जाड मिरचीची भाजी

Submitted by BLACKCAT on 30 December, 2020 - 23:27
जाड मिरचीची भाजी , भावनगरी मिरची
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जाड मिरच्या पाव किलो , 10 नग
तीन लहान वांगी
तीन टोमॅटो लाल
दोन कांदे चिरून
लसूण बारीक करून
कोथिंबीर मूठभर
ओले खोबरे खिसून अर्धी वाटी
साध्या मिरच्या 2 चिरून
कढीपत्ता

फोडणीसाठी तेल , मोहरी , जिरे , हळद , हिंग

चिमूटभर साखर , मीठ

क्रमवार पाककृती: 

जाड मिरचीचे दोन तुकडे करावेत , चाकु फिरवून आतला गर काढून टाकावा, पहिल्यांदाच केल्याने तिखटपणाचा अंदाज नसल्याने सेफर म्हणून गर काढला. नुसते नळकांडे घ्यावे,

तेलात नेहमीप्रमाणे फोडणी करावी , जाड मिरचीचे तुकडे टाकावेत व शॅलो फ्राय करावेत , ते मउ पडतात , रंग फिका पडतो व नळ्या तडकून फुटतात,
मग कांदा लसूण घालून परतावे , कढीपत्ता व बारीक मिरच्या घालाव्यात, मग वांगी , टोमॅटो फोडी घालून परतून झाकण लावून वाफेवर शिजु द्यावे, थोडे शिजले की खोबरे व कोथिंबीर घालून मिसळून झाकण लावून शिजवावे
शेवटी साखर चिमूटभर व मीठ घालून मिसळून घ्यावे

SAVE_20201231_095425.jpegSAVE_20201231_095437.jpegSAVE_20201231_095447.jpegSAVE_20201231_095500.jpeg

वाढणी/प्रमाण: 
2
अधिक टिपा: 

सारण भरूनही भाजी करतात

माहितीचा स्रोत: 
यू ट्यूब
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

दाण्याचे कूट घालूनही करता येईल

गर काढल्यावर दुसर्‍या दिवशी तिखटपणा तितकाच होता की वाढला होता? जनरली ह्या मिरच्यांची भाजी केली की तो वाढतो असं लक्षात आलं आहे.

पाकृ छान , पण ह्या मिरच्या पोहे-उप्पीटात घालायच्या आहेत की वेगळ्या . भगवती मिरच्या म्हणून भाजीच्या वेगळ्या मिळतात पण रंग फिका असतो. मी ह्या म्हणतेय.

20201231_171726.jpg

वाल आणि डाळिंब्या

हळीव आणि फ्लेक्स सीडस

असे अनेक संवाद झडले आहेत

एखादा मिर्चीवर घडायला हवा

छान रेसिपी...
मला ह्या मिरचीचे नाव माहीत नाही. पण आमच्या एरियामध्ये बागायतदार ह्या मिरचीची लागवड करतात. साधारण चव सिमला मिर्चीसारखी असते. तिखट लागत नाही. आम्ही भजीची मिर्ची म्हणतो.

@ वर्णिता --- ते म्हणतायत ती मिरची भावनगरी मिरची नावाने नेटवर दिसतेय. मला नक्की नाव माहिती नाही.
जाड सालीची, गडद्/काळपट हिरवी, तळव्याइतकी लांब. तिखटपणाच्या बाबतीत मिरची नावाला कलंक.
भरून करायची भजी किंवा इतर पाकृ यासाठी वापरतात.
Besanwali Hari Mirchi बघा संजीव कपूर यांची (फोटोत). त्यात आहेत त्याच असाव्या बहुतेक. BLACKCAT ओळखतील.

अजिबात तिखट नव्हत्या
गर आणि बिया काढायचा उपद्व्याप नसता केला तरी कदाचित चालले असते

अरे तुम्ही दिलाय की फोटो .... मग वर्णिता का विचारतायत?
हो, तिखट नसतात बिलकूल. नुसत्या खाल्ल्या तरी हायहुय नाही होणार.
भरून आणि तात्पुरती लोणची / तोंडी लावणे यासाठी वापरतात.

कारवी, हो हो भावनगरी बरोबर, भगवती नाही, मला नाव आठवत नव्हतं.
ते मी विचारलं कारण एवढया गडद रंगाच्या कधी बघितल्या नव्हत्या. आणि मला ती ताटातली मिरची पोह्यात वगैरे घालतात तीच वाटली . Happy

छान , मी दाण्याचा कूट, सुकं खोबरं व तीळाचा कूट घालून वांगे न घालता करते. याला स्वतःची एक छान चव असते.

मस्त आहे रेसेपी. फोटो खूपच छान आहे. यांना भजीच्या मिर्च्या म्हणतात. वर्णिता, तू टाकलेला फोटो बहुतेक ( जर प्रत्यक्षात त्या खूप छोट्या म्हणजे बोटाच्या पेरा एवढ्या असतील तर ) कुटाच्या म्हणजे सांडगी मिर्च्यांचा आहे. वाळवुन केल्या जाणार्‍या त्या या मिर्च्या. ज्या आपण तळुन वापरतो.

आमच्या मुस्लिम क्लासमेटच्या आईने या भजीच्या मिर्च्या खिमा भरुन तळल्या होत्या. काही लोक यात उकडलेला बटाटा व कांदा घालतात.

images_0.jpeg

सांडगी मिरची
मसाला भरून वाळवतात व त्याची 'ममी' उर्फ इमोटेप करतात ,

images (1).jpeg

भारी रेसिपी.. ती वाळवलेली मिरची पण भन्नाट दिसतेय...!

रश्मी.. वैनींच्या मुस्लीम मैत्रीणीच्या आईने खीमा भरून तळलेली मिरची प्रकरण ऐकुन तोंपासु.. वैनींची मज्जा आहे राव.! Wink