वर्षाविहार २००८:वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 27 July, 2008 - 23:49

कालचा वर्षाविहार अतिशय उत्साहात आणि जोषात पार पडला.. या वर्षाविहाराचे मुख्य आकर्षण म्हणजे दिवसभर असलेली वर्षाराणीची उपस्थिती.. Happy यावेळी वविकरांना तिने खर्‍या अर्थाने वर्षाविहाराचा आनंद उपभोगु दिला.. दिवसभर पड्णार्‍या पावसात सर्व वविकर भिजुन चिंब झाले आणि त्यांची मने हिरवीगार टवटवीत झाली... बाकी मग वविला असणारा मायबोलीकरांचा नेहमीचा जल्लोष,दंगा हे तर साथीला होतेच... अश्या रितीने मायबोलीचा हा सहावा वर्षाविहार सोहळाही सुफल संपन्न झाला...

  खाली वविकरांनी वविचे वृत्तांत आणि त्यांच्या प्रतिक्रिया द्याव्यात..... ज्यांनी पहिल्यांदा मायबोली वर्षाविहार अनुभवला त्या सर्वांनीही वृतांत आणि विचार नक्की लिहावेत..

  विषय: 
  Group content visibility: 
  Public - accessible to all site users

  सही! सगळ्यांनी धमाल केलीये वाटतं! Happy
  मंजू, तू हर्क्युलसाच्या अवस्थेत लाउडस्पीकर पाठीवर तोलून घेतलायस असं कॅरीकेचर मला सुचतंय. Proud
  दंड्या, हा आयडी बदल. साधा 'दंड्या' असा आयडी घेतला असतास तर कालचा प्रसंग ओढवला नसता. Proud
  >>आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
  अ.आ., नवीन नोकरी धरलीत का?

  ------------------------------------------
  हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

  १०० गजांवरील ढाण्या वाघ दिसो नये ऐसे धुके,>>>>>>
  ढाण्या वाघ होता तिथे????????? माझाच असेल तो.... Proud धुक्याची संधी साधून पळून गेला मेला....
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~
  'माता' रिटर्न्स.

  (आमची टीम हरण्यात माझा हातभार मोठा आहे हे मात्र विजेते कृतघ्नपणाने विसरले असे मी इथे नोंदवू इच्छितो.) आर्भटा... अपयश ही यशाची पहिली पायरी असते... (जल्ला अजुन एक वाक॒प्रचार मिळाला सा.स.ला)

  वृतांत आवडला... मस्त धमाल... परत एकदा खांदा दुखावला... Happy

  कॅरीकेचर आता सुचतंय. फ ते पण येऊ दे...

  अरभाट मस्त वृत्तांत छोटा आणि गोड (म्हणजे शॉर्ट अँड स्वीट)....
  ______________________________________
  आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
  घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
  उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
  पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

  'श्यामची आई' हा चित्रपट ओळखताना 'धाकटे बाळ' >>>>>>> Lol
  जबरी.
  चला म्हणजे मागच्या वर्षी 'कुरवाळु का भाउराया' झालं ह्या वर्षी 'धाकटे बाळ'.  
   
  ==============
  बजे सरगम हर तरफ से | ताल कदमो पे छाये जाये |
  लब पे जागे गीत ऐसा | गूंजे बनकर देश राग||

  फोटो टाक्णार आहे का कुणी???
  ______________________________________
  आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
  घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
  उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
  पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

  मस्तच लिहिलेत सगळ्यांनी वृत्तांत! नुस्तं वाचून पण मज्जा आली.
  .
  मुंबईहून आलेल्या 'लेडिज बायकांचा' घोळका<< हिमांशु Lol

  :):-) अभिनंदन संयोजक.

   ***
   It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
   - Gore Vidal

   चला आता माझा वृत्तांत.

