विविध उपक्रमांसाठी स्वयंसेवक

Submitted by admin on 19 June, 2009 - 01:52

गेली अनेक वर्षे मायबोलीवर बरेच उपक्रम चालू आहेत. जसे की गणेशोत्सव, दिवाळी अंक, वर्षा विहार व मायबोली टिशर्टस, गझल कार्यशाळा तसेच संवाद व आताचे अक्षरवार्ता. हे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत ते तुमच्यामधल्याच स्वयंसेवकांच्या मदतीमुळेच. ह्या सर्व उपक्रमांची माहिती वरील मेनूपैकी "मायबोली विशेष"मध्ये मिळेल.

सर्वसाधारणपणे काही उपक्रमांसाठी दर दिवशी काही मिनिटे तर इतर उपक्रमांसाठी काही तास द्यावे लागतील. खालीलपैकी कुठल्या उपक्रमासाठी तुम्ही आपला वेळ देऊ शकता ते कळवा. जेव्हा ते उपक्रम सुरू करायचे असतील तेव्हा त्या उपक्रमाचे संयोजक आपल्याशी संपर्क करतील. काही उपक्रमांत मर्यादीत सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही.

१. गणेशोत्सव संयोजन
२. दिवाळी अंक संपादन
३. दिवाळी अंक रेखाटन
४. दिवाळी अंक सजावट
५. मायबोली चाचणी समिती
६. मायबोली मदत समिती
७. कानोकानीसाठी मदत.
८. वर्षा विहार
९. मायबोली टी-शर्टस

अजून उपक्रम वाढतील तसे इथे ते लिहिले जातील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५,६ नी ७ साठी काम करायला आवडेल....

मला खालील उपक्रमांमधे भाग घ्यायला आणि मदत करायला निश्चित आवडेल Happy

२. दिवाळी अंक संपादन
५. मायबोली चाचणी समिती
६. मायबोली मदत समिती
७. कानोकानीसाठी मदत

१ ते ७ अन त्यापुढील सर्व कामांसाठी मला वेळ आहे.

माझ्या कुवतीनुसार मला कामे सोपवा.

मला खालील उपक्रमांमधे भाग घ्यायला आणि मदत करायला निश्चित आवडेल:
५. मायबोली चाचणी समिती
७. कानोकानीसाठी मदत.

कानोकानी उपक्रमासाठी नवीन ग्रुप बनवला आहे. तिथे पुढील माहिती व कामाचे स्वरुप लिहिले आहे.

१,४, ६ किंवा जिथे गरज असेल तिथे क्षमतेप्रमाणे कुठलेही काम करायला तयार आहे. फक्त ५ नंबरचे काम जमणार नाहि असे वाटते.

५. मायबोली चाचणी समिती
६. मायबोली मदत समिती
मला फक्त ही दोनच कामे जमु शकतील असे वाटते!
आवश्यकता भासल्यास केव्हाही सान्गावे Happy

गणेशोत्सव संयोजक मंडळाची जुळवाजुळव चालू आहे तेव्हा कोणाला हे काम करण्याची इच्छा असेल त्यांनी ईथे तसे लिहावे.

१, २, ५, ६ मधे काम करायला आवडेल.

मला १,२ ४,६,७ मध्ये मदत करायला आवडेल. ह्याचबरोबर प्रत्येक पॉईंट नी त्याचं साधारण कामाचं स्वरुप स्पष्ट केलंत तर बरं होईल. म्हणजे कुवतीचा अंदाज येईल.

कानोकानी उपक्रमासाठी नवीन ग्रुप बनवला आहे. तिथे पुढील माहिती व कामाचे स्वरुप लिहिले आहे. >> हे कुठे आहे ते सापडले नाही.

आपल्या
५. मायबोली चाचणी समिती
६. मायबोली मदत समिती
७. कानोकानीसाठी मदत.
वरिल साठी मी मदत करीन
संजीव

आपण माहिती सर्व दिलेली आहे. मीच कोठेतरी कमी पडत आहे. नवीन लिखाण कोठे करू ते समजत नाही.खालील मजकूर सर्वाना माहिती होण्याकरिता लिहावयाचा आहे.
कान्दिवली अत्रे कट्ट्यावर शनिवार दि. १३ फेब्रु. सायन्काळी ५.१५ ते ७.०० आणि रवि.दि. १४ फेब्रु. सकाळी १० ते १२ राममन्दिर, दत्तपाडा, बोरिवली पूर्व येथे
भगवद्गीता एक अनोखे पठण हा एक आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. सर्वानी आवर्जून पहावा, ऐकावा अशी विनन्ती आहे.
सम्पर्क
श्रीकृष्ण जोशी
०२२ २४३००८१७ / ९६१९८ २८१५७

मी
१. गणेशोत्सव संयोजन
५. मायबोली चाचणी समिती
६. मायबोली मदत समिती
७. कानोकानीसाठी मदत.

साठी काम करु शकते.

http://www.maayboli.com/node/15936 या धाग्यावरील ध्वनिमुद्रीत मनोगतांचे देवनागरीमध्ये शब्दांकन करायचे आहे. ज्यांना हे पुढील २/३ दिवसांत जमू शकेल त्यांनी कृपया इथे प्रतिसाद द्यावा.

Pages