भाग २४ - https://www.maayboli.com/node/77512
"इट्स बिन अ लॉंग नाईट मॉम!"
"येस इट वॉज."
मोहन स्थिरपणे त्याच्या आईकडे बघत होता. शांतपणे...
तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते.
"आय मिस यु मॉम!"
"मिस यु टू बेटा... शांत हो. आताच जागा झालायेस."
"येस. बाबा?"
"इथेच होते, आता बाहेर गेलेत."
"मॉम, तू आलीस ना, खूप बरं केलं. तुला पुन्हा भेटेल की नाही, वाटलं नव्हतं."
"बाबा, काका, सगळे आहेत ना? अण्णा, सोनी..."
"सगळे आहेत. तू शांत राहा. शांत डोळे मिट."
"हो थकवा येतोय. मी डोळे मिटतो थोड्यावेळ."
मोहनने शांतपणे डोळे मिटले.
◆◆◆◆◆
"कृष्णा!!"
"दादा?" कृष्णरावानी मागे वळून बघितले.
"मला सोडून जाऊ नकोस कधी. खरंच."
"अरे दादा, हे काय? कृष्णराव गडबडले..."
"नाही रे, माझंही वय झालंय. आई किती दिवस राहील, माहिती नाही. माझा स्वभाव बघितला असा, चिडखोर. एक घाव दोन तुकडे. रागावून जाऊ नकोस कधी."
"दादा, कानफटात मार, पण असं बोलू नकोस."
वसंतरावांकडे शब्द उरले नाहीत. त्यांनी कृष्णरावाना घट्ट मिठी मारली...
"चल. मोहनकडे जावं लागेल आता. तू थांब इकडे. अंबाला काय हवं नको ते बघ. मी पोराकडे जातो." वसंतराव म्हणाले.
"ठीक आहे दादा."
तेवढ्यात तिकडून ओला धावत आली.
"अहो, मोहनला शुद्ध आली होती."
कृष्णराव प्रचंड आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिले.
...आणि ते धावत सुटले. मोहनच्या खोलीकडे...
वसंतरावही त्यांच्यामागे होते.
ते मोहनजवळ पोहोचले.
"बाबा... काका..." मोहनने त्यांच्याकडे डोळे उघडून बघितले.
...दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
◆◆◆◆◆
महिनाभरानंतर...
युक्रेनमधील एका संथ नदीच्या काठी बाकावर दोन लोक बसले होते.
"व्यास..."
"येस सर."
"आपण वेडेपणा केला ना?"
"हो सर..."
"बरं मला एक सांगा, मी शुद्धीवर कधी आलो होतो, आणि तुम्हाला कधी सांगितलं, अंबेला आणा असं?"
व्यास हसले.
"सर, आयुष्यभर चाकोरीत राहिलो. तुमच्यामुळे आयुष्यात थोडीफार हिरोगीरी करायला मिळाली."
"अच्छा!" मोहन हसला.
"हो, आणि शेवटी हिरो अवेलेबल नसेल, तर साईड हिरोलाच काम पूर्ण करावं लागतं, म्हणून जरा खोटं बोललो, इतकंच."
मोहन हसला...
"तुम्ही तर हिरो ठरलात व्यास शेवटी."
"नाही सर. पण हिरोसोबत काम करायला मिळालं."
मोहन हसला व शांतपणे वाहणाऱ्या नदीकडे बघत राहिला.
त्याने बोलायला सुरुवात केली...
"व्यास. आपण सगळेच हिरो होतो कथेत. अण्णा, बाबा, स्पेशल हिरो काका, सगळेच. प्रत्येकाने आपलं काम केलं, जोमाने. जीव तोडून.
...मात्र हिरोईन एकच होती, आजी... सगळं घडवलं, तिच्या मनासारखं, आणि निघून गेली. आजी जिंकली... शेवटी अंबेला तिची चूक उमगलीच, पण त्याचबरोबर तिने सगळ्यांच मनही जिंकलं, अंबेला माफ करून."
"सर, दोन्ही बहिणी शेवटी अठरा दिवस एकमेकीना सोडून एक क्षण राहिल्या नाहीत."
"नातीगोती असतात व्यास. नाही कळत. बरं, उद्याची तयारी झाली ना?"
"हो, सकाळी प्रायवेट प्लेनने जबलपूर, आणि तिथून कारने नर्मदा किनारी. अस्थविसर्जनासाठी..."
"आजीने नर्मदाच का निवडली होती, माहितीये व्यास?"
"का?"
"मलाही नाही माहीत." मोहन हसला...
थोडा अजून वेळ गेला.
"सर एक विचारु?"
"बोला ना व्यास."
"पाटीलवाडीत कधी जाणार परत."
मोहनने क्षणभर विचार केला.
"पाटीलवाडी आपलीच आहे व्यास, लवकरच जाऊयात."
...तो निर्धाराने म्हणाला.
क्रमशः
छान...
छान...
मस्त
मस्त
मस्तच...!
मस्तच...!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत....
छान भाग !
छान भाग !