   ५.३० ला पहाटे पहाटेच उठून अतुलनी धपाधप फोन करुन इतर लोकांना उठवायला सुरुवात केली. त्याच्या लाइट लावणे बंद करणे आणि इतर गडबड बडबड यांना न जुमानता, मी झोपुन रहायचा काही काळ प्रयत्न केला. शेवटी अगदीच झोपता येईनास़ं झालं, मग उठले झालं! मग काय धपाधप आवरुन ६.३० ला शार्प घराबाहेर पडलो एकदाचे. किमयाला पोचल्यावर कोपर्‍यावरच पुरुष माणसांचा एक घोळका उभा दिसला. बायका कशा दिसेनात म्हणून बसमधे डोकावताच आत लेडीज बायका असल्याचे कळले. त्यात माताजी, रिमझिम (बसमधेच रिमझिम घेऊन गेलो मग वर्षाराणीला आमच्या बरोबर येण्याशिवाय गत्यंतर नव्हतेच!), १५ अमृता आपलं ते अमृता १५ या होत्या. आणि मला वाटतं स्नेहल पण होती. मुख्य म्हणजे छत्रे कुटुंबिय आणि एक सहकुटुंब संयोजक नव्हते. मग वाट पहाणं आलंच. थोडक्याच वेळात त्यांचं आगमन झालं आणि मातेच्या आदेशानुसार त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं. मग जागांची पकडापकडी असा एक छोटासा खेळ झाला. याआधी एक अत्यंत महत्त्वाची घटना झाली. अनेक दिवसांनी (सावज) Wink भेटल्याने पूनमनी मला चक्क कडकडून मिठी मारली आणि कॅमेरावाल्यांची हे ऐतिहासिक चित्र टिपण्यासाठी धावपळ उडाली.
   .
   असो. बस सुरु होताच सालाबादप्रमाणे माझ्यात वविचा संचार झाला. आणि पूनमला नको नको वाटणारी अशी माझी ती एक अखंड बडबड ती सुरु झाली. (माझी बडबड ऐकुन तीने दोन दिवसाचं मौन धारण केल्याची एक आतली बातमी आहे. पण ती इथे नको सांगायला.) यात सुरुवात अंताक्षरी पासुन झाली. मग एकापेक्षा एक हिंदी गाणी एकापेक्षा एक भयंकर आवाजात म्हणायची स्पर्धाच जणू सुरु झाली. त्यात सायली आणि स्नेहल यांना एका गटात ठेवण्याची भयंकर चुक आमच्या कडून झाल्याचा साक्षात्कार आम्हाला व्हायला फार वेळ लागला नाही. पण हाय रे कर्मा...! वेळ निघुन गेली होती. या दोघींच्या गटात असलेल्या अमृता१५, रिमझिम, मिल्या, देवा, आरभाट, मंगेश आणि संदीप या सर्वांची मुस्कटदाबी उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलिकडे आम्ही काही करु शकलो नाही ते शेवटपर्यंत.... (कुणी ढसाढसा रडणारा स्मायली देता का स्मायली!) आता यापैकी देवा आणि मिल्याला मुस्कटदाबीमधे तसं नविन काहीच वाटलं नसणार हा भाग अलाहीदा. आरभाटाने मनातल्या मनात मी त्याला त्याच्या आयडीचा अर्थ वगैरे विचारुन जी बोलायची संधी दिली त्याबद्दल माझे आभार मानलेले मला मनातल्या मनात मोठ्याने ऐकु आले. संदीपची मात्र फारच बिकट अवस्था झाली ह्या पोरींनी आधी त्याला तोंडातुन 'ब्र' सुद्धा काढायची संधी दिली नाही आणि नंतर सखुकरवी त्याला 'चुप चुप खडे हो जरुर कोई बात है .. पहली मुलाकात है जी पहली मुलाकात है..' असे टोमणे मारवले. बिचारा 'अहो' 'मी' 'गाणं' 'तुमचा आवाज' असं काही तरी म्हणायचा प्रयत्न करत होता पण....... 'देवा'लाही (तोच त्याच्या सगळ्यात जवळ होता नं!) त्याचं गार्‍हाणं ऐकु येऊ शकलं नाही. याहूनही पुढे जाऊन अमृता आणि रिमझिमला 'ख' वरुन गाणं म्हणा असं सांगून स्वतःच 'खंबेजैसी खडी है...' असं गाणं म्हणून सायलीने अगदी कहर केला.
   ~~~~~~~~~
   ~~~~~~~~~
   Happy

   IMG_1889.jpg

   हिरव्या हिरव्या रंगांची झाडी घनदाट...

