ए ऍसिडिटी,तुमने भी बहोत कुछ सिखाया - भाग ३

Submitted by me_rucha on 27 November, 2020 - 06:03

तर सगळा रिपोर्टचा जथ्था घेऊन मी डॉक्टरांना भेटले. त्यांनी सगळे रिपोर्ट काळजीपूर्वक तपासले. सगळेच रिपोर्ट नॉर्मल होते. त्यांनी सांगितलं की तुमच्या शरीरात कोठेही बिघाड नाहीय. म्हणजे लिव्हर वर सूज आलीय किंवा esophaugus मोठा आहे किंवा यातलं काहीही नाहीय. मग काय झालय? तर तुमच्या शरीरात काहीतरी functional प्रॉब्लेम झालाय. म्हणजे कदाचित माझी नर्व्हस सिस्टिम उद्विपीत होऊन माझ्या मेंदूला उलट्या करण्याचे चुकीचे संकेत देत होती म्हणून माझ्या शरीरात काहीही तसा बिघाड नसताना हा त्रास सुरु झालेला. म्हंटल बर ठीकय. मला वाटलं आता इतक्या टेस्ट्स झाल्या आहेत आता डॉक्टर औषधं देतील आपल्याला दोन एक महिन्यात बर वाटेल आणि आपण पूर्वी सारखं खाऊ शकू वगैरे.

डॉक्टरांनी औषधं दिली. खरंतर मी दोन वर्ष त्यांची ट्रीटमेंट घेतली त्यातली पहिले दोन महिने हे ट्रायल अँड एरर मध्ये गेले. हे घेऊन पहा ह्याने बर वाटेल मग त्याने माझा त्रास काही थांबलेला नसायचा मग मी परत त्यांच्याकडे मग परत हे घेऊन पहा ह्याने बर वाटेल असं करत करत दोन महीने योग्य औषधं मिळायला गेले. त्या डॉक्टरांनी मला अँटीडिप्रेसंट्स आणि अँटासिड्स दिले होते.
अँटिडिप्रेसंट माझ्या नर्व्हस सिस्टिम ला शांत करण्यासाठी आणि अँटासिड्स अर्थात ऍसिड निर्माण न होण्यासाठी. हे त्यांनी मला कधीही समजावून सांगितलं नाही. हे मी स्वतः मिळवलेलं त्यातलं थोडंबहुत ज्ञान आहे.
एव्हाना ह्या गोळ्यामुळे दुपारच्या जेवणाची प्रगती नारळपाण्यावरून ज्वारीच्या पिठाचा उपमा, क्वचित तांदूळ आणि मूग डाळीची पेज, कधीतरी छोटी भाकरी इथपर्यंत झाली पण उलट्या काही पूर्णपणे थांबल्या नव्हत्या. मी गोळया सुरु झाल्यानंतर थोडया दिवसांनी पोळी भाजी खाल्ली पण परत त्रास झालाच. आधी 5 व्हायच्या तर आता 3 क्वचित प्रसंगी 4ही. वरतून भरीस भर म्हणून खूप कडक पथ्य करायला लगे.
म्हणजे टोमॅटो नाही, हरभरा डाळीचे पदार्थ नाही जसं की भजे, पुरणपोळी, बटाटे वडा, फरसाण सुद्धा नाही. मटकी नाही, राजमा नाही. इतकंच काय गोड वगैरे खाल्लं किही त्रास व्हायचं.
गोड खाणं म्हणजे माझ्या आवडीचा भाग पण नाही खाऊ शकत होते मी . डॉक्टराना हे सगळं सांगितल्यावर ते म्हणायचे खा सगळं काही होतं नाही. आता किती त्रास होते हे सांगूनही हे सांगितल्यावर काय बोलणार?
ह्यातच नवऱ्याला U. K. ला एक वर्षासाठी जायची संधी आली . माझी ही सगळी अवस्था बघून तो नाही म्हणायला लागला. पण त्याला ती संधी मिळण्यासाठी त्याने किती कष्ट घेतले आणि त्याला किती वाट पाहावी लागली हे मी जवळून पाहिलं होतं म्हणून मी त्याला सांगितलं तू जा. माझ्या आई बाबांनीही त्याला सांगितलं आम्ही हिच्याकडे बघू तुम्ही आलेली संधी सोडू नका. मी तिकडे तश्या
अवस्थेत जाण शक्य नव्हतं. एकतर माझी ट्रीटमेंट सुरु होती आणि दुसरं म्हणजे माझ्या तश्या अवस्थेत 18-20 तासांचा विमान प्रवास, तिकडचं हवामान ह्यात माझी तब्येत खालवण्याची शक्यता जास्त होती. म्हणून मी आणि मुलगा पुण्यात आणि नवरा तिकडे असं राहायच ठरवलं.
नवरा तिकडे एकटा गेला. मला थोडाबहूत फरक वाटायचा. खरंतर मी खाण्यापिण्यावर आलेल्या बंधनांमुळे जास्ती वैतागले होते. रोज तेच तेच खाणं नकोस व्हायचं. सगळे सणवार मी मोजकच किंवा काहीच न खाता साजरे केले. आणि दुसरं म्हणजे त्या अँटीडिप्रेसंट्स मुळे भयानक झोप यायची.
म्हणजे मला स्वतः ला आश्चर्य वाटायचं मी इतकी झोपायचे. मुलाला शाळेतून दुपारी आणला की 3 ते 5 आणि रात्री परत 9:30 लाच मला झोप यायला सुरवात व्हायची.अँटीडिप्रेसंट्स मुळे वजनही वाढायला लागलं. आधी तोळा मासा दिसणारी मी ह्या गोळ्यामुळे थोडीशी भरलेली दिसतं होते. ते बघून सगळे म्हणायचे "अरे व्वा तब्येत सुधारली वाटत." पण खरी परिस्थिती तर माझी मलाच ठाऊक होती. माझ्या मूळ त्रासातून मला रिलीफ मिळाला नव्हता.
क्रमश :

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वाचतेय.
गोड खाणं म्हणजे माझ्या आवडीचा भाग पण नाही खाऊ शकत होते मी . >>या ऐवजी ' पण खाऊ शकत नव्हते मी' असं कराल का. चुकून झालं असेल ते लिहिता लिहिता.
किती सोसलत हो तुम्ही!
बरेच डॉ कुठली गोळी कशासाठी हे नीट सांगतच नाहीत. हे अगदी खरं आहे.
पुढच्या भागाची उत्सुकता आहे.

बापरे कठीण काळ होता.
अँटी डिप्रेसंट्स द्यायची गरज नव्हती असं वाटतं.
तुम्ही ब्ल्युलिमिक आहात, उलट्या मुद्दाम काढल्या जातात अशी परिस्थिती अजिबात नव्हती.

मी_रुचा तुम्ही खूप सहन केलंत.. मलाही ऍसिडिटी चा त्रास आहे..पण फार नाही. अंडी, गव्हाचे पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स खाल्ले कि ऍसिडिटी होते. मी हे सारे पदार्थ खूप कमी खाते.. आणि झाली तरी मी कधी कधी दुर्लक्ष करते. पण तुमचा त्रास बघून असे वाटतंय कि मी ऍसिडिटीला हलक्यात घेऊ नये..