अज्ञातवासी! - भाग १५ - समाप्त!

Submitted by अज्ञातवासी on 28 November, 2020 - 09:04

भाग चौदा https://www.maayboli.com/node/77293

खानाची हवेली बरीच मोठी होती. जवळजवळ तीस पस्तीस माणसे एकाचवेळी हवेलीत असत.
खान त्याच्या खोलीत उदास होऊन बसला होता.
एक पोरगा खालून धावत आला.
"खानसाहेब, एक पोरगा खाली उभा आहे.
मग?"
"तुम्हाला भेटायचं म्हणतोय."
"मी सध्या कुणालाही भेटणार नाही. जायला सांग त्याला."
"त्याला तेच सांगितलं, तर तो म्हणे, मोक्ष आलाय असं सांग."
"काय???" खान उठला आणि धावतच खाली आला.
"मोक्ष पाठमोरा उभा होता."
"मोक्षसाहेब, तुम्ही? अहो मला बोलवलं असतं वाड्यावर."
"तुम्ही येणार नाही, असं वाटलं मला. बरं, मला बसायला काही मिळेल का? पाय दुखतोय."
"हो हो, थांबा. अरे हैदर, पटकन खुर्ची आण."
"दोन खुर्च्या हैदर!" मोक्षने हैदरकडे खूण केली.
लगेच दोन खुर्च्या आणल्या गेल्या. मोक्ष आणि खान त्यांच्यावर बसले.
"वाड्यावर तीन दिवस झाले, आला नाहीत खानसाहेब?"
"जरा तब्येत नासाज होती."
"...आणि आमच्या तब्येतीला काही झालं तर?" मोक्षने खानाकडे रोखून बघितले.
"या अल्ला, काय बोलताय मोक्षसाहेब?" खान वरमून म्हणाला.
"माझ्यावर हल्ला झालाय खानसाहेब. पुन्हाही होईल. तुम्ही नसलात, तर मी जिवंत राहील का?"
"मोक्षसाहेब असं बोलू नका. दादासाहेबांची पुण्याई आहे तुमच्या पाठीशी!"
"पुण्याईसुद्धा आणि शापसुद्धा खानसाहेब..." मोक्षची नजर अजूनही हटत नव्हती.
खान जरा अस्वस्थ व्हायला लागला.
"उद्या मी निघतोय वाड्यातून."
"थोडे दिवस थांबला असता..." खान म्हणाला.
"थोडे दिवस का मग?" कायमचं थांबतो.
खान प्रचंड गोंधळला होता.
"खानसाहेब चहा की फालुदा?"
"काय?"
"चहा की फालुदा ऑफर करताय?"
"अरे...हैदर..."
"दोन फालुदा." मोक्ष मध्येच बोलला.
"खानसाहेब. एक लक्षात ठेवा. दादासाहेबांचा सगळ्यात जास्त विश्वास होता तुमच्यावर. ...
आणि माझाही आहे...
मी थांबणार आहे. मी कायम थांबेन. कारण हे गाव माझं आहे. इथले लोक माझे आहेत...
...आणि खुर्चीही..."
खानला हा दिवसातला सगळ्यात मोठा धक्का होता...
"...आणि आजपासून तुम्ही वाड्यावर पाऊलही ठेवायचं नाही." मोक्ष हसत म्हणाला.
खान वेड्यासारखा मोक्षकडे बघतच राहिला...
◆◆◆◆◆
मोक्ष त्याच्या सामानाची आवराआवर करत होता. रात्री तीनची फ्लाईट असली, तरीही त्याला एक वाजेपर्यंत मुंबईला पोहोचावं लागणार होतं. त्यासाठी संध्याकाळी सातलाच त्याला नाशिकहून निघावं लागलं असतं.
"आत येऊ का दादा?"
एक जवळजवळ साडेसहा फूट उंचीचा मुलगा त्याच्यासमोर उभा होता. मात्र चेहऱ्यावर अतिशय निरागस भाव होते.
मोक्षला त्याची उंची बघूनच गंमत वाटली.
"अरे ये, पण तुला या लोकांनी आत कसं सोडलं?"
"दादा, हे माझंही घर आहे. मी शुभम!"
"शुभम?"
"हो, शुभम," काकूंचा मुलगा!
मोक्ष क्षणभर गोंधळला.
"अरे, बस ना. सॉरी, तुला ओळखलं नाही मी. खरंच सॉरी." मोक्षला खरोखर आनंद झाला.
"आपण कधी भेटलोच नाही. काल आईने सांगितलं, दादा आज जाईल, पुन्हा परत येईल की नाही माहिती नाही, तर भेटून घ्या!"
"अरे, पुण्याहून आलास? इतक्या लांबून?"
"तुम्हाला भेटायचं होतं दादा."
मोक्ष त्याच्याकडे बघतच राहिला. तेवढ्यात त्याला दाराजवळ हालचाल झालेली जाणवली.
