वर्षाविहार २००८:वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 27 July, 2008 - 23:49

कालचा वर्षाविहार अतिशय उत्साहात आणि जोषात पार पडला.. या वर्षाविहाराचे मुख्य आकर्षण म्हणजे दिवसभर असलेली वर्षाराणीची उपस्थिती.. Happy यावेळी वविकरांना तिने खर्‍या अर्थाने वर्षाविहाराचा आनंद उपभोगु दिला.. दिवसभर पड्णार्‍या पावसात सर्व वविकर भिजुन चिंब झाले आणि त्यांची मने हिरवीगार टवटवीत झाली... बाकी मग वविला असणारा मायबोलीकरांचा नेहमीचा जल्लोष,दंगा हे तर साथीला होतेच... अश्या रितीने मायबोलीचा हा सहावा वर्षाविहार सोहळाही सुफल संपन्न झाला...

    खाली वविकरांनी वविचे वृत्तांत आणि त्यांच्या प्रतिक्रिया द्याव्यात..... ज्यांनी पहिल्यांदा मायबोली वर्षाविहार अनुभवला त्या सर्वांनीही वृतांत आणि विचार नक्की लिहावेत..

    विषय: 
    Group content visibility: 
    Public - accessible to all site users

    "आत लेडीज बायका असल्याचे कळले" हा काय नविन प्रकार आहे का?खुलशाबद्दल अगोदर च आभार

    मस्त मजा केलेली दिसते तुम्हा लोकांनी. दर वेळच्या वविचा वृत्तांत वाचायची उत्सुकता असते. ह्यावेळेला तर बर्‍याच जणांनी वृत्तांत लिहिल्यामुळे अजूनच छान वाटल.

    पण मी म्हणते, सगळ मराठमोळं असताना त्या छोल्याची काय गरज? मटकीची उसळ चालली असती. Happy

    अरे यार!
    इतके सारे वृतांत वाचणार कधी.
    ही लिन्क माय अनरीड मध्ये का दिसत नाही.
    ही आजच सापडली.
    आता वाचुन घेतो एक एक वृतांत. Happy

    .............................................................
    A successful marriage requires falling in love many times, always with the same person. Happy

    सगळ मराठमोळं असताना त्या छोल्याची काय गरज? ...>>> असं काय करतेस आर्च... हरबर्‍याचीच उसळ नाही का ती? म्हणजे मराठमोळीच की Happy

    गिरीभाऊ... एकदम जबरी लिहिलाहेस...
    आमच्या गाडीत 'जिराफ' असल्याचा साक्षात्कार >> हे खुपच आवडले.. Lol

    -::- -::- -::--::--::--::--::--::--::--::--::--::--::-
    घुमेंगे, फिरेंगे, नाचेंगे, गायेंगे, ऍश करेंगे और क्या... Yo !!
    -::- -::- -::--::--::--::--::--::--::--::--::--::--::-

    व.वि. छान झाला! फोटो पण मस्त आलेत!! दिम्डू ला सा. न.!! कसले सिनेमे / गाणी शोधली होती!! एक मिनीट खेळांना मजा आली!! मातेला वयानुसार विस्मरण झालेलं दिसतयं >>१५ वय तर नक्किच नव्हत>>>great common sense :)!!! १५ हि माझी जन्मतारीख आहे माते,तसं बर्‍याच वेळा सांगितलं पण मी पण... भक्तांकडे नीट लक्ष देइल तर ती माता कसची !!!:)

    ए यशा हा गिरीश तुला जिराफ म्हणतोय बघ....

    ~~~~~~~~~
    ~~~~~~~~~
    Happy

    लोक्स धमाल केलीत तर या वर्षी सुद्धा. या वर्षी पण मिसले मी ववि. Sad

    ~~~~~~~~~~~~
    गड्या आपुला गाव बरा!!
    ~~~~~~~~~~~~

    चला माझा वृत्तांत.
    सालाबादाप्रमाणे मी येणार म्हणजे काहीनाकाहीतरी घोळ व्हायलाच पहिजे. शिवाजी पार्कमधे मी आणि लाडकीने ठरवले होते की शनिवारी मी तिच्याकडे रहायला जाईन (मागच्या वर्षी घारूअण्णा कृपेने मला बेलापूरला दोन तास उभे रहावे लागले होते!)

