गर्ल्स कॅन नॉट प्ले आबादुबी ! बॉईज कॅन नॉट डू शिवणकाम !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 November, 2020 - 16:50

गर्ल्स कॅन नॉट प्ले बास्केटबॉल !

जेव्हा पहिल्यांदा हे ऐकले तेव्हा हसायला आले. कारण मुलींशी अशीच चिडवाचिडवी खेळायचे वय ते. त्यात शाहरूख आपला बालपणीपासूनचा क्रश. तो जे बोलेल तो आपला डायलॉग, आणि मग याची मालिकाच सुरू झाली. गर्ल कॅन नॉट प्ले फूटबॉल, गर्लस कॅन नॉट प्ले क्रिकेट, गर्लस कॅन नॉट प्ले कबड्डी.. लंगडी… खोखो. पत्ते, गोट्या. आबादुबी, वगैरे वगैरे काहीही शब्द घालून उगाच मुलींना चिडवणे सुरू झाले…. वयच होते ते तसे करण्याचे..

पण गर्लस कॅन प्ले विषअमृत ! आणि गर्लस कॅन प्ले लपाछुपी!
हे विष-अमृत आणि लपाछुपी हे खेळ आमच्या ईथे भयंकर हिट. कारण हेच दोन खेळ होते जे मुलेमुली एकत्र खेळायचे.

तर ते एक असो,
शारीरीक क्षमतेचा विचार करता ओवरऑल कित्येक मैदानी खेळात मुलांपेक्षा मुली मागे असतात असे म्हणू शकतो.

पण मला वाटते शारीरीक क्षमता हे एकच कारण नसते. कारण बॅडमिंटन वा टेनिस हे देखील कमालीचे दमछाक करणारे खेळ मुलींना आवडीने खेळताना पाहिले आहे. किंबहुना बॅडमिंटन तर आमच्याकडे मुलीच जास्त खेळायच्या.

पण त्याचवेळी कॉलेजला असताना डिपार्टमेंटची मुलींची क्रिकेट टिम बनवायला आम्हाला किती कष्ट पडायचे त्या गोड आठवणी आजही ताज्या आहेत. अकराची टीम, त्यातल्या सहाजणी चटकन मिळून जायच्या उरलेल्या पाच मुली त्या आधीच्या सहा मुलींसाठी हातापाया पडून गोळा कराव्या लागायच्या. फूटबॉलची टीम तर कधीच बनली नाही.

कारण मुळातच या काही खेळांची मुलींना तितकीशी आवड नसणे
जी आवड मुलांमध्ये उपजत असते.
अन्यथा या क्रिकेटवेड्या देशात क्रिकेट खेळो न खेळो पण बघणारे करोडो आहेत, आणि त्यावर तावातावाने चर्चा करणारेही लाखो आहेत. पण मुलींमध्ये हे प्रमाण फारच नगण्य. आणि ते देखील मुलामुलींचा एकत्र ग्रूप असेल तरच. अन्यथा निव्वळ मुलींच्या ग्रूपमध्ये मी कधी क्रिकेटची चर्चा ऐकलीच नाही. (आता प्लीज तू कुठे ऐकायला गेलेलास विचारू नका, ईंजिनीअरींगची सात वर्षे माझी अश्याच ग्रूपच्या आजूबाजूला घुटमळण्यात गेली) नाही म्हटल्यास तो राहुल द्रविड काय क्यूट दिसतो हे कानावर पडायचे, पण त्याला मी क्रिकेटची चर्चा मानत नाही.

आजही ऑफिसातील महिला बघतो. मुलींच्या आवडी, गप्पा, छंद, त्यांचे बोलण्याचे, गॉसिपिंग करायचे विषय मुलांपेक्षा वेगळेच असतात, त्यांना नटायची, छान दिसायची, शॉपिंग करायची आवड उपजतच असते. ते आपले विणकाम शिवणकाम वगैरे गोष्टी जमवायचे झाल्यास स्त्री पुरुष दोघेही करू शकत असले तरी एखाद्या पुरुषापेक्षा एखादी स्त्रीच लोकरीचे झबले वगैरे विणताना दिसण्याची शक्यता जास्त असते. या आवडी असतात, हे छंद असतात, या गोष्टी काही स्त्री पुरुष असमानतेने लादलेल्या नसतात.

मुलांच्या आवडीनिवडीबाबतही अशीच एक लिस्ट बनवता येईल.

तर हाच आपला धाग्याचा विषय आहे.

जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल की स्त्री पुरुष यांच्या आवडी देखील नैसर्गिकरीत्या भिन्न असू शकतात ज्या पुरुषप्रधान संस्कृतीने त्यांच्यावर लादलेल्या नाहीत तर ती लिस्ट ईथे बनवा.

तर ज्यांना असे काही नसते हे वाटते, त्यांनी ईथली लिस्ट खोडून दाखवा Happy

जे छंद दोघांत कॉमन असतात, असू शकतात, उदाहरणार्थ गाणी ऐकणे, चित्रपट बघणे, पुस्तक वाचणे वगैरे तर त्यांना या धाग्यापासून दूर ठेवा.

जर पाणीपुरीवर पुरुषांपेक्षा महिला जास्त तुटून पडतात असे निरीक्षण असेल तर जरूर नोंदवा Happy

धागा स्त्री पुरुष दोघांसाठी समसमान खुला आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@मानव :
जेव्हा आपण विस्तृत/ढोबळ जनसमुहाचा विचार करत असतो (स्त्री/पुरुष किंवा युरोपिअन/आफ्रिकन इ.) तेव्हा (एक युरोपियन मुलगा आणि एक भारतीय मुलगा) अशी वैयक्तिक उदाहरणे विचारात घेणे योग्य नाही. मुळात अश्या जनसमुहांमध्ये शारिरीक क्षमतांमधला फरक नैसर्गिक आहे हे मान्य केलं की त्या माहीतीचा उपयोग कसा करता येईल याचा विचार होऊ शकतो.

उदाहरण १:
जगभरातल्या मुतारींमध्ये पुरुषांसाठी उभ्याने लघवी करता येईल अशी सोय असते.

उदाहरण २:
मुंबईतल्या लोकल ट्रेन्स मध्ये महीलांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये वरती लटकत असलेल्या हॅन्डल्सची उंची साधारण ६ इंचांनी कमी असते. (निदान १५ वर्षांपुर्वी तरी असायची)

उदाहरण ३:
गुरखा लोकांमध्ये उंचावरच्या विरळ हवेतही काम करायची क्षमता असते. सैन्यामधल्या गुरखा पलटणीला पाकीस्तानच्या राजस्थान मधल्या सीमेवर तैनात करण्यापेक्षा सियाचेनमध्ये तैनात करणे जास्त संयुक्तिक ठरेल.

वर्णद्वेषाच्या भितीमुळे असे "निर्भेळ" जनसमुह फारसे आढळत नाहीत. आणि ही वर्णद्वेषाची भिती योग्यच आहे. कारण असे समुह बनणं/बनवणं हा एक निसरडा रस्ता आहे. वैयक्तिक पातळीवर मात्र मी तुमच्याशी सहमत आहे. तेव्हा सरासरीचा विचार करण्यापेक्षा त्या विशिष्ट व्यक्तींच्या क्षमतेचा विचार करणे योग्य ठरते.

मृ. नेटफ्लिक्लवर ‘स्पिरिट रायडिंग फ्री’ बघ. आवडेल.
>>>>>>>>>>>

प्राईमवर आहे का? नेटफ्लीक्स नाहीए माझ्या कडे.. अमेझौन प्राईम आहे.

व्यत्यय हा धागा कुठल्या धाग्यावरून निघालाय हे तुम्हाला ठाऊक आहे. मी समानतेच्या म्हणजे रोजच्या जीवनातल्या, घर चालवण्या बाबतच्या संदर्भात ते लिहिले आहे.
त्यात अशी कुठले कामे आहेत जी कुणी करावीत हे ठरवताना आपण स्त्री पुरुष यांच्यातील नैसर्गीक सरासरी अथवा मूलभूत फरकांचा विचार करायला हवा?
त्यात अशी कुठली कामे आहेत ज्यात आपली शारीरिक क्षमता पणास लागु शकते? अथवा मानसिक क्षमता पणास लागू शकते? अथवा अशी काही कौशल्ये लागतात जी निसर्गतः एका जेंडरला लाभलेली आहेत?

त्यात अशी कुठली कामे आहेत ज्यात आपली शारीरिक क्षमता पणास लागु शकते? अथवा मानसिक क्षमता पणास लागू शकते? अथवा अशी काही कौशल्ये लागतात जी निसर्गतः एका जेंडरला लाभलेली आहेत?
>>>>>>

दिवाळीसाठी पडदे अल्टर करून आणयचेय. मगाशीच बायको मला बडबडली, तुझ्या भरवश्यावर राहिले तर काही काम नाही होणार. जर जड नसते तर मीच करून आणले असते. थोडक्यात मी आमच्या घरातील हमाल आहे. बरेच घरात अशी परीस्थिती असू शकते. की वजन उचलायचे काम पुरुषांवर सोपवले जाणे.
तसेच आमच्या घरात स्टूलावर चढून काही काढायचे असेल तर वजन प्लस बॅलन्स अशी दुहेरी कसरत मलाच करायला लावतात. मग मी ऑफिसचे काम करत असलो वा अगदी मृतावस्थेत झोपलो असेल तरी उठवतात.

आता तुम्ही लोकं म्हणाल, आमच्या घरच्या बायका आहेत स्ट्राँग, हि सगळी कामे त्याच करतात. तर ठिक आहे. घाला वादाला वाद. नाहीतर तसेही काय मला टीआरपीच हवा असतो ना Happy

अरे हो, सध्या कोरोनामुळे पार्सल घरी येत नाही. खाली जाऊन आणावे लागते.
कारण तर अफाट आहे
मी काय बाप्या माणूस, घरच्या हाल्फ चड्डीत टणाटण उड्या मारत खाली जाऊ शकतो Happy

आणि रात्रीची वेळ असेल तर जा बाप्पू बनियानवर बिनधास्त .. कोण बघतेय यावेळी.
स्वतःची जायची वेळ आली की बायका घरचा ड्रेस बदलतात, केस विंचरतात, नीट नेटके दिसतोय याची खात्री करूनच खाली उतरतात.
पण आपल्याला तर आरशाचे तोंडही न दाखवता खाली पिटाळतात..

Lol
ऋन्मेष,
माझ्या घरात तरी हिच परिस्थिती आहे.. अवजड कामं मी नवर्यासाठी राखून ठेवते Lol

तुला एक युक्ती सांगतो यासाठी. छानसा स्वयंपाक शिक चवदार बनला पाहिजे हां, आणि आठवड्यातून किमान तीन दिवस तरी तू स्वयंपाक करून खाऊ घाल. बघ मग तू वर सांगितलेली कामेही बायको करू लागते की नाही.
प्रेमाने चवदार करून खाऊ घातलं की वेगळाच रोब निर्माण होतो, समोरचे आपली बरीच कामे करून देतात.

माझ्या घरात तरी हिच परिस्थिती आहे.. अवजड कामं मी नवर्यासाठी राखून ठेवते Lol
>>>>>

धिस ईज अ‍ॅबसोल्युटली फाईन
प्रत्येक घरात हेच चालते.
जर मी म्हटले की आज चहा मी करतो (बरेचदा करतो खरे तर) आणि तुम्ही स्टूलावर चढून वरचा जड डब्बा काढा. तर घरच्या महिलाच हि समानता नाकारतील Happy

आता ईथे मी वरचा डब्बा काढू शकतो यात मला शक्तीचा अभिमान वगैरे जराही नाही. कारण फारच सामान्य काम आहे ते. याऊलट आई बायको छान रुचकर जेवण बनवतात हे फार कौशल्याचे काम आहे.

@ मानवमामा
जेवण बनवणे एक झाले, आणि चवदार जेवण बनवणे हे वेगळे झाले.
ते चवदार कुठून बनवू?

जगातल्या सगळ्या स्त्रियाही काही चवदार स्वयंपाक बनवत नाहीत. ज्या घरात स्त्रिया स्वयंपाक बनवतात त्या घरात त्या जश्या बनवतात ते तसेच खावे लागते लोकांना.

मृणाली शारीरिक कष्ट टाळण्याचा मनुष्याचा स्वभाव असतो, समोरचा करतो म्हटलं की त्यावर ढकलतो.
घरी असे स्टूलावर चढ, वरचे काही काढून दे असे काम करणारे पुरुष सुद्धा ऑफिसमध्ये असली कामे इतरांंकडून करून घेतात, स्त्री कामगार असल्या तरीही.

100

ते चवदार कुठून बनवू? >> सोपे आहे.
युट्युब चॅनल्सवरील इन्स्ट्रक्शन्स जरी फॉलो केले ना तरी छान स्वयंपाक बनतो. मी काही व्हिडिओज शेअर करेन, बाकी लोकही करतील. काही स्त्रिया / पुरुष नसतील बनवत चवदार आपण त्यांची कशाला, चांगली उदाहरणे घायची.

मुलगा-पुरुष्/मुलगी-स्त्री असा भेदभाव न करता वेगवेगळ्या गोष्टींची ओळख करुन द्या, त्या गोष्टींशी मैत्री करण्यासाठी निकोप वातावरण उपलब्ध करुन द्या. त्यातले काय निवडायचे ते त्या व्यक्तीला ठरवू द्या. पारंपारिक चौकटीच्या बाहेरची निवड असेल तर सहज सामावून घेतले जावे यासाठी प्रयत्न करा. कारण तुम्ही घरात भेदभाव करत नसाल तरी बाहेरचे जग भेदभाव करु शकते, पारंपारिक चौकट पाळण्याचा आग्रह धरु शकते. जसा सहभाग वाढत जाईल तसे हळू हळू चौकटही अंधुक होत जाईल. कुठलीही कला, छंद हे आपले आयुष्य समृद्ध करतात. पालक म्हणून आपले काम ही समृद्धी वाढवणे हे आहे. भरतकाम, शिवणकाम यासारखी कौशल्ये पुरुषांसाठी उपजिविकेची साधने म्हणून योग्य वाटत असतील आणि केवळ छंद म्हणून त्याकडे बघणे हे चेष्टेचा विषय होत असेल तर त्याचा अर्थ आपण त्यांना एक प्रकारच्या सकारात्मकतेपासून वंचित करत आहोत. कुणाला तणाव कमी करायला बास्केटबॉल उपयोगी पडेल तर कुणाला जॉगिंग. कुणी सुतारकामात रमेल तर कुणी विणकामात. यातील काही गोष्टींच्या बाबत बेसिक लाईफ स्किल म्हणून आवश्यक आणि नंतर आवडल्यास पुढे छंद म्हणून , कदाचित उपजिविकेचे साधन / मनी सेविंग स्किल असेही घडू शकते. पारंपारिक चौकट आपली व्यक्ती म्हणून वाढ खुंटवत नाही ना, एखाद्या निखळ आनंदापासून आपल्याला वंचित करत नाही ना हा विचार महत्वाचा.

माझा मुलगा गाड्यांशी खेळायचा, भातुकली नाही. मात्र याचे कारण त्याचे मुलगा असणे नव्हते तर गाडीच्या बाबतीत प्रिटेंड प्ले गरजेचा होता, कारण खरी गाडी हातात मिळणार नव्हती. स्वयंपाक घरात मात्र तो रोजच लुडबुड करत होता, खरे घटक हाताळत होता. तेच माझ्या शेजार्‍याच्या मुलाच्या बाबतीत ५ व्या वर्षी Quarter midget racing ला सुरुवात झाली. लहानशी का होईना रेस कार चालवायला मिळे. त्याला मॅटवर बसून गाड्याशी प्रिटेंड प्ले हे अजिबातच आवडत नसे. साईड वॉकवरची रिमोट कारची रेसही त्याला बोअरिंग वाटे, थोडा वेळाने त्याचा इंटरेस्ट संपायचा. नव्या ओळखीत 'मुलगा असून गाड्यांशी खेळत नाही' हे यायचे. तो रेसिंग करतो कळले की चेहरा बघण्या लायक असे.

ते चवदार कुठून बनवू? >> चवदार जेवण बहुतेकदा दोन गोष्टाींवर अवलंबून असतं.. पेशन्स आणि जेवण बनवण्यासाठी लागणाऱया गोष्टींचं योग्य प्रमाण (गणित) .. तर ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या आवडीच्याच आहेत.. आता कारणं नका सांगू ..आळस झटका आणि घुसा किचनमधे

रुकटुक खानचे पिक्चर बघुन असलेच धागे पाडले जातात आणि त्यावर कोणी काही उदाहरणं दिली की कै च्या कै प्रतिसाद दिले जातात.

कोणत्या जगात जगतात लोक्स ? आयुष्य लिमिटेड आहे, स्टिरिओ टिपीकल धागे, छंद आणि प्रतिसाद ह्यावर का वेळ घालवावा? जे आवडेल ते करावं, त्याची सार्वजनिक तोरणं कशाला लावा?

छंद आणि प्रतिसाद ह्यावर का वेळ घालवावा? जे आवडेल ते करावं,
>>>>

चटकन विरोधाभास जाणवला लागोपाठच्या दोन वाक्यात Happy

बाकी शाहरूखचे आणखी एक नाव आवडले.
रुकटुक खान Happy

Pages