
अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
धनवन्ती - मजेशीर आहे स्नोई !
धनवन्ती - मजेशीर आहे स्नोई ! अंग मळवून येणे पण कुत्र्यांसारखे आहे , कुत्र्यांच्या संगतीत राहिला होता का लहानपणी
त्याला वाट्त असेल तो कुत्राच आहे 
व्हिक्टोरियाचे चॅनल नक्की पहा. खूप टिप्स मिळतील.
ईथले प्रतिसाद वाचुन एकिकडे हसायला येतय आणि दुसरिकडे टेन्शन >>> समीर, तो यायला वेळ आहे तोवर अभ्यास करा भरपूर
https://youtu.be/pwwwxXnCWpE
माउईची काल ग्रूमर ची
माउईची काल ग्रूमर ची अपॉइन्टमेन्ट होती, फुल हेअरकट वगैरे. हे दुसरेच ग्रुमिंग त्याचे. पहिले ग्रुमिंग घरी येऊन करणारा एक ग्रुमर मिळाला होता त्याच्याकडून केले होते आणि माव्याला तो एक्सपिरियन्स अजिबात आवडला नव्हता. एक तर त्याला मेन एकूणच चटकन फारसे आवडत नाहीत. हा माणूस पण अजिबात आवडला नव्हता. टेबल ला बांधलेले , त्यात तो ग्रुमर सारखा त्याच्यावर खेकसत होता हलू नको नीट बस म्हणून ,तेही आम्च्या समोर! आम्हालाही फार कळत नव्हते तेव्हा. ३ तास लागले हेअरकट आणि नेल्स ला . माउई ला ओव्रऑल इतका ट्रॉमा झाला की नंतर दिवसभर झोपून राहिला होता. आता पुन्हा केस कापायची वेळ आली तरी पुढे ढकलत होतो आम्ही. शेवटी केसांचे जंजाळ वाढल्यावर अन डोळ्यावर केस येऊन आता याला समोरचे दिसेनासे होईल की काय अशी वेळ आल्यावर जरा चौकश्या करून वेगळी जास्त प्रोफेशनल जागा शोधली.
म्हणजे मस्त बाथ, शांपू. कंडिशनर, कोकोनट क्रीम ने पॉज ना मसाज, नेल कटिंग वगैरे. तरी मनात धाकधुकच होती आता कसा रिअॅक्ट करतो माउई. कालची ग्रुमर एक गोड तरुण मुलगी होती. तिने माउई ला गोंजारले वगैरे आमच्याशी बोलता बोलता. माउई त्या मुलीवर खुषच झाला एकदम. शेपूट हलवत गेला तिच्यामागे आमच्याकडे न बघता. मला एकदम मुलीने प्रिस्कूल च्या पहिल्या दिवशी मला हसून बाय बाय केले होते त्या मिक्स फीलिंगची आठवण आली
३ तासांनी तिचा टेक्स्ट आला तेव्हा पिक अप ला गेलो तेव्हा मस्त चकाचक होऊन एकदम गुंड्या दिसत होता. त्याचं तोंडभर हसू बघून नवर्याने खूष होऊन घसघशीत टिप दिली त्या मुलीला. अशा तर्हेने आता ग्रुमिंग ची भिती गेलेली आहे. नेक्स्ट टाइम पण त्या मुलीचीच अपोईन्टमेन्ट घेणे मस्ट झाले मात्र 
आम्ही मारे "कोकोनट स्पा" नावाचे पॅकेज घेतले होते
इकडचे भू भू आणि माऊ बघून मला
इकडचे भू भू आणि माऊ बघून मला पण इच्छा होते आणायची.. पण आम्ही ऑफिसला गेल्यावर घरी कोणी नसल्याने नाही आणत.. कालच सकाळी सोसायटी मधली एक माऊ उचलून आणली.. पण खाऊ खाल्ला आणि निघून गेली ती.. तसे पण आम्ही ऑफिसला गेल्यावर तिला ठेवणार कुठे हा प्रश्न होताच..आता ठरवलेय दर रविवारी तिचे माहेरपण करायला तिला घेऊन येऊया..