कुणी आहे का तिकडे?
दोन तरुण मुली आत आल्या...
"पिंकी, तुला तिकडे थांबण्याची काय गरज होती. आणि तू कोण?"
"दादा ही दिती, माझी, आय मीन आपली बहीण!"
"अरे, तुम्ही ना..."मोक्ष काहीही बोलला नाही.
"दादा थांबा ना." दिती म्हणाली.
"हो ना दादा, आम्हालासुद्धा तुम्हाला नीट भेटता आलं नाही."
"मग भेटायचं ना, मी भूत आहे की वेताळ?" मोक्ष हसला.
"नाही दादा."
"खूप उशीरा आलात. लवकर यायला हवं होतं. माझे दिवस छान गेले असते."
"दादा, अजून कुणालातरी तुम्हाला भेटायचंय!" पिंकी खट्याळ हसत म्हणाली.
"कुणाला?" मोक्षने आश्चर्याने विचारले.
"रुपालीला!"
मोक्ष क्षणभर थांबलाच.
"बोलावू का?" पिंकीच हसू अजूनही थांबत नव्हतं.
नको. आज सगळ्या भावंडानाच भेटू दे... मोक्ष शांतपणे म्हणाला.
...आणि ते कितीतरी वेळ गप्पा मारत बसले.
बऱ्याच वेळाने काकू आत आल्या.
"झाली का पॅकिंग?"
"हो काकू, तास दोन तासात निघतोच."
"दिती, दादाला मदत कर."
"ऑलरेडी सगळं झालंय काकू.
"अच्छा, परत कधी येणार?"
"माहिती नाही." मोक्ष हसला.
"कमीत कमी वर्षातून एकदा चक्कर टाकत जा. आपलाच वाडा आहे."
"हो काकू. अरे तुम्ही बसा ना."
"नाही. बरीच कामे आहेत. तुम्ही गप्पा मारा, मी येते."
काकू तिथून निघाल्या, व वाड्याच्या टोकाला असलेल्या खोलीत गेल्या.
खोलीचं दार उघडच होतं. रुपाली आत काहीतरी वाचत बसली होती.
"पेपर कालचा आहे रुपाली!"
"काकू!" रुपाली गडबडून उठली.
"बस... बस... आजचा पेपर आणून देऊ?"
"नाही, मी सहज..."
"घालमेल होतेय ना? कळतंय मला. त्याला चहा द्यायला मी जात असताना बघते मी. कधी सकाळी दहाच्या आत न उठणारी तू, आजकाल सकाळी आठला उठून खिडकीत असतेस, तेव्हाच मी ओळखलं."
"नाही काकू..."
"पिंकीकडून कन्फर्म करूनच बोलतेय रुपाली. परवा रात्री तुम्ही दोघीजणी बोलताना अनाहूतपणे बोलून गेलीस तू!"
"काकू!" रुपाली प्रचंड अवघडली.
"तुझी काहीही चूक नाही. मुलगा आहेच जीव लावण्यासारखा. साधा आहे, सरळ आहे, विचारी आहे पण तू एक विसरलीस, त्याचा बाप कोण होता...
...कितीही नाही म्हटलं, तरी आयुष्यभर तो दादासाहेबांचा मुलगा राहील आणि असा माणूस म्हणजे मृगजळ. धावणं योग्य नाही.
तसंही, अमेरिकेत त्याने कुणी शोधली असेलच की."
"काकू, मला इतक्या पुढे..."
"मग काय विचार केला होतास. गुंतून जाशील, मजा करशील आणि तो निघून गेल्यावर सगळं विसरून जाशील???"
"नाही काकू, तसं नाही."
"आमदारसाहेबांनी शेलारांकडे मुलगी शिक्षणासाठी पाठवलीये रुपाली. फक्त शिक! पुढचा निर्णय घेण्यास तू समर्थ आहेस मग."
"काकू???"
"चल मी जाते, गेल्या दोन आठवड्यात दोन शेलार कायमचे वाडा सोडून जाताहेत. बोलूयात नंतर."
काकू झराझरा निघून गेल्या. रुपाली त्यांच्याकडे बघतच राहिली
◆◆◆◆◆
"अप्पा, सगळं सोपं झालं, नाही?"
"हा चिरंजीव, एवढं सगळं सोपं झालं, तरीही टोचणी लागते."
"म्हणजे अप्पा."
"कधीही इतकं सगळं सोप्यारित्या मिळालं नाहीये रे! एखादी सुंदरी स्वयंवरात आपल्याकडे बघून हसावी आणि माळ दुसऱ्याच्याच गळ्यात पडावी असं होतंय नेहमी..."
"काकांच लिखाण वाचताय वाटतं आजकाल. इति सौदामिनीबाई!"
"नाही, माझ्या जीवनाचं सार सांगतोय. चला, भेटून येऊ..."
