Learn German with Kedar Jadhav : मराठीतून जर्मन शिकण्यासाठी माझे YouTube channel !!

Submitted by केदार जाधव on 4 January, 2021 - 04:47

नमस्कार , मी केदार जाधव, म्युनिक , जर्मनी येथे राहतो .

मी गोएथे इन्स्टिट्यूटमधून, जर्मन भाषेचे सर्वोत्तम मानले गेलेले आणि सर्वात कठीण असे C2 सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे आणि जर्मन शिकवणे ही माझी पॅशन/ आवड आहे .

गेली ४ वर्षे मी जर्मन भाषा विनामूल्य शिकवत आहे , आणि आजपर्यंत ४४ बॅचेसमध्ये ११०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवले आहे. त्यातील अनेकांना विविध लेवल्सवर/पातळ्यांवर उत्तम यश मिळाले आहे.

ज्याला ज्याला जर्मन शिकायचे आहे त्याला ते विनामूल्य शिकता यावे हे माझे ध्येय आहे , आणि म्हणूनच मी मराठीतून जर्मन शिकवण्यासाठी Learn German with Kedar Jadhav हे चॅनेल सुरू केले आहे .

पहिल्या मराठी व्हिडिओची लिंक https://youtu.be/7KwhDAbhBG0

चॅनेलची लिंक https://www.youtube.com/channel/UCdL9VHNN43PeoJoW2u0Y3cA

मराठी प्लेलिस्टची लिंक
https://www.youtube.com/playlist?list=PLyRWSjr-0OBCey0DLCg-4a9ahm59PbiOz

आज जर्मन भाषा येत असणार्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत , पण दुर्दैवाने भारतात चांगले जर्मन शिकणे खूप कठीण आहे . चांगल्या क्लासेसची फी प्रत्येक लेव्हलला हजारोंच्या घरात आहे , जी सामान्यांना परवडणारी नाही, अन खेडयांत आणि छोट्या शहरांतही असे क्लासेस नाहीत .

दुसरे म्हणजे सहसा जर्मन ही इंग्रजीमधून शिकवली जाते .त्यामुळे बर्याच जणाना ती अवघड वाटते . त्याउलट मराठी आणि जर्मन भाषेमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत , त्यामुळे आपण मराठीतून जर्मन सोप्या पद्धतीने शिकू शकतो , आणि म्हणूनच मी हे चॅनेल सुरू केले आहे .

सध्या मी पहिले ९ व्हिडीओ अपलोड केले आहेत आणि दर आठवड्याला नवे १ ते २ व्हिडीओ मी अपलोड करणार आहे. जर्मन भाषेतील अत्यंत महत्वाच्या बी १ ( तिसर्या) परीक्षा लेव्हल पर्यंतचे व्हिडीओ अपलोड करण्याचा माझा मानस आहे .

तरी माझी विनंती आहे की तुम्ही वरील चॅनेलला SUBSCRIBE करा आणि तुमच्या ओळखीच्या ज्यांना ज्याना जर्मन शिकायची इच्छा आहे त्याना हा मेसेज फॉरवर्ड करा . आणि जर तुम्ही एखाद्या शाळेचे किंवा कॉलेजचे शि़क्षक / प्रतिनिधी असाल तर तुम्ही मला WhatsApp वर +49 17673915195 या क्रमांकावर संपर्क साधू शकता , मी तुमच्यासाठी प्रात्यक्षिक म्हणून एक छोटा ऑनलाईन क्लास विनामूल्य घ्यायचा प्रयत्न करेन.

पुन्हा एकदा , ज्याला ज्याला जर्मन शिकायचे आहे त्याला ते विनामूल्य शिकता यावे हे माझे ध्येय आहे , आणि ते साध्य करण्यास तुम्ही माझी मदत करावी अशी माझी विनंती आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------
टीप : जर हा धागा मायबोलीच्या नियमात बसत नसेल तर क्षमस्व . मी तो काढून टाकेन .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद फेरफटका , valsangikar , Shreya_11 , अमितव , फारएण्ड , मानव पृथ्वीकर, रूनी पॉटर , भरत , srd !!

रूनी पॉटर, हो , तो जर्मनीचा फ्लॅग करायचा प्रयत्न होता , पण त्याचा हा इफेक्ट लक्षात आला नाही .

पुढच्या भागात नक्की सुधारणा करेन !

