
जेव्हा एका मोठ्या ब्रेकनंतर माझी बायको वेळ घालवण्यासाठी म्हणून किंवा काहीतरी वेगळे करावे म्हणून आपले शिक्षिकेचे काम सोडून एका कंपनीत जॉबला लागली तेव्हा तिच्यासोबत काम करणारे मुलेमुली सारेच नुकतेच कॉलेज पासआऊट झालेले युवा होते. छान होते. तिचे त्यांच्याशी छान ट्युनिंग जमले होते. पण बरेचदा असे व्हायचे की तिने काही अमुकतमुक म्हटले की ती मुलेमुली खिदळायची. माझ्या बायकोला आधी काही कळायचे नाही. आधी मजा वाटायची, मग एकदा चिडली त्यांच्यावर. तेव्हा त्यातली एक मुलगी म्हणाली की तिने उच्चारलेल्या काही शब्दांचा डबल मिनींग निघतो जो सेक्स वगैरे गोष्टींशी संबंधित असतो.
तिने जेव्हा हे मला सांगितले तेव्हा मी तिला माझ्याकडचे थोडे शब्द सांगितले, जसे की ..... चला राहू द्या.
जसे हे शब्दांबाबत तसेच चित्रांबाबतही झाले आहे. व्हॉटसपवर एखादा चित्ररुपी मेसेज येतो, त्यात एक फोटो असतो, तो बघताच आपल्याला अश्लील वाटते, किंवा तसले काही भलतेच डोळ्यासमोर येते. आणि मग त्या फोटो खाली लिहिले असते की जे तुमच्या मनात आहे ते तसे नसून त्या फोटोत अमुकतमुक आहे. मग आपण पुन्हा तो फोटो बघतो आणि खरेच की, हा साधासाच फोटो आहे म्हणत स्वतःशीच हसायला लागतो.
यातच एक दुसरा प्रकार असतो, त्यात फोटो पाहताक्षणी नॉर्मलच भासतो. त्यावरचे कॅप्शन मात्र असे असते की फक्त सो कॉलड पोहोचलेल्या लोकांनाच यातला गभितार्थ समजेल, ज्यांना नाही समजणार त्यांनी पोगो बघा. आणि मग आपण त्यात निरखून पाहिल्यावर, वेगवेगळे अॅगलने त्यात काय दुसरा अश्लील अर्थ अभिप्रेत असेल हे चेक केल्यावर वा मग कोणीतरी तो उलगडून सांगितल्यावर, त्याच्या नजरेतून तो फोटो पुन्हा बघितल्यावर आपल्याला तो दुसरा अर्थ दिसतो, आणि मग पुन्हा पुन्हा जेव्हा ते चित्र पाहू तेव्हा मग त्याच नजरेतून बघितले जाते आणि तसाच तो अश्लील भासतो.
मिंंत्राच्या लोगोबाबत नेमके हेच झाले आहे !
ज्यांनी हे केलेय त्यांचा हेतू नक्की समाजाचे / स्त्रियांचे भले आहे की आणखी काही हे ठाऊक नाही
पण येत्या काळात असे बरेच वाद बघायचे आहेत, त्यासाठी तयार राहा.
दरम्यान मिंत्राने आपला लोगो बदलायचा निर्णय घेत त्याची तयारीही सुरू केली आहे. त्यांनी आपल्या बिजनेस मॉडेलचा विचार करता त्यादृष्टीनेच हा निर्णय घेतला असेल, त्यामुळे तो त्यांच्यासाठी योग्यच असेल.
सोशलसाईटवर मात्र आता ईंग्लिश मूळाक्षर "एम" सुद्धा बाद करायचे का म्हणत यानिमित्ताने काही नवनवीन लोगो शेअर केले जात आहेत. खाली काही उदाहरणे दिली आहेत, शोधल्यास आपल्यालाही सापडतील.
असो, तर एकूणच या मिंत्रा प्रकरणावर चांगली वाईट चर्चा करायला हा धागा.