माऊईची पोस्ट धमाल आहे.गोड आहे
माऊईची पोस्ट धमाल आहे.गोड आहे बच्चू!
हे वाचून आमच्या पिंट्याची आठवण झाली.त्याला फिरायला नेल्यावर त्याला पारशी बाई दिसली की खूप खूश व्हायचा.अगदी त्यांच्या पायात पायात घोटाळायचा.त्यापण बिचार्या मायेने त्याला वागवायच्या.पण हा अधिक लाडात यायचा.पारशीणी फ्रॉक घालत असल्याने नंतर ऑक्वर्डायच्या. हाच का तो चावरा पिंट्या का असं वाटायचे.
काय मस्त मस्त किस्से आहेत. हा
काय मस्त मस्त किस्से आहेत. हा धागा स्ट्रेसबस्टर आहे.

मधे मधे येऊन सगळ्यान्चे फोटो बघितलं तरी छान वाटतं.
माऊईचा नवीन फोटो पाहिजे.
माऊई बाळ कसला गोड आहे.
माऊई बाळ कसला गोड आहे.
Photo photo !!!!! Of the
Photo photo !!!!! Of the groomed furbby.
धन्यवाद देविका , मैत्रेयी. .
धन्यवाद देविका , मैत्रेयी. .
मैत्रेयी, म्हणजे आता मला मुलांच्या मित्रांबरोबर स्नोई च्या मित्रांवर पण लक्ष ठेवावे लागेल
Jokes apart.. स्नोई 2 महिन्यांचा असेल जेव्हा माझ्या मुलाला तो रस्त्यावर सापडला होता. हडकुळा आणि मलूल होता. आता लाडोबा झाला आहे नुसता. .
ये देखो बिफोर अँड आफ्टर
हो फोटु राहिलाच, हा पहा
बिफोर अँड आफ्टर

कसलं गोडुलं दिसतंय.
कसलं गोडुलं दिसतंय.
तरी पार्लर वालीने (नंतर लवकर बिझनेस मिळावा म्हणून) जरा जपूनच कात्री चालवलेली दिसतेय.
माउई !
माउई !
घरात लहान मुले असतील आणी अचानक शांतता पसरली तर याचा अर्थ त्या मुलांनी काहीतरी भयंकर प्रताप केला आहे असा घेतला जातो.
हा नियाम आता पाळीव प्राण्यांनाही लावायला हवा !
विकु - अगदी बरोबर आहे. काही
विकु - अगदी बरोबर आहे. काही फरक नाही.
अनु - हो, मागच्या वेळच्या अनुभवानंतर आम्हीच सांगितलं होतं जरा फ्लफीच ठेवा म्हणून. एक तर इथे थंडी भयंकर आहे आणि ते अगदी बारीक शेव केलेले लूक कसेतरी वाटतात बघायला.
माउई त्या मुलीवर खुषच झाला
माउई त्या मुलीवर खुषच झाला एकदम. शेपूट हलवत गेला तिच्यामागे आमच्याकडे न बघता.>>> व्हॅलेंटाईन डेट का माऊईची

माउई गोड आहे फार.
माउई गोड आहे फार.
समीर यांचा भुभु तर काळा पॉम पॉम वाटतो. फार क्यूट. अभिनंदन.
सगळी पिल्लं धमाल.
माऊ ई चा नवा अवतार सज्जन मुला
माऊ ई चा नवा अवतार सज्जन मुला सारखा दिसला.
आमचा बोका पण मायाळू आहे.
आमचा बोका पण मायाळू आहे. बरेचदा आमच्याजवळ येतो. पायाला अंग घासतो.