    पण गंमत अशी झाली की भरपूर पाऊस पडला आणि तशा पावसात माझा मोबाईल संपावर गेला. लाडकीकडे जाण्याचा प्रोग्राम रद्द केला. आणि इंद्राबरोबर येन्याचा निर्णय घेतला. पण निर्णय कळवणार कसा??
    माझा फोन कुणाला लागेना आणि कुणाचा मला!! (सणसणीत अपवाद सतिशचा. मग त्याने इंद्राला फोन करून परळ स्टेशनवर किती वाजता काय याची चौकशी केली. दुसर्‍या दिवशी पहाटे (माझी तर मध्यरात्रच म्हणायला हवी... ) साडेचारला उठून बरोबर पावणेसहाला परळ स्टेशनवर पोचले. तवर लाडकीचे तीन फोन!!

    इंद्रदेवाना फोन केला तर ते म्हणे सहा सव्वा शापर्यंत येणार.. परत स्टेशनवर पंधरा वीस मिनिटे वेळ काढला. त्यातल्या त्यात स्टेशनवरच्या तिकीट काऊंटरवर वाद पण घातला. केवळ विस्तार भयाने तो इथे देत नाही. Happy

    इंद्रा आणि मनी आल्याबरोबर आम्ही ट्रेन पकडली. आणि नाहूर स्टेशनकडे निघालो. ट्रेनमधे इंद्राने संयोजक मोड घेतला आणि ताबडतोब फोनाफोनी करायला सुरुवात केली. मग नाहूरवरून आम्ही ऐरोली नाक्यावर गेलो. तिथे नील आणि आनंदमैत्री आमची वाट बघतच होते. सर्वाची चौकशी करण्यात आली. तितक्यात नीलने मंजुला तिचा नवरा सोडणार असल्याचे ऐकून "अरेरे वाईट झालं" वगैरे पीजे मारून घेतले. बस अजून पंधरा मिनिटानी येणार होती. तितक्यात घारू अण्णाचा अचाट आणि अतर्क्य कार्यक्रम समजला. आता काय घारू अण्णा येत नाहीत हे आम्हाला समजलेच होते. Happy तितक्यात अगदी अनपेक्षित रीत्या आमची बस आली. बसमधे योगी, आनंदसुजु, स्वाती, लाडकी, फणसळ्कर कुटुंबीय, अश्विन, मंजु इत्यादिनी आमचे स्वागत केले. मग बस पुढे निघाली....वाटेत चेतना उभी होती.. तरी बस पुढे गेली. बिचारी धावत धावत आली. Happy
    बसमधे आल्या आल्या तिने रीना नुकतीच अंघोळीला गेल्याची बातमी दिली. मग काय???
    रीनाच्या बिल्डिंगच्या जवळ्पासच बस उभी होती. प्रचंड शिव्या घातल्या. अर्धा पाऊण तास वाट पाहिली. शेवटी एकदाच्या मॅडम आल्या. तवर उरण फाट्याला साधना उभी होतीच. तिला गाडीत घेताच आम्ही निघालो. मग काय... आनंदसुजु, आनंदमैत्री नील याची मस्ती सुरू झाली. गाडीमधे अंताक्षरी वगैरे प्रकार करन्याचा प्रयत्न झाला.. अजून एक फालतू विनोद!!
    गाडी पेट्रोलपंपामधे शिरत असताना.. कुणीतरी "काय आलय?" असं विचारलं... रीना ताबडतोब.. "पेट्रोलपंप!!"
    तरी नशीब आनंद सतत तिला गप्प बैस असे ओरडत होता!!!

    यानंतर दुसरा स्टॉप होता एनडीच्या जवळ एका चहा टपरीजवळ. तिथे रीनाने नारिंगी रंगाचे पेय असलेली एक बाटली काढली.
    आनंदमैत्रीने ते पेय पिऊन ते फक्त पाणीच असल्याची खात्री केली.
    आम्ही रीनाने आणलेल्या कांद्यावरच्या अंड्याचा व्यवस्थित समाचार घेतला. त्या एका गोष्टीसाठी रीनाचे उशीरा येणे आम्ही मोठ्या मनाने माफ केले.

    यादरम्यान पुणेकर अजूनही लोणावळ्यात असल्याचे समजले. कधी नव्हे ते आम्ही वेळेवर पोचणार म्हणून आम्ही खुश!! याच खुशीत एकदा चुकून रस्ता चुकलो आंणि मग नीट रस्त्याला लागलो. मुख्य म्हणजे पोचलो एकदाचे!!

