स्वप्नांचा आयुष्यावर होणार परिणाम

Submitted by बोकलत on 10 February, 2021 - 01:02

मी आजकाल एका विचित्र समस्येने ग्रासलो आहे. स्वप्नात मला काही दुखापत झालेली दिसली कि ती सकाळी उठल्यावर प्रत्यक्षात झालेली असते. काही दिवसांपूर्वी स्वप्न पडलं कि हातावर कोणीतरी ओरखडे काढतंय सकाळी उठलो तेव्हा बोटांवर खरंच ओरखडे होते. एकदा धावताना पाय मुरगळल्याचं स्वप्न पडलं उठल्यावर खरोखरच पाय मुरगळला होता. कालच एक स्वप्न पडलं मी खूपच लहान सायकल चालवत होतो. मला चालवताना खूपच खाली वाकायला लागत होतं. त्यानं माझ्या मानेजवळ चमक भरली. आता सकाळपासून तिथे दुखतंय. हे असं भरपूर वेळा होतं जसं कि स्वप्नात ती गोष्ट मी प्रत्यक्षात करत होतो. असा अनुभव कोणाला आला आहे का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काही दिवसांपूर्वी स्वप्न पडलं कि हातावर कोणीतरी ओरखडे काढतंय सकाळी उठलो तेव्हा बोटांवर खरंच ओरखडे होते. >> बोकलत, हे वाक्य वाचायला आणि माझा मुलगा शेजारच्या मुलाने बोचकारले म्हणून घरी रडत यायला एकच वेळ झाली. चांगलंच रक्त निघाले. Sad

स्वप्न शास्त्रानुसार असे मानले जाते की माणसाला त्याच्या कर्मांनुसार चांगली किंवा वाईट स्वप्ने असतात.परंतु ब्राह्मणांची सेवा केल्याने आपल्या कर्मातून मुक्ती मिळते आणि स्वप्नातील दोषही नष्ट होतात. योग्य आणी पात्र ब्राह्मणांची पूजा करून दान देऊनही स्वप्नांचा त्रास टाळता येतो.
ब्राह्मण शक्यतो पुण्यातल्या कोथरूड भागात स्वतंत्र बंगल्यात राहणारा असावा.

ही तुमची खरोखरच समस्या असेल तरी कुणी गांभीर्याने घेणार नाही. > बरोबर, लोकं इथल्या काल्पनिक धाग्यांवर प्रामाणिक प्रतिसाद देत असतात पण अशा प्रामाणिक धाग्यांवर मात्र काल्पनिक प्रतिसाद देतील.

रात्री झोपण्यापूर्वी "स्वप्नातल्या कळ्यांंनो उमलू नकाच केव्हा"
हे गाणं मन लावून ऐका.

रात्री झोपण्यापूर्वी "मेरे ख्वाबों मे जो आए आके मुझे छेड जाए ..उससे कहो कभी सामने तो आए" हे गाणं ऐकू नका.

Subconcious mind नेहमी कार्यरत असते. आपण झोपेत असताना, सावध होण्याची गरज असेल असे काही आसपास घडत असेल तर तशा प्रकारची विचित्र स्वप्ने तयार करून आपल्याला ते दचकवून उठवते. (हे मी वाचलं आहे पण आता लिंक मिळत नाही)

उदाहरणार्थ, तुम्ही पाणी पिण्यासाठी म्हणून किचनमधला फिल्टरचा टॅप सूरु केला आणि तो अनियंत्रित होऊन बघता बघता त्याचा प्रचंड मोठा धबधबा झाला. तुम्ही दचकून जागे होता तेंव्हा कळते की बाथरूम मधला कार्पोरेशनच्या पाण्याचा नळ रात्री तसाच खुला राहिल्याने सकाळी पाणी आल्यावर त्यातून वेगानं आलेलं पाणी खाली पडून वाहून जात आहे.

तुम्ही धाग्यात लिहिलेल्या घटना आशा पडताळून पहा.

नाही मला झोपेत चालण्याची सवय नाही. मला तर अता वाटंतय जे मी स्वप्नात बघतो तेच खरं आहे जागा झाल्यावर ज्या विश्वात वावरतो ते
आभासी आहे.

चांगल्या पोश्चर मध्ये झोपा. कसं झोपताय याकडे लक्ष ठेवा.

कदाचित पोश्चर चुकल्यामुळे होणाऱ्या वेदना स्वप्नामध्ये सुटेबल घटनेतून दिसत असतील.

असा अनुभव मला बऱ्याचदा आलाय. लहानपणी बेड च्या अगदी काठावर आल्यावर मला भयंकर उंचावर असल्याची स्वप्ने पडायची. भूक लागली असेल तर क्रिकेट खेळत असल्याची स्वप्ने पडायची.

झोपताना विको टरमरिक /निओस्पोरिन/हळद /डेटॉल असं सामान घेऊन झोपा , स्वप्नात जखम झाल्या झाल्या लावा, किंवा हळदीचा लेप लाऊनच झोपा .याने उठल्यावर बरे झालेले असताल शिवाय दिवसेंदिवस सुंदर त्वचा होईल, आणि लोकंच विचारतील 'खुबसुरती का राज' काय आहे , मगं मात्र मुळीच सांगू नका. Wink

ओचकारले बोचकारले जाणे हे अवघड प्रकरण आहे Sad

बाकी मलाही साधारण अशी स्वप्ने पडतात. ज्यात मला जोराची बाथरूमला (१ नंबर) लागलेली असते. आणि स्वप्नातून जागा होतो तर खरेच लागलेली असते Sad

झोपेत व्यायाम करत जा. खरच बारीक व्हाल हाकानाका. तुम्ही जाडे आहात का बारीक ते बाकी मला माहीत नाही. पण असाच एक आझ्गाउ सल्ला.

>>>

झपाटलेल्या झाडांना विचारा, पछाडलेल्या वाडयांना विचारा.
मध्यरात्री दोन कानाखाली खाणाऱ्या पिंपळावरच्या मुंज्याला विचारा,>>>>
Happy Happy Happy

Bhoot chidali ahet bokalat.>>> मला पण तेच वाटतंय मी सध्या बाहेर कुठे जात नाही त्याचा परिणाम असावा. काल रात्री खिडकीतून मला कोणीतरी अदृश्य शक्ती शुकशुक करत होती.
निरर्थक, विषयाला सोडून प्रतिक्रिया देणे बंद करून बघा>>>>>मै अभी उस मुकाम पर हु जहा से लौटना नामुमकन है.

Pages