मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं मुख आहे

Submitted by ज्योतिषशास्त्र on 19 November, 2009 - 05:04

आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्‍या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो.
लक्ष्मी दारातून आत येते किंवा दारातून माघारी जाते. म्हणून वास्तुशास्त्रात दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला गेलाय. फक्त दरवाजा जरी वास्तुशास्त्राप्रमाणं असेल तरी अनेक सुपरिणाम मिळतात. संपूर्ण घर रेक्टिफाय करत बसण्यापेक्षा फक्त दरवाजा रेक्टिफाय करणं सोपं, कमी श्रमाचं आणि कमी खर्चाचं आहे. शिवाय इतंकच केलं तरी भाग्योदय होतो. म्हणून दरवाजाचं वास्तुशास्त्र जाणून घेणे गरजेचं आहे.
ऊर्जा दोन प्रकारची असते. चांगली आणि वाईट. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. कधी " काय अवदसा घरात आलीय !" असं आपण सहजच म्हणून जातो. मायबोलीतील ही 'अवदसा' म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी. आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे अर्थात लक्ष्मी होय. लक्ष्मी म्हणजे चांगल्या वैश्र्विक ऊर्जेचं घरात आगमन व्हांव म्हणून ज्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी येते, त्या मुख्य दरावाजाकडे विशेष लक्ष पुरवावं लागतं.
घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असेल तर लक्ष्मी घरात येते. म्हणजेच योग, क्षेम, आयु, कल्याण, मांगल्य या पंचपरमेष्ठीची प्राप्ती होते, भाग्यकल्प होतो, असं वास्तुशास्त्रा मानतं. पण मुख्य दरवाजा वस्तुशास्त्राच्या नियमांच्या विपरित असेल तर तो वाईट ऊर्जेला निमंत्रण देतो. घरात 'अवदसा' आल्याची प्रचीती येते. विपरित फळं मिळू लागतात. मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं मुख आहे. जर मुखच अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त, जंतुसंसर्ग झालेलं असेल तर तेथून पोटात जाणार्‍या अन्नाची अवस्था काय होईल? जंतू घेऊन आलेलं अन्न आपल्या शरीराचं भरणपोषण करु शकेल का? दूषित ऊर्जा आपल्या घराचं स्वास्थ टिकवू शकेल का?
या साठी दरवाजाला उंबरठा असणं अतिशय आवश्यक आहे. हिंदू परंपरेत त्याला मर्यादेचं प्रतीक मानलंय. आयुष्य म्हणजे स्वैराचार नव्हे हेच जणू तो सांगत असतो. फ्लॅट सिस्टिममध्ये उंबरठा गायब झाला. कारण आजकालचं बांधकाम बिल्डरचं हित सांभाळत त्याची पै न पै वाचवत केलं जातं. उंबरठा नसेल तर दरवाजाची चौकट ही चौकट न राहता त्रिकाट होते हे लक्षात घ्या. शिवाय हळूहळू या फ्रेमचा काटकोन कमी होत जातो. उंबरठा नसेल तर घराची सीमारेषाही पूर्ण होते नाही. अर्थात वास्तुपुरुष डिफाइन होत नाही. त्यामुळे घराबाहेरील दोषांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं, दरवाजा त्रिकोणी असेल तर स्त्रीपीडा उद्दभवते. दरवाजाची चौकट पूर्ण असावी. म्हणजेचं लाकडी उंबरठा असावा. हल्ली फ्लॅटमध्ये उंबरठा गायब झालेला असतो. त्यामुळे दरवाजाची
आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्‍या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो. चौकटीसह पूर्ण दरवाजा एकाच प्रकारच्या लाकडाचा असावा. लाकूड पुल्लिंगी झाडाचं वापरावं, दारासाठी दोन कवाड असतील तर डांव कवाड मोठं ठेवावं. त्याला मातृ कवाड तर उजव्या कवाडाला पुत्रिका कवाड अशी संज्ञा आहे. मातृ कवाड पुत्रिका कवाडा॑पेक्षा मोठं असावं.
दरवाजा प्रमाणबध्दच असावा. आवाज करणारे, उघडताना अडकणारे, बुटके किंवा अतिउंच, फुगलेले, पातळ, कललेले, तिरके, डाग पडलेले, भेग पडलेले, रंग उडालेले दरवाजे असू नयेत. बृहत्संहिता ग्रंथात म्हटलंय की दरवाजा प्रमाणापेक्षा उंच असेल तर शासनभय आणि प्रमाणापेक्षा कमी असेल तर चोरभय व दु:ख देतो. मध्यभागी विस्तुत असेल ( ओव्हल आकाराचा ) तर हाव वाढवतो. कुब्ज ( उघडण्यास कठीण ) असेल तर कुलनाशक होतो. अतिपीडित ( उंबर्‍यास टेकणारा ) असेल तर गृह्स्वामीस पीडा करतो. घराच्या दिशेनं त्याचा तोल गेलेला असेल तर मृत्यूसारख्या घटना घडतात. बाहेरच्या दिशेनं कललेला असेल तर गृहस्वामीला अकारण प्रवास करावा लावतो.
कोणत्याही प्लॉट किंवा भवनाला ३२ प्रकारे दरवाजा काढता येतो. यातील ८ दरवाजे शुभ असतात तर उर्वरित २४ दरवाजे कमी-अधिक अशुभ असतात. या २४ दरवाजांचं अशुभत्व कस कमी करायचं ते आता पाहणार आहोत. प्रथम मुख्य दरवाजे पाहू.
कोणत्याही मुख्य दिशेत चुकीच्या पदात दरवाजा असेल तर वाईट फळं देणारच. मग भलेही ती दिशा उत्तर किंवा पूर्व असो. पण असे चुकीच्या पदातील दरवाजे रंग, पिरॅमिड, स्वस्तिक, धातू, दगड आदींचा खुबीनं वापर करीत रेक्टिफाय करता येतात.