तिला पोट किंवा गालाला हात लावुन पाहिजे असेल तरच ती जमिनीवर लोळून दाखवते की असं करा. नाहीतर तुम्ही कोण आणि आम्ही कोण असंय तिचं.
स्पेशली नवरा आणि मुलीकडे सारखा जातो. बेडवर पाय लांब करून ते दोघं बसले असतील तेव्हा त्यांच्या पायावर जाऊन बसायला खूप आवडतं. मुलगा आंघोळ करून बाहेर आला की त्याला अगदी चिकटून अंग घासत असतो बहुतेक तो वॉर्म फिल आवडतो त्याला. मांजर थोडी खडूस आहे.
(No subject)
सगळेच एकदम धम्माल आहेत इथे...
सगळेच एकदम धम्माल आहेत इथे... माऊईला एक पापा माझ्याकडून. ..
क्रूरकर्मा- एक स्वतंत्र मांजर
क्रूरकर्मा- एक स्वतंत्र मांजर.
याला शोलेमधल्या असरानी
याला शोलेमधल्या असरानी सारख्या मिशा आहेत
अमा, काय नाव आहे भुभुचे ?
अमा, काय नाव आहे भुभुचे ? एकदम मुटुकळ करून झोपलाय.
कॉमी , वाघाच्या मावशीचे डोळे डेंजर दिसत आहेत
अमांचा भूभू खूप दमून झोपलाय.
अमांचा भूभू खूप दमून झोपलाय.
पिंकी नाव आहे ना अमा?
पिंकी नाव आहे ना अमा?
पिंकी नाव आहे ना अमा?>.>. अगं
पिंकी नाव आहे ना अमा?>.>. अगं नाही डीअर स्वीटी नाव आहे. आणि ती म्हातारी आहे . १२ पूर्ण १३ चालू. त्यामुळे फार खोड्या नसतात. थोडे वॉक थोडे लाड की लगेच आराम झोप. मालका सारखेच कुत्रे आहे एकद्म . तो बेड हेड्स अप फॉर टेल्स मधून घेतला म्हणून फोटो टाकला आहे.
अरे वा पहिल्यांदाच पाहिले
अरे वा पहिल्यांदाच पाहिले स्वीटी ला. डॅशुंड आहे हे माहित होते. जागी असतानाचा फोटो असता तर ते डॅशुंड स्पेशल मोठे मोठे डोळे बघायला मिळाले असते
डॅशुंड कुत्र्यांना लांब
डॅशुंड कुत्र्यांना लांब पाठीचा कणा विदाउट सपोर्ट असल्याने आय वी डीडी नावाचा रोग होतो. तो होउ नये म्हणून त्यांना फार उड्या मारणे बेड वर चढणे अलाउड नसते. खास स्टेप्स येतात त्यांच्या साठी किंवा शिडी. पण मी स्वस्तात ला मार्ग म्हणून जमिनीवरच गाद्या घालून झोपायचे केले
माग ची दोन चार वर्शे. त्यात मला पाठ गुढ घे दुखी लागली. !!!!
बेड पण मस्त आहे.
बेड पण मस्त आहे.
आज वरळीला अट्रिया मॉल मध्ये
आज वरळीला अट्रिया मॉल मध्ये बघितलं दुकान हेड्स अप फॉर टेल्स आणि ह्या धाग्याची आठवण आली. सगळे भूभू छान वाटतात इकडे बघायला आणि मज्जा येते गमती वाचायला.
शेपूट हलवत गेला तिच्यामागे
शेपूट हलवत गेला तिच्यामागे आमच्याकडे न बघता >> हे मस्त वाटले मैत्रेयी. आता छान नीटनेटका दिसतोय.
Odin चे इन्स्टा अकाउंट सुरु
Odin चे इन्स्टा अकाउंट सुरु केलं आहे
Odin_the_god_of_hunger
नावाने सर्च मारा
त्याचे एकेक करत सगळे फोटो टाकणार आहे
Pages