   काय? मला तर सगळे म्हटले, मुंबईकरच नेहमी आधी पोचतात म्हणुन.....पुणेकर नेहमी सारखे ------- >> नविन सभासद बनल्यावर "बनवणे" भाग असते.. Proud पण बनविले नक्की कोणी ?
   काश रीना उसके बाल सुकवती... काश रीना अपने बालोंको तेल लावती...
   काश रीना अपनी जुल्फे विंचरती.. तो शायद मुंबैवाले अपनी परंपरा कायम राखती... Proud
   '
   हिम्या, साधना, माते, मंजु, मीनु... प्लिज कन्टीन्यु... छानच Happy
   आरभटा... हिम्या बनला गोविंदा, मोडीला इंद्राचा खांदा... Happy ती मजा काहि औरच..
   इतका छोटा वृ...... मस्तपैकी लिहिलाहेस.. बाकी तुझी "या सुखांनो या" ची ओळख करुन देण्याची धडपड शॉलिड होती.. Happy

   -::- -::- -::--::--::--::--::--::--::--::--::--::--::-
   "घुमेंगे, फिरेंगे, नाचेंगे, गायेंगे, ऍश करेंगे और क्या... Yo !! "

   अरे कोणी तरी "फ"चा वारसा चालवा....
   सचित्र बखर वगैरे लिहा.....
   नाहीतर "फ", तुच चालव रे तुझा वारसा!

   बाकी लोक्स.... येत राहु दे!

   वा सहीच मजा केली आहे तुम्ही........ Happy

   यंदा ही व वि ला छान धमाल आली. मी ही वेळेत पोहचलो सर्व सन्योजकान्चे आभार विशेषतः इन्द्राचे मी मा़झ्यासाठी थाबल्याबद्दल.
   चाला आणखी डिटेल्स नन्तर टाकतो

   घारुआण्णा
   इदं न मम राष्ट्राय स्वाहा !! व

   मी ही वेळेत पोहचलो...>>>> अण्णा, मध्ये एक शब्द राहिलाय... `जेवायच्या' Proud

   मयुरेश दा अण्णांनी एकचीच वेळ दिलेली आणि बरोबर एकच्या ठोक्याला पोहचलेही... म्हणजे वेळेतच नाही का... Happy
   नायतर गेल्यावेळी एक तास.... (माझ दु:ख मीच समजु शकते... Sad )
   आणि एक राहील... परवा जेवणात छोले आणि फ्रुट सॅलड चांगल होत हां... Happy

   लाडके, अण्णांना खूप भूक लागली होती .. आणि त्यामुळे जेवणाची वेळ डोक्यात ठेवुनच त्यांनी एकची वेळ
   दिली होती असे शिक्रेट मला इंद्राने सांगितले गं Proud

   बातम्या पुढे चालू.

   लोणावळ्यात चिक्कीग्रहण आणि चहाप्राशन

   द्रुतगती महामार्गावरून द्रुतगतीने चाललेल्या बसने एकाएकी लोणावळ्यात प्रवेश केला. सभोवताली चिक्कीची (बंद) दुकाने दिसत होती.
   तेथे असलेल्या एका हॉटेलमध्ये चहाप्राशनाच्या कार्यक्रमासाठी बसने नांगर टाकला. हॉटेलबाहेर एके ठिकाणी 'अमुकतमुक बार अँड रेस्टॉरंट' असा कापडी फलक दिसून आला. त्याच्या पार्श्वभूमीवर कार्याध्यक्षांचा हसरा फोटो काढण्यात आला आहे.
   सर्वांचे चहाप्राशन झाल्यावर सायली, स्नेहल वगैरे मंडळी एकमेव उघड्या असलेल्या चिक्कीच्या दुकानाकडे पळाली व त्यांनी चिक्कीचे खोके घेऊन गाडीत पुनर्प्रवेश केला.
   गाडी पुन्हा सुरू झाल्यावर सर्वांनी चिक्की व वेफर्स असा 'जंक आहार' घेतला.
   .
   सखू आणि पाणीप्रश्न: समस्येने धारण केले गंभीर रूप