संजीव
http:\\vastuclass.blogspot.com

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

लाकूड पुल्लिंगी झाडाचं वापरावं

झाडात ( म्हणजे वनस्पतीत... बॉटनीचा शब्द) पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोन्ही एकत्रच असते म्हणे... आता हे नुसते पुल्लिंगी झाड कोठून आणायचे?

लिम्बुभाऊ थोताम्डाला आणि एक विषय मिळाला....

दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं >>> काय म्हणायचय तुम्हाला? कन्याजन्माचे प्रमाण जास्त म्हणून अर्धवर्तुळाकार दरवाजा नको??? कन्याजन्म हा प्रॉब्लेम आहे?

"दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं, दरवाजा त्रिकोणी असेल तर स्त्रीपीडा उद्दभवते" "लाकूड पुल्लिंगी झाडाचं वापरावं"
>>>>> Uhoh तुमच्या सो कॉल्ड वास्तु'शास्त्रा'(??)ला स्त्रियांची अ‍ॅलर्जी आहे का?

माझ्या माहेरी दरवाजा चौकोनी असूनही दोन्ही मुलीच- म्हणजे आम्ही दोघी बहीणी - जन्माला आल्या. असं कशाने झालं असेल हो?

माझ्या माहेरी दरवाजा चौकोनी असूनही दोन्ही मुलीच- म्हणजे आम्ही दोघी बहीणी - जन्माला आल्या. असं कशाने झालं असेल हो?>> आमच्याकडे देखील आम्ही दोघी बहीणी ........आणि त्यानी काय वाईट झालं म्हणे??????

हे एक संशोधन आहे. अर्थात चिकित्सक अभ्यासू व या शास्त्राचे रसिकजन यांनी यातील ठोकताळ्यांचा अनुभव घेऊन जरुर पडताळा पहावा व जे जे अनुभव पटले असतील वा नसतीलही ते माला कळवावे. म्हणजे माझ्या संशोधनाचे कामाला उत्तेजन मिळेल ही विनंती.

घराला घरपण देणारा उंबरठा हा नेहमी बाहेरील निगेटिव्ह ऊर्जेला घरात येण्यास मज्जाव करत असतो. पंरतु आज काल लोंक लाकडाचा उंबरठा न बसवता मार्बलचा किंवा दगडाचा उंबरठा बसवतात. ह्याच गोष्टीचा त्रास आपल्या दररोजच्या जीवनात होत असतो.

आपल्याला एक महत्वाची सुचना करावी वाटते. ती म्हणजे आपल्या घराच्या उंबरठ्याला चिर पडली आहे का? पहिल्यादा उंबरठा तपासा व आपल्या घरातील मुख्य व्यक्तिला अपघात होण्या पासुन वाचवा. आपला जर ह्या गोष्टीवर विश्र्वास नसेल तर आपण आपल्या संकुलातील किंवा नातेवाईकाचे उंबरठे तपासुन खात्री करा.