तळटीप - मी सुद्धा माझ्या लेखात ईंग्रजी मूळाक्षर "एम" असे देवनागरीत लिहून संभाव्य वाद टाळला आहे. मागाहून मलाही लफडे नकोत. आधीच माझे धागे सतत वादाच्या भोवर्यात असतात 

@ म्हाळसा
@ म्हाळसा
कायदा, रूल ह्याची मला कल्पना नाही. पण हे माहित आहे की logo communicates a lot about a company or product. मिंत्राच्या लोगो मागचा अर्थ देखिल केवळ “इंग्रजीतला M” इतकाच मर्यादीत नाही.
>>>>>>
नाही की नसावा? खात्रीने कसे सांगू शकता? जर रुल नाही तर अर्थ असलाच पाहिजे हे बंधनकारक नाही. तरीही असेलच आणि त्याची कुठे नोंद करून ठेवली असेल तर येईल पुढे..
वर मूळ पोस्टमध्ये बायजुंगचा बी आहे, त्यात बी हे अक्षर वापरलेय. मग ते लिहायचे कसे यामागे काही अर्थ जोडला असेल तर तो पुढचा विचार झाला?
आता समजा मिंत्राच्या जागी संत्रा असते किंवा आणखी काही असते तर ते एस वा ईतर आद्याक्षर घेऊन लोगो बनवला असता आणि तो वेगळाच असता..
फेसबूकच्या लोगोत एफ आहे, त्यामागे काही विचार आहे का? कोणाला काही आयड्या?
कुछ तो लोग कहेंगे, लोगों का
कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना
फेसबुकच्या लोगोचा अर्थ तज्ञ
फेसबुकच्या लोगोचा अर्थ तज्ञ लोकांनी आधीच शोधून ठेवला आहे ...
https://www.india.com/viral/facebook-logos-true-meaning-will-freak-you-o...
कुछ तो लोग कहेंगे, लोगों का
कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना >>
क्लासिक!
>>>>>.ह्या पार्श्वभूमीवर
>>>>>.ह्या पार्श्वभूमीवर मिंत्राचा नवीन लोगो मला खुर्चीवर बसलेल्या स्त्रीचा वरून फोटो घ्यावा तसा वाटत आहे.>>>> अगदी अगदी मलाही हेच वाटलेले. पायावर पाय टाकून २ स्त्रिया व्यवस्थित बसलेलेल्या आहेत. अश्लील म्हणायला,
त्या फोटोत, कुल्ले आहेत का? अशी कुल्ले विहीन व्यक्ती असू शकते का?
अर्र मला आत्ता कळले ती एकच स्त्री आहे
मला २ स्त्रिया वाकलेल्या वाटलेल्या होत्या आत्ता परत पाहीले

ऍमेझॉन आणि जीमेलच्या लोगोत
ऍमेझॉन आणि जीमेलच्या लोगोत काय आहे?>>>>>???????
ऍमेझॉन आणि जीमेलच्या लोगोत
ऍमेझॉन आणि जीमेलच्या लोगोत काय आहे?>>>>>???????
>>>>>
जीमेल मध्ये मिंत्राचाच एम आहे, जरा व्यवस्थित पद्धतीने आहे ईतकेच.
आणि अॅमेझॉनमध्ये तो बाण द अॅरो पुरुषाच्या लिंगाचे प्रतीक आहे असा जाणकारांचा आक्षेप आहे. तो देखील ए टू झेड गेला आहे आणि त्यानंतर ऑन म्हटले आहे. थोडक्यात हे पुरुषांना पुर्णपणे उकसवण्यात आले आहे. सहन करतात म्हणून पुरुषांना काहीही ईशारे द्याल का
लोगो चं माहिती नाही पण इथे
लोगो चं माहिती नाही पण इथे सार्वजनिक आंबट मनोरंजन सुरू झालेय हे नक्की
अॅमेझॉनमध्ये तो बाण द अॅरो
अॅमेझॉनमध्ये तो बाण द अॅरो पुरुषाच्या लिंगाचे प्रतीक आहे असा जाणकारांचा आक्षेप आहे >> कायच्या काय लॉजिक. कोण असतात हे रिकामटेकडे 'जाणकार' ?
