गर्ल्स कॅन नॉट प्ले आबादुबी ! बॉईज कॅन नॉट डू शिवणकाम !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 November, 2020 - 16:50

गर्ल्स कॅन नॉट प्ले बास्केटबॉल !

जेव्हा पहिल्यांदा हे ऐकले तेव्हा हसायला आले. कारण मुलींशी अशीच चिडवाचिडवी खेळायचे वय ते. त्यात शाहरूख आपला बालपणीपासूनचा क्रश. तो जे बोलेल तो आपला डायलॉग, आणि मग याची मालिकाच सुरू झाली. गर्ल कॅन नॉट प्ले फूटबॉल, गर्लस कॅन नॉट प्ले क्रिकेट, गर्लस कॅन नॉट प्ले कबड्डी.. लंगडी… खोखो. पत्ते, गोट्या. आबादुबी, वगैरे वगैरे काहीही शब्द घालून उगाच मुलींना चिडवणे सुरू झाले…. वयच होते ते तसे करण्याचे..

पण गर्लस कॅन प्ले विषअमृत ! आणि गर्लस कॅन प्ले लपाछुपी!
हे विष-अमृत आणि लपाछुपी हे खेळ आमच्या ईथे भयंकर हिट. कारण हेच दोन खेळ होते जे मुलेमुली एकत्र खेळायचे.

तर ते एक असो,
शारीरीक क्षमतेचा विचार करता ओवरऑल कित्येक मैदानी खेळात मुलांपेक्षा मुली मागे असतात असे म्हणू शकतो.

पण मला वाटते शारीरीक क्षमता हे एकच कारण नसते. कारण बॅडमिंटन वा टेनिस हे देखील कमालीचे दमछाक करणारे खेळ मुलींना आवडीने खेळताना पाहिले आहे. किंबहुना बॅडमिंटन तर आमच्याकडे मुलीच जास्त खेळायच्या.

पण त्याचवेळी कॉलेजला असताना डिपार्टमेंटची मुलींची क्रिकेट टिम बनवायला आम्हाला किती कष्ट पडायचे त्या गोड आठवणी आजही ताज्या आहेत. अकराची टीम, त्यातल्या सहाजणी चटकन मिळून जायच्या उरलेल्या पाच मुली त्या आधीच्या सहा मुलींसाठी हातापाया पडून गोळा कराव्या लागायच्या. फूटबॉलची टीम तर कधीच बनली नाही.

कारण मुळातच या काही खेळांची मुलींना तितकीशी आवड नसणे
जी आवड मुलांमध्ये उपजत असते.
अन्यथा या क्रिकेटवेड्या देशात क्रिकेट खेळो न खेळो पण बघणारे करोडो आहेत, आणि त्यावर तावातावाने चर्चा करणारेही लाखो आहेत. पण मुलींमध्ये हे प्रमाण फारच नगण्य. आणि ते देखील मुलामुलींचा एकत्र ग्रूप असेल तरच. अन्यथा निव्वळ मुलींच्या ग्रूपमध्ये मी कधी क्रिकेटची चर्चा ऐकलीच नाही. (आता प्लीज तू कुठे ऐकायला गेलेलास विचारू नका, ईंजिनीअरींगची सात वर्षे माझी अश्याच ग्रूपच्या आजूबाजूला घुटमळण्यात गेली) नाही म्हटल्यास तो राहुल द्रविड काय क्यूट दिसतो हे कानावर पडायचे, पण त्याला मी क्रिकेटची चर्चा मानत नाही.

आजही ऑफिसातील महिला बघतो. मुलींच्या आवडी, गप्पा, छंद, त्यांचे बोलण्याचे, गॉसिपिंग करायचे विषय मुलांपेक्षा वेगळेच असतात, त्यांना नटायची, छान दिसायची, शॉपिंग करायची आवड उपजतच असते. ते आपले विणकाम शिवणकाम वगैरे गोष्टी जमवायचे झाल्यास स्त्री पुरुष दोघेही करू शकत असले तरी एखाद्या पुरुषापेक्षा एखादी स्त्रीच लोकरीचे झबले वगैरे विणताना दिसण्याची शक्यता जास्त असते. या आवडी असतात, हे छंद असतात, या गोष्टी काही स्त्री पुरुष असमानतेने लादलेल्या नसतात.

मुलांच्या आवडीनिवडीबाबतही अशीच एक लिस्ट बनवता येईल.

तर हाच आपला धाग्याचा विषय आहे.

जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल की स्त्री पुरुष यांच्या आवडी देखील नैसर्गिकरीत्या भिन्न असू शकतात ज्या पुरुषप्रधान संस्कृतीने त्यांच्यावर लादलेल्या नाहीत तर ती लिस्ट ईथे बनवा.

तर ज्यांना असे काही नसते हे वाटते, त्यांनी ईथली लिस्ट खोडून दाखवा Happy

जे छंद दोघांत कॉमन असतात, असू शकतात, उदाहरणार्थ गाणी ऐकणे, चित्रपट बघणे, पुस्तक वाचणे वगैरे तर त्यांना या धाग्यापासून दूर ठेवा.

जर पाणीपुरीवर पुरुषांपेक्षा महिला जास्त तुटून पडतात असे निरीक्षण असेल तर जरूर नोंदवा Happy

धागा स्त्री पुरुष दोघांसाठी समसमान खुला आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>व्यवसाय म्हणून ठिक आहे हो.
पण मी कधी ट्रेनमध्ये कुठल्या पुरुषाला लोकरीचा गुंडा घेऊन झबले शिवताना नाही पाहिले.

Sacred Games पुस्तकात एक आयेसाय एजन्ट असतो त्याला फावल्या वेळात शिवणकाम करायचा छंद असतो Lol

जनहितार्थ
Stupidity is a more dangerous enemy of the good than malice. One may protest against evil; it can be exposed and, if need be, prevented by use of force. Evil always carries within itself the germ of its own subversion in that it leaves behind in human beings at least a sense of unease. Against stupidity we are defenseless. Neither protests nor the use of force accomplish anything here; reasons fall on deaf ears; facts that contradict one’s prejudgment simply need not be believed – in such moments the stupid person even becomes critical – and when facts are irrefutable they are just pushed aside as inconsequential, as incidental. In all this the stupid person, in contrast to the malicious one, is utterly self satisfied and, being easily irritated, becomes dangerous by going on the attack. For that reason, greater caution is called for when dealing with a stupid person than with a malicious one. Never again will we try to persuade the stupid person with reasons, for it is senseless and dangerous.
Dietrich Bonhoeffer, Letters and Papers from Prison

Sacred Games पुस्तकात एक आयेसाय एजन्ट असतो त्याला फावल्या वेळात शिवणकाम करायचा छंद असतो Lol
>>

कर्रेक्ट
वेगळेपण दाखवणे हा हेतू

अरेरे.. लोकांना आबाधुबी आणि लगोरी फरक देखील माहीत नाही...
रबरी बॉल पेक्षा तो कडक प्लास्टिक बॉल ( kitkat बॉल) बेकार लागायचा.. सिझन बॉल ने खेळण्याआधी आम्ही त्या किट कॅट बॉल ने खेळायचो...

Runmesh ignored my example of common people knitting and stitching like be did Swati2 s sensible posts on another bb.
Happy

≠======≠=========
Runmesh Uwach:
हो मला कंटाळा आहे म्हणूनच धार्मिक बाबींमध्येही समानता यायला हवी. उगाच आरतीसाठी पुरुषांना वेठीस धरू नये हेच त्यातून सांगायचे होते. >>
मग सन्मान दिला, समानता आणली म्हणून ढोल का पीटत होतास रे बाबा?
आता तर तू खोटारडा पण वाटायला लागलास की!
( ये क्या घोडा चतुर घोडा चतुर? एक पे रहना)

मला कंटाळा आलाय म्हणून आरती दिली. बायको तर त्यावर हक्क नव्हता कधी म्हणजे मी महान.
मला स्वयंपाकाचा कंटाळा येतो तरी मी पास्ता करतो मी अजूनच महान.
मला पहा फुले वाहा!

मग सन्मान दिला, समानता आणली म्हणून ढोल का पीटत होतास रे बाबा?
>>>>

अरे देवा..
अहो तो ईंग्लिशमध्ये sarcasm कि काय म्हणतात तो होता.

मी असे लिहिले असते लेखात, वाह वा काय तो मान मरातब मी धन्य झालो याने. हा मान मरातब आपल्या पत्नीलाही मिळावा असे मला वाटते...
तर ती माझी महानता आणि मग मी त्या महानतेच्या फुशारक्या मारणे झाले असते.

