Submitted by बोकलत on 10 February, 2021 - 01:02
मी आजकाल एका विचित्र समस्येने ग्रासलो आहे. स्वप्नात मला काही दुखापत झालेली दिसली कि ती सकाळी उठल्यावर प्रत्यक्षात झालेली असते. काही दिवसांपूर्वी स्वप्न पडलं कि हातावर कोणीतरी ओरखडे काढतंय सकाळी उठलो तेव्हा बोटांवर खरंच ओरखडे होते. एकदा धावताना पाय मुरगळल्याचं स्वप्न पडलं उठल्यावर खरोखरच पाय मुरगळला होता. कालच एक स्वप्न पडलं मी खूपच लहान सायकल चालवत होतो. मला चालवताना खूपच खाली वाकायला लागत होतं. त्यानं माझ्या मानेजवळ चमक भरली. आता सकाळपासून तिथे दुखतंय. हे असं भरपूर वेळा होतं जसं कि स्वप्नात ती गोष्ट मी प्रत्यक्षात करत होतो. असा अनुभव कोणाला आला आहे का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चांगला मांत्रिक गाठा.
चांगला मांत्रिक गाठा.
ही तुमची खरोखरच समस्या असेल
ही तुमची खरोखरच समस्या असेल तरी कुणी गांभीर्याने घेणार नाही.
या धाग्याचा उगम कालच्या
या धाग्याचा उगम कालच्या गुप्तधन या कथेत तर नाही?
काही दिवसांपूर्वी स्वप्न पडलं
काही दिवसांपूर्वी स्वप्न पडलं कि हातावर कोणीतरी ओरखडे काढतंय सकाळी उठलो तेव्हा बोटांवर खरंच ओरखडे होते. >> बोकलत, हे वाक्य वाचायला आणि माझा मुलगा शेजारच्या मुलाने बोचकारले म्हणून घरी रडत यायला एकच वेळ झाली. चांगलंच रक्त निघाले.
रात्री झोपताना हेल्मेट घालुन
रात्री झोपताना हेल्मेट घालुन झोपा. काळा बोका पाळा. इन्सेप्शन सिनेमा ११ वेळा बघा. :हघ्या:
स्वप्न शास्त्रानुसार असे
स्वप्न शास्त्रानुसार असे मानले जाते की माणसाला त्याच्या कर्मांनुसार चांगली किंवा वाईट स्वप्ने असतात.परंतु ब्राह्मणांची सेवा केल्याने आपल्या कर्मातून मुक्ती मिळते आणि स्वप्नातील दोषही नष्ट होतात. योग्य आणी पात्र ब्राह्मणांची पूजा करून दान देऊनही स्वप्नांचा त्रास टाळता येतो.
ब्राह्मण शक्यतो पुण्यातल्या कोथरूड भागात स्वतंत्र बंगल्यात राहणारा असावा.
ही तुमची खरोखरच समस्या असेल
ही तुमची खरोखरच समस्या असेल तरी कुणी गांभीर्याने घेणार नाही. > बरोबर, लोकं इथल्या काल्पनिक धाग्यांवर प्रामाणिक प्रतिसाद देत असतात पण अशा प्रामाणिक धाग्यांवर मात्र काल्पनिक प्रतिसाद देतील.
When I Get Hurt in a Dream,
.
म्हणून म्हणते की अमानवीय धागा
म्हणून म्हणते की अमानवीय धागा आणी गुप्तधन अश्या संवेदनशील ठिकाणी जाऊ नका. काळजी घ्या.
तुम्हाला झोपेत चालायची सवय
तुम्हाला झोपेत चालायची सवय आहे का?
चांगली स्वप्न पहा म्हणजे कुठे
चांगली स्वप्न पहा म्हणजे कुठे फिरायला जाताय काही गोड धोड खाताय! उगाच दरिद्री स्वप्न पाहू नका!
रात्री झोपण्यापूर्वी
रात्री झोपण्यापूर्वी "स्वप्नातल्या कळ्यांंनो उमलू नकाच केव्हा"
हे गाणं मन लावून ऐका.
रात्री झोपण्यापूर्वी "मेरे
रात्री झोपण्यापूर्वी "मेरे ख्वाबों मे जो आए आके मुझे छेड जाए ..उससे कहो कभी सामने तो आए" हे गाणं ऐकू नका.