फेरफटका ,

हो मीच पाठवला आहे तो . जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा म्हणून . पण तो इतका व्हायरल होईल याची कल्पना नव्हती Happy

IMG_20210105_110825448_compress62.jpgIMG_20210105_111149965_compress9.jpg
हे छोटेसे पुस्तक आणले होते जर्मन डाइरेक्ट शिकायला ( टुरिस्ट लोकांसाठीचे). पण उच्चार कळत नाहीत. ते तुमच्या युट्यूब पाठातून कळतील.

( पानाचा फोटो एक उदाहरण आहे, कॉपीराइट भंग करण्याचा उद्देश नाही. Indicative photo)

Srd,

खर तर इंग्रजीमधून जर्मन उच्चार शिकणे अवघड आहे . कारण इंग्रजी Phonetically Correct अजिबात नाही.

Tough ट्फ
Though दो

याला काही अर्थ नाही .

जर्मनच आपल्या मराठी सारख आहे. क ला उकार चा उच्चार 'कु' च होणार 'का' किंवा 'की' नाही

जर्मनमधेही U आला की उ च होणार उच्चार , बुस (Bus), नुल (Null)
इंग्रजीसारख कधी कट (Cut ) कधी पुट (Put)नाही

मी आजपासून आपले चॅनल फ़ालो करायला सुरुवात करत आहे, खूप दिवसापासून मनात होते एखादी नवीन भाषा शिकावी, धन्यवाद या प्रोजेस्टसाठी.

किती सुरेख, चॅनेल पाहिला नाहीये अजून पण कल्पना फारच छान, मला खूप आवडेल शिकायला, हातात य गोष्टी असल्याने इव्हन ऑनलाइन कलासेस करणे शक्य झाले नव्हते. आता या व्हिडिओच्या मदतीने कासवाच्या गतीने का होईना पण शिकेन.

मी ही एखादी भाषा शिकायचा विचार करत होते आणि नेमका हा धागा दिसला.. खुप मस्त वाटलं...खुप शुभेच्छा आणि अभिनंदन.

फारच छान. मुलगा जर्मनीत असतो. जर्मन शिकायच्या प्रयत्नात आहे. त्याला चॅनेलची लिंक पाठवली आहे.
मी पण आवड म्हणून शिकेन म्हणते.

केदार,
खुपच छान आणि स्तुत्य उपक्रम. तुमचे आभार आणि शुभेच्छा !

केदार, तुमचे आभार!
चॅनल subscribe केले आहे.
शिकवण्याची पद्धत छान आहे. नक्की प्रयत्न करेन.

इंग्रजी Phonetically Correct अजिबात नाही., जर्मनमधेही U आला की उ च होणार उच्चार , बुस (Bus), नुल (Null) शिवाय ते उमलाउट टिंबवाले स्वर/व्यंजनं.
हे तुमच्या पहिल्या धड्यात ऐकलं सर्व. खरंय केदार सर.

फक्त भाषा शिकायची आहे. दमदार आवाज आणि स्पष्ट उच्चार आवडले. आणि तळमळ!!

कालच चॅनेल सबस्क्राईब केले आणि पहिले 3 videos बघितले. खूप सोपे करुन सांगितले आहे. तुमच्या शिकवण्याच्या पद्धतिमुळे एकदम सोपे आणि आपल्यालाही जमेल असे वाटले. म्हणून शिकायचे ठरवले आहे. नविन वर्षात नविन काही शिकल्याचे समाधान. खूप खूप धन्यवाद. खूप मनापासून शिकवत आहात.

TYSM!
I subscribed and my kid who is learning with her friends mom (who used to teach at mmb) says - ur method is lot easier and relatable. Happy

खूपच छान

मला शिकायचं आहे जर्मन .

केदार, खुप छान सुरुवात आहे आणि मराठीत परकीय भाषा शिकवण्याची तुझी तळमळ आवडली. मी आजपासून तुझे व्हिडिओज बघायला सुरुवात केली आणि कुठलेही उद्दीष्ट नसताना केवळ मजा म्हणून नवी भाषा शिकणार आहे.

काय लिहावं केदार सर. किती सोप्प करून सांगितले आहे, (मी आजपासून तुझे व्हिडिओज बघायला सुरुवात केली आणि कुठलेही उद्दीष्ट नसताना केवळ मजा म्हणून नवी भाषा शिकणार आहे.).मी पण ,

अ बिग थँक्ययु

Pages