पण लेखात स्पष्टच वर्णणासहित लिहिलेले की मला नास्तिक असल्याने कंटाळा आलेला, त्रस्त झालेलो मी. म्हणूनच तर मी शास्त्राने उगाच पुरुषावर लादलेल्या या सो कॉलड मानाचा त्याग केला. Sarcastically याला मान लिहिलेले ओ. नास्तिकाला कसले पूजेच्या मानाचे कौतुक Happy

ज्यांना खरेच त्या लेखाचा अर्थ तुम्ही म्हणता तसा लागला असेल त्यांच्यासाठी आता वेगळा धागा काढावा म्हणतो.... Sad

अरेरे.. लोकांना आबाधुबी आणि लगोरी फरक देखील माहीत नाही...
>>>>
कारण गर्ल्स कॅन नॉट प्ले आबादुबी Wink

..

रबरी बॉल पेक्षा तो कडक प्लास्टिक बॉल ( kitkat बॉल) बेकार लागायचा.. सिझन बॉल ने खेळण्याआधी आम्ही त्या किट कॅट बॉल ने खेळायचो...
>>>>

येस्स. लोकांना प्लास्टीक म्हटले की तान्ह्या बाळांचे बॉलच आठवतात म्हणून मी माझ्या पोस्टमध्ये लिहिलेले की आम्ही फुल पिच ओवर आर्म क्रिकेटही खेळायचो त्या बॉलने.

तो प्लास्टीक बॉल कडकपणामुळे हाडावर बेकार लागायचा.
रबरी बॉल जेव्हा नरम व्हायचा हवा जायची तेव्हा आम्ही त्याला आबादुबीसाठी बाजूला काढायचो. अर्थात आपापसातच खेळायचे असायचे. कमी मार पडेल तितके चांगले Happy

आमच्या वेळेस प्लास्टिक क्रिकेट बॉलस् मिळायचेच नाहीत. मिळायचे ते प्लास्टिक बॅट आणि बॉल, तान्ह्या पोरांचे.
रबरी बॉल मध्ये वेगवेगळे मिळायचे साधा टप्पे खेळण्याचा, त्यात लगोरीही खेळता यायची. त्याने आबाधुबी खेळतही असतील काही. पण त्याने क्रिकेट खेळण्यात मजा नसायची. दुसरा कडक, क्रिकेटचा बॉल. लेदर बॉलच्या आधीचा. त्याने आबाधुबीला मजा यायची. अशाच बॉलने मला एकदा चार दिवस घरी बसवले होते.
बाकी ते चट्टे वळ जखमा वगैरेचे गावी एवढे खेळ असायचे शहरी लेकरांसोबत तुलना करण्यात काही अर्थ नाही.

हे खेळ मुलांना आवडत नाहीत
ईतक्या लहान वयात सामाजिक दबाव वगैरे संकल्पना त्यांच्या डोक्यात शिरत नसतील>>माझ्याच नात्यातल्या जवळ राहणारा 7वर्षे वयाचा मुलगा आहे,माझ्या मुलीशी येतो कधी कधी खेळायला, त्याच्याकडे भरपूर प्रकारची भातुकली आहेत,तो भातुकली न कंटाळता कितीही खेळू शकतो अगदी माझी मुलगी कंटाळून जाते पण तो नाही,पण हल्ली हल्ली बऱ्याच लोकांनी अरे हा मुलींचा खेळ आहे सांगून सांगून त्याची चेष्टा करून करून तो हल्ली बंद झालाय खेळायचा पण सगळ्या समोर खेळत नाही,घरात खेळतो
सो सामाजिक दबाव समजत नाहीच मुलांना त्यांच्यावर आपोआप लादला जातोच तो,

नैसर्गिक क्षमता भिन्न असतात असं तुमचं म्हणणं आहे पण मी त्याला कौशल्ये म्हणेन,कदाचित पुरुष बाहेर शिकारीसाठी जाणार आणि बाई घरी देखरेख करणार यासाठी कदाचित आवश्यक त्या प्रकारची कौशल्ये जास्त प्रमाणात विकसित झाली असतील,पण याचा अर्थ क्षमता च नाही असं नाही,प्रजनन क्षमता आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या हार्मोन्स मुळे असणारा वेगळेपणा हाच फरक असू शकतो फक्त,

