भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माऊई अगदी गुड बॉय सारखा दिसतोय साफ सफाई झाल्यावर

अमा ते सॉफ्ट टॉय टिकल कस काय
आमच्याकडे एक दिवसात चिंध्या झाल्या असत्या त्याच्या

क्रूरकर्मा मानिमाऊ भारिये एकदम

हे भारी आहे
सर्व माऊ भूभूंचे नेटवर्क तयार झाले फॉलोवर्स चे की एकदमच इन्स्टा अकाऊंट उघडून सर्वांना बघेन.
बाकीचे पण येऊद्या, फुंतरु, खुनशी बोका, स्नोई वगैरे

monkey_and_sammie पण आहेत इन्स्टावर! त्यांच्या purrsonalities चा विडीओ टाकलाय.

ओडीन आणि माऊई दोघांना करते फॉलो.

ज्याना हे भुभुन्चे उद्योग आवडले आहेत त्यानी न्युझीलन्डच्या लिन्ली डॉड यानी लिहिलेल्या हेरि म्यक्ल्यरी (Hairy Maclary) या नावाच्या एक कुत्र्याच्या व त्यान्च्या मित्रान्च्या कथा जरुर वाचाव्या. ही मुलासाठी लिहिलेली पुस्तके लिहून आता ३० वर्श झाली असतील. परन्तु मला अजुन ती वाचायला आवडतात.

धन्यवाद
राजबिंड्या बाळाला स्थळे चालून येऊ लागली आहेत
आजच एक आलेलं, मी नकोच म्हणत होतो लहान आहे म्हणून
पण त्यानी फोटो पाहून सिलेंक्त केलं म्हणे
जर सक्सेस झालं तर एक किंवा दोन पपीज देणार आहेत
सगळा अनुभव त्यालाही नवीन होता आणि आम्हालाही
मित्र म्हणाले पैसे मागयाचे सरळ, पण खरं सांगायचं तर जीभ रेटेना असा भाव वगैरे करताना
मी आपलं काय तुम्ही जे ठरवलं ते चालेलं म्हणून मोकळा झालो
आपल्या पोराच्या बाबत काय व्यवहार करणार ना?
बरंच काय काय कळलं नव्यानेच, सगळं इथं लिहिण्यासारखे नाही Happy

राजबिंड्या बाळाला स्थळे चालून येऊ लागली आहेत >>> अरे वा Happy हे भारी!
स्थळे कुठून आली पण ? डॉगीज ची पण मॅट्रिमोनिअल साइट वगैरे असते की काय Happy
सगळीच माहिती नविनच आणि मजेशीर आहे. अशा सोयरिकींमधे पैसे दिलेच कोण कोणाला देणार हे कसे ठरते? कि इथेही मुलालाच हुंडा मिळतो असे आहे का? Happy

एकूणात इंडियात किंवा इन जनरल ग्लोबल इंडियन कम्युनिटीमध्ये मेल कुत्रा प्रीफर केला जातो असं दिसतं.
ते बघून मलाही प्रश्न पडला की मग ज्या फीमेल पपीज असतात त्यांचं काय होतं? की त्यांची संख्या मुळातच कमी असते?
अमेरिकेत असा काही preference दिसलेला नाही. शेजारी अमेरिकन आजीची एक गर्ल डॉगच आहे.

सोयरिकींमधे पैसे दिलेच कोण कोणाला देणार हे कसे ठरते? कि इथेही मुलालाच हुंडा मिळतो असे आहे का?>>>
हो तसेच असते
मेल जर व्यवस्थित मेंटेन असेल तर फिमेल वाले त्यांना विचारतात
आणि मग तो चॅम्पियन ब्रीड चा आहे का कसा त्यावर पैसे ठरतात
पेपर्स व्यवस्थित असतील तर किंमत जास्त
ब्लड लाईन पण बरेच काही असते
ओडीन चा बाबा चॅम्पियन आहे, त्याला डॉग शो मध्ये बक्षिसे वगैरे आहेत
पण आई रेग्युलर आहे सो तो सेमी गटात मोडतो
त्यामुळे त्यापासून होणारी पिल्ले ही अलेक्स (त्याचा बाबा) च्या सेमी ब्लड लाईन मध्ये
तयामुळे किंमत कमी होते
तरीही 20 हजार मिळतील ओडीन ला एका सक्सेसफुल ब्रीड केल्याबद्दल किंवा मग झालेल्या पिल्लापैकी एक किंवा दोन
मग ती विका किंवा पाळा तुमचा प्रश्न
फिमेल ला सात आठ पिल्ले होतात आणि बाबा आणि आई हेल्दी असतील तर एकेक पिलू 20 ते 25 हजार ला जाते लाब्राडोर चे

मॅट्रिमोनी नाही या ब्रीडर चे नेटवर्किंग असत ओळखीतून सजेस्ट करतात
हे जे आलं ते असेच ओळखीतून
त्यांनी ओडीन चे फोटो बघायला मागितले
मुलगा पसंत पडला आणि मग मुलीला घेऊन आले

सनव - सहसा ब्रीडर नसतील तर मेल भुभु पसंत करतात कारण त्याचा व्याप कमी असतो तुलनेने
बाळंतपण प्रकार फार व्यापाचा असतो म्हणे
आणि फिमेल पप् ची किंमत पण कमी असते

मला व्यक्तश हे फारच विचित्र वाटलं पैसे आणि काय काय
त्यामुळे मी म्हणलं काय जे असेल योग्य ते बघा आणि ठरवा मला काहीच म्हणयाच नाहीये
मुलगा सरकारी नोकरीत असूनही हुंडा नको म्हणणाऱ्या बापाचे फिलिंग आलं Happy
असाही तो वयात आल्याने फारच त्रास देत होता
आता शांत होईल थोडा असं व्हेट म्हणाले
माझा आपला तेवढाच उद्देश

तुम्ही वाजवी पैसे घेऊन ते डोनेट करू शकता अगदीच पैसे घेणं नको वाटत असेल तर. विशिंग फॅक्टरी नावाची एक संस्था आहे जी टर्मिनल कॅन्सर पेशन्ट्सच्या (लहान मुलं विशेषतः) शेवटच्या ईच्छा पूर्ण करते. एखाद्या मुलाला पपी पाळायचं असल्यास तुम्ही पैशांऐवजी पिल्लु मागून ते देऊ शकता.

रच्याकने, तुम्ही दिलेलं उत्तर सुद्धा सरकारी नोकरीत असणार्‍या नवर्‍या मुलाच्या बापासारखंच होतं Wink

Happy होय जाणवलं मला ते
बघू पपी घेऊन ते चांगल्या फॅमिलीत देईन
आणि पैसे दिले तर मग ओडीन साठीच बाजूला ठेवून त्यावर खर्च करीन.
फुकट तर नाही काही देणार कारण लोकांना किंमत राहत नाही फुकट मिळालं तर, हा अनुभव आहे

हे सगळं वाचून वाटतंय की मालकांनी कुत्रा पाळलाय की कुत्र्याने मालक पाळलाय? Light 1
पण छान स्ट्रेसबस्टर धागा आहे हा.

बाजारात तुरी सारखा प्रकार झाला
ओड्याला काय जमलंच नाही हे प्रकरण
आधी इतका नाच नाच नाचला, उड्या मारल्या
आणि प्रत्यक्ष वेळी ढिस Happy

म्हणलं जाऊ दे, पहिलीच वेळ आहे
शिकेल हळू हळू
पण ते लोकं परत आलेच नाहीत

Happy Happy Happy
मलाही आलेलं हे मनात
पण ते बघून शिकणे वगैरे वर विश्वास नाही ठेवत
अनुभवाने शिकत जातात

यांचे हँडलर असतात, ते शिकवतात or करवून घेतात अशीही एक अजब माहिती कळली.

आमच्याकडे पण हीच फेज चालू आहे .
हँडलर ला पण पैसे द्यावे लागतात
पहिल्याच वेळी जमत नाही असं म्हणतात त्यामुळे २-३ वेळा तरी प्रयत्न करा
बाकी काही लिहीत नाही ... जाऊदे

श्या.
हँडलर नक्की काय शिकीवतो पोरांना ?
धाग्याचे उपशीर्षक- भूभू आणि माऊ घोड्यांच्या गमतीजमती Happy

हो ना मलाही सामाजिक संकेतांचे भंग न करता काय लिहिता येईल असा प्रश्न पडला. Happy
हा एवढा सगळा व्याप असतो हे नव्यानेच कळलं
मला म्हणजे प्रत्येक वेळी ऑ असंच होत गेलंय ही माहिती कळल्यावर Happy

जाऊदे.आपण डिटेल्स सोडून देऊ
पण एकंदर या कामासाठी कोणी कोणाला पैसे देणे अमानुष वाटते.नाती मनाची मनाशी जुळली पाहिजेत.
आपण काही कुत्र्यांचा कंसेंट घेत नाही Happy

सगळ्या गमती जमती वाचते आहे. आमचा ऑस्कर. आज एक वर्षाचा झाला. शिबा ब्रीड आहे. पण मला इथे फोटो देता येत नाहीत. E7BC3AE6-150F-426B-A287-7CC4A9A57E5A.jpeg

Pages