   गाणी म्हणता म्हणता मीन्वाज्जींना काहीतरी आठवले आणि त्यांनी सखू या महिलेच्या पाण्यामुळे होणार्‍या हालांचे अप्रत्यक्ष वर्णन सुरू केले.
   'चार वाजले.
   कोंबडा आरवला.
   सखू गेली पाण्याला....'
   असे त्या वारंवार सांगत होत्या. इथे शहरात घराघरात नळ असताना सखूला मात्र चार वाजता पाण्याला जावे लागते, ही आपल्या सरकारची हार आहे.
   सखूच्या स्पिरिटला वविकरांनी केला सलाम: एवढ्या पहाटे रोज पाण्यासाठी चालत जाऊनही सखू भेटलेल्या प्रत्येकाला उचित असे गाणे म्हणून दाखवते, यात तिची चिवट वृत्तीच दिसून येते; असे म्हणून सर्वांनी सखूबद्दल गौरवोद्गार काढले.
   सखूची कैफियत ऐकण्याच्या नादात वविकर मात्र पुन्हा कर्जतच्या 'त्या' चौकात रस्ता चुकले. कधी नव्हे ते लौकर पोचलेल्या मुंबईकरांनी मग रस्ता सांगण्याचे काम चोख पार पाडले.
   क्रमश:

   ~~~~~~~~~~~~~~~~~~~
   'माता' रिटर्न्स.

   सुप्रभात श्रीकर्स,
   पहाटे ठिक ५ वाजता मी कांदिवलीहुन बस घेऊन बोरिवलीला निघालो...

   मुंबईची बस...
   Bus.jpg

   बोरिवलीला पोहचल्यावर तब्बल ६.०० वाजता आपल्या सगळ्यांची लाडकी आली...
   त्यानंतर आम्ही दोघ योगि महाराजांची वाट पाहत उभे होतो, पहाटे ठिक ६.१५ मिनिटांनी योगी महाराज प्रकट झाले,त्यानंतर आम्ही बोरिवलीहुन निघालो, लाडकीने आणलेल्या सेंडवीचमूळे आमच्या पोटाला आसरा मिळाला....त्याबाद्द्ल लाडकीचे आभार मानतो.. आणि लाडकीला एकच विनंती करतो की तिने हि परंपरा आशीच जोपासावी..
   सेंडवीच संपे पर्यत आम्ही जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडला पोहचलो... योगीने फणसेकरांच्या भ्रमणध्वणी यंत्राला ध्वणी लहरी सोडल्या, आणि त्या फणसेकरांच्या भ्रमणध्वणी यंत्राने पकडल्या...(अर्थात फणसेकरांशी संपर्क साधला)

   योगि महाराज भ्रमणध्वणी यंत्राद्वारे फणसेकरांशी बोलताना...

   IMAGE_002.jpg

   श्री.फणसेकर आणि परिवार आपल्या वेळेत बरोबर आले, त्यानंतर गाडी निघाली ती थेट ऐरोलि - मुलुंड जोड रस्त्यावर थांबली, तिथे निलदेव अगोदरच प्रकट झाले होते... अहाहा त्या ठिकाणी योगी महाराज आणि बाबा आनंद यांच्या भेटिचा जो सोहळा झाला तो अवर्णनीय होता..

   योगी महाराज आणि बाबा आनंद यांची भेट...
   IMAGE_003.jpg

   ठाण्यातील इतर देवतांना आमचा रथ निघाला तो थेट रिना देवींच्या दर्शनाला...
   जवळपास १ तासभर बाहेर तातकळत राहील्यानंतर रिना देवी प्रकट झाल्या...
   रिना देवी दर्शन देई पर्यंत योगी महाराज आणि बाबा आनंद यांच्या हस्ते बसला हार घालण्यात आला...
   योगी महाराज आणि बाबा आनंद यांच्या हस्ते बसला हार घालताना घेतलेले हे छायाचित्र..
   IMAGE_008.jpg

   सोबत इन्द्र देव त्यांना मार्गदर्शन करतांना...

   क्रमशः

   नमस्कार माबोकरांनो,

   माझा पहिला-वहिला ववि,सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून खूपचं मजा आली. तरीही माझ्या कोनातून ववि लिहीण्याचा प्रामाणिक धाडसी प्रयत्न करायचा मोह आवरत नाहीये. सो....हा प्रपंच..ऊशीरा लिहीत असल्याबद्दल माफी असावी..

   ५.४०, बालगंधर्व-

   नेहेमीप्रमाणे (खरचं) मी खुपचं लवकर पोहोचलो होतो. सुदैवाने मा.सं आणि इतर (राजा,अभि,स्नेहल) सगळेजण गाडी येण्याच्याही आधीपासून तिची वाट पाहत होतो,आणि १दाची ती आली आणि आमची गाडी रस्त्यावर लागली. 'किमया'ला ६.४० ला पोहोचूनही काही 'किमया' घडली नाही आणि ईतर मा.सं. नेहेमीप्रमाणेचं(ईतर आधी पोहोचलेल्या माबोकरांनी ही अमूल्य माहीती पुरविली.) आपापल्या लौकिकाला साजेशा वेळेत पोहोचले.(मीन्वाज्जी नी लवकर उठण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता म्हणे पण चालायचंच, वयोमानानुसार काही बदल होतचं असतातं..दिवे घ्या) तर परत १दाची आमची गाडी सगळ्यांना घेवून रस्याला लागली.. सालाबादप्रमाणे हजेरी घेण्याचा शिरस्ता मा.सं. नी चालू केला पण नवीन सदस्य सोडले तर बाकीच्या ज्येष्ठ नागरीकांनी त्यांच्या प्रयत्नांना दाद लागू दिली नाही,त्यातही अतरंगी अरभाट ने आपले रंग दाखवायचा प्रयत्न केला पण मीन्वाज्जी पुढे त्याचे काहीचं चालले नाही आणि मराठी शब्दकोशात बघून सांगतो असं म्हणत त्याने आपली सुटका करून घेतली ( सापडला का रे अर्थ...?)आणि मग मा.सां.सं. नी अंताक्षरीचा खेळ चालू केला आणि 'मराठी बाण्याला' जागं ठेवत फक्त आणि फक्त मराठी गाणीचं म्हणायची टूम निघाली..मग मराठी गाणी,कविता,स्वरचित विडंबनं ई.ई. सादर झाले(फक्त धडेचं म्हणायचे शिल्लक राहीले होते..)