आता पुरुषप्रधान संस्कृती विकसित झाली असेल कारण कुणीतरी एकाने घरी आणि एकाने बाहेर असं विभाजन आदिमानव ने केलं असेल त्या वेळी घरी राहणं स्त्री च्या वाट्याला आलं असेल,त्यात गैर काहीच नसेल तेव्हा पण पुढे पुढे त्यात रिजिड पणा आला असेल,स्त्रीच घरी आणि पुरुषच बाहेर असं झालं असणार जस तुम्ही नवरात्र नवरंग बद्दल बोलता अगदी तसंच, स्त्री घरातच राहू शकते ,अमकी कामे तिचीच,तमकी कामे तिला जमुच शकत नाही आवडूच शकतच नाही वगैरे वगैरे असं
80टक्के पुरुष झबली तेव्हाच विणतील जेव्हा लहानपणापासून जेव्हा ती सुई ते पहिल्यांदा हातात घेतील तेव्हा त्यांना हे तुझं काम नाही असं सांगितलं जाइल, रच्याकने स्त्रियांची म्हणून सांगितलेल्या कित्येक कामांची स्त्रियांनाही आवड नसते,
विणकाम बद्दल विचारशील तर मी लेडीज डब्ब्यात सुद्धा इतक्या वर्षात एखादीच बाई विणताना पाहिली असेल Lol

तुझ्या धार्मिकतेचं सांगताना मला त्यात काही विशेष वाटलं नाही,माझा नवरा आणि सासू सुद्धा नास्तिक आहेच पण सासरे धर्मीकच आहे खूप,
वेळ लागेल पण हळूहळू यातही बदल होईलच,हल्ली बायका पूजा सांगतात तसं हळूहळू सत्यनारायण पूजेला सुपारीची ठेऊन बसतीलच एक दिवस
मॅन ली उमनली काही गोष्टी असणारच ,त्याशिवाय भिन्नलिंगी आकर्षक कसं होईल,पण फक्त त्याचाच बाऊ नको,आणि त्याआधारे सरसकटीकरण नको,रडू येणं ये त्याचं प्रातिनिधिक उदा म्हणू शकतो

क्षमता,कामे,कौशल्ये वेगवेगळे असली तरी हरकत नाही फक्त कोणीही कुणाला कमी लेखून त्रास देऊ नये,
प्रतिसाद फारच लांबला Lol

बाकी ते चट्टे वळ जखमा वगैरेचे गावी एवढे खेळ असायचे शहरी लेकरांसोबत तुलना करण्यात काही अर्थ नाही.
>>>>>

तुम्हाला असे म्हणायचे आहे का की गावातल्या पोरांची शारीरीक क्षमता शहरातील लेकरांपेक्षा जास्त असते?

बाकी गावात आबादुबी मोकळ्या मैदानात खेळली जात असेल
शहरात गल्लीत खेळणे फार डेंजरस होते.
आमच्याकडे तर टेरेसवर खेळायचेही फॅड आलेले मध्यंतरी. पण मोठ्यांनी दम देऊन ते बंद पाडले.

अरे हो, टेरेसवरून आठवले, गच्चीवर मुली नसायच्या पतंग उडवायला...
गर्लस कॅन नॉट फ्लाय काईट बोलू शकतो का Happy

@ आदू
माझ्याच नात्यातल्या जवळ राहणारा 7वर्षे वयाचा मुलगा आहे
>>>>

तुम्ही दिलेय ते उलटे अपवादाचे उदाहरण दिलेय. ज्याला भातुकलीची ऊपजत आवड आहे. त्याला चिडबले जाते हा नक्कीच सामाजिक दबाव आहे. जो त्याला आपली आवड उघड केल्यावर आलेल्या अनुभवानंतर समजले की समाजात असे काही असते.

मी म्हणतोय ते मुळातच बहुतांश पोरांना या आवडी उपजतच नसतात. ते असे खेळ खेळत नाहीत यामगचे कारण कुठला सामाजिक दबाव नसून ते मुळातच त्यांना आवडत नाहीत हे असते. त्यांच्या डोक्यातही हा भेद नसतो. ते फक्त नॅचरली रिॲक्ट करत असतात.
सामाजिक दबावाची अक्कल आणि अनुभव यायच्या आअधीच त्यांनी उपजत आवडीने हे खेळ नाकारले असतात.