Subconcious mind नेहमी
Subconcious mind नेहमी कार्यरत असते. आपण झोपेत असताना, सावध होण्याची गरज असेल असे काही आसपास घडत असेल तर तशा प्रकारची विचित्र स्वप्ने तयार करून आपल्याला ते दचकवून उठवते. (हे मी वाचलं आहे पण आता लिंक मिळत नाही)
उदाहरणार्थ, तुम्ही पाणी पिण्यासाठी म्हणून किचनमधला फिल्टरचा टॅप सूरु केला आणि तो अनियंत्रित होऊन बघता बघता त्याचा प्रचंड मोठा धबधबा झाला. तुम्ही दचकून जागे होता तेंव्हा कळते की बाथरूम मधला कार्पोरेशनच्या पाण्याचा नळ रात्री तसाच खुला राहिल्याने सकाळी पाणी आल्यावर त्यातून वेगानं आलेलं पाणी खाली पडून वाहून जात आहे.
तुम्ही धाग्यात लिहिलेल्या घटना आशा पडताळून पहा.
एक पेग मारून झोपत जा.. स्वप्न
एक पेग मारून झोपत जा.. स्वप्न लक्षात राहणार नाहीत..
नाही मला झोपेत चालण्याची सवय
नाही मला झोपेत चालण्याची सवय नाही. मला तर अता वाटंतय जे मी स्वप्नात बघतो तेच खरं आहे जागा झाल्यावर ज्या विश्वात वावरतो ते
आभासी आहे.
काही दिवस फक्त ओरोजिनल आयडीने
काही दिवस फक्त ओरोजिनल आयडीने मायबोलीवर प्रवास करा आणि नंतर अनुभव सांगा.
चांगल्या पोश्चर मध्ये झोपा.
चांगल्या पोश्चर मध्ये झोपा. कसं झोपताय याकडे लक्ष ठेवा.
कदाचित पोश्चर चुकल्यामुळे होणाऱ्या वेदना स्वप्नामध्ये सुटेबल घटनेतून दिसत असतील.
असा अनुभव मला बऱ्याचदा आलाय. लहानपणी बेड च्या अगदी काठावर आल्यावर मला भयंकर उंचावर असल्याची स्वप्ने पडायची. भूक लागली असेल तर क्रिकेट खेळत असल्याची स्वप्ने पडायची.
काही दिवस फक्त ओरोजिनल आयडीने
काही दिवस फक्त ओरोजिनल आयडीने मायबोलीवर प्रवास करा>>> सदिया बित गयी, याद भी नही कब डु आयडी से लॉगिन किया था.
Bhoot chidali ahet bokalat.
Bhoot chidali ahet bokalat.
Mafi magun taka.
झोपू नका.
झोपू नका.
झोपताना विको टरमरिक
झोपताना विको टरमरिक /निओस्पोरिन/हळद /डेटॉल असं सामान घेऊन झोपा , स्वप्नात जखम झाल्या झाल्या लावा, किंवा हळदीचा लेप लाऊनच झोपा .याने उठल्यावर बरे झालेले असताल शिवाय दिवसेंदिवस सुंदर त्वचा होईल, आणि लोकंच विचारतील 'खुबसुरती का राज' काय आहे , मगं मात्र मुळीच सांगू नका.
झोपू नका. >>> अक्सीर ईलाज
झोपू नका. >>>
अक्सीर ईलाज
ओचकारले बोचकारले जाणे हे अवघड
ओचकारले बोचकारले जाणे हे अवघड प्रकरण आहे
बाकी मलाही साधारण अशी स्वप्ने पडतात. ज्यात मला जोराची बाथरूमला (१ नंबर) लागलेली असते. आणि स्वप्नातून जागा होतो तर खरेच लागलेली असते
झोपेत व्यायाम करत जा. खरच
झोपेत व्यायाम करत जा. खरच बारीक व्हाल हाकानाका. तुम्ही जाडे आहात का बारीक ते बाकी मला माहीत नाही. पण असाच एक आझ्गाउ सल्ला.
>>>
>>>
झपाटलेल्या झाडांना विचारा, पछाडलेल्या वाडयांना विचारा.
मध्यरात्री दोन कानाखाली खाणाऱ्या पिंपळावरच्या मुंज्याला विचारा,>>>>
निरर्थक, विषयाला सोडून
निरर्थक, विषयाला सोडून प्रतिक्रिया देणे बंद करून बघा
Bhoot chidali ahet bokalat.>>
Bhoot chidali ahet bokalat.>>> मला पण तेच वाटतंय मी सध्या बाहेर कुठे जात नाही त्याचा परिणाम असावा. काल रात्री खिडकीतून मला कोणीतरी अदृश्य शक्ती शुकशुक करत होती.
निरर्थक, विषयाला सोडून प्रतिक्रिया देणे बंद करून बघा>>>>>मै अभी उस मुकाम पर हु जहा से लौटना नामुमकन है.
काळा बोका पाळा<<<
काळा बोका पाळा<<<
इथेच आहे एक!
हा धागा दिसला कि मला हे गाणं
हा धागा दिसला कि मला हे गाणं का आठवतंय "रूला के गया सपना मेरा..बैठे हे कब हो सवेरा "
Pages