   त्यातही अभ्या नामक गुटगुटीत बाळाला काय 'ल'सीकरण झाले होते माहीत नाही पण कुठलेही गाणे 'ल' वर संपवून आमच्यावर 'ल' 'लादण्याचा' लकडाचं लावला होता..पण आम्हीही काही कमी नव्हतो..अखेर आम्ही ती 'ल'ढाई जिंकलो..नंतर कुठल्यातरी गावच्या पाणवठयावर पहाटे पहाटे पाणी भरणारी सखू मीन्वाज्जी आणि स्नेहल ला भेटली आणि बिचार्‍या त्या सखूलाही माहीत नसतील अशी सगळी गाणी तिच्या गळ्यावर लादण्यात आली..मग 'आपकी फर्माईश' मध्ये श्रोत्यांनाचं बळजबरीने फोन करून त्यांच्या आवडीची गाणी त्यांच्याकडूनचं सक्तीने म्हणवुन घेण्याचाही प्रयत्न झाला..

   या सगळ्या प्रकारात मा. दिशादर्शक सं. चे थोडेशे लक्ष विचलित होवून रस्ता चुकणे साहजिकचं होते..पण मातेच्या आशीर्वादाने संभ(संयोजक भक्त) ना योग्य मार्ग लगेचंच सापडला आणि 'आर्युलाईफ' वर अगदी सुखरूप पोहोचलो आणि चक्क लाईफमध्ये 'इंद्रधनुष्य्''आनंदा'सहीत अवतरले..मग तिथून पुढे सकाळची पोटपुजा ई.ई. मुंबईकरांनी आमच्या साठी राखून ठेवल्याने यथासांग पार पडली.

   मग आपापल्या जुळ्यांसोबत 'ओळखपरेड' चा अभिनव कार्यक्रम पार पडला..(माझ्या पार्ट्नरला "निलवेद' ला छान लाजता येतं होतं हे नम्रपणे नमूद करावेसे वाटते)

   आणि नंतर 'पाऊस भटकंती' करायला आम्ही सगळे निघालो..पावसात भिजत असतांनाही तलावात जलक्रीडा करण्याचा मोह बहुते़कांना आवरला नाही..मग 'शेषावतार्','कालियामर्दन' असे अनेक अवतार तिथे बघायला मिळाले.. नाणे फेकून ते शोधण्याचा प्रयत्नही झाला..आणि पुरूष लोकांची ईमले चढवण्याची स्पर्धाही अतिऊत्साहात संपन्न झाली. 'पाऊस-नृत्य' या मध्ये तर आपल्या अंगभूत अंगविक्षेपांना बाहेर काढत सगळ्यांनीचं त्यामध्ये पाय धुवून घेतले आणि नाचणार्‍यांना अंगण गोल असूनही कमी पडले..पण जसा-जसा वेळ जात होता..तसा-तसा १-१ जण आता तिथून पाय काढत होता..पण आपल्या 'यो' चे 'यो..यो' काही केल्या संपत नव्हते..शेवटी कसे तरी आवरते घेवुन सगळ्यांसोबत त्याचेही पाय भोजनकक्षा कडे वळाले..काहीजणांनी आम्हां वाळलेल्यांवर त्यांना 'वाळीत' टाकण्याचा आरोप केला पण आम्ही (पुन्हा नम्रपणे) नमूद करतो की आम्ही त्यांना 'वाळीत' नाही,'ओलीत' टाकले होते...सुग्रास जेवणानंतर सगळ्यांची गाडी पुन्हा सां.का. कडे वळली..काही २र्‍या लोकांचा ववि चालू असल्याने आम्ही थोडावेळ आमची खेळण्याची हौस भागवून घेतली..

   नंतर परत अंताक्षरी..यावेळेस कोणा दिमडू च्या साहाय्याने ती पार पडली ..त्यात 'धाकटे बाळ', 'शेवटचा मालुसरा','या सुखांनो या' ई.ई. प्रयत्न त्याच्यांत असलेल्या कसबांची चांगलीचं ओळख करून देणारे होते..त्यांच्या गटाला ते ओळखता आले नाही एवढेचं..मुंबईच्या सांघिक प्रयत्नांना यश आले आणि 'वर्ल्डकप' मिळाल्याचा आनंद त्यांनी साजरा केला..त्या संघातील भरवशाच्या रीनाला बाकीच्यांनी बरेच टोमणे मारले पण तरीही तिने चिवटपणे आपला 'मॉरल' का कसला सपोर्ट चालूचं ठेवला..तिचे खास अभिनंदन..

   नंतर १ मिनीटाच्या खेळांमध्ये मराठी नट ओळखतांना अस्मादिकांचा १ क्रमांक आला पण सगळ्यात वर माझ्या नावाचा उल्लेख असतानाही मा.सां.का.सं नी त्याचा साधा ऊच्चार ही केला नाही ..पण मी गप्प बसलो ..(आपल्या पडत्या काळात गप्प असलेलेचं चांगले असे मत मी मनातल्या मनात नोंदवून मोकळा झालो..)

   नंतरच्या खेळात तर शाळेतल्या मराठी व्याकरणाचीचं आठवण झाली..आम्ही जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले..'पंच' आणि'पाच' म्हणजे एकचं असेही सांगून झाले..पण 'पंचां' नी 'परमेश्वर' ओळखल्याचे'पाच' गुण देखील दिले नाहीत.. 'हातातोंडाशी गाठ पडून' आमच्या 'तोंडचे पाणी पळाले' होते आणि तरीही 'आड-विहीरीच्या काठावर' असूनही विजय 'हातावर तुरी देवून' निसटून गेला..

   चहा-पान होता होता वहीनींनी माबोची नवीन माहीती पुरवली..ती डोक्यात साठवून सांघिक छायाचित्र काढून आम्ही आपापल्या परतीच्या वाटेला लागलो..परततांना आमच्या गाडीत 'जिराफ' असल्याचा साक्षात्कार आम्हाला घडला..पण परतीचा प्रवासही गंमतीशीर्(माझ्यामते) झाला..