नवीन विषय Lol
>>>

हो, त्यांनी त्यांना काय म्हणायचेय हे स्पष्ट केले. मला पटले नाही. आणि ईथे अवांतर असेल. तर जरून नवीन धागा निघेल. माझे बालपण दक्षिण मुंबईतील चाळ संस्कृतीत फार रावडी पद्धतीने गेलेय. त्यामुळे वरचे विधान मला एखाद्या आरोपासारखे वाटून फार जिव्हारी लागलेय Happy

हो, पण डेटा नाहीय.
आपण भेटलो की कुस्ती खेळु आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून इथे अपलोड करू. आता हे एकाच उदाहरणावरून कसे सिद्ध होणार म्हणुन मी गावातली शंभर मुले, मुली घेऊन येतो तू शहरातली शंभर मुले मुली घेऊन ये.
हाय काय अन नाय काय, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा.

आता एक मिटींग आहे
आलोच
घाबरलो समजू नका
रात्री पुन्हा येतो. आधी चर्चेने प्रश्न सुटतो का बघूया?

आजकाल मुलांची शाळा नसल्याने त्यांच्या सोबत माझे ही कार्टून बघणे होते..त्यात खटकलेल्या काही गोष्टी.
एडवेंचर टाईप कार्टून सीरीज मधे लीड रोल नेहमी बॉयज
१.रूद्रा
२.शिवा
3.पॉ पैट्रोल
4.रस्टी ऐन्ड रिवेट्स
5.वीर द रोबो बॉय
6.छोटा भीम
लीड रोल मधे गर्ल्स असणारे कार्टून्स
१.डोरा -पजल सॉल्वींग
२.व्हिसपर- नेचर,एनिमल केरींग
३.शिमर ऐन्ड शाईन- मैजिक
ब्लु रंग मुलांचा आणि पिंक मुलींचा हे पण कुणी ठरवलं असावे माहिती नाही..

मला आवडतो पिंक शर्ट फार. माझ्याकडे आहेत बरेच पिंक शर्ट. मी घालतो बिनधास्त ऑफिसमध्ये. ते बघून बायकाच हसतात. माझ्यावर सामाजिक दबाव टाकतात. पण मी त्या दबावाला जुमानने सोडून दिलेय.

अधिक माहितीसाठी तुम्ही हे वाचू शकता
व्हाई शूड ‘गर्ल्स’ हॅव ऑल द फऽऽन !!
https://www.maayboli.com/node/52681

आवडलं तर नवीन सभासदांसाठी वर देखील काढू शकता. हल्ली पुरुषांचे प्रश्न तसेही फार कमी मांडले जातात आणि फार कमी गांभीर्याने घेतले जातात.

एडवेंचर टाईप कार्टून सीरीज मधे लीड रोल नेहमी बॉयज>> मृ. नेटफ्लिक्लवर ‘स्पिरिट रायडिंग फ्री’ बघ. आवडेल.
टेरेसवरून आठवले, गच्चीवर मुली नसायच्या पतंग उडवायला...>> गच्चीवर मुली असायच्या ओ.. पण मांजा पकडायला.. हर कामयाब मर्द के पिछे एक औरत हात होता है Happy

एडवेंचर टाईप कार्टून सीरीज मधे लीड रोल नेहमी बॉयज
>>>>
हो खरेय, लहान मुलांना ईथेच सुपर मॅन असतात वूमन नाही हा डोस दिला जातो. आणि आपण हे कार्टून एंजॉय करतो.
नाही म्हणायला एक डोरेमॉनमधील नोबिता छान रडतो. पण ते देखील त्याची टिंगल उडवली जाते. जणू काही मुलांनी रडू नये, हळवे होऊ नये…
मी स्वतः कर्क राशीचा असल्याने हळवा, संवेद्नशील, शाहरूखचा चित्रपट बघताना डोळ्यात चटकन पाणी येणारा वगैरे आहे. लोकं हसतात. चालायचेच. कारण त्यांच्यामते हा मक्ता बायकांचाच, अलका कुबल बघा आणि डोळ्याला पदर लावा. पुरुषांनी मात्र रुमाल नेहमी नाक शिंकरायलाच वापरावा..

नवीन Submitted by mrunali.samad on 11 November, 2020 - 14:51 >> असंच कंडीशनिंग केलं जातं, अगदी लहानपणापासून.
त्यात मुलीने झुरळ पालीला घाबरले पाहीजे, घाबरली तर पहा मुलगी आहे घाबरणारच, मुलगा घाबरला तर पुरुष असून घाबरतोस? म्हणून त्याला न घाबरायला खास शिकवले जाते. मुलींकडून घाबरण्याची अपेक्षा ठेवली जाते.
वर्ष दीड वर्षांपासून मुलीचे कपडे वेगळे मुलांचे वेगळे इथ पासून कंडिशनिंगची सुरवात झालेली असते, आपल्याला कळत सुद्धा नाही.

