नातीगोती - भाग ४!

Submitted by अज्ञातवासी on 11 November, 2020 - 11:18

भाग - ३
https://www.maayboli.com/node/69646

भाग १
https://www.maayboli.com/node/63469

भाग २
https://www.maayboli.com/node/69583

"स्टुपिड!"
कितीतरी मोठ्याने ओरडली ती.
"मूर्खासारखं काहीही बोलू नकोस. त्या छोट्याशा गावातून तुझ्या बाबाला मी बाहेर काढलं होतं. आणि तुला परत भिकेचे डोहाळे लागतायेत."
"तो गाव माझ्या बाबाचा होता. माझे नातेवाईक राहतात तिथे. आपलं खूप मोठं घर आहे तिथे, शेती आहे. सगळं आहे."
"काहीही नाहीये. गप्प बस. लिव घेतलीये ना, मी युरोप ट्रिप मॅनेज करते. फिरून ये, फ्रेश होशील."
"मम्मा..."
"नो मोर डिस्कशन. नो मोर स्टुपीड डिस्कशन! अंडरस्टँड? मी असला काहीही मूर्खपणा खपवून घेणार नाही. "
तिच्या ओरड्यासमोर माझी हिंमत चालली नाही...
◆◆◆◆◆
मी अंथरुणात तळमळत होते. हे घर मला खायला उठलं होतं.
माझ्याच घरात माझा श्वास गुदमरत होता.
मला झोप लागली, की मी अर्धवट ग्लानीत होते?
मला भास होत होता, की मेंदूचे भ्रम?
'ये माऊ झोपलीस काय? उठ!'
पप्पा!!!!!!
'जेव्हा तुझी ममा म्हणते ना, नो मोर डिस्कशन. त्याचा अर्थ होतो, जे करायचं ते करा, आणि नंतर फायरिंग झेलण्यासाठी तयार राहा.'
मी हसले.
'मी तुला आजपर्यंत कधी अडवलं नाही, ही कोण अडवणारी? जा. तुझ्या ममाचा नवरा जरी आला ना वरून, तरीही तुला अडवू शकणार नाही...
...आणि तीसुद्धा तुझीच फॅमिली आहे, समजलं? कुणीही कुणाला आपल्या परिवारात जाण्यापासून अडवू शकत नाही. कुणीही कुणाला आपल्या मुळापर्यंत जाण्यासाठी रोखू शकत नाही...
म्हणून शांतपणे जा, काळजी घे. माझी माऊ.'
मला कुणीतरी माझ्या कपाळावर हात फिरवल्याचा भास झाला. मी जागी झाले...
...आणि ओक्साबोक्शी रडू लागले.
◆◆◆◆◆
सकाळी मला जरा उशिराच जाग आली. कालची आठवण येऊन मन भरून आलं.
मी आळसावून अंथरुणातून खाली उतरले. ममा ऑफिसमध्ये जाण्यासाठी रेडी झाली होती.
"उठलीस? आज जोशी अंकलशी बोलून ट्रीपच्या सगळ्या डिटेल्स फायनल करून घे. मी प्लॅन केली असती, पण तुला आवडणार नाही. फक्त व्हेनिस विसरु नकोस."
"मी कुठेही जाणार नाहीये!"
"तेच मला हवंय. पण जायचंच असेल तर पिंपळगाव सोडून कुठेही जा. ओके?
मी शांतपणे पायरीवर बसून राहिले."
ती माझ्याकडे न बघताच निघून गेली.
◆◆◆◆◆
पप्पाचे शब्द माझ्या डोक्यात घुमत होते.
'माझी फॅमिली, माझी मुळं!!!'
मी मोबाईल हातात घेतला, आणि सर्च करायला सुरुवात केली.
बारा वाजेची मुंबई फ्लाईट, तिथून अलमोस्ट सहा तासांचा प्रवास!
मी फ्लाईट बुक केली, आणि पटापट आवरू लागले.
त्याआधी मी ओल्ड स्कुल मुलीसारखं ममासाठी लेटर ठेवलं. ते लेटर ठेवताना मी कितीदा रडले असेल, माहिती नाही.
पण आता मी जाणार होते, माझ्या मुळांकडे!!
◆◆◆◆◆
मुंबई एअरपोर्टवर मी उतरले. मॅपवर पिंपळगाव सर्च केलं.
ओ माय गॉड! कमीत कमी शंभर पिंपळगाव होते मॅपवर!!!
मी डोक्याला हातच लावला.
जायचं कुठे. शेवटी पूर्णाआजीला फोन करावाच लागणार. पण मलातर तिला सरप्राईज द्यायचं होतं.
तिला काय, सगळ्यांनाच!
मी विचारातच चालले होते, तेवढ्यात एका माणसाला धडकले.
"ओह सॉरी! सो सॉरी!"
"ठीक आहे." तो म्हणाला.
रडून सुजल्यासारखे त्याचे डोळे दिसत होते.
"आर यु ओके?" मी न राहवून विचारले.
"येस." तो गडबडून म्हणाला, आणि लंगडत चालू लागला.
मलाच त्याच्याकडे बघून वाईट वाटलं.
मी जायला निघणार तेवढ्यात मला खाली एक पासपोर्ट पडलेला दिसला.
"एक्स्क्यूज मी!" मी ओरडलेच. आणि तो पासपोर्ट उचलला.
त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतच.
"एक्स्क्यूज मी," मी पुन्हा ओरडले. तरीही तो हळूहळू तंद्रीतच चालला होता.
शेवटी मी न राहवून त्याचा पासपोर्ट उघडला, आणि त्याचं नाव वाचून ओरडले.
"मि. मोक्ष राजशेखर शेलार!!!"

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह...काय होणार आहे पुढे??
धन्यवाद कथा कन्टीन्यु करताय त्याबद्दल...छान झाला आहे हा भाग..उत्सुकता वाढवणारा....

@मृणाली - धन्यवाद. हो सगळ्या कथा कन्टीन्यू करायच्यात हळूहळू.
@अथेना - धन्यवाद. पुढील भाग लवकरच टाकतो
@रुपाली - धन्यवाद!
@एस - हो, पण हा फक्त क्रॉसओव्हर. दोन्हीही कथा स्वतंत्र चालतील. धन्यवाद!

अरे व्वा, मस्त surprise. इतक्या दिवसांनी continue केलं पण खूपच सहज सुंदर ओघवत्या भाषेत आहे, ब्रेक अजिबात जाणवत नाहीये..
तुम्ही आमच्या अपेक्षा वाढवल्या आहेत अज्ञात.
पुढील लिखाणासाठी शुभेच्छा! दोन्ही कथांच्या पुढील भागाच्या प्रतिक्षेत!!

Finally! Happy

मस्त..