तिघांचा लवाजमा मोक्षच्या खोलीत गेला.
"अरे वा बंधू, तुम्ही इकडे?" संग्राम शुभमकडे रोखून बघत म्हणाला.
"हो, दादा आज निघतोय तर..."
"चांगलं केलंत. पुन्हा कधी भेट होते, नाही होतं..."सौदामिनीबाई किणकिणल्या.
"पण बंधुराज," संग्राम मोक्षकडे बघत म्हणाला. "तुम्ही टॅक्सीने जाताय बरं दिसत नाही...
...आम्ही पोहोचवलं असतं की!!!"
अप्पा व सौदामिनीबाईंचा चेहरा बघण्यासारखा झाला.
"... त्याचीच तर भीती वाटतेय..." मोक्ष अतिशय थंडगार आवाजात म्हणाला. त्याची नजर संग्रामवर रोखली गेली.
"म्हणजे?" संग्रामचा आवाज चढला.
"तुमची फॉर्च्युनर आहे. दोनशेचा स्पीड तर घेतच असेल. त्याची भीती वाटते. मी पडलो साधा माणूस..." तो हसत म्हणाला.
अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला...
"पिंकी, कधी आईजवळही बसावं. मोठी बहीण चाललीये उद्या तुझी, तिच्याशीही बोलावं. उठ बघू..."
पिंकी नाईलाजाने उठली.
"चला, काळजी घ्या." अप्पा म्हणाले. आणि ते निघाले.
मात्र काहीतरी आठवल्यासारख करत ते परत आले.
"अरे शुभम, तुझी कॉलेजची फी भरायचिये ना?काकाने विचारलं मला चारदा, पण दादा गेल्यापासून घरात पैसाच नाही. बघू काही जमतंय का?"
"अप्पा पण, दादासाहेब सगळं आधीच मॅनेज करून ठेवायचे."
"हो का? मग नसेल केलं यावेळी. गरज वाटली नसेल त्यांना. ठीक आहे, बोलूयात नंतर. येतो मी."
शुभम गप्पच खुर्चीवर बसला. सगळी मंडळी तिथून निघाली.
"दिती, जा काकूंना मदत कर. सगळं एकट्याच करतात त्या." मोक्ष म्हणाला.
"दिती तिथून निघून गेली..."
मोक्ष थोड्यावेळ शांतच बसला.
"किती फी आहे?" त्याने अनपेक्षितपणे प्रश्न विचारला.
"दादा?"
"किती फी आहे???"
"अरे..." आम्ही करतो मॅनेज...
"बरं, तुझा मोबाईल नंबर तर देशील? भावाच्या टच मध्ये राहणार की नाही?" मोक्ष हसला.
शुभमने गडबडीने नंबर सांगितला.
मोक्षने तो टिपून घेतला.
तेवढ्यात मोक्षचा फोन वाजला.
"ओके, निघतो मी! या तुम्ही."
"चल शुभम, मला हेल्प कर, या बॅग्स ठेवायला."
मोक्षने शुभमकडे एक बॅग दिली व तो स्वतः एक बॅग घेऊन चालू लागला.
मोक्षला निघताना बघून रुपाली लगबगीने बाहेर आली.
मोक्षला तिच्याकडे बघून स्मितहास्य केलं, व हात हलवला.
तिच्या हृदयाचा एक ठोकाच चुकला...
काका, काकू, पिंकी, अक्षय आणि दिती सगळे मोक्षबरोबर दरवाजापर्यंत आले.
"बाळा, कधीही परत ये, वाडा तुझाच आहे." काका म्हणाले.
"कॉल करत राहा. कमीत कमी आवाज तर ऐकू दे." काकूंनी डोळे पुसले.
मोक्ष खाली वाकला, व त्याने दोघांच्या पाया पडल्या.
तेवढ्यात टॅक्सी समोर आली!
"शुभम, चल."
ते दोघेही गाडीजवळ आले.
"ऐक, अभ्यासाकडे लक्ष दे. फक्त अभ्यास. तुसुद्धा अमेरिकेला जा. तिथे आयुष्य घडव कळलं?" मोक्ष त्याला सूचना देत होता.
तो टॅक्सीत बसला...
"...आणि अजून काही लागलं तर मागून घे!" त्याने शुभमला सांगितलं.
"...बाय. चला..."
गाडी निघाली.
तेवढ्यात शुभमचा फोन वाजला...
पाच मेसेजमध्ये एक एक लाख रुपये त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा झाल्याचा मेसेज आला...
समोर दूरवर जाणाऱ्या गाडीकडे तो भरलेल्या डोळ्यांनी बघतच राहिला.
अज्ञातातून आलेला अज्ञातवासी पुन्हा अज्ञाताकडे निघाला होता....

