थंडीत त्वचेची काळजी

Submitted by मी अमि on 5 November, 2009 - 00:30

माझी स्किन हिवाळ्यात कोरडी होते. पण जर moisturiser वापरले तर चेहरा तेलकट होतो. घरगुती उपायांनी त्वचेचा कोरडेपणा जाऊन चेहरा तेलकट दिसणार नाही, असा काही लेप इ. कुणाला माहित आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेहेऱ्यावर खोबरेलाने दहा मिनिटे मसाज करावा. पिकलेल्या केळ्याचा वरचा भाग चमच्याच्या कडेने अलगद खरवडून त्यातून दोन छोटे चमचे इतका मऊ गर एका ताटलीत घ्यावा. त्यात तीन चार थेंब लिंबाचा रस आणि तीन चार थेंब खोबरेल व्यवस्थित मिसळून ह्या मिश्रणाचा लेप चेहेऱ्यावर लावावा. हातापायांच्या त्वचेवरही लावता येईल. पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाकावा. जरूर वाटल्यास सौम्य साबण/ फेस वॉश वापरावा. खोबरेलाऐवजी ऑलिव्ह ऑइल सुद्धा वापरता येईल. अधिक चांगले.

मेथी दाणे, तूर डाळ, चणा डाळ, गवला कचरा, बावची, कडू जिरे, खसखस, बदामाची साले, आंबेहळद, हळकुंडे हे जिन्नस स्वच्छ करून बारीक कुटावे अथवा दळावे. वस्त्रगाळ करावे. तेलकट त्वचा असेल तर पाण्यात कालवून चेहेऱ्यावर लावावे. कोरडी त्वचा असेल तर दोन तीन बोट चमचे दूध घेऊन त्यात मिसळून लावावे. हे उटणेच आहे पण चोळायचे नाही. लेप लावायचा. पंधरा मिनिटांनी काळजीपूर्वक धुवावे. हळदीचे डाग कपड्यांवर पडू शकतात.

कुंकुमादी तेल फारच महाग आहे आणि लावल्यावर चेहऱ्याला केशर पेढा फासून लावलाय की काय असा वास येतो Proud तुनळीवरचे विडिओ बघून घरीच बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. Screenshot_20201112-165617.png
जसवंद तेल आणि बदाम तेल आहे घरी. गुलाबाच्या पाकळ्या टाकणार नाही. खोबरेल तेल साधंच वापरणार, कोल्ड प्रेस नाही माझ्याकडे.

जिद्दू तुमचे स्किन केअर रुटीन लिहा प्लीज. माझी स्कीन मिक्स आहे, कधी कोरडी, कधी तेलकट. मला पतंजली क्रीम चा खूप फायदा झाला होता, 2 वर्ष वापरली, पण नंतर चेहरा परत खराब. त्यांनी फॉर्म्युला बदलला असावा. त्यानंतर मला अजून एकही उपयोगी क्रीम किंवा रुटीन मिळालं नाही.

कुंकुमादी तेल उलट सर्वांत स्वस्त वस्तु आहे. मी avp कोईम्बतूर चा ५मिली चा एकच रोलऑन दीड महिन्यापासून वापरतो आहे. कोट्टाक्कल ची बॉटल होती आधी पण त्यात हातावर घेऊन मग चेहऱ्यावर एकेक ठिपके देत बसावे लागे जे काम रॊलॉनमध्ये सोपे होऊन जाते. वासपण फार येत नाही मला एवढा. ते तेल बनवण्याची एक एक विशिष्ट पद्धत असते जी घरी जमणे अवघड आहे.
केरळचे प्रोडक्टस खात्रीशीर आयुषारोग्यम साईटवर मिळतील. मुंबईत दुकान आहे त्यांचे. ऍमेझॉन/फ्लिपकार्टवरून कोणतेही स्किन प्रोडक्टस/पर्फुम्स घेऊ नये कारण बऱ्याचदा डुप्लिकेट मिळतात. लोकं डिस्कॉउंटच्या नादात फसतात. नायकावरपण महागडे कोरियन ब्युटीप्रोडक्टस डुप्लिकेट मिळतात. इथले बरेच प्रोडक्ट रिव्यु फेक असतात.
ट्युलिप, पतंजली क्रिम म्हणजे कोणती? अँटीएजिंग वर आता बराच रिसर्च झालाय तर त्याचा थोडाफार अभ्यास करून ते कन्टेन्ट असणारे आणि डर्माटॉलॉजिस्टने सुचवलेले प्रोडक्टस वापरून पाहतो मी. भारतीय ब्रॅण्ड्स आयुर्वेद आणि ऑल न्याचरलच्या नावाखाली पब्लिकला उल्लू बनवत आहेत. केमिकल प्रोडक्टस म्हणजे वाईट असा एक मोठा गैरसमज आहे आपल्याकडे. सिप्ला.इप्का, रेड्डी वगैरे औषध कम्पन्यांचे स्किन प्रोडक्टस हे कॉस्मेटिक ब्रॅण्डपेक्षा कैकपटीने चांगले असतात पण ते शक्यतो स्किनवले डॉक्टर आणि वापरणारे पब्लिक यांच्यातच राहतात. जाहिरातबाजी नसल्याने माहित होत नाही जनरल पब्लिकला. शिवाय चांगले प्रोडक्टस स्त्री-पुरुष दोन्हींवर काम करतात. दोघांसाठी वेगळे प्रोडक्टस फक्त मार्केटिंग गिमिक आहे.
रुटीन सोपे आहे. सकाळी उठल्यावर सेरावे क्लिन्सरने रात्री फासलेला माल साफ करतो. मग अंघोळ-मॉयस्चरायजर -गुलाबपाणी/टोनर- व्हिटॅमिन सिरम -सनस्क्रीन. संध्याकाळी आल्यावर सकाळी फासलेला माल मिसेलर वॉटर- क्लीन्सरने साफ करतो . मग अंघोळ-मॉयस्चरायजर -गुलाबपाणी/टोनर एवढे. रात्री झोपताना कुंकुमादी तेल आणि त्यावर रेटिनॉइड जेल - कोजीक क्रिम आणि बाकी अँटीएजिंग प्रोडक्टस आलटूनपालटून वापरतो. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटस , aha ,bha ,एक्सफॉलिएशन याचा थोडा अभ्यास करा.
मी दिलेला सबरेडिट वाचा. त्यावर थोडा वेळ घातल्यावर तुम्हला अंदाज येईल. कोणतेही प्रयोग करताना आपले स्किन बॅरिअर खराब होणार नाही याची काळजी घ्यायची. माझा फक्त मार्चपासूनचा अनुभव आहे यात आणि अजून बरेच प्रयोग करायचे आहेत. सध्या आयुर्वेदातील स्किन रेसिपीज गोळा करत असून उन्हाळ्यात ते प्रयोग चालू होतील. आहार चांगला आणि नियंत्रित ठेवतो. दर दहा दिवसांनी विरेचन घेतो.

त्याच्याबरोबर नलप्रमादी तेल पण चांगले आहे बॉडी मसाजला. त्यात तीळतेल/नारळतेल अशा दोन व्हर्जन मिळतात. सध्या थंडीत वीकेंडला दुपारी चहा झाल्यावर त्याने साऱ्या अंगाची मालिश करून तासाभराने अंघोळ करायची. मस्त चमचम करते अंग. त्यात हळद जास्त असल्याने सारे कपडे पिवळे होतात सो त्याची काळजी घ्यायची.

मुंबईत अगदी मे महिना असल्याप्रमाणे उकडते आहे, मग मे महिना समजून त्वचेची काळजी घ्यायची की कॅलेंडर बघून.

दिवाळीपासून थन्डी इकडेबी गायबच आहे तशी पण ह्या विकेण्डपर्यंत परत येईलच. सुट्टीच्या दिवशी तेल मालिशनंतर निवांत रमतगमत अंघोळीला मजा येते. बाकी आपल्या शरीराचा प्रतिसाद बघूनच ठरवावे आपले रुटीन.

पतंजलीचं एक गुलाबी क्रीम आहे, नाव नाही आठवत पण त्यात शिया बटर आहे. मी ओरिजिनल शिया बटर आणलंय पण काही फरक नाही जाणवत. मलाही स्किनच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या क्रीम चालायच्या पण सध्या भारताबाहेर असल्याने शक्य नाही. असो, प्रयोग चालूच राहतील. धन्यवाद तुमचं स्किन केअर रुटीन सांगितल्याबद्दल.

माझे BARVA चे प्रॉडक्ट आले.
मॉइश्चरायझर, लिप बाम मस्त आहे. ५००/- च्यावर असेल तर काजळ फ्री मिळतंय. ते ही मस्त आहे.

ज्यांची स्किन एकदम कोरडी आहे ते कोणता फेसवॉश वापरतात ? स्पेशली थंडीत. >>> मी दिवसात अनेकदा चेहरा धुते पण फेसवॉश फक्त दोनदा. सकाळी बेकिंग सोडा + पाण्याचे थेंब घालून किंचित पेस्ट करून आणि रात्री झोपताना बेकिंग सोडा + 2 थेंब कोकोनट किंवा ऑलिव्ह ऑइल घालून पेस्ट. स्किन फार मस्त झाली आहे.

* सोड्याने त्वचा कोरडी होत नाही. काही अपायही होत नाही. गुगल करून बेकिंग सोड्याचे बेनेफिट्स esp स्कीनसाठी, चेक करू शकता.

मी दिवसात अनेकदा चेहरा धुते पण फेसवॉश फक्त दोनदा. सकाळी बेकिंग सोडा + पाण्याचे थेंब घालून किंचित पेस्ट करून आणि रात्री झोपताना बेकिंग सोडा + 2 थेंब कोकोनट किंवा ऑलिव्ह ऑइल घालून पेस्ट. स्किन फार मस्त झाली आहे.

* सोड्याने त्वचा कोरडी होत नाही. काही अपायही होत नाही. गुगल करून बेकिंग सोड्याचे बेनेफिट्स esp स्कीनसाठी, चेक करू शकता.>>>>>>>>>>>>>>>>>>> अरे वा! नक्की हे वापरून बघते मग. कारण मला कुठलाच फेसवॉश सुट होत नाही , स्किन एरवी पण अगदी ताणल्यासारखी होते आंघोळीनंतर. थंडीत तर मी नुसत्याच गरम पाण्याने चेहेरा धुते. पण कधी मेकप किंवा आयलायनर वगैरे काढण्यासाठी काहीतरी वापरावेच लागते. मेकप वाईप्स जळजळतात. हा बेकिंग सोडा कोकोनट नक्की ट्राय करते. खूप खूप धन्यवाद मीरा.... Happy

हा बेकिंग सोडा कोकोनट नक्की ट्राय करते. >>>> Happy
वापरून बघ पण रोज नको. खरं तर रोज फेसवॉशची गरज पण नाही. अगदीच मुंबई सारखा लोकल ट्रेन प्रवास असेल तरच, नाही तर पुण्याच्या लोकांना तर रोज साबण लावण्याची सुद्धा गरज नाही. घरात AC, AC कारमधून परत AC ऑफिसमध्ये त्यामुळे चेहऱ्यावर धूळ उडतच नाही. घाम येत नसेल तर नुसती फिल्टर कॉफी किंवा फ्रुट पल्प किंवा डाळीचं पीठ + साय असं काहीतरी आलटुन पालटुन लावून अंग धुतलं तरी मस्त मऊ आणि स्वच्छ होतं. नुसत्या स्वच्छ पाण्याने 4-5 वेळेस चेहरा धुतला तरी चालतो. मी तर हातात येतात त्या सगळ्या फळांचे आणि भाज्यांचे उरलेले रस किंवा सालं चेहऱ्यावर फिरवत असते. आंबा खाल्ला फिरव साल, डाळींब सोलताना त्याचा रस सांडतो तो लाव, पपई कापली की त्याची सालं चेहऱ्यावर फिरव, अगदी टोमॅटो चिरताना त्याची वरची चकती कापतो तीसुद्धा चेहऱ्यावर फिरवते. Over the period या सगळ्याचा मस्त इफेक्ट दिसतो आहे. मी आयुष्यात 3-4 वेळेस पार्लरमध्ये फेशियल केलं असेल, पण माझ्या एज ग्रुपमध्ये माझी त्वचा सगळ्यात तरुण आहे ( ही प्रौढी नाही पण फक्त सांगण्याचा प्रयत्न आहे की काम करता करता पण त्वचेची काळजी घेता येते आणि स्वस्तात Happy )

अंजली, तुझी त्वचा जर एवढी कोरडी एडेल तर आव्हाकॅडो + ऑलिव्ह ऑइल वापरून बघ बरं. मला तर हे त्वचेसाठी मिरॅकल क्रीम वाटतं. जर शक्य असेल तर व्हिटॅमिन e ऑइल किंवा कॅप्सुल पंक्चर करून त्यातलं ऑइल पण घालू शकतो. बेबी स्किन assured Happy

koni St.Botnica che products vaparle ahet ka, specially collegen+ biotin shampoo ani Vitamin C facewash

रोज च्या वापरा साठी cetaphil मॉइश्चराइजर वापरा
380 रु चे आहे 80grm पण बेस्ट आहे रोज वापरायला. दूसरे काही लावायची गरज नाही पड़त

मी तर हातात येतात त्या सगळ्या फळांचे आणि भाज्यांचे उरलेले रस किंवा सालं चेहऱ्यावर फिरवत असते. आंबा खाल्ला फिरव साल, डाळींब सोलताना त्याचा रस सांडतो तो लाव, पपई कापली की त्याची सालं चेहऱ्यावर फिरव, अगदी टोमॅटो चिरताना त्याची वरची चकती कापतो तीसुद्धा चेहऱ्यावर फिरवते. Over the period या सगळ्याचा मस्त इफेक्ट दिसतो आहे>>>>>>>>>> अरे वा सहीच की!

मी पण मोस्टली पाणीच वापरते चेहेर्‍यावर. पण आंघोळीतून बाहेर येताना चेहेरा तसाच राहिला असा फील येतो कधी कधी Lol मसूर पीठ लावायचे आधी कधीतरी. पण पिठाने पण कोरडेपणा जाणवतो मला. पाणी कमी प्यालं जातं ओव्हरॉल माझ्याकडून ते एक कारण असेल त्वचा कोरडी होण्याचं आणि तशीही स्कीन टाईप पण कोरड्या प्रकारातच मोडणारी आहे.

आव्हाकॅडो + ऑलिव्ह ऑइल>>>>>>>> ग्रीसी फिलींग येत नाही का ऑलिव ऑईल ने.

रोज च्या वापरा साठी cetaphil मॉइश्चराइजर वापरा>>>>>>>>>> मी अवीनो वापरतेय सध्या. अन सेंटेड आहे.

याच धाग्यात वाचुन कुकमादी तैलम आणले, आयुष्यरोग्य site वरून
माझी त्वचा कॉम्बिनेशन प्रकारची आहे, त्यामूळे हिवाळ्यात कोरडी होते, काळपट पणा येतो, एरवी कपाळ हनुवटी नाक तेलकट आणि गाल कोरडे, भरपूर क्रीम्स झाली, फेस वॉश झाले काहीही उपयोग झाला नाही,
रात्री या तेलाने मसाज केला , दिवसभर स्किन छान राहिली, ग्लो आहे चेहऱ्यावर, facewash वापरला नाही .

अमेरीकेत कोण कोण ROC प्रॉडक्टसचे फॅन आहेत?? आय अ‍ॅम डाय हार्ड फॅन.
.
>>>>>>>नाही भयानक वास नाही...
चांगला वास येतो.. डर्मितिलोजिस्ट ने दिले मला...>>>>>> ओह ओके. मग वेगळे असेल मी आणलेले. फार औषधी वास होता माझ्या क्रीमला.

सेटाफील चे 2 प्रकार आहेत लिक्विड आणि क्रीम
लिक्विड ला जरा चीकू फळा सारखा वास येतो पण क्रीम ला तसा आला नाही. माझी स्किन ओवर सेंसेटिव्ह प्रकारात मोडत असल्याने मला दुसरं काही च सूट होत नाही

टॉपिकल ट्रेटक्रिम सुरु केल्यामुळे चेहरा सध्या जास्तच कोरडा पडतोय तसेच ट्रेटिनॉइनमुळे स्किन ब्यारीअर गँडायला आले होते पण शतधौत घृत वापरायला सुरु केल्यापासून बराच फरक पडला आहे हा त्रास कमी होण्यात. ट्रेटिनॉइन खतरनाक प्रकार आहे पण अँटीएजिंग साठी तोच बेस्ट ऑप्शन आहे सध्या. क्रोना धोका कमी झाल्यावर चांगल्या ठिकाणी जाऊन बोटॉक्स शॉट घेण्याचा विचार आहे. योग्य वयात वर्षातून दोनदा बोटॉक्स सुरु केल्यावरच त्याचा फायदा पुढे टिकून राहतो चेहरा तरुण राहण्यासाठी.

Pages