    रीझॉर्ट तसे बरे आहे. पण आम्ही गेल्या गेल्या त्यानी "शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है... " असे गाणे वाजवायला सुरुवात केली. रेन डान्सला हे गाणं!!!!! मग काही अचाट आणि अतर्क्य डान्स स्टेप्स सुचवून झाल्या. आणि आम्ही आमच्या रूमवर गेलो. रेन डान्सच्या फील देण्यासाठी म्हणून रूममधे टिप टिप पाणी टिबकत होते. Happy

    नंतर बाहेर पडत असतानाच पुणेकर दिसले. मागच्या वर्षीचे सर्वजण काय कसं काय असे बोलत होते. तितक्यात एक जबरदस्त ओळखीचा चेहरा दिसला.. वर जोरात "नंदे इथे काय करतेस?" नाव काही केल्या आठवेना..
    मग तिनेच ओळख सांगितली. स्नेहल, माझ्या मामेबहिणीची बाल मैत्रीण. Happy मग माझ्या डोक्यात ट्युब पेटली.

    यानंतर आम्ही नाश्ता केला. पोहे आणि उप्पीट... मेरेको नही पसंद आया.. तिथेच आमची निहिरा आणि तिच्या आईसोबत ओळख झाली. अर्थात मी रूमाला ओळखलं. पण तिने मला ओळखले नाही. मग मयुरेशने तिला माझी "व्यवस्थित" ओळख करून दिली. Happy तिने पण आयडी ओळ्खा स्पर्धेत असल्यासारखे पहिल्या क्लुला बरोबर ओळखले. (सां.स.: पुढल्या वेळेला हा प्रकार ठेवता येऊ शकतो)
    यावेळेला नचिकेतने एकदम वेगळेच नाव सांगितले. सर्व जण एकदम चकित. इथे पण डु आयडी का असा संशय येताच त्याच्या आईने अर्थात पूनमने हेच नाव बरोबर आहे असे सांगितले.. आता काय बोला!!!! नंतर सिदने डॉनचे गाणे म्हणून दाखवले. मायबोलीकराची पुढची पिढी एकदम "तय्यार" आहे. मयुरेशच्या मुलीने हस म्हटले की गोड हसून दाखवले. आणि चॉकोलेट ताब्यात घेतले. Happy

    यानंतर सर्वात महत्वाचे काम... पावसात भिजणे. भरपूर पाऊस होताच त्याशिवाय स्विमिंग पूल आणि रेन डान्स. मज्जानु लाईफ!!!

    यामधे उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणजे कु. निहिरा. जवळ जवळ दोन तीन तास पाण्यामधे खेळत होती. आणि पाण्यातून बाहेर काढल्यावर पण परत घेऊन चल म्हणुन ओरडत होती. Happy वय वर्षे जवळपास दीड.

    अजून एक होता फणस़ळकर सुपुत्र अथर्व आणि कन्यका गौरवी. गौरवीने तर अथर्वचा रेनकोट काढून आईच्या हातात दिला. Happy बाकी रेन कोट घालून मग मुलांना पाण्याना सोडण्यामागचे त्याच्या मासाहेबाचे लॉजिक काय मला समजलं नाही.

    पाण्यात खेळून आल्यावर भूक लागलेलीच होती. जेवणाचा समाचार घेतला. मला तरी जेवण विशेष आवडले नाही. पण जेवण घेत असताना माझ्या समोरच्या काकूनी वाढप्याबरोबर झक्क वाद घातला. तितकीच करमणूक. Happy

    यानंतर आम्ही सर्वजण रूमवर आलो. जाम झोप येत होती. त्यातच मीनुने आणि श्रने काहीच्या काही कविता आणि कायच्याकायच गझल याचे गायन सुरू केले. ते इतके मजेशीर होते की आमची झोप दुणावली. Happy या गझल कार्यशाळेला वर उल्लेखलेल्या भांडणार्‍या काकू हा प्रमुख विषय होता. तसेच रीनाने "चाव्या आणि शिव्या" असा विषय दिला.. तिला सकाळी सकाळी मिळालेल्या शिव्या ह यामागचे कारण असेही तिने नंतर खाजगीत जाहीर केले. त्यानंतर न आलेल्याची वगैरे चौकशी उखाळ्यापाखाळ्या इत्यादि कार्यक्रम पार पडला.