जर मार्बलच्या उंबरठा असेल तर अपघाताचे प्रमाण १००% आढळते. ह्या गोष्टीची खात्री करुन घ्या, व आम्हांला आपला अभिप्राय कळवा. नुसते वाचत बसु नका आपले विचार लिहा.

आम्ही एकदा डि.एन. नगर अंधेरी येथे कँपला गेलेलो असतानाची एक गोष्ट, एक जातक दु:खी अंत:कर्णाने आमच्या स्टाँलवर आला. त्यांनी माझ्या सहकारी श्रीमती चव्हाण व चौघुले यांना टेरोच्या माध्यमातुन जातकाने प्रश्न विचारला कि माझ्या घरात काही बाधा आहे का? माझ्या मुलावर करणी किंवा जादुटोणा तर केला नाही ना? त्या जातकाची सर्व कार्ड पाँझिटिव्ह आली. माझे सहकारी चमकले त्यांनी हा प्रश्न माझ्या कडे सुपुर्द केला. मी सुध्दा चमकलो! पुन्हा श्री स्वामी चरणाकडे आशिर्वाद मागितला, त्याचक्षणी स्वामीची ती ओळ आठवली “भिऊनकोस मी तुझ्या पाठी आहे” त्यांप्रमाणे टेरोकार्ड स्वामीच्या चरणा वरती काहीवेळ ठेऊन नंतर जातकाच्या हाती दिली. त्यातील एक कार्ड काढण्यास सांगितले आणि प्रश्नाचे उत्तर मिळाले. जातकाला घरी जाण्यास सांगुन एक सुतार व एक कडीया दुस-या दिवशी सकाळी तयार ठेवण्यास सांगितला, ठरवल्या वेळेनुसार सकाळी १०.३० च्या सुमारास मी त्यांच्याकडे गेलो. सगळे जण वाटबघत होते मी गेल्या गेल्या सुतारास सांगितले, घराचा मुख्य दरवाजाचा बसविलेला उंबरठा तोड. घरातील सर्वजण चमकले; ते म्हणाले आम्ही तर गेल्या वर्षी हा दरवाजा व घराचे नुतनीकरण केले आहे. मुख्य दरवाजासाठी जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये खर्च केले आहेत. तुम्ही तो का तोडता? मी म्हटले; मुळ कारण त्यांच ठिकाणी लपले आहे. सर्वाची नजर त्या उंबरठ्यावर पडली. उंबरठा सुंदर स्वच्छ होता. मी सांगितले जर का आपले ह्या गोष्टीसाठी नुकसान झाले तर, मी आपले सर्व नुकसान भरपाई देईन. त्यां प्रमाणे ते कबुल झाले. जसा मुख्य द्वाराचा उंबरठा तोडण्यास घेलला तसे सर्वजणाचे डोळे त्या उंबरठ्यावर केंद्रित झाले. बघतात तर काय! काम करताना घरातील शिल्लक राहिलेल्या लाकडाच्या पट्ट्यानी तो खिळे मारुन सुंदर उंबरठा बसवला होता. ह्या कारणाने त्यांचा मोठा ११ वर्षाच्या मुलगा अपघातात मरण पावला होता. दुस-या मुलाच्या अभ्यासातील लक्ष उडाले होते. तो घरात चिरचिर करत राहात होता.

आपण घर सुंदर दिसण्यास हजारो रुपये खर्च करतो. मुख्य द्वाराची सजावट करताना आपल्या पुर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी कडे दुर्लक्ष करतो. पहिल्यादा संगणकासमोरुन उठा. आपला उंबरठा कसाआहे तो तपासा. तसेच वरिल दिलेल्या उदाहरण तपासण्या साठी आजुबाजुच्या घरात न जाता त्यांचे उंबरठे तपासा व खात्री करुन घ्या. मला कळवण्यास विसरु नका; तसदि घ्या, आपला अभिप्राय सर्व वाचका साठी उपयुक्त ठरेल.