   मीन्वाज्जींनी त्यांच्या आणि आताच्या पिढीत कीती अंतर आहे हे..रूमा, निहीरा, यशवर्धन,माता,सुशांत यांच्या वरून सोदाहरण स्पष्ट केले..(सबंध वविला जिथे-जिथे मीन्वाज्जी आहेत तिथे-तिथे आजोबा का गप्प-गप्प होते ते मला येतांना कळले)..बिचार्‍या वहीनींचा आवाज बसला होता..अन्यथा या मुस्कटदाबी विरूध्द आवाज ऊठवण्याच्या तिच्या प्रयत्नांना यश नक्कीचं आलं असतं..मग..आताच्या राजकारणावर सांगोपांग चर्चा झाली..दिवसभरच्या श्रमाने थकलेले ईतर माबोकर केव्हाचं झोपले होते..गाडी मात्र कुठे प्यायला पाणी मिळतेयं का ते शोधत फिरत होती..आणि मुक्कामाचे ठीकाण आल्यावर एकेकाला जागे करत होतो...पण मातेची (मातेला) कुणीतरी टोपी घातल्याची जाणीव झाली..आणि टोपी शोधमोहीम सुरू झाली..पण शेवटपर्यंत टोपी काही सापडली नाही..

   १०.४५ - राहाते घर, सांगवी

   सरतेशेवटी ववि ला येवुन आठवणींच्या वर्षावात वर्षा घेवूनचं घरी पोहोचलो...

   --समाप्त--

   वा वा! सर्वांचे वृतांत अगदी झकास! Happy
   वर्षाविहाराला वर्षेने कृपा केली असल्यामुळे मन उल्हसित झाले. वरून पाऊस पडत असताना जलतरण तलावात पोहण्याची मजा काही औरच. 'रेन डान्स्'ही नंबर वन. माझ्यासारखे दोन डावे पाय असणारीलाही नाचण्याची हौस भागवता आली. नाश्ता, जेवणाची मस्त सोय होती. सांस नेहेमीप्रमाणे हिट! Happy
   संयोजकांनी घेतलेली अथक मेहनत फळली. सही झाला हा ववि! Happy
   या वर्षी पहिल्यांदाच वविला आलेल्या माबोकरांमुळे जास्त मजा आली. ते पहिल्यांदाच भेटत आहेत, असं वाटलंही नाही. या सर्वांना इथे मायबोलीवरही नियमितपणे भटायला आवडेल Happy

   ------------------------------
   झाडावर प्रेम करा, झाडा’खाली’ नको!
   Proud

   मीन्वाज्जी... सगळे दिवे घेतले तर ईथे बराच प्रकाश पडेल आणि त्यामुळे माझ्या पोस्ट-लंच मेडीटेशन पिरिअडमधे व्यत्यय येईल... सो दिवे परत कधीतरी Happy
   तर सांगायचा मुद्दा असा की त्यादिवशी वेज सॅडविच (विथ पहाटे ३:३०ला केलेली चटणी) ऐवजी गटारी (अमावस्या)असल्यामुळे माझे सॅडविचही संपले असते... Happy
   बाकी सां.का. च्या आधीचा वॉर्म-अप कविता, गझल सेशनही भारीच होता... Happy
   आणि यावेळी घरी एक तरी बक्षीस घेऊन जायची माझी मनिषा आपल्यातला एक कप मला देऊन पुर्ण केली... त्यासाठी आनंदमैत्रीचे खुप खुप (शतशः वैगैरे काय ते) आभार... Happy

   अरे ते खाण्यापिण्याला काय काय होत?, कुणी कुणी कसे कसे हात मारून घेतले, ते पण लिव्हा ना.
    
    
   ==============
   बजे सरगम हर तरफ से | ताल कदमो पे छाये जाये |
   लब पे जागे गीत ऐसा | गूंजे बनकर देश राग||

   दिमडे,
   नाश्ता : उपमा, चटणी, पोहे, चहा/कॉफी
   जेवण : फ्रुट सॅलड, बटाट्याची भाजी, छोले, पुर्‍या, डाळ, भात, कोथिंबीर वड्या (काहीजणांच्या मते त्या मायबोलीवर नुकत्याच प्रकाशित झालेल्या पाटवड्या होत्या) जेवण चांगलं होतं. फक्त मायबोलीकरांना विखरून बसावं लागल्याने कोणी, कशावर, कसा हात मारला ते समजू शकलं नाही. Sad Proud

   वॉव, सगळ्यांचेच वृतांत खूपच छान आहेत. Happy

   गिरीष व्वा अग्दी शैलीदार (लस्सणदार) वृतांत... Happy

   कोथिंबिरवड्यासारख्या दिसणा-या त्या पाटवड्या होत्या, कोथिंबिर अगदी नावालाच, एका पाटवडीत एक पान ह्या हिशोबाने.

   मी तर बाबा "उगाच जेवण बनवणा-यांचं मन कशाला मोडा जरासंच जेऊन" असे म्हणुन भरपुर खाउन घेतले. आणि माझ्या आजुबाजुचे माबोकर सुद्दा माझ्यासारखेच निघाले...

   फ्रुट सॅलड मस्त होते, मला सहसा आवडत नाही पण इथले आवडले. छोल्यात दही घातले होते बहुतेक, भात थोडा कच्चा आणि वरणाला जssssssरासा जळकट वास. बस्स. बाकी सगळे मस्तच.
   ______________________________________
   आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
   घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
   उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
   पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

   वा मस्तच लिहीलय सगळ्यांनी Happy

   Pages