठी गरज त्यात भागली. आग्रहाने मराठी लेखनाचा आग्रह धरण्याचे कारण असे होते की इंग्रजी लेखनासाठी इतर अनेक संस्थळे उपलब्ध होती. त्यासाठी (पदरमोड करून ) आणखी एक फोरम काढण्याची आवश्यकता नव्हती. मला आठवते मी पाश्चिमात्य संगीताचा परिचय , रसग्रहण जाणकारांकडून करण्यासाठी एक धागा काढला होता पण एडमीन यांनी तो पाश्चात्य संगीताचे इतर अनेक फोरम असताना या धाग्याची आवश्यकता नाही म्हणून तो उडवला होता. अर्थात त्यातील लेखन मराठीत असताना ही अशी भूमिका घेण्यात आली होती. मग इंग्लंड बद्दल लिखाणाला बंदी घातली पाहिजे होती . नंतर हा मायाबोलीवरील तत्कालीन टोळी युद्धाचा भाग असल्याचे लक्षात आले . असो, मला एवढेच म्हणायचे आहे की इथे इंग्रजी लेखन कसे अप्रस्तुत आहे. इव्हन खुद्द मायबोली या संकेत स्थलाबद्दलही तुम्ही इंग्रजीतून लेख टाकणेही त्याज्य आणि अप्रस्तुत आहे....

तुमच्या प्रश्न 2 साठी -- शक्यतो ज्यांनी तुम्हाला विपु पाठवली आहे त्यांच्या नावावर टिचकी मारून त्यांच्या विपु त मजकूर लिहावा. म्हणजे तो त्या व्यक्तीला त्याच्या विपुत सहजतेने वाचता येईल. विपुचे उत्तर पहायला तुम्हाला शोधून तुमच्या विपुत डोकवायला लागणार नाही.

१) कथेत, लेखात काही इंग्रजी / इतर भाषीय वाक्ये,संवाद असणे वेगळे आणि पूर्ण कथा / लेख इंग्रजीत असणे वेगळे. मायबोलीचा सभासद या नात्याने मला इथे मराठी साहित्य अपेक्षित आहे. मायबोलीचे धोरण (कुठे मिळेल वाचायला?) असे असावे हे गृहीत धरले आहे.

२) वर वर्णिता यांनी लिहिलेच आहे, त्यात भर: उत्तर देतानाही त्या व्यक्तीच्या विपुत जाऊन लिहिल्यास त्या व्यक्तीला इमेल द्वारे सूचना मिळते की तुमच्या विपुत कुणी लिहिले आहे. (इमेल नोटीफिकेशन त्या व्यक्तीने सुरू ठेवले असल्यास.) इमेल नोटिफिकेशन पहिल्या शिवाय आपल्या विपुत न डोकावणारे माझ्या सारखे अनेक असतील.
आणि दुसरे हे की तुम्हास माहीत असेलच: कुणाचीही विपु मायबोलीवरील कुणीही वाचू शकतं. तेव्हा विपुत लिहिताना आपल्या प्रायव्हसीची आपण काळजी घ्यावी.

@एविता
लेखनात थोडेसे इंग्रजी आले तर चालेल पण शक्य तितके लेखन मराठीत आणि देवनागरी लिपीत असावे अशी अपेक्षा आहे. पूर्णपणे इंग्रजीत असलेले लेखन इथे योग्य नाही .
@बाबा कामदेव
मायबोलीच्या धोरणात वेळोवेळी बदल होत गेले. सुरुवातीच्या काळात तुम्ही म्हणता तसे झाले असेल, पण त्याचे कारण कंपूबाजी नसून त्या त्या वेळेचे धोरण हे आहे. नंतर मराठी संस्कृती या एका निकषावर न राहता , मराठी माणसांना आवडेल असे मराठीत लिहिलेले लेखन असे धोरण आपण स्विकारले.

@ webmaster, वरील उत्तर वाचून एक विचारतो की आपापल्या गावातील /शहरातील मायबोलीकरांचे गप्पांचे वाहते पान - पाने आहेत. तिथे इंग्रजीत लिहिले तर चालेल का? तिथले लेखन तीस प्रतिसादांत उडतच असते आणि अमेरिका, युकेत राहणारे लोक सहजच इंग्रजी वापरतात.

अ‍ॅट दि रिस्क ऑफ माझाच आयडी उडणे एक फुकटचा सल्ला - समटाईम्स इट इज बेटर टू आस्क फरगिव्हनेस दॅन परमिशन... अनेक लोक इथे असं देवनागरीत इंग्रजी लिहून पोस्टी/लेख टाकत असतात. नो रिपर्कशन्स उर्फ काही वाकडं झालं नाही त्यांचं. मग तुझे कशाला कोण करेल? सबब असेल काही चांगलं लिहीलेलं तर भाषा, लिपी इन दायरोंमे सिमीत हुए बिना पोस्ट कर दे मेरी जान... बाद की बात बाद मे देखी जाएगी... सोशिक आहेत लोकं इथे.

लेखनात थोडेसे इंग्रजी आले तर चालेल पण शक्य तितके लेखन मराठीत आणि देवनागरी लिपीत असावे अशी अपेक्षा आहे. पूर्णपणे इंग्रजीत असलेले लेखन इथे योग्य नाही . >>>>> मागे एका उपक्रमात एक संपूर्ण लेख इंग्रजीत होता. त्यावेळी उपक्रमाच्या संयोजिका धडाडीने इंग्रजीतल्या लेखाचे समर्थन करत होत्या आणि प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतली नव्हती. "पूर्णपणे इंग्रजीत असलेले लेखन इथे योग्य नाही ." हा धोरणातला त्यानंतर झालेला बद्दल असेल तर स्वागतार्ह आहे.

अ‍ॅट दि रिस्क ऑफ माझाच आयडी उडणे एक फुकटचा सल्ला - समटाईम्स इट इज बेटर टू आस्क फरगिव्हनेस दॅन परमिशन... अनेक लोक इथे असं देवनागरीत इंग्रजी लिहून पोस्टी/लेख टाकत असतात.  >>>> Lol राज ह्यांच्या गोल्फच्या लेखाची आठवण झाली Happy

आता या वीकएंडला मराठी लँग्वेज डे आहे.
मला तर हे कळल्यावर एक्स्ट्रिमली प्राऊड फील झालं.
म्हणून मी हा मेसेज कम्प्लिटली मराठीतच टाईप केला.
थोडे एफर्टस् घ्यावे लागले,
पण आफ्टर ऑल मराठी आपली मदरटंग आहे,
तर ऍट लीस्ट इतकं करणं मस्ट आहे.
तुम्हीपण माझा लीड फॉलो करा.
लाँग लिव्ह मराठी..

सगळ्यांना हॅप्पी मराठी डे हं !!

आता कुणाच्या लेखाची आठवण झाली ते पण सांगून टाका. Rofl

मायबोलीवर येऊन इंग्रजी लेख वाचायचा उत्साह नसतो. नावावरुन विषय मनोरंजक वाटला तर कदाचित वाचला जाईल. देवनागरीत लिहून इंग्रजी वाक्यंच्या वाक्य मात्र टाकू नका. त्या सिग्नेचर स्टाईलचा वापर सदस्य न वाचता पुढे जायला करतात. Wink

हो ना. मायबोलीवर इंग्रजी लेख म्हणजे बासुंदीमध्ये स्कॉच टाकल्यासारखे वाटेल. ती तिकडे पेप्सीमध्येच बरी.