संजीव
http:\\vastuclass.blogspot.com

दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं>> आपल्याकडे अर्धवर्तुळाकार दारांची फॅशन आज काल आलिए तरी मुलींची संख्या एवढी का कमी आहे भारतात. तुम्ही लिहा पण अर्धवर्तुळाकार नको. असं कशाला. आम्ही पण दोघी बहिणी आहोत आणि आमच्या घराचा दरवाजा चौकोनी होता Happy

// आम्ही पण दोघी बहिणी आहोत आणि आमच्या घराचा दरवाजा चौकोनी होता //

प्रीति यांस
आपला प्रश्न रास्त आहे. पण वास्तुपदमंडलात साधारण पणे जर आपण पाहीले तर आपल्या घराचा दरवाजा १५ ते ६० अंशावर असला पाहिजे. पण हा दरवाजा मुख्य करुन ५० ते ६० ईशान्य-पुर्व पदात किंवा उत्तर-ईशान्य १५ ते ३० अंशावर ह्या सांगितलेल्या दोन पदा मध्येच कुठेतरी असला पाहिजे.

माझे जर चुकत असेल तर आपण तसे कळवा. मी आपला आभारी असेन.
संजीव

दरवाजा कुठल्या दिशेला असावा याला शास्त्रीय कारण आहेत.
उदा. आमच्या टेक्सास मध्ये मुख्य दरवाजा दक्षीण दिशेला तोंड करुन असेल तर त्या लॉट ला जास्त preference मिळतो. कारण , आमच्याकडे समर मध्ये तापमान अतिशय जास्त असत. आणि इथ लोक फ्रंट यार्ड पेक्षा बॅक यार्ड चा वापर जास्त करतात. अशावेळी उत्तरेकड असलेल बॅकयार्ड दुपारी चार पासुन वापरता येत कारण सावली येते. या उलट पश्चिमेला बॅकयार्ड च्या लॉट ला लास्ट preference मिळतो. कारण strong सुर्यकिरणांमुळ बॅकयार्ड रात्री ८ वाजले तरी वापरता येत नाही.

सीमा यांस
दरवाजा कुठल्या दिशेला असावा याला शास्त्रीय कारण आहेत.
आपण योग्य तो प्रश्न विचारला त्या बद्द्ल ध्यन्यवाद, प्रत्येक ठिकाणी वास्तुपदमंडलाचे उपयोग अमंलात आणले जात नाहीत.
हे भारतीय वास्तुशास्त्र आहे. आपण परदेशात राहात आहात. जसा देश तसा वेश ह्या कायद्या नुसार आपण चालले तर बरे होईल, त्यातल्या त्यात काही भारतीय परपरा आपण आपल्या दैनिक व्यव्हारात उपयोगी आणूशकता. अधिक माहीती साठी आपण संपर्क साधा.
संजीव

हा लेख योग्य जागी हलवावा. जिथे यावर विश्वास असणारे, त्याना उपयुक्त गोष्टींची चर्चा करु शकतील. नाहीतर इथे वास्तूशास्त्र खरं-खोटं यावर चर्चा सुरु होइल.

नाही हो, मी तो प्रश्न विचारला नाही. माझ मत सांगितल. भारतात सुद्धा घरामध्ये कुठ दरवाजा असावा, कुठे पाणी असाव या विषयी जे नियम आहेत त्याला शास्त्रीय कारण आहेत अस माझ मत आहे. भिंतीची तोड फोड करुन किंवा दरवाज्याच्या आकारमाना नुसार मुल होण ई गोष्टी त्याच मुळ मला पटल्या नाहीत.

सॅम
हा लेख योग्य जागी हलवावा. जिथे यावर विश्वास असणारे, त्याना उपयुक्त गोष्टींची चर्चा करु शकतील.
आपणच मार्गदर्शन करा मी तो त्याजागी हलवतो.
धन्यवाद

सीमा
प्रश्न मुल होण्याचा नाही. दु:ख हे माणसाला येते कोणाला लवकर कोणाला उशिरा संबध तो आपण ज्या वास्तुत राहातो त्या वास्तुच्या परिणामाचा, आजकाल काही वास्तु तज्ञ लोंकाना फसवतात व त्यामुळे समाजातील लोंकाचा या कलेवरचा विश्वास उडतो. ही एक कला आहे, व त्याकलेचा आपण आदर केला पाहीजे.

भिंतीची तोड फोड करुन किंवा दरवाज्याच्या आकारमाना नुसार मुल होण ई गोष्टी त्याच मुळ मला पटल्या नाहीत.

आज आपल्याला जी जागा मिळते ती योग्य प्रकारे असत नाही, दुसरा बनवितो व आपण आपल्या सोईसाठी विकत घेतो.
जी जागा आपण घेतो त्या जागेचे फळ आपल्याला मिळणारच.

राग नसावा आपले मार्गदर्श ( टिप्पनी ) सुध्दा मला योग्य दिशा दाखवेल
संजीव
ज्यांना ह्या विषयाची गोडी आहे त्यांनी ह्या विषया बद्द्ल बोलावे नाहीतर गप्प बसुन बघावे.

>विषय काय ? चघळतायत काय ? कठीण आहे बुवा.
अनुमोदक...

ज्योतिष्शास्त्री यांनी वास्तूशास्त्राचे संकेत सांगितले त्यावरून लगेच मग मुली होणं वा असणं म्हणजे वाईट इतके टोकाचे अनुमान्/प्रश्ण का काढले जात आहेत? त्यांनी स्वतः व्यक्तीशः तरी असे कुठे म्हटले आहे? याचा अर्थ वास्तूशास्त्राला स्त्रीयांची अ‍ॅलर्जी आहे वगैरे म्हणणे म्हणजे कमाल आहे.

वास्तूशात्र अन त्याचे संकेत प्राचीन आहेत (शतकानु शतके?), ज्या काळात घरात मुलगा/कुलदीपक्/पुढे वंश चालवणारा वगैरे संकल्पना खूप रूढ होत्या अन ते संकेत आजच्या युगात तसेच "नमूद" केले तर एककल्ली वाटणारच तेव्हा त्यावरचा आक्षेप समजू शकतो. पण म्हणून थेट नकारात्मक भूमिकेतून त्यावर लगेच टीकासूड ओढायची काय गरज?
>दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं, दरवाजा त्रिकोणी असेल तर स्त्रीपीडा उद्भवते.
हेच वाक्य लेखकाने, दरवाजा चौकोनी असला तर मुलगा आपत्त्य जन्माला यायची शक्यता जास्त आहे अन अर्धवर्तुळाकार असला तर कन्या आपत्त्य जन्माला येण्याची शक्यता जास्त आहे असे बदलून लिहीले असते तरी त्यातला "संकेत" बदलणार नाही. भावनिक दृष्ट्या हे विधान फक्त संतुलीत वाटेल ईतकच ना. मग तसच ते "समजून" घ्यायला काय हरकत आहे?

निव्वळ "छापिल"(टाईपलेल्या) शब्दाला पकडून एक वाचक म्हणून आपल्याला जे वाचायचे तेच आपण वाचतो, नेहेमीच आपल्या भूमिकेतून? वास्तूशात्रात ईतरही गोष्टी सांगितल्या आहेत.. कितीतरी लोकं त्या पाळतात, कितीतरी शक्य असूनही पाळत नाहीत... कितीतरींचा त्यावर विश्वास नाही. leave it at that, why be judgemental all the time? if it doesn't work for u it doesn't work for u... but it works for others.. so learn to repsect that.

(अजून असा आक्षेप कुणि घेतला कसा नाही की फक्त पुल्लिंगी झाडाचच लाकूड वापरायला सांगीतलय? याचा अर्थ स्त्रीलिंगी वनस्पती/झाडांनाही वास्तूशात्रात कमी लेखलं गेलं आहे?...... हा! )

मायबोलीबर आजकाल हे फारच दिसतं.... ज्योतिषाच्या बा.फ. वरही हाच अनुभव दिसून आला.

(येतील आता तलवारी घेवून...... आणि हाही बा.फ. पुन्हा स्त्रीमुक्तीच्या वगैरे मार्गाने जाईल, तेव्हा वर कुणीतरी म्हटल्या प्रमाणे खरच हा बा.फ. दुसरीकडे हलवा जिथे लोकांन्ना असे विषय वाचायची अ‍ॅलर्जी नसेल..)
इती लेखनसीमा.

वास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे, हे कृपया सांगाल का? भारतीय प्राचविद्येच्या काही अभ्यासकांना मी याबद्दल विचारलं होतं. त्यांच्या मते हे शास्त्र भारतीय नाही. स्वच्छता, आरोग्य यांच्या दृष्टीने सुचवलेले काही संकेत जरूर आहेत, पण शास्त्र नाही.
तरी कृपया याबद्दल अधिक माहिती देऊ शकाल का?

हेच वाक्य लेखकाने, दरवाजा चौकोनी असला तर मुलगा आपत्त्य जन्माला यायची शक्यता जास्त आहे अन अर्धवर्तुळाकार असला तर कन्या आपत्त्य जन्माला येण्याची शक्यता जास्त आहे असे बदलून लिहीले असते तरी त्यातला "संकेत" बदलणार नाही. भावनिक दृष्ट्या हे विधान फक्त संतुलीत वाटेल ईतकच ना.
>>>>>तरीसुद्धा ते संतुलित कसं? कमाल आहे! घरात स्त्री जन्म होणे वाईट असेच इथे चक्क लिहिले आहे. स्त्रीजन्म होण्याचे शक्यता असलेला दरवाजा (! हेही खरे धरून चाला हवे तर) नको असे सरळ लिहिलेय त्यातून अजून कुठला अर्थ घेणे अपेक्षित आहे??
विषय काय चघळता काय? >>> विषय तोच् आहे की , लेखात मांडलेल्या वाक्यावरच बाकी प्रतिक्रिया आहेत की. हो विरोधी आहेत , पण विषयान्तर कुठे दिसले तुम्हाला ?

हा लेख योग्य जागी हलवावा. जिथे यावर विश्वास असणारे, त्याना उपयुक्त गोष्टींची चर्चा करु शकतील. नाहीतर इथे वास्तूशास्त्र खरं-खोटं यावर चर्चा सुरु होइल.
------------------------------------------------
सॅम, यावर एक उपाय Happy
कोणीही कुठलाही बाफ सुरु करताना एक विषयाचा आणि दुसरा "(अमुक अमुक) थोतांड आहे का?" असे दोन बाफ सुरु करावेत म्हणजे ज्याना त्या विषयावर चर्चा हवी आहे ते मुळ बाफवर चर्चा करतील.
इतराना त्याच्या "थोतांड" क्लोन वर चर्चा करता येइल.. विन विन दोघांसाठी Happy

ज्योतिषशास्त्र,
विषयांतराबद्दल क्षमस्व!

खुप जबर्दस्त प्रश्न पडले आहते मला. "दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं, ">>>>

आता दरवाजा आपल्य स्वतःच्या घराचा की आपण रहात असलेल्या (भाड्याच्या , rent बरकां दुसरा अर्थ घेउ नका) घराचा.

ज्याघरात conceive झाले त्या घराचा की ज्या घरात असताना delivery होणार त्या घराचा. किंवा होटेल मध्ये?

मग ज्यांना १ मुलगा १ मुलगी असते त्यांचा काय घोळ झालेला असतो.

पण खरोखर डेटा बेस करयचा असेल तर कोल्हापुर (हजारी ८०० + मुली) आणि केरळ (हजारी १०००+ मुली) इथल्या घरांच्या दरवाज्यांचा अभ्यास करता येइल का? Uhoh

आमच तर बाबा "मुलगा मुलगी एकसमान, दोघांनाही शिकवा छान"

>>>>>>तरीसुद्धा ते संतुलित कसं?
संतुलीत वाटेल असं मी लिहीलय, तसा आग्रह आणि अनुमान नाही. फक्त शक्यता लिहून दाखवली Happy
बाकी तुमचं चालू द्यात...

>दरवाजा त्रिकोणी असेल तर स्त्रीपीडा उद्दभवते
हे वाक्य मात्र विचीत्र वाटते. ज्योतिषशास्त्री यांनी यात नेमका काय अर्थ अभिप्रेत आहे ते स्पष्ट केले तर बरे होईल.

संजीव , वास्तुशास्राचा पुर्ण आदर बाळगुन मी एक प्रश्न विचारु इच्छितो
<<< दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं, >>>
जर दरवाजाचा आकार, कन्या वा दिवट्यांच्या जन्माला कारणीभुत असेल तर XX आणि XY गुणसुत्रांचा उपयोग काय ?

<<< दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं, >>>
महाराष्ट्रात शनिशिंगणापुर येथेतर घरांना दरवाजेच नसतात...
मग तिथे काय्..पोरचं ( आणि पोरी सुद्धा ) होत नाहीत असे समजावे काय..

उगाच डोक्यात किडा वळवळला म्हणुन विचरलं इतकच...

Pages