समाप्त!!!!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
सॉरी, भाग १५ समाप्त Wink
◆◆◆◆◆
"ऐका ना, गाडी गरवारेवरून सरळ द्वारकेला घ्या."
"साहेब उलट कुठे जाणार?"
"अहो एक काम आहे. बराच वेळ लागेल... मला तिथे फक्त ड्रॉप करा. तुम्हाला सगळं पेमेंट करतो, मग तर झालं."
"ठीक आहे साहेब."
थोड्यावेळाने गाडी द्वारकेला आली. मोक्षने बॅगा बाहेर काढल्या, व टॅक्सीवाल्याचे पैसे चुकते केले...
...टॅक्सीवाला निघून गेला.
मोक्षने समोर बघितले, व तो समाधानाने हसला...
...समोरच खान आपल्या माणसांबरोबर उभा होता!!!

क्रमशः!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

IRONMAN जी!

हा भाग रोमात असलेले वाचक चेक करण्यासाठी क्लिकबेट आहे असं मी मानते.
मस्त वाचत होते, आणि आज डायरेक्ट समाप्त??? शेवटी क्रमशः बघून कळलं, साहेबांनी मजा घेतलीये.
लवकर पूर्ण कर, कारण खूप उशीर झालाय हा भाग टाकायला. आणि आता ना, अजून स्पीड वाढव. कथा एक नंबर वाटतेय, पण तू एवढे भाग फक्त मोक्षच्या मतपरिवर्तनासाठीच घेतलेस, व थोडेसेच पात्र अजून आलेत. तू गॉडफादर बनवत नाहीयेस हे लक्षात ठेव Lol
आता तुझा पात्र परिचयच मला धडकी भरवतोय, कधी संपेल ते...
जयश्री +१११११

खूप छान झालायं हा भाग!! मस्तच...
समाप्त वाचून जरा आश्चर्य वाटलं आणि सुरुवात न वाचता आधी शेवट वाचला...
मग लक्षात आलं लेखक महाशय आज आमची फिरकी घेताहेत...

बेस्ट...

ते समाप्त वाचून धक्काच बसला होता>>> +१०८

मोहन कोण आहे? की मोहन ऐवजी मोक्ष पाहिजे? Confused...

मागे एकदा तुम्ही बोलले होते की वर्षभर चालतील दोन्ही कथामालिका... त्यामुळे हा शेवटचा भाग नसेल याची खात्री होती.....

