व्हिसल ब्लोअर-२

Submitted by मोहिनी१२३ on 10 November, 2020 - 12:20

भाग १- https://www.maayboli.com/node/77210

आपण नवीन कंपनीत रुळेस्तोवर ,कंपनीतले पॅालिटिक्स,डायनामिक्स समजेस्तोवर कोणतेही अनावश्यक किडे करायचे नाहीत हा धडा नेहा आधीच्या कंपनीत शिकली होती. त्यामुळे तिने कल्पनाबद्दलची नाराजी मनाच्या पार तळाशी गाडून टाकली आणि स्वत:ला कामात झोकून दिले.

नेहा कामात परफेक्शन गाठण्यासाठी मात्र कितीही धोके,पंगे घ्यायला तयार असायची.अशात वर्ष दिड वर्ष निघुन गेलं.

त्या दिवशी कंपनीत पहिल्यादांच फॅमिली डे साजरा होणार होता. त्यामुळे सगळेजण खुप उत्साही होते. जवळजवळ संध्याकाळच्या ५ वाजेपर्यंत कोणीही लॅपटॅाप उघडला नव्हता. ज्यांना त्यादिवशी फारसे काम नव्हते असे बरेच जणं शुक्रवार म्हणून डायरेक्ट घरीच गेले. नेहाही निघायचा विचार करत होती. तेवढ्यात तिला एक प्रपोजल त्या दिवसाअखेरपर्यंत पाठवायचं होतं त्याची आठवण झाली. आणि नाईलाजाने तिने लॅपटॅाप उघडला.

फ्लोअरवर तुरळक लोकं होती. नेहाला परत एकदा हाहा-हीही आवाज आला आणि तिच्या कपाळाला आठ्या पडल्या.तिने उभे राहुन पाहिले. अर्थातच तो आवाज कल्पनाच्या बाजूने येत होता.मात्र तिने जे द्रुष्य पाहिले त्याने तिला धक्काच बसला.

तिथे कल्पना आणि तिचे दोन टिम मेम्बर होते. ती त्यांच्याशी बोलताना त्यांