थंडीत त्वचेची काळजी

Submitted by मी अमि on 5 November, 2009 - 00:30

माझी स्किन हिवाळ्यात कोरडी होते. पण जर moisturiser वापरले तर चेहरा तेलकट होतो. घरगुती उपायांनी त्वचेचा कोरडेपणा जाऊन चेहरा तेलकट दिसणार नाही, असा काही लेप इ. कुणाला माहित आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज च्या वापरा साठी cetaphil मॉइश्चराइजर वापरा>> मीही तेच वापरते. CeraVe ही वापरून पाहीले पण cetaphil जास्त चांगले वाटले.

COSRX Advanced Snail 96 Mucin Power Essence (cruelty free stuff ) आणि Nature's Tattva Natural Witch Hazel हे दोन नवीन प्रोडक्ट ऍड केलेत रुटीनमध्ये

जिद्दू बोटॉक्स म्हणताय खरं. पण ते बोटुलिनीअम टॉक्साईड आहे. आणि कॉस्मेटीक कन्सल्टंट वगैरे सांगतील की it relxes your facial muscles etc but it actually paralyses your facial muscles.
आता हे बरेचजण करतात वगैरे सगळं मान्य. पण राहवलं नाही म्हणून लिहीतेय.
तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल तर Go Ahead.

माझ्याकडे एक्सपायरी सम्पलेल्या बऱ्याच ग्रीनटी बॅग्स पडल्या होत्या. फेकून द्यायला बरे वाटेना म्हणून सध्या फेसमास्क बनवतोय दही आणि बाकी आयुर्वेदिक मटेरिअल मिसळून. माझे नेहमीचे रुटीनबी चालूच असते पण याने चेहरा थोडा जास्त तुकतुकीत वाटतोय आता.

फेसमास्क बनवतोय दही आणि बाकी आयुर्वेदिक मटेरिअल मिसळून.
>>>>पाककृती देता येईल का ? नॉर्मल त्वचेसाठी चालतो का...

जिद्दु आपण pixi glow tonic वापरले आहे ना? काय आहे आपला review? Share कराल का?

आणि आपण anti aging साठी काय use करता?

Kumkumadi tailum कुठले घेऊ? Brand कुठला?

कधी पासून मलाही स्किन केअर रूटिनचा धागा काढायचा आहे.. पण हा धागा आहे तर इथेच मी सध्या फॅालो करत असलेले स्किन केअर रूटिन आणि प्रॅाडक्ट्स टाकेन

Filmy, मला आत्ता कोरियन स्किन रूटिनबद्दल सगळं आठवत नाहीए.. पण जवळपास १० स्टेप्सचं रोजचं रूटिन असतं.. त्या सगळ्याच नाही पण बऱयाचश्या स्टेप्स मी माझ्या स्किनकेअर रूटिनमधे आणल्यात. सगळ्याच स्टेप्स एकाच वेळेस introduce नाही केल्या..एका वेळेस एकच प्रॅाडक्ट लावून बघितलं.. काही ब्रेकआऊट्स किंवा रिॲक्शन झाली नाही तेव्हा हळूहळू दुसरे प्रोडक्ट्स ॲड करत गेले.

माझा स्किन टाईप - combination skin + textured skin + open pores

मॅार्निंग रूटिन -
नाईट स्किनकेअर रूटिनमधे मी डबल क्लिंसिंग करत असल्याने मॅार्निंग स्किनकेअर रूटिनमधे मी फक्त एकदाच क्लिंसिंग प्रोसेस फॅालो करते
1. Cleansing/face wash- cetaphil cleanser (ह्याने चेहरा कमीतकमी २० सेकंद क्लिन करावा आणि पाण्याने धुवावा)
2. Ice roller for face - Amazon वर बरेच ॲाप्शन्स आहेत. फ्रिझरमधून काढून दोन तीनदा संपूर्ण चेहऱ्यावर फिरवावं
4. Treatment - niacinamide 10% (ONE THING) ह्याने बराच फरक पडला .. हे अगदी पाण्यासारखं असतं त्यामुळे चेहऱ्यावर लावल्यानंतर ३० सेकंद जाऊ देऊन पुढचे लोशन लावावे. पुढचे लोशन ह्यासाठी म्हटलंय कारण ज्यांना पिंपल्स किंवा C vitamin serum लावायचे असेल तर ते ह्या नंतर लावावे.. मला पिंपल्सचा त्रास नाही त्यामुळे मी niacinamide लावल्यानंतर Moisturiser लावते.
5. Moisturiser - Olay total effects (हे मला गिफ्ट मिळालेलं म्हणून वापरून बघितलं.. चांगलं आहे पण संपलं का थोडं रिसर्च मारून नवीन ट्राय करणार आहे)
6. Sunscreen - La Roche-Posay SPF 50 (tinted mineral) - Moisturiser नंतर Sunscreen लावणंही गरजेचं.. मी जे Olay चे Moisturiser वापरते त्यात SPF 20 आहे त्यामुळे La Roche-Posay SPF 50 Sunscreen मी फक्त बाहेर पडण्याआधी लावते. अजून एक म्हणजे मी कधी फाऊंडेशन वापरत नाही पण हे tinted Sunscreen जे फाऊंडेशन लावतात त्यांच्यासाठी एक छान रिप्लेसमेंट ठरू शकेल.

नाईट रूटिन -
1. इथे डबल क्लिंसिंग फॅालो करते. पहिल्यांदा ॲाईल बेस्ड क्लिंसिंग वापरून चेहरा धुते आणि नंतर नेहमीचं cetaphil cleanser वापरून चेहरा धुते- सनस्क्रिन किंवा इतर मेकअप काढण्यासाठी डबल क्लिजिंग मस्ट आहे. Oil based cleaning- Clinique चे take the day off (मला हे प्रॅाडक्ट भयंकर आवडलंय)
2. डबल क्लिंसिंग नंतर plum चे night gel लावते.

वरच्या स्टेप्स व्यतिरिक्त आठवड्यातून एकदा चेहरा धुताना माईल्ड स्क्रबिंग करते.
लवकरच eye cream ची स्टेपही मॅार्निंग रूटिनमधे ॲड करणार आहे. eye cream फार महाग असतं म्हणून आता पर्यंत टाळत होते पण आलिया भट आणि इतर सेलिब्रिटीजचे स्किनकेअर रूटिन्स बघून वाटले की eye cream ॲड करणं गरजेचं आहे. (आलिया भटचा स्किनकेअर रूटिन - https://youtu.be/xe_D9Btu28M )

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हापासून वरचे रूटिन फॅालो करायला सुरू केलंय तेव्हापासूनच आठवड्यातून ४ दिवस इंटेन्स वर्कआऊट देखिल सुरू केला.. स्किनकेअर, आहार आणि व्यायाम ह्या तीन्ही गोष्टींमुळे असेल कदाचित, पण माझ्या चेहऱ्यावर आता मस्त ग्लो आला आहे.

म्हाळसा , माझं रुटीन ऑलमोस्ट असंच आहे, प्रॉडक्ट्स वेगळे. niacinamide मात्रं नव्हतं, आता वापरून बघते.
कोणी tea tree ऑईल वापरतं का? एक छोटी बाटली आहे घरात केव्हाची. कशासाठी वापरावी कळेना.

tea tree ऑईल वापरतं का? एक छोटी बाटली आहे घरात केव्हाची. कशासाठी वापरावी कळेना.>>> मी ते केसांसाठी वापरते.

माझं रुटीन ऑलमोस्ट असंच आहे, प्रॉडक्ट्स वेगळे>> ट्युलिप, तुम्ही कोणते प्रॅाडक्ट्स वापरता ते ही लिहा.
वर लिंक दिलेल्या आलिया भटच्या विडिओत ती Glow Recipe Skincare Routine Set वापरताना दिसते.. पुढच्या वेळेस हे वापरून बघणार आहे

दिवसाचा बराचसा वेळ मी हल्ली थेट उन्हात असते. चेहर्यावर कधी अलोए वेरा जेल लावते, कधी घाईत राहुन जाते. कधी चेहरा झाकुन घेते, टोपी घालते तर कधी राहुन जाते. यामुळे चेहरा, मान, पाठ व हात खुप काळवन्डले आहेत. टॅन निघण्यासाठी काय करावे? रोज महागडे सन स्क्रिन लावणे जमणार नाही.

मी ते केसांसाठी वापरते.>> sonalisl कसं वापरता ?
म्हाळसा, माझे cerave चे प्रॉडक्ट्स आहेत सध्या. सनस्क्रीन Neutrogena चे होते, ते संपत आलंय. आता दुसरे ट्राय करेन. Costco मध्ये असे सगळे सेट्स आहेत स्किनकेअरचे. महाग आहेत, आणि सूट नाही झालं काही तर पैसे पाण्यात, म्हणुन ट्राय नाही करत.

टॅन निघण्यासाठी काय करावे?>> लिंबू रस आणि टोमॅटो एकत्र करून चोळावे , कॉफ़ी बेस्ड फेसपॅक मिळतात त्यानेही टॅन निघू न जातो

रोज महागडे सन स्क्रिन लावणे जमणार नाही.>>> सनस्क्रीनला पर्याय नाही . भारतीय वातावरणात कमीत कमी SPF 50 असलेलं सनस्क्रीन वापरायलाच हवं

रोज महागडे सन स्क्रिन लावणे जमणार नाही >> इतर काहीही नाही लावलं नाही तरी चालेल पण Moisturiser आणि Sunscreen ला पर्याय नाही.. दिवसभर अगदी घरात बसत असाल तरीही ह्या दोन गोष्टी गरजेच्या आहेत असं मला जितके व्हिडिओज बघितलेत त्यावरून समजलंय.

अजून एक गोष्ट.. प्रॅाडक्टस सिलेक्ट करताना मी ते mineral based आहेत की नाही हे नेहमी बघते.. लहान मुलांचे Moisturiser घेतानाही mineral based च घेते

टॅन निघण्यासाठी काय करावे? >>
मी पूर्वी हे नेहमी करायचे - कॅाफी पावडर आणि थोडंस दूध किंवा कॅाफी पावडर आणि मध - मिक्स करून पेस्ट बनवायची आणि चेहऱयावर १०-१५ मि ठेवायची. हे आठवड्यातून ४-५ वेळा तरी करावं लागतं

<<<टॅन निघण्यासाठी काय करावे? >>

Tried and tested formula... एक चमचा दही आणि 10-12 थेंब लिंबू रस एकत्र करून चेहरा, मान, हात यावर लावून, थोडा मसाज करून 10 मिनीटात धुवुन टाकावे. 2-3 दिवस केले तरी खूप फरक पडेल.

मी सध्या ममाअर्थ चे सन्स्क्रीन वापरत आहे. चांगले आहे . न्युट्रोजीना हायड्रा जेल जास्त चांगले आहे पण.

माझी स्किन सेन्सिटिव्ह टाईप ची आहे. मी अत्यन्त इग्नोरण्ट होते स्किन बाबत , बरेच फेस वोश वापरले (कमीत कमी २५ ३० प्रकारचे, आयुर्वेदिक, रामदेव बाबा, cetaphil lakme , एव्हर युथ असे ) स्किन कॉम्बिनेश टाईप मधील असल्याने कोणताही फेस वॉश सूट होत नव्हता. ३५ मध्ये ageing दिसायला लागले , youtube पाहून पण प्रयोग करायचे , सनस्क्रीन किंवा इतर काही वापरत नव्हते . स्किन अतिशय damage झाली. शेवटी स्किन स्पेसिलीस्ट दाखवले तिने अतिशय चांगला फेस वोश जो clinically proven आहे तो दिला . १ वर्ष झाले वापरात आहे स्किन बऱ्यापैकी रिकव्हर झाली , एक सिरम पण आहे जे रात्री वापयरायचे व्हिटॅमिन सी चे. माझे एकच सांगणे आहे , जे सर्वाना लागू होते ते आपल्याला लागू होईल असे नाही. त्यामुळे कोणतेही प्रॉडक्ट वापरताना काळजी घ्या

अ‍ॅक्ने पिंपल येऊन गेल्यावर जे काळे डाग पडतात ते जातात का कधी? अ‍ॅट लिस्ट फिक्के होण्यासाठी काय करावं? मला गेल्या इतक्या वर्षात कद्ध्ही आले नव्हते आता बहुतेक हार्मोनल इम्बॅलन्स मुळे सतत हनुवटीवरच येत राहिलेत आणि डाग पडतायत.

अ‍ॅक्ने पिंपल येऊन गेल्यावर जे काळे डाग पडतात ते जातात का कधी? अ‍ॅट लिस्ट फिक्के होण्यासाठी काय करावं?>> बरेच क्लिनिक्स peeling treatments देतात .. अमेरिकेतलं माहित नाही पण ठाण्यात त्वचा मधे हि ट्रिटमेंट आहे.. माझं पूर्वी एक मोठं ॲक्सिडंट झालेलं.. चेहऱयावर, हातापायांवर जखमांनंतरचे डाग होते.. त्यावर लेझर आणि peeling treatment घेतलेली.. चेहऱयावरचे डाग दोन-तीन सेटिंग्जमधे कमी झाले होते.

धन्यवाद मैत्रिणीनो, सनस्क्रिन लावायला हवे हे कळतेय, बघु कसे जमतेय ते. टॅन काढायचे उपाय मात्र लगेच करुन पाहते.

Pages