थोडक्यात हे पुरुषांना पुर्णपणे उकसवण्यात आले आहे. >> असल्या छपरी गोष्टींवरून उचकणारे 'पुरुष' असतात ?
आचरट पुरुष असतात असा बदल करा
आचरट पुरुष असतात असा बदल करा
नुसत्या पायावरून ती स्त्री
नुसत्या पायावरून ती स्त्री कसे ओळखता?
पुरुष का नसेल तो बरे ....
जशी दृष्टी तशी सृष्टी....
जशी दृष्टी तशी सृष्टी....
Submitted by ऋन्मेऽऽष on 4
Submitted by ऋन्मेऽऽष on 4 February, 2021 - 16:12>>>> बाप्रे भयानक लॉजिक आहे. हे लॉजिक लावणारे तेच हुशार विद्यार्थी असतील जे शाळेत गणिताच्या तासाला काहीही करून LHS=RHS आणायचे.
कोणत्या लोगोत काय अर्थ लपलाय
कोणत्या लोगोत काय अर्थ लपलाय किंवा कसा अर्थ काढायचा यावर चर्चा करण्यासाठी धागा काढलाय का?
जर हे प्रकरण पेल्यातले वादळच ठरले असते, लोकांनी चार दिवस गॉसिपिंग करून सोडून दिले असते तर मग हे प्रकरण सौम्य ठरले असते.>>> हे प्रकरण सौम्यच ठरले असते पण काही लोक अशा गोष्टींना नको तेव्हढे महत्व देऊन त्यावर चर्चा घडवतात, विषयाला फाटे फोडतात.
कोणत्या लोगोत काय अर्थ लपलाय
कोणत्या लोगोत काय अर्थ लपलाय किंवा कसा अर्थ काढायचा यावर चर्चा करण्यासाठी धागा काढलाय का?
>>>
त्यासाठी विकेंडला वेगळा काढायचा विचार आहे, पण लोकांना उत्सुकता स्वस्थ बसू देत नाही
बाप्रे भयानक लॉजिक आहे. हे
बाप्रे भयानक लॉजिक आहे. हे लॉजिक लावणारे तेच हुशार विद्यार्थी असतील जे शाळेत गणिताच्या तासाला काहीही करून LHS=RHS आणायचे.
>>>>>>
अॅमेझॉनचा फोटो एकाने ट्विट करत म्हटलेले की आता यावर आम्हा पुरुषांनी आक्षेप घ्यायचा का? त्यावरून मी मला वाटले ते लॉजिक लावले. पोस्टकर्त्याच्या मनात काही वेगळे असू शकते. तुम्ही आणखी तिसराच अर्थ लाऊ शकतात. लोगो की यही बात तो कमाल होती है
हे प्रकरण सौम्यच ठरले असते पण
हे प्रकरण सौम्यच ठरले असते पण काही लोक अशा गोष्टींना नको तेव्हढे महत्व देऊन त्यावर चर्चा घडवतात
>>>>>>>
माझ्या मित्राने आपला लोगो बदलला नसता तर मी धागा काढलाच नसता. त्याच्यावर बदलायची वेळ आली म्हणून माझ्यावर धागा काढायची आली. मित्रासाठी कायपण
काहीही! टिमकी वाजतेच आहे.
काहीही! टिमकी वाजतेच आहे. त्यामुळे माझा पास.
त्या बिचाऱ्या दुरदर्शनच्या
त्या बिचाऱ्या दुरदर्शनच्या लोगोलापण वादात ओढलं रिकामटेकड्यांनी.
दूरदर्शनच्या लोगोला वादात
दूरदर्शनच्या लोगोला वादात ओढले नाही तर त्याला ते सारकाझम की काय बोलतात ना त्यातला प्रकार आहे तो
Pages