मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं मुख आहे

Submitted by ज्योतिषशास्त्र on 19 November, 2009 - 05:04

आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्‍या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो.
लक्ष्मी दारातून आत येते किंवा दारातून माघारी जाते. म्हणून वास्तुशास्त्रात दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला गेलाय. फक्त दरवाजा जरी वास्तुशास्त्राप्रमाणं असेल तरी अनेक सुपरिणाम मिळतात. संपूर्ण घर रेक्टिफाय करत बसण्यापेक्षा फक्त दरवाजा रेक्टिफाय करणं सोपं, कमी श्रमाचं आणि कमी खर्चाचं आहे. शिवाय इतंकच केलं तरी भाग्योदय होतो. म्हणून दरवाजाचं वास्तुशास्त्र जाणून घेणे गरजेचं आहे.
ऊर्जा दोन प्रकारची असते. चांगली आणि वाईट. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. कधी " काय अवदसा घरात आलीय !" असं आपण सहजच म्हणून जातो. मायबोलीतील ही 'अवदसा' म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी. आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे अर्थात लक्ष्मी होय. लक्ष्मी म्हणजे चांगल्या वैश्र्विक ऊर्जेचं घरात आगमन व्हांव म्हणून ज्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी येते, त्या मुख्य दरावाजाकडे विशेष लक्ष पुरवावं लागतं.
घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असेल तर लक्ष्मी घरात येते. म्हणजेच योग, क्षेम, आयु, कल्याण, मांगल्य या पंचपरमेष्ठीची प्राप्ती होते, भाग्यकल्प होतो, असं वास्तुशास्त्रा मानतं. पण मुख्य दरवाजा वस्तुशास्त्राच्या नियमांच्या विपरित असेल तर तो वाईट ऊर्जेला निमंत्रण देतो. घरात 'अवदसा' आल्याची प्रचीती येते. विपरित फळं मिळू लागतात. मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं मुख आहे. जर मुखच अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त, जंतुसंसर्ग झालेलं असेल तर तेथून पोटात जाणार्‍या अन्नाची अवस्था काय होईल? जंतू घेऊन आलेलं अन्न आपल्या शरीराचं भरणपोषण करु शकेल का? दूषित ऊर्जा आपल्या घराचं स्वास्थ टिकवू शकेल का?
या साठी दरवाजाला उंबरठा असणं अतिशय आवश्यक आहे. हिंदू परंपरेत त्याला मर्यादेचं प्रतीक मानलंय. आयुष्य म्हणजे स्वैराचार नव्हे हेच जणू तो सांगत असतो. फ्लॅट सिस्टिममध्ये उंबरठा गायब झाला. कारण आजकालचं बांधकाम बिल्डरचं हित सांभाळत त्याची पै न पै वाचवत केलं जातं. उंबरठा नसेल तर दरवाजाची चौकट ही चौकट न राहता त्रिकाट होते हे लक्षात घ्या. शिवाय हळूहळू या फ्रेमचा काटकोन कमी होत जातो. उंबरठा नसेल तर घराची सीमारेषाही पूर्ण होते नाही. अर्थात वास्तुपुरुष डिफाइन होत नाही. त्यामुळे घराबाहेरील दोषांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं, दरवाजा त्रिकोणी असेल तर स्त्रीपीडा उद्दभवते. दरवाजाची चौकट पूर्ण असावी. म्हणजेचं लाकडी उंबरठा असावा. हल्ली फ्लॅटमध्ये उंबरठा गायब झालेला असतो. त्यामुळे दरवाजाची
आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्‍या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो. चौकटीसह पूर्ण दरवाजा एकाच प्रकारच्या लाकडाचा असावा. लाकूड पुल्लिंगी झाडाचं वापरावं, दारासाठी दोन कवाड असतील तर डांव कवाड मोठं ठेवावं. त्याला मातृ कवाड तर उजव्या कवाडाला पुत्रिका कवाड अशी संज्ञा आहे. मातृ कवाड पुत्रिका कवाडा॑पेक्षा मोठं असावं.
दरवाजा प्रमाणबध्दच असावा. आवाज करणारे, उघडताना अडकणारे, बुटके किंवा अतिउंच, फुगलेले, पातळ, कललेले, तिरके, डाग पडलेले, भेग पडलेले, रंग उडालेले दरवाजे असू नयेत. बृहत्संहिता ग्रंथात म्हटलंय की दरवाजा प्रमाणापेक्षा उंच असेल तर शासनभय आणि प्रमाणापेक्षा कमी असेल तर चोरभय व दु:ख देतो. मध्यभागी विस्तुत असेल ( ओव्हल आकाराचा ) तर हाव वाढवतो. कुब्ज ( उघडण्यास कठीण ) असेल तर कुलनाशक होतो. अतिपीडित ( उंबर्‍यास टेकणारा ) असेल तर गृह्स्वामीस पीडा करतो. घराच्या दिशेनं त्याचा तोल गेलेला असेल तर मृत्यूसारख्या घटना घडतात. बाहेरच्या दिशेनं कललेला असेल तर गृहस्वामीला अकारण प्रवास करावा लावतो.
कोणत्याही प्लॉट किंवा भवनाला ३२ प्रकारे दरवाजा काढता येतो. यातील ८ दरवाजे शुभ असतात तर उर्वरित २४ दरवाजे कमी-अधिक अशुभ असतात. या २४ दरवाजांचं अशुभत्व कस कमी करायचं ते आता पाहणार आहोत. प्रथम मुख्य दरवाजे पाहू.
कोणत्याही मुख्य दिशेत चुकीच्या पदात दरवाजा असेल तर वाईट फळं देणारच. मग भलेही ती दिशा उत्तर किंवा पूर्व असो. पण असे चुकीच्या पदातील दरवाजे रंग, पिरॅमिड, स्वस्तिक, धातू, दगड आदींचा खुबीनं वापर करीत रेक्टिफाय करता येतात.