------
वरची ऋन्मेषची पोस्ट न पहाता हे लिहिले आहे, आता लिहिलीच आहे तर राहू देतो.

गच्चीवर मुली असायच्या ओ.. पण मांजा पकडायला.. हर कामयाब मर्द के पिछे एक औरत हात होता है Happy
नवीन Submitted by म्हाळसा on 11 November, 2020 - 14:54

>>>

हे वाक्य कालबाह्य झालेय आता.
उगाच त्यापुढे हॅप्पी टाकू नका
त्या दुसर्‍या धाग्यावर टाकाल तर भडका उडेल.

बाकी मला बोअर व्हायचे पतंग उडवायला. मी गच्चीवर किडे करायलाच जायचो, ते देखील वयात आल्यावर, त्यामागचे कारण हा वेगळाच किस्सा आहे. असो, पण ईतर मुले फिरकी पकडायला सांगायचे. पण मी ती मदतही कोणाला फारशी केली नाही. कदाचित ते कामयाब मर्द के पीछे का मर्द होण्यात मला फारसा ईंटरेस्ट नाव्हता.

वरची ऋन्मेषची पोस्ट न पहाता हे लिहिले आहे, आता लिहिलीच आहे तर राहू देतो.
>>>
अहो मला दोन्ही मुद्दे मान्य आहेत.
म्हणजे मुले आणि मुली यांच्यात एक नैसर्गिक भेद असतो हे देखील मान्य आहे
तर कंडीशनिंग सामाजिक दबाव वगैरेमुळे त्याची पाळेमुळे खोलवर रुजली आहे हे सुद्धा मान्य आहे.
यातले एक अस्तित्वातच नाही हे मला पटत नाही.

मी ते द्विरुक्ती आहे तरी राहू देतो याअर्थी म्हटले आहे.

नैसर्गिक भेद प्रांताप्रमाणेही आढळतात. युरोपियन लोकांची उंची, हाडांचे आणि स्नायूंचे प्रमाण भारतीयांपेक्षा जास्त असते. शारीरिक सामर्थ्यही जास्त असेल मग.
असे प्रांतीय फरक इतरही असतील.
त्याने काय फरक पडतो? माहिती साठी फरक आपण मांडू शकतो त्याचा समानतेशी संबंध नाही. एक युरोपियन मुलगा आणि एक भारतीय मुलगा एक खोली घेऊन रहात असतील आणि त्यांना कामाची विभागणी करायची असेल तर या सरासरी शारिरिक (अथवा अजुन कुठला फरक असला तर त्या) क्षमतेच्या टिचभर फरकाचा विचार करून करावी का?

मानव,
आमच्या कडे उलट आहे
मुलगा झुरळ,पाल किडे सगळ्यांना घाबरतो..लांब पळतो....मुलगी किडा दिसला कि पटकन न घाबरता मारते..
मुलाला रागवलो तरी रडतो..मुलीला रागवले कि ती उलट रागवते आमच्यावर.. Lol
आम्ही कधीच तू मुलगा म्हणून असं कर आणि मुलगी म्हणून हे केले पाहिजे अस नाही ठरवत आहोत....

माझ्या लहाणपनापासून पण आम्हांं भावंडांमधे पण हा भेद कधीच नाही केला गेला....समान वागणूक होती आम्हाला आमच्या पेरेंट्सकडून..
(मला स्वतःला शिवणकाम, विणकाम अज्जिबात येत नाही..माझ्या भावांंना स्वयंपाक येतो..)

चित्रपट बघताना डोळ्यात चटकन पाणी येणारा वगैरे आहे. लोकं हसतात. चालायचेच. कारण त्यांच्यामते हा मक्ता बायकांचाच, >>>>>>>>>>

मला कध्धीच पिक्चर बघताना डोळ्यात पाणी वगैरे येत नाही... पण नवरा होतो इमोशनल पिक्चर बघताना.. मुलांना पण माझ्या पेक्षा जास्त धीराने सांभाळतो..माझी लगेच चीडचीड होते मुलांनी त्रास दिला कि पण नवर्यात भलताच पेशन्स आहे...स्वयंपाक पण सगळा करू शकतो...लग्नानंतर मुलं होईपर्यंत मला काहीच स्वयंपाक येत नव्हता..
(नवर्याचे जरा जास्तच कौतुक झाले हे, पण उदाहरण म्हणून घ्या. Proud )

Pages