अज्ञातवासी! - भाग २२ - MRS 76!

Submitted by अज्ञातवासी on 9 January, 2021 - 11:32

भाग २१
https://www.maayboli.com/node/77652

टकटक...
गोडवूनच्या भल्यामोठ्या लोखंडी दारावर आवाज झाला.
मधली मंडळी दक्ष झाली.
टकटक... पुन्हा आवाज झाला.
एकाने गोडवूनची अतिशय छोटी झडप उघडून तिला डोळा लावला.
बंदुकीची नळी...
धाड...
खेळ खल्लास...
"अरे कौन है..." मधली मंडळी दरवाजाकडे धावली.
मात्र पुढच्याच क्षणी ते भानावर आले...
दरवाजा उघडला, तर त्यांच्यापैकी एकदोन जणांचा तरी बळी जाणार होता...
आणि झडपेला डोळा लावला तरीही!
सर्वजण विचारात पडले.
"तू जा!" कुणीतरी कुणाला म्हणाले.
"तू जा बे!" प्रत्युत्तर आलं.
सर्वजण जीवाला घाबरून आत उभे होते. प्रत्येकाजवळ बंदुका होत्या, पण चालवायची कुणावर, हे शोधण्याची हिंमत नव्हती.
आता मात्र ती झडप पुन्हा उघडली...
तिथून एक बंदुकीची नळी आत आली...
आणि कुणालाही काही कळण्याच्या आत गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला...
अंदाधुंद... त्या गोळ्यांना नेम नव्हता, मात्र ज्याला लागली, तो तत्काळ खाली पडत होता.
ती छोटीशी झडप कित्येक जणांचा कर्दनकाळ ठरली...
गोळ्या थांबल्या...
जे काही थोडेफार बचावले होते, ते समोर पडलेला प्रेतांचा खच बघून हादरून गेले होते.
त्यांनी काही विचार करायच्या आधीच नळी बाहेर गेली, व झडप बंद झाली.
"गया?" एकाने विचारले.
"कौन गया?" प्रत्युत्तर आले.
"दरवाजा खोलके देख ले..."
"तू जा!"
...आणि पुढच्याच क्षणी एक भलामोठा कानाचे पडदे फाडणारा आवाज आला.
व तो दरवाजा कोलमडून पडला...
"अरे भागो, वो अंदर आ रहा है!" त्यांच्यापैकी एकजण ओरडला...
त्या धुरामधून एक माणूस आत आला...
...एका हातात उझी व दुसऱ्या हातात एके ४७ घेऊन त्याने उरलेल्या जिवंत लोकांना प्रेते बनवायला सुरुवात केली!!
◆◆◆◆◆
"तो, शिकू नाही शकणार अब्बू."
"असं का म्हणतेय झोया."
"त्याच्या मनात अनेक गोष्टी चालू आहेत. अश्याने बंदूक चालवणं तर दूरच राहिलं, तो नीट नेमही धरू शकणार नाही."
"खानसाहेब विचारात पडले."
"ठीक आहे झोया. यावेळी हवेलीत त्याला काही त्रास तर नाही झाला ना?"
"नाही, उलट त्या हवेलीत जरा जास्तच रमतोय तो."
"ठीक आहे. जा, आराम कर... तुही दमतेस दिवसभर."
"अब्बू, आपल्या हॉटेलकडे दुर्लक्ष होतंय माझं."
खान हसले.
"सहा शाखा उघडून ठेवल्यात, होणारच..."
"नाही अब्बू, मी लक्ष द्यायला हवं. माझा वेळ याला शिकवण्यातच जातोय."
"झोया, यावेळी एवढं काम कर तू माझं. नंतर तुला काहीही काम सांगणार नाही."
"हे काय अब्बू?" झोया बावरली.
"नाही ग झोया, हा मोक्ष म्हणजे ना, कर्ज आहे दादासाहेबांचं माझ्यावर. जे मला उतरवावं लागणार आहे. ते झालं, की मी दादासाहेबांकडे जायला मोकळा."
"काहीही काय बोलताय अब्बू."
"काहीही नाही ग झोया, वय होतंय हळूहळू."
"काही वय नाही झालं. दाढीला अजून मेंदी लावली ना, तर मुली मरतील तुमच्यावर."
खानसाहेब हसले.
"आणि तुझं काय? किती मुलांना नाकारशील?"
"अजून मला लग्नच नाही करायचं. मी लहान आहे अजून."
"हो माझ्यासाठी लहानच आहेस, पण आता मोठी झालीये."
"मी जाते. आराम करायचाय मला..."
झोया लटक्या रागाने तिथून निघून गेली.
खानसाहेब विचारात गढले.
◆◆◆◆◆
मोक्ष खोलीत शांतपणे विचार करत होता.
'संग्राम नाही, मग कोण?'
सर्व शेलारांची वंशावळ त्याच्या नजरेसमोर तरळून गेली.
त्यांच्यापैकी कित्येक जणांना तो भेटलाही नव्हता.
'मग कोण?
उत्तर भारतीय मारेकरी. नेमके कोण?'
"मोक्षसाहेब, बोलावलं होतं?" खानसाहेबांच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली.
"हो. बसा खानसाहेब."
खानसाहेब बसले.
"खानसाहेब त्या मारेकऱ्यांना मारल्यावर तुम्ही काय तपास केला?"
"म्हणजे?"
"म्हणजे त्यांच्या ओळखपत्रांवरून तुम्ही संग्रामपर्यंत पोहोचलात. बरोबर?"
"हो."
"पण आता संग्राम नाही, तर दुसरा कोण?"
"कळत नाहीये मलाही मोक्षसाहेब. पण कुणी आतलाच. कारण तुम्ही केव्हा निघणार, केव्हा पोहोचणार, याची पूर्ण माहिती त्याला होती."
मोक्ष पुन्हा विचारात गढला.
"माझ्यावर अक्षरशः गोळ्यांचा वर्षाव झाला खानसाहेब. एके ४७ च असेल त्यांच्याकडे."
"नाही, उझी होती. कारण मोटारसायकलवर उझी वापरायला सोपी जाते..."
"उझी... इस्राएलची. सहसा मिळत नाही बरोबर ना खानसाहेब?"
हो.
मोक्ष पुन्हा विचारात पडला.
"खानसाहेब त्या बंदुका कुठे आहेत?"
"आहेत ना."
"आणा बरं एकदा माझ्याकडे."
खानसाहेब खाली गेले, व थोड्यावेळाने बंदुका घेऊन वर आले.
"खानसाहेब, तुमची उझी दाखवा."
खानसाहेबांनी उझी मोक्षकडे दिली.
"तुमची उझी पूर्ण लोडेड आहे, बरोबर?"
"हो."
"तरीही हलकी वाटतेय, आणि ही जड. तुमची उझी इस्रायली आहे ना?"
"येस, ओरिजनल." खानसाहेब अभिमानाने म्हणाले.
"आणि, या जड म्हणजे या दुसऱ्या बनावटीच्या आहेत."
मोक्ष लक्षपूर्वक बंदुकांच निरीक्षण करत होता.
एका क्षणी त्याची चर्या उजळली...
'...खानसाहेब, MRS - 76....'
खानसाहेब आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिले.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत......

नेहमीप्रमाणे छानच भाग!!
बंदुकींची बरीच माहिती आहे तुम्हांला... बराच अभ्यास केलेला दिसतोयं (गंमत करते बरं...)

मस्त

सुरू केली वाचायला अन् तेवढ्यात क्रमशः आलं...
जरा मोठे भाग टाका ना राव... आधीच आठवडा जातो काय झालं असेल या विचारात

Igi मधली एकदम आवडती गन म्हणजे उझी अन् mg १६

आवडला हाही भाग.. Happy

बंदुकींची बरीच माहिती आहे तुम्हांला... बराच अभ्यास केलेला दिसतोयं +1
पु.भा.प्र.

पुढचा भाग?
मधल्यकाळत संततधार वाचून काढली... ती पण छान आहे... मनु चा angle कळला

?

Zee टाॅकीज च्या कथायन स्पर्धेत हि कथा पाठवा .
या कथेवर चित्रपट पहायला आवडेल तसहि आता मराठी Movie चांगल्या बनत आहेत.
मायबोली वर मी login न करता खुप वेळा कथा वाचतो म्हणुन reply देत नाही. पन advertisement बघितली न आलो इथे.
FB Page vr bgha details. 28 Jan last date to apply.
त्या निमित्त आम्हाला पन कथा लवकर वाचायला मिळेल.