संजीव
http:\\vastuclass.blogspot.com

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

जर दरवाजाचा आकार, कन्या वा दिवट्यांच्या जन्माला कारणीभुत असेल तर XX आणि XY गुणसुत्रांचा उपयोग काय>>>>

काय राव गुण्सुत्रांशिवाय कस काय साध्य होइल. पण या थेअरी नुसार XX कि XY ते दरवाज्यावर ठरत असेल...

ऊर्जा दोन प्रकारची असते. चांगली आणि वाईट.
---- सर्व ऊर्जा चांगल्या प्रकारची असते.... आता त्याचा वापर कोण आणि कसा करतो यावर सर्व काही अवलंबुन आहे.

अमेरिकेने हिरोशिमा वर अणू बाँब टाकला - गैरुपयोग.
त्याच अण्विक ऊर्जेचा वापर विजनिर्मीती सारख्या शांततामय कार्या साठी पण होतो - सदुपयोग. ऊर्जा तिच असते, पण तिचा वापर कोण कसा करतो यावर सर्व अवलंबते...

संजीव , वास्तुशास्राचा पुर्ण आदर बाळगुन मी एक प्रश्न विचारु इच्छितो
<<< दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं, >>>
जर दरवाजाचा आकार, कन्या वा दिवट्यांच्या जन्माला कारणीभुत असेल तर XX आणि XY गुणसुत्रांचा उपयोग काय ?

---- ज्या घरात जास्त मुली असतील तर घराचा दरवाजा चौकोनी असेल तर नंतर गोलाकार होतो... जर गोलाकार असेल तर अजुन गोलाकार होतो...

मला संपुर्ण लेख आवडला... काहीच्या काही विनोदी सदरात खुप शोभेल.