    यानंतर सांस च्या कार्यक्रमाना सुरुवात झाली. अंताक्षरीला मी स्कोरर म्हणून श्रद्धाने नियुक्त केले होते.
    काय तर गाणी आणि पिक्चर होते!! बरं झालं मी खेळत नव्हते. Happy
    दीमडू... पुढच्या वेळी साठी सर्वाच्या वतीने दयेचा अर्ज मी पाठवून ठेवते.

    सर्वात मस्त म्हणजे सायलीने ओळ्खलेले धाकटं बाळ आणि जांभूळ पिकल्या झाडाखाली च्या वेळेला तिची रेऍक्शन.
    नंतर वन मिनिट गेम्स झाले... यामधे भयानक शोध लागले. उषा चव्हाण अभिनेता???
    यानंतर मूकाभिनयामधे मी पण भाग घेतला. यामधे सर्वात जास्त मजा सुश्याने आणली. "अरे किती सोपय.. मला पण ओळखू आलं." असं तो इतराच्या टीमला सांगत् होता. आनंदसुजु गेल्य वर्षीसारखा फॉर्मात होता. घारूअण्णाची अर्धांगिनी सोबत नसल्याने बराच मोठा प्रॉब्लेम झाला. सर्वात शेवटी आमची पाचावर धारण न बसल्याने आम्ही हरलो. पण ठीकाय. आम्ही भरपूर एंजॉय मात्र केलं.

    नंतर चहा कॉफी.. ( हे सर्वात महत्वाच). आणि पूनमने नवीन मायबोलीबद्दल जरा सांगितलं. बरं झाल्. मला ते अजून वाचयचय वगैरे भानगडी माहितच नव्हत्या,
    नवीन मायबोलीला अख्खी प्रदक्षिणा घातली तरी हवा तो बीबी मला सापडत नाही.
    यानंतर आम्ही रूममधे गेलो. तिथे आवरा आवरी करून निघायची तयारी केली.
    मीनुआज्जीनी माझी अगदी प्रेमाने विचारपूस केली. अगदी वडीलधार्‍या व्यक्तीसारखं "कुठला मुल्गा आहे काय करतो? कुठे असतो?" वगैरे विचारून् घेतल.. खूप बरं वाटलं.

    यानंतर आम्ही परतीच्य प्रवासाला लागलो. सर्वाना बाय पुन्हा भेटू. वगैरे म्हणून झालं. आणि आमची गाडी मुंबईच्या रस्त्याला लागली. आयुष्यातला एक दिवस कमी झाला. पण जाताना खूप मजेत गेला.

    आता वाट बघायची ती पुढच्या वविची.
    --------------
    नंदिनी
    --------------

    ...त्याने इंद्राला फोन करून परळ स्टेशनवर किती वाजता काय याची चौकशी केली. >>>...
    आणि मी फोन आणि मेसेज केला ते कुणाला बरे???...

    लाडके, सतिशच्या पुढे तिला आता तुझी आठवण कशी बरे होईल???

    गिरिश.. एकदम जबरी वृत्तांत रे भो....
    ==================
    सुसाट वारा वीज कडकडे पाऊस झाला सुरू
    पाणीच पाणी रस्त्यावरती मुठीत गारा धरू

    रीनाने आणलेल्या कांद्यावरच्या अंड्याचा व्यवस्थित समाचार घेतला>>>
    अरे वा! शेवटी एकदाची ती फेमस रेसिपी मुम्बईकरांच्या पोटात गेली तर. Happy
    .............................................................
    A successful marriage requires falling in love many times, always with the same person. Happy

    ववि चा वृतांत इतक्या सही लोकांनी सही पध्दतीने सांगितलाय, की त्यापेक्षा वेगळं अन चांगलं मी काय सांगणार? त्यामुळे माघार. इतरांचेच वृतांत चालू देत भन्नाट.
    वविला मातेचा मुकूट (पक्षी- मातेची मायबोली टोपी / कॅप) हरविल्याचं जाहीर झालं, अन एकच खळबळ उडाली. तशातच एकानं मातेचा मुकूट आपल्याकडे चुकून आल्याचं एका वविकरानं जाहीर केल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. मुकूटाची पालखी करून मातेकडे समारंभपुर्वक नेण्याचे ठरले. पण याच वविकराने दुसर्‍या दिवशी पुन्हा जाहीर केले, की त्याला सापडलेली टोपी म्हणजे मातेचा मुकूट नसून कुणा अर्ध-वविकराची टोपी (किडस कॅप) आहे. झाले. पुन्हा सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. एकच हंगामा जाहला. यस्जीवर दोन दिवस अगदी आणीबाणीसदृश परिस्थिती आली. दरम्यान पुजनीय मीन्वाज्जीकडे एक बाँबसदॄश पदार्थ सापडल्यावर त्या प्रचंड घाबरल्या. नीट निरखून बघितल्यावर तो बाँब वगैरे काहीही नसून मातेचाच मुकूट असल्याचा शोध लागला. मग सर्वांनी 'चांगभलं' वगैरे म्हणून घेतलं, अन यस्जीवरचं विस्कळित जनजीवन पुर्वपदावर आलं.
    सध्या मीन्वाज्जी या जगप्रसिध्द मुकूटाची तो मातेकडे जाईपर्यंत सरबराई व पाहूणचार करण्यात व्यस्त आहेत. त्याची विधीपुर्वक प्राणप्रतिष्ठा वगैरे करता येईल का याचीही तज्ज्ञांकडून तपासणी करीत आहेत..
    या दरम्यान अवघा यस्जी अतिशय अवघड परिस्थितीतून गेला. फिरत्या मुकूटाचा आत्मा त्रस्त होऊ नये म्हणून यस्जीवर शांतीसाठी किर्तन करण्यात आले. त्याचा थोडा भाग आपल्या माहितीकरिता देत आहोत.
    -----------------------
    अस्वस्थ होऊ नका मंडळी, चला, किर्तन करू या..
    -----------------------
    विषय- टोपी
    टोन- बाबा महाराज सातारकर
    वाद्यसाथ- ढोलकी, टाळ, एकतारी
    कोरस- यस्जीचे बीबीकार
    ..
    तर श्रोत्या म्हाराजा, ऐका या टोपीच्या गमजा.
    (गद्याला साथ म्हणून संथ एकतारी, जरूर तिथं कोरस)
    या टोपीचं किर्तन करावं तेवढं थोडं,
    सार्‍या जगाला या टोपीनं केलंSSSSS वेडं!
    काय वर्णावा इथं या टोपीचा महिमा
    नाव एकच पण अनेकार्थाने जाणावाSSSS..
    (ढोलकी, टाळ अन कोरस सुरू. एकतारी जोरात)
    (चाल- मला नवरा नको गं बाSSSSई, मला नवरा नको गं बाई..)
    मला टोपी सापडली बाSSSSई, मला टोपी सापडली बाई-
    मला टोपी सापडली बाSSSSई, मला टोपी सापडली बाई-
    मला टोपी सापडली बाSSSSई, मला टोपी सापडली बाई...
    ..
    (बुवांचा हात वर, त्यासरशी कोरस, टाळ ढोलकीच्या समेवर बंद. एकतारी पुन्हा संथ- गद्यात)
    तर मंडळी (ढोलकीवर थाप)
    बोडक्याला केसांपुरती, वारकर्‍याला भक्तीपुरती;
    सत्यनारायणाला नमस्कारापुरती, अन गांधीबाबाला अहिंसेपुरती
    भामट्याला ठकविण्यापुरती, जादूगाराला लपविण्यापुरती;
    पुढार्‍याला झुकण्यापुरती; अन मंत्र्याला खुर्चीSSSSपुरती.

    अशी ही सर्व गुणाची टोपी
    कुणाला अवचितच सापडली, तर काय म्हणाSSSSSल???
    (ढोलकी, टाळ अन कोरस सुरू. एकतारी जोरात)
    मला टोपी सापडली बाSSSSई, मला टोपी सापडली बाई-
    मला टोपी सापडली बाSSSSई, मला टोपी सापडली बाई-
    मला टोपी सापडली बाSSSSई, मला टोपी सापडली बाई...
    ..
    (बुवांचा हात पुन्हा वर. कोरस, टाळ, ढोलकी बंद. एकतारी संथ)
    तर भक्तांनो, अशी ही सर्वगुणसंपन्न टोपी सापडल्यास-
    तो योगायोग मानोSSSS नये.
    अवचित आलेल्या भाग्यास दुर ढकलोSSSS नये.
    टोपीखाली दडलंय काय- असे निरर्थक प्रश्न विचारोSSSS नये.
    नको त्या संशयाने बेजार होवोSSSS नये.
    या गुणी टोपीस स्वगृही आणावीSSSS.
    प्राणापलीकडे जपून ती देवस्थानी ठेवावीSSSS.
    तर म्हाराजा (ढोलकीची जोरदार थाप)
    हा सोनियाचा दिन जगून घ्यावा.
    हा अमृतयोग भोगोनी घ्यावाSSSS.
    सणच आला समजोन, साजरा करावा.
    अन तिचा गोडवा सकल जनांस बोलावा-
    म्हणाSSSS-
    (ढोलकी, टाळ अन कोरस सुरू. एकतारी जोरात)
    मला टोपी सापडली बाSSSSई, मला टोपी सापडली बाई-
    मला टोपी सापडली बाSSSSई, मला टोपी सापडली बाई-
    मला टोपी सापडली बाSSSSई, मला टोपी सापडली बाई...
    (ढोलकी, टाळ, कोरस, एकतारी वाढत्या वेगात, सुरात चालूच.........)

    ***
    शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन, शब्दें वाटू धन जनलोकां..

    चला माझा वृत्तांत.
    बरेच दिवसा पासुन वाट पहात होतो तो दिवस सकाळी ५.०० वाजता गजर वाजताच सुरु झाला. आणि पटापट आवरते घेत आम्ही तिघे जण बस ची वेळ वेळेत गाठली. सर्व जण आल्यानंतर बस व वि च्या मार्गाला निघाली. सर्व जणांनी गाडीत खुप मजा केली आणि गाडीतला वेळ छान गेला. दिलेल्या नकाशा नुसार मार्ग शोधत (एकदा चुकलो) सरळ जागेवर पोहोचलो. मुंबइकर आगोदरच पोहोचले होते आणि नाश्ता करुन आमची आतुरतेने वाट पहात होते.
    आमचाही नाश्ता लवकर आटोपता घेत आम्ही खोली मार्गे सभाग्रहात पोहोचलो. ओळ्ख परेड मुंबइ आणि पुणेकर एकत्र करण्यात आल्याने खुप मजा आली. त्यामध्ये खुप जण एकमेकांना प्रथमच भेटले असले तरी हा माझा मित्र सांगताना आपण खुप वर्षापासुन ओळ्खत आहोत असाच भाव बोलताना वाट्त होता.
    ओळख परेड मध्ये लहान मुल्लांनी छान बोलत न घाबरता ओळख करुन दिली आणि गिफ्ट्स पण घेऊन गेली. नंतर सर्व जणांना २ वाजता भोजन केल्यानंतर पुन्हा सभाग्रहात येण्यास सांगण्यात आले. सर्व जण ज्याला जमेल तसे पाण्यात भिजण्यासाठी मार्गस्थ झाले. काही जण मनसोक्त पाण्यात (तलावात) पोहत होते. काही जणं पाण्यामध्ये दहि हंडि फोड्ण्याचा प्रयत्न करत होते. निघता निघता रेन डान्स करुनच भोजनास जमा झाले.
    भोजन कार्यक्रम संपल्यानंतर एका जुन्या अशा खोलीत मिळेल त्या जागेवर बसत होते कारण व वी चा सभाग्रह दुसर्‍या लो़कांनी भरलेला होता आणि त्यांचा कार्यक्नम काहि केल्या लवकर संपत नव्हता. शेवटी काहि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत गनिमि मार्गे त्यांचा कार्यक्रम संपवण्याचा उपक्रम हाती घेत एकदाचा शिरकाव केलाच. सा.स. ने आयोजीत केलेल्या नुसार आपला कार्याक्रम खुप छान वातावर्णात पार पडला. वेळ कमी पडला असे खुप वाटले पण खुप मजा आली. आणि नेहमी प्रमाणे फोटो सेशन करत आणि पुन्हा भेट्ण्याच्या अटी वर एकमे़कांचा निरोप घेत पुन्हा आपापल्या गाडी मध्ये स्थानापन्न झालो. आणि परत आठ्वणी जाग्या करत घरच्या मार्गास रवाना झालो.
    अतुल....
    (आतल्या).....

    चला झालं का सगळ्यांचं लिहून.... Happy ?

    ~~~~~~~~~
    ~~~~~~~~~
    Happy

    लहान मुल्लांनी छान बोलत >>>>>>>>
    मुल्ला? Uhoh
    सभाग्रह हा कुठला ग्रह आहे म्हणे? Proud अतल्या, आधी मराठी सुधार बघू.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~
    'माता' रिटर्न्स.

    चला झालं का सगळ्यांचं लिहून.... >>>>>> म्हणजे आता तू लिहिणार आहेस का? लिही हो. आम्ही वाचू ............. Happy

      ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
      या ओठांनी चुंबून घेइन हजारदा ही माती
      अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
      इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे

      Pages