खालील धागा पहा पहिल्याच पानावरच्या प्रतिसादात अज्ञातवासी आणि महाश्वेता हे दोन्ही आयडी एकच व्यक्ती चालवतोय हे सिद्ध झालंय.
https://www.maayboli.com/node/71955

हो ना..समाप्त बघून मी पण आधी स्क्रोल करून पाहिले.. खाली पाहिले कि मज्जा केलेली दिसतेय, क्रमशः आहे...मग हैप्पीली भाग वाचायला सुरू केले...इंटरेस्टिंग भाग आहे हा .... काय काय होणार आहे पुढे....उत्सुकता !!!

बरं शेवटी क्रमशः टाकलं आहे...
ते समाप्त वाचून धक्काच बसला होता >> अगदी!
नेहमी प्रमाणे मस्त भाग.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

मोहन कोण आहे? की मोहन ऐवजी मोक्ष पाहिजे? Confused... >> पद्म, तो पाटील स्टीलचा मालक आहे.
पाटील vs पाटील चा नायक!

भारीच !!!

मागे एकदा तुम्ही बोलले होते की वर्षभर चालतील दोन्ही कथामालिका... त्यामुळे हा शेवटचा भाग नसेल याची खात्री होती.....
>>>> +१

@ धनवंती - धन्यवाद! वाट बघायला लावल्याबद्दल सॉरी!
@ जयश्री - धन्यवाद! जस्ट जरा वेगळा प्रयोग करून बघितला.
@महाश्वेता - माझं क्लिकबेट जाऊदे, पण तू माझ्या धाग्यावर आल्यावर नेहमी एक डुआयडी उघडा पडतो. यालाच क्लिकबेट म्हणावं का? Wink
आय नो, मी गॉडफादर लिहीत नाहीये, पण सगळ्यांना वेळ देणं जरुरी होतं, आणि कॅरेक्टर establishment सुद्धा. आता माझ्या मते, निम्मं काम झालंय, सो स्पीड अप व्हायला हरकत नाही.
बादवे, 'वारसदार' कधी पूर्ण करणार आहेस. कधीची वाट बघतोय.
@चरपस - नक्की फीडबॅक द्या Lol धन्यवाद
@ रुपाली - सॉरी, आणि धन्यवाद!
@पद्म - धन्यवाद!
१. हा भाग लिहिताना कित्येकदा मोहन लिहिलं गेलं. मेबी या कथेच्या नायकाचं नाव आधी मोहन ठेवायचं होतं, पण तो पाटील मध्ये वापरला गेला. असो. टायपो दुरुस्त केला आहे.
२. To be honest, मी त्याला बदलायला पुरेसा वेळ आणि भाग (१५ दिवस) दिले आहेत असं मला वाटतं. जर मी कसा बदलला यावर अजून वेळ घालवला, तर कथा रटाळ होईल.
पण येस. हा फक्त acceptance आहे बदलाचा... अजून अनेक बदल बाकी आहेत. सो स्टे ट्युन्ड. धन्यवाद.
@च्यवनप्राश - धन्यवाद!
@प्रवीण - धन्यवाद!
@लावण्या - धन्यवाद!
@सुखी - धन्यवाद!
@मृणाली - धन्यवाद!
@गार्गी - धन्यवाद! पाटीलची आठवण आहेच. लिहावा का पुढचा भाग? Wink
@आबासाहेब - धन्यवाद
@सुची - धन्यवाद

मध्यंतरी तब्येत बरी नसल्याने गॅप पडला. Now I'm fine.
आता दररोज नातीगोती, पाटील नाहीतर अज्ञातवासीचा भाग येईल याची अपेक्षा करतो.
आणि तूर्तास, मोक्षचा सध्याचा वाड्यातील मुक्काम समाप्त!!!

तुमच्या एका टायपोमुळे डोकं भंजाळून गेलं.. पाटील vs पाटील परत वाचायला सुरु केली होती. बरं झालं क्लिअर केलंत

मागे एकदा तुम्ही बोलले होते की वर्षभर चालतील दोन्ही कथामालिका... त्यामुळे हा शेवटचा भाग नसेल याची खात्री होती.....+111
पण तरीही आधी स्क्रोल केलं मी : फिदी:
छान झालाय हा पण भाग. Happy

Pages