चिनूक्स यांस
प्रश्न :- वास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे, हे कृपया सांगाल का?
उत्तरः- मयानं वास्तुशास्त्रावर मयमतम नावाचा अफलातून ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ पॉडिचेरीच्या आश्रमात धूळ खात पडून होता. ब्रुनो डॉन्जेस नामक फ्रेंच तत्वचेत्त्याला हा ग्रंथ सापडला आणि ग्रंथाचं भग्य उजळ्लं डॉन्जेसनं हा ग्रंथ फ्रेंचमध्ये भाषांतरित केला. फ्रान्समध्ये खूप गाजावाजा झाल्यानंतर त्यांच इंग्रजीत भाषांतर झांल. त्यानंतर भारतीयांचं त्याच्याकडे लक्ष गेलं.

१. सुज्ञान जन्म रहित्यम् २. गंटल पंचांगम् ३. गुप्ता पंचागम्, ४. गुप्ता वास्तु, ५. गुप्ता वास्तु सम्राट, ६. गृहवास्तु ( काकिनाडा ) ७. वास्तुशास्त्र विवेकम् ४ भाग ८. श्री रामराय वास्तु शास्त्रम् ९. जातक परिजातम्, १०. बृहत्पराशर होरा शास्त्रम् ११. श्रीकृष्ण वास्तू शास्त्रम् १२. वास्तु दर्पणम् १३. वास्तु नारायणीम् १४. सनत्कुमार वास्तुशास्त्रम् १५. उत्तर काळमृत् १६. पेध्दबाल शिक्षा १७. आंध्रज्योति सचित्र वार पत्रिका १८. मनदेशम् पाक्षिक वार पत्रिका १९. गृहवास्तू दीपिका २० गृहवास्तू रहस्यम् २१ गृहवास्तू दर्पणम् २२. वास्तु दुंदुभि / टुंटुभि २३ वास्तु पद्माकरम् २४. वास्तु विज्ञान सर्वस्वम् २५. सुब्बराय वास्तु शास्त्रम् २६. श्री दत्तात्रेय वास्तुशास्त्रम २७ कृष्णा यजुर्वेद तैत्तरीय संहिता ५ भाग २८ याजुषा पुर्वप्रयोगचंदिका,

२९ निर्णयसिंधु ३० धर्मसिंधु ३१, अश्वलायन गृह्यसूत्रम् ३२. समारांगण- सूत्रधार ३३. ऋग्वेद ३४ यजुवेद ३५ सामवेद ३६ अथवेद ३७ शांति कमलाकरम् ३८ शांति रत्नाकरम् ३९ सर्व देव प्रतिष्ठा प्रकाश ४० श्रीविमानार्चना कल्पम्

४१ बृहत्संहिता ४२ वास्तु रत्नाकर ४३ वास्तु रत्नावली ४४ बृहद्वास्तुमाला ४५ गृहवास्तु शांती प्रयोग ४६ मुर्हर्त चिंतामणी ४७ वराह पुराण ४८ सूर्य पुराण ४९ भविष्य पुराण ५० विष्णु पुराण ५१ विष्णु धर्मोत्तर पुराण ५२ विश्वकर्मा पुराण ५३ विश्वकर्मा प्रकाश

५४ वास्तुवैभव ५५ मातृस्मृती १२ भाग ५६ वास्तु सम्राट ५७ वास्तुशास्त्र, ५८ शिल्पशास्त्र ५९ मेदिनीय ज्योतिष ( ५७ ते ५९ प्रत्येकी १२ भाग ) ६० मयमतम् ६१ मशिल्प ६२ मयशिल्पशतिका ६३ सूर्यसिध्दान्त ६४ वास्तुप्रवेश ६५ अजित वास्तु ६६ वास्तुशुभा ६७ मस्त्यपुराण ( १९०६) ६८ स्कंद पुराण ६९ वेद पुराणे समालोचन ७० श्री अग्निमहापुराण ७१ श्री गरुड पुराण ७२ श्री विश्वकर्मा पुराण ७३ सार्थ मुहूर्तमार्तंड

अशी अनेक पुस्तके आपणास मिळतील
वरील सर्व पुस्तकांचे संदर्भ आपणास पाहिजे असता माफक शुल्लकात उपलब्द होईल.

