मराठी वृत्तवाहिन्या आणि त्यावरील राजकीय चर्चासत्रे

Submitted by खरा पुणेकर on 19 December, 2020 - 05:56

गेली अनेक वर्षे अगदी दूरदर्शनच्या दिवसांपासून न चुकता बातम्या बघितल्या आहेत.... साप्ताहिक/दैनदिन मालिकांपेक्षा आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमापेक्षा बातम्या, माहितीपट, चर्चासत्रे वगैरे बघण्याकडेच एकंदर घरातल्या सर्वांचा कल राहिलेला आहे.
अगदी खासगी वाहिन्यांच्या सुरुवातीची काही वर्षेही त्यांनी दूरदर्शनची ती लीगसी छान चालवली.... पण हल्ली गेल्या काही वर्षात वृत्तवाहिन्यांच्या विश्वासार्हतेवर खुप मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
एकतर कुठलीही खातरजमा न करता प्रश्नचिन्हांकित बातम्या चालवणे आणि दुसरे म्हणजे उघडउघड राजकीय अजेंडे राबवणे ह्या दोन्ही गोष्टींचे प्रमाण आजकाल फार वाढलेले दिसते..... या सगळ्यात निष्पक्षपाती पत्रकारिता पार कुठेतरी मागे राहिलीय.
काही लोक निष्पक्षपाती असल्याचा आव आवर्जून आणतात पण तो पवित्रा पण सोयीस्कररित्या बदलत राहतात.... आणि ते बघणाऱ्याला कळते.
सलग एक आठवडा जर पाच-सहा वृत्तवाहिन्या पाहिल्या तर एखाद्या घटनेचे वार्तांकन करण्याची प्रत्येकाची आपापली पद्धत, लावलेले अन्वयार्थ, काढलेले निष्कर्ष, घेतलेले पोल्स आणि त्याचे रिझल्टस खुप परस्परविरोधी असल्याचे दिसून येते आणि एकूणच त्या त्या वाहिनीचा राजकीय कल याचा सहज अंदाज येतो.
राजकीय चर्चासत्रे ही चर्चासत्रे न राहता कुस्तीचे आखाडे किंवा नळावरची भांडणे वाटावीत इतका त्यांचा स्तर खालावलाय.
अगदी पाच दहा वर्षापूर्वीपर्यंत या चर्चाना येणारे पक्ष प्रवक्ते, नेतेमंडळी, राजकीय विश्लेषक वगैरेंची भाषा बऱ्यापैकी संयमित असायची, राजकीय चिमटे तेंव्हाही काढले जायचे पण एकंदर हसतखेळत मामला असायचा पण हल्लीचे पक्ष प्रवक्ते (काही सन्माननीय अपवाद वगळता) अक्षरशः ऐकवत नाहीत..... सोशल मिडियावर पेड ट्रोल जी भाषा बोलताता त्यात आणि या राजकीय प्रवक्त्यांच्या भाषेत काही म्हणून फरक उरलेला नाहीये..... जागेवर पुराव्यानिशी चूक दाखवून दिली तरी किमान दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्यसुद्धा ही मंडळी दाखवत नाहीत.
आणि या चर्चांचे सूत्रसंचालक तर त्यावर वरताण असतात.... काय निष्कर्ष काढायचा हे त्यांचे आधीच ठरलेले असते.... कुठल्या प्रश्नावर कुणाकडे जायचे, कुणाचे मुद्दे कुठे तोडायचे, कुणाला बोलायला किती वेळ द्यायचा, राजकीय विश्लेषक म्हणून कुणाला बोलवायचे ते अगदी शेवटी कुणाला बोलू देवून आपल्याला पाहिजे त्या वळणावर चर्चा नेवून ठेवायची हे सगळे सगळे उघड उघड डोळ्यांवर येण्याइतके सर्रास चाललेले असते.

कधी कधी राग येतो, कधी सात्विक संताप होतो आणि कधी अति होते आणि हसू येते.

आणि या सगळ्याला कुठलाही पक्ष वगैरे अपवाद नाहीये.... आपले प्रवक्ते, प्रतिनिधी या वाहिन्यांवर काय भाषा बोलतात, काय मुद्दे मांडतात याचा सामान्य जनमानसावर फार मोठा परिणाम होत असतो त्यातून त्या त्या पक्षाची प्रतिमा तयार होत असते.... मोठे नेते महिन्या दोन महिन्यातून एखाद्या जाहिर सभेतून आपले म्हणणे मांडत असतील तर ही प्रवक्ते मंडळी रोज लोकांसमोर येत असतात.... त्याचा परिणाम खुप प्रभावी असतो.

असो!
वेगवेगळी यूट्यूब चॅनेल्स हा एक पर्याय आहे पण त्यातही बरीचशी कुठल्या ना कुठल्या विचारधारेला वाहून घेतलेली आहेत.
त्यातल्या त्यात समतोल रिसोर्सेस शोधत रहायचे.

(तळटीप: जरी माझाही राजकीय कल एका विशिष्ट बाजूला असला तरी त्या बाजूचे सर्वच्या सर्व मुद्दे उचलून धरणारे एकांगी वार्तांकन, विश्लेषण मला फारसे पटत नाही)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शेखर गुप्ता थोडे संतुलित वाटतात. त्यांचे clut the clutter आणि National Interest चे व्हिडिओस चांगले असतात. कृषी कायद्यांवरचे त्यांचे videos चांगले आहेत, त्यांचे समर्थन आहे या कायद्यांना

शेखर गुप्ता थोडे संतुलित वाटतात. >>>>>>>>
हे मात्र बरोबर आहे , गुप्ता बऱ्याच वेळा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करतो !!!!

>>>>>>>>>>
जागेवर पुराव्यानिशी चूक दाखवून दिली तरी किमान दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्यसुद्धा ही मंडळी दाखवत नाहीत. >>>>>>>>
काल परवा च आप ने ऊ प्रदेश मध्ये निवडणूक लढवनियाचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्या नंतर तेथेच एका पत्रकाराने आप च्या संजय सिंग ची विकेट काढली. " देल्ली के बाहर वालो को बाद में पहले दिल्ली वालो को करोना का उपचार मिलेगा !" असे तुम्ही म्हणता मग यूपी मध्ये तुमचा पक्ष बाहर का नाही का ?
तर संजय ने गोडीगुलाबीे ने next question म्हणून विषय डावलला !!!!!!
एकंदरीत ! हा दुसरा पक्ष ज्यातील संजय ला मीडिया समोर येवुन पक्षाची इज्जत धुळीला मिळवत असतो .
आपले संजय ने तर आता डायरेक्ट कोर्टाला पण धमक्या द्यायला सूर वात केली आहे Happy

असा एक तरी वादविवाद/डिबेट आहे का, ज्यात एका बाजूचा मुद्दा दुसऱ्याने चुकीचा ठरवला आणि चुकणाऱ्याने ते मान्य केलं? मग त्या वादाला अर्थ काय? नुसते आपापले मुद्दे मांडत राहायचं. बघणाऱ्याला पण ज्याचा पक्ष आवडतो, त्याचेच मुद्दे पटतात. काय चूक काय बरोबर हे न पाहता, आपणच कसे बरोबर ह्याचे मुद्दे मांडत राहतात हे लोक.

>>आपणच कसे बरोबर ह्याचे मुद्दे मांडत राहतात हे लोक.

तेच तर ना!
मुद्दा नको तितका ताणत नेण्यापेक्षा आणि आक्रस्ताळेपणा करण्यापेक्षा प्रसंगी माघार घेण्याचा समंजसपणा लोकांना अधिक भावतो हे जनमानसशास्त्र का कळत नाही या लोकांना..... ही काही कुस्ती नाही की पाठ टेकली की हरलात तुम्ही!
आणि गोष्टी तुमच्या बाजूने घडत असतानाही विनय दाखवावा लागतो.... समोरच्याला हिणवलेत तर लोक बरोबर जागा दाखवतात!

मा मू म्हणतात " होय मी अहंकारी आहे ! माझ्या मुंबईकर साठी अहंकारी होणारच "
मुख्यमंत्री राज्याचा असतो की मुंबईचा ?
Happy

कारशेडवर का?
तो तर नुसता इगो इश्यू केलाय!

>>पांडवांची आई अर्जुनाची आई असतेच की

पुराण विसरले का ?<<

ही असलीच काहीतरी गैरलागू उदाहरणे पक्षप्रवक्ते पण द्यायला लागलेत आजकाल! Angry

पांडवांची आई अर्जुनाची आई असतेच की

पुराण विसरले का ? >>>>>>
तिच्या पेक्षा रामायण मधील कैकई चे उदाहरण सर्वात मोठे !
कसं ही करून तिला आपल्या मुलाला राजगादी वर बसवायचे असते , अगदी तसेच आपल्या सोनिया ची धडपड चालू आहे Happy
पण एक गोष्ट नक्की राजपुत्र वारंवार पटायाला जाऊन मिक्स फ्रुट ज्यूस पित फिरण्या पेक्षा अध्यक्ष बनविलेले केंव्हाही चांगले !
म्हणजे भाजप ला निवडणूक मध्ये १००% यशाची खात्री असेल Happy

आत्ता बघितले थोडेसे live..... कितीतरी गावगप्पांवर नेमके प्रश्न विचारावेसे वाटले.... पण काय करणार?

असल्या गावगप्पांचा पार धुरळा केला असता फडणवीस आणि मंडळींनी म्हणूनच बहुतेक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आटोपते घेतले Proud

कैकयी

लिवायल शिका आधी>>>>> भावना पोहोचल्या की. Proud

कोविडच्या कारणाने लोकसभेस टाळेच लावायचे होते तर मग नव्या संसद भवनाचे बांधकाम का करीत आहात? 900 कोटी रुपये नव्या संसद भवनाच्या बांधकामासाठी खर्च होणार आहेत, ते काय बाहेरून टाळे लावण्यासाठी?

किती बालिश प्रश्न आहे हा?
हे विचारणारे आपले लोकप्रतिनिधी Rofl

>>मोदींनी तर अधिवेशन घेतलेच नाही<<

तेही चुकीचेच आहे!
सध्याच्या काळात VC वर अधिवेशन घ्यायला काय प्रॉब्लेम आहे यांना?

>>हे कार्यक्रम वेळ घालवण्यासाठी असतात<<

मिडियाचे एक समजू शकतो पण राजकीय पक्ष याच्याकडे वेळ घालवण्याचे कार्यक्रम म्हणून बघत असेल?

बरं मला एक प्रश्न पडलाय, ते आपले एक राजकारणी काका व त्यांच्या पुतणे मंडळींचा पुर्वी घंटा बडवायचा धंदा होता कां?
नाही म्हणजे जिथे बघावे तिथे " टोला हाणला", टोला मारला" असच वर्तमानपत्रात दिलेलं असत त्यांच्या कोणत्याही भाष्य किंवा प्रतिक्रियेबद्दल

Lol

आता तसे नाही. ते शांत आहेत, पण त्यांच्या जीवावर जे बसलेत ते सारखे कोथळा, नंगाभुंगा, बघुन घेईन असे ढोल बडवत असतात. काका मुरब्बी व धोरणी असल्याने ते शांतपणे वाट बघतायत. एकदाचे अखेरचे ढोल बडवले गेले की मग काका - पुतण्या बघतील आवाजाचे काय करायचे ते.

" टोला हाणला", टोला मारला" असच वर्तमानपत्रात दिलेलं असत त्यांच्या कोणत्याही भाष्य किंवा प्रतिक्रियेबद्दल
--

वरिल शब्द महाराष्ट्रातील 'चाय-बिस्किट' पत्रकारांचे आवडते शब्द आहेत. याबरोबर भाजपा सरकारने सुरु केलेल्या योजना, महाभिखार सरकारने स्थगित केल्या तर मराठी वर्तमानपत्रात फडणविसांना 'झटका'वगैरे शब्द वापरतात मात्र या टेंगळीच्याना इतके कळत नाही की त्या योजना बंद केल्याने फडणवीसांना काहीही फरक पडणार नाही, फरक पडेल तो त्या योजनांचा लाभ घेणार्‍या लाभार्थींना.

ज्यांना टोला हाणला आहे त्यांच्या तोंडुन हल्ली फक्त कन्हण्याचा आवाज येतो... एका चंपाकलीने तर सासुरवाडीतुन माहेरी जायची तयारी करुन बॅगही भरुन ठेवली आहे..!! Biggrin

बाबॉ, म्हणे फडणविसाला काहीही फरक पडत नै... जसे काय त्याने स्वतःच योजना सुरु केल्या होत्या... आधिच्या सरकारच्या योजना नाव बदलुन चालु ठेवल्या... आणि स्वतः तयार केलेल्या योजना फक्त गफल्या साठीच होत्या यावर कॅगने फाटेस्तोवर ताशेरे ओढले आहेत..! Proud

त्या योजना बंद केल्याने फडणवीसांना काहीही फरक पडणार नाही, फरक पडेल तो त्या योजनांचा लाभ घेणार्‍या लाभार्थींना.
हे मात्र खरय, कोणी का बंद पाडेना, एंड युजरलाच फरक पडणार.

एका चंपाकलीने तर सासुरवाडीतुन माहेरी जायची तयारी करुन बॅगही भरुन ठेवली आहे..!
सोनिया गांधींनी तस म्हटल्याच कुठे वाचनात आले नाही.

खमक्या बाया सासर सोडून जात नाहीत... त्यामुळे बायको सोडून पळालेल्या माणसाच्या भक्तांनी सोनियाबाईंची काळजी करु नये..! Proud

चंपाकली... खोत्रुड सासुरवाडी अन कोल्हापुर माहेर असणारी..!! Rofl

नुसते नेते, पक्ष प्रवक्तेच नाही तर समर्थकांनी समर्थनार्थ वापरलेल्या भाषेचाही सर्वसामान्य मतदारावर परिणाम होत असतो

होऊ दे झाला तर... १-१.५% मतांची कदर फार कोणीच करत नै..! Wink

आणि इथे कुणी काही अमुक पक्षालाच मत द्या असं सांगत फिरत नै.. एक अनाजी पंतुकड्याची विखारी विचारधारा चालवणारा भंपक पक्ष सोडला तर इतर कुणालाही मते दिली तरी ताटात नै तर वाटीत येतातच Biggrin

Pages