वास्तु विज्ञान प्रेमी संजीव

धन्यवाद संजीव. Happy

आपण वर उल्लेख केलेल्या बृहत्संहितेत मला तरी वास्तुशास्त्राबद्दल काही आढळले नाही. परत एकदा शोध घ्यायला हवा.

चिनूक्स , यात काहीतरी निगेटीव एनर्जी , लहरी वगैरे भानगडी आहेत . मला तर वाटते बोवा हे वास्तुशास्त्र हे क्वांटम मेकॅनिक्सचा भाग असावे. तू तुझ्या पी एच्च डी साठी नॅनोचा अभ्यास केलाय ना. त्यात नाही का हे? आणि पाँडिचेरीच्या आश्रमातला धूळ खात असलेला मूळ ग्रंथ फ्रेंच भाषान्तरानन्तर कुठे आहे सध्या... ?

रात्री २०१२ पाहिला . सकाळपासून मृत्युपत्र ल्याहायला घेतले आहे. मग काय फरक दर्वाजा त्रिकोणी असला काय अन षटकोनी असला का?

अमेरिकेने हिरोशिमा वर अणू बाँब टाकला - गैरुपयोग.

>>
याला गैरौपयोग कसे म्हणता येईल?. त्यामुळे जपान्यांचे कम्बरडे मोडून हिटलरनन्तर ही चालू असलेले दुसरे महायुद्ध कायमचे बन्द झाले . व भारत जपान्यांच्या घशात जाण्यातून वाचला. व मानवजात जपान्यांच्या पंज्यातून वाचली. काही हजार जपानी मेले तर त्यांची घरांचे दर्वाजे दक्षिणेकडे असल्याने मेले. जे वाचले त्यांचे दरवाजे दक्षिणेतर दिशेला होते. (सन्दर्भ; रंगदासामृत प्रकरण ३रे ;वास्तुफल.)

आता आपण पाकिस्तानवर अणुबोम्ब टाकून काही हजार पाकिस्तानी मारले तर त्यालाही तुम्ही उर्जेचा गैर उपयोग म्हणणार? डास मारण्यासाठी गूड नाईटला जो वीज पुरवठा केला जातो त्यालाही उर्जेचा गैर वापर म्हणणार? छे छे तुमच्या बेसिकमध्ये वांधा आहे.

वा सन्जिव, उत्तम माहिति देत आहात. बिजगणित, अन्कगणित, खगोलशास्त्र, सिव्हिल इन्हिनिअरिन्ग, वैद्यकशास्त्र यासारख्या भौतिक विशयान्मधल्या ज्ञानापासुन ते अध्यात्मातले सुक्ष्मातिल सुक्ष्म ज्ञानापर्यन्त आपले पुर्वज अथक सन्शोधनाने पोचले होते व या दोन प्रकारच्या ज्ञानशाखान्ना जोडणारे, त्यान्च्यातिल दरि सान्धणारे विशयसुध्दा त्यान्नि अवगत करुन त्यावर मोठे काम केले आहे जे केवळ अभ्यासायचे म्हणले तरि पिढ्यान पिढ्या जातिल. योग, वास्तुशास्त्र हे विशय या दोन ज्ञानशाखान्मधलि दरि भरुन काढणारेच हेत. हे मि म्हणतो म्हणुन आता सर्व बुप्रावादि वस्सकन अन्गावर धावुन येतिल पण हेच जेव्हा एखादा फ्रेन्च किन्वा अमेरिकन "शास्त्रज्ञ" सान्गतो तेव्हा मात्र हेच बुप्रावादि सान्ग सान्ग भोलानाथातल्या बैलासारखे हो ला हो करतात हा काळाचा महिमा आहे. याच बुप्रावाद्यान्ना जेव्हा अनुभुतिचे "च्यालेन्ज" दिले जाते तेव्हा मात्र काहितरि "विज्ञान, सन्ख्याशास्त्र" असलि खुस्पटे काधुन "प्रयोग' करण्यास टाळाटाळ करतात असाच अनुभव हे.

आमचे परिचितातिल एका घरचा अगदि ताजा अनुभव सान्गतो. नवरा बायको दोघेहि आयटि कम्पनित कामाला असुन त्यान्ना दाबुन पगार हे. दोघेच दोघे असुन राजा-राणिचा सन्सार हे (म्हणजे होता :फिदी:) लग्नाला २ वर्शेच झालि असुन राजाराणिला "लाएफ एन्जॉय" करायचे असल्याने सध्या फ्यामिलि प्लॅनिन्ग सुरु आहे. हे जोडपे नुकतेच एका "टॉवर"मधे फ्लॅटमधे राहायला गेले. बिल्डरला खास सान्गुनसवरुन घरात पाहिजे तसे बदल करुन घेतले. त्यात एक बदल असा कि दाराला मार्बलचि चौकट करुन घेतलि. त्यान्च्या वास्तुशान्तिला आम्हि गेलो होतो. हे सर्व लोक स्वताहाला "आधुनिक, पुरोगामि" म्हणवुन घेतात व वास्तुशान्त मात्र साग्रसन्गित विधिवत ब्राह्मणाला बोलावुन करुन घेतात Proud चार महिन्यान्पुर्वि आम्हि त्यान्चेकडे गेलो होतो तेव्हा त्यान्च्या या मार्बलच्या चौकटिला एके ठिकाणि तडा गेल्याचे मला आढळले. अधिक चौकशि करता असे समजले कि दाराच्या पुढे 'सिक्युरिटि डोअर' म्हणजे लाकडि दाराच्या आधि असतो तसा लोखन्डि दरवाजा बसवुन घेताना ठाकाठोकित तो तडा गेला. सान्गण्याचि गोश्ट हि कि २ आठवड्यान्पुर्वि ३बीला या जोडप्यातलि बायको बाजारात भेटलि आणि कळले कि त्यान्चेकडे "गोड" बातमि हे. ३बिने विचारले कि मग तुमच्या फ्यामिलि प्लॅनिन्ग चे व "लाएफ एन्जॉय" करणेचे काय झाले ? तर ती पत्नी म्हणालि कि अहो, ते सर्व उपाय सुरु होते तरिहि असे झाले. डोक्टर म्हणाले कि असे होणेचि शक्यता कमि असते पन "अपघाताने" अशा केसेस घडतात. सुदैवाने त्यान्नि लगेच गर्भपाताचा निर्णय न घेता त्यावर विचार करुन, वडिलधार्यान्चा सल्ला घेउन आए-बाप होण्याचे ठरवले. तर "असेहि" अपघात होउ शकतात. ह्या घटनेस कोणि योगायोग म्हणेल, पण हा योगायोगच होता याचा पुरावा काय ? Proud

रात्री २०१२ पाहिला . सकाळपासून मृत्युपत्र ल्याहायला घेतले आहे. मग काय फरक दर्वाजा त्रिकोणी असला काय अन षटकोनी असला का?>> हुड काय रे हे. मला तुझे १० - १२ चषमे दे. २०१२ त काही अर्थ नाही बॉस.
इथे आंध्रा मध्ये वास्तुदोष चे खूपच प्रस्थ आहे विषेशतः श्रिमंत बंगलेवाल्या रेड्डीज/ चौधरीज मध्ये व मारवाड्यांमध्ये. ते लाखो रु. खर्च करीत असतात वास्तुदोष ठीक करण्यासाठी.

माहिती चान्गली आहे. बरेच दा अपार्टमेन्ट मध्ये एकच मोठा दरवाजा असतो. दोन दारे नसतात. त्यांनी काय करावे.

पण हा योगायोगच होता याचा पुरावा काय ?>> लाइफ जरा जास्तच एन्जोय झाले की काय:) पण गोड न्युज इस गुड न्युज.

दोन दारे नसतात. त्यांनी काय करावे.

>>त्यानी मरावे. संकटे उपभोगावीत. आपल्या फुटक्या नशिबाला दोष द्यावा. वास्तुशास्त्र विचारात न घेता घर घेतात म्हनजे काय? भोआआकफ.

मार्बलचे दरवाजे वाईटच. त्याने प्लॅनिंग वाल्यानाच काय पन लग्न न झालेल्यानाही मुले होतात. Sad

दोन दारे नसतात. त्यांनी काय करावे.

>>त्यानी मरावे. संकटे उपभोगावीत. आपल्या फुटक्या नशिबाला दोष द्यावा. वास्तुशास्त्र विचारात न घेता घर घेतात म्हनजे काय? भोआआकफ.

मार्बलचे दरवाजे वाईटच. त्याने प्लॅनिंग वाल्यानाच काय पन लग्न न झालेल्यानाही मुले होतात.>>

मार्बल चा उंबरठा रे. दरवाजा खूप जड नाही का होणार? भाप्र. मग कन्या नाही न पुत्र नाही. भोआ दरवाज्याचीफ

हसुन हसून पड्ले खाली.

आमच्या ऑफिस ला काचेचे दार आहे. व वरून शटर. ते बरोबर आहेका. ? तसेच नावात Poornima
ते Pournima केले तर धन pour होइल का? तुम्ही सल्ला द्या तर मी आरोसी कडे कंपनीचे नाव
बदलणीसाठी अर्ज दाखल करेन.

मामीसाहिबा, मृत्युपत्रात मी माझ्याकडील वास्तुशास्त्राबद्दलची भूर्जपत्रावरील पुस्तके चिनूक्सला देण्याचा विचार करतोय. बिचारा वाचनाच्या उपासमारीने कितना दुबला हो गया है.

रच्याकने, अश्मयुगात भारतीय मानव आपापल्या गुहेचे दरवाजे उत्तरेकडे ठेवीत असत कारण नेऋत्य मान्सूनचे पाणि दरवाज्यातून आत येऊ नये म्हणून असा उल्लेख माझ्याकडे वास्तुचूडामणि नावाच्या या राजशेखरसुताने लिहिलेल्या ग्रंथात म्हटले आहे.

वास्तुशास्त्र विचारात न घेता घर घेतात म्हनजे काय? भोआआकफ.

मार्बलचे दरवाजे वाईटच. त्याने प्लॅनिंग वाल्यानाच काय पन लग्न न झालेल्यानाही मुले होतात.

हूडा Rofl

आमच्या ऑफिस ला काचेचे दार आहे. व वरून शटर. ते बरोबर आहेका
>>
आत्ता आठव्त नाही पण सतुपल्लीस्थित मठातील नामानागेश्वररचित 'कंच द्वारफल' या प्रकरणात आहेत त्याची फळे मामीजी.

हह पुवा

मी शुक्रवारचया कहाणीतील मुलग्या सारखी शिळा ब्रेड, त्याहून शिळी भाजी दूर बसून खात आहे ते हसता हसता सांड्ले ना. कंच द्वारफल चा दुसरा भाग सटरफटर शटरफल आहे का?

जेवण झाले की मी राजाचा वैरी मारणार. व दरवाजे चोरणार.

एक भा प्र. त्रिकोणी दर्वाजे कोण बसवेल हो? फकत टेपी नावाच्या त्रिकोणी घरांना असतील नाही का उस्गावात?

तसेच नावात Poornima
ते Pournima केले तर धन pour होइल का?

>> नाही. पूर्णिमामध्ये दोन ओ आहेत. आणि पौर्णिमामध्ये एकच आहे. एका ओ तून जी पॉझिटीव्ह एनर्जी बाहेर पडते ती प्लॅन्क्स कॉन्स्टन्ट गुणिले पौर्णिमा नाव धारण करणारीचे वय इतके ज्यूल्स असते. त्यामुळे एक ओ आहे की दोन ओ आहेत यापेक्षा वय बघावे लागेल.

सेच नावात Poornima
ते Pournima केले तर धन pour होइल का?
>> नाही. पूर्णिमामध्ये दोन ओ आहेत. आणि पौर्णिमामध्ये एकच आहे. एका ओ तून जी पॉझिटीव्ह एनर्जी बाहेर पडते ती प्लॅन्क्स कॉन्स्टन्ट गुणिले पौर्णिमा नाव धारण करणारीचे वय इतके ज्यूल्स असते. त्यामुळे एक ओ आहे की दोन ओ आहेत यापेक्षा वय बघावे लागेल.>> . जातक मातेचे वय .... वो किस्सा फिर कभी.

चिनुक्ष तू झ्या घरचे द्वार्फल काय आहे? आम्हाला छोटे भाचेनातू आहेत की नाती? म्हातारीस विषद करून सांगावे.

मामीजी? आचारसंहिता लागू आहे का? मग तुम्ही हुड्साहेब.

चिनुक्ष तू झ्या घरचे द्वार्फल काय आहे? आम्हाला छोटे भाचेनातू आहेत की नाती?

अहो मामी, बेडीत अडकायचाय हो तो बिचारा अजून Rofl

हूडा भारीच अभ्यास दिसतोय तुझा (नुसतं वाचन नव्हे बा!) या विषयात.. Happy

तींबू (३बू), तुमचा लिंबू अशी काही संबंध आहे का?

आणि त्या it जोडप्याचं थोडं प्लानिंग चुकलं.. ऊगाच दरवाजा, चौकट, वास्तूशास्त्रा ला का दोष देता राव? Happy

अहो मामी, बेडीत अडकायचाय हो तो बिचारा अजुन>> अरे ते तर बरेच की. पहिले चान्गला दरवाजा शोधुन घे
मग बायको पसंत कर.
संगमरवरी दरवाजा उघडायचा म्हण्जे हर्निया व्हायचा चान्स जास्ती. ( जड असतंय ते भारी)

हूड नवाबसाहेब, ती छोटी पूर्निमा घरातील धन मॉल मध्ये pour करत असते.

मामी , म्हातारी होगी तुम्हारी दुष्मना. Angry

आता फारच खोलात जायचे तर भद्राचलम नरसिंहालु यानी 'अद्वैत उर्जा तरंगिणी 'नावाचा ग्रंथ लिहिला (होता). (त्याचे नन्तर वेंगुर्ल्याच्या डच रेसिडेन्टने डच क्रिओल मध्ये भाषान्तर केले). तो तर थेट ग्रॅन्ड युनिफाईड थिअरी शीच साधर्म्य दाखवतो. आईन्स्टाईन तर फक्त रेलेटीव्हिटी आणि एलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या पुरताच मर्यादित राहिला. पण भद्राचलम नरसिंहालु म्हणजे तोबा तोबा. या तरंगिणीत तर इग्लू हा गृहप्रकार वास्तुशास्त्राच्या दृष्टीने लक्षवेधक असल्याचे उल्लेखिले आहे. त्याने एनर्जी कॉनवर्जन्स एका विशिष्ठ बिन्दूत केन्द्रमान होतो असे म्हटले आहे. पू. भ. नरसिंहालूंचे शिष्य रामण्णा यानी नरसिंहालुंचा संचार दोन्ही धृववृतांपर्यन्त असावा असे अनुमान नोन्दवले आहे.

सॉरी फोक्स, मला तुमची चर्चा खूपच आवडली पण ती अस्थानी होत आहे असे वाटले.

कळावे लोभ आहेच तो वाढावा ही विनंती.

अहो मामी , विषय काय तुमची चर्चा काय? चिन्याचे वैवाहिक जीवन हा या बा फ चा विषय नाही. त्यासाठी वेगळा बाफ उघडा. उगीच इथले गाम्भीर्य घालवू नका फा. को. करून. Proud

चांगले हुशार लोक पन खिल्ली उडवता नविन लोकांची दुखी तोंड
चिनुक्श तुमचे चांगले लेख वाचुन माजे मत चान झाले होते तुमच्याबद्दल पन तुम्ही पन
तुमाला हा विशय आवदत नसेल तर इते येउन न वाचन्याचा ऑप्शन आहे ना तुमच्याकडे
इते येउन सग्ळयांसोबत दात काडले की झालं का कुटे जातो तुमचा व्यासंग आब्यास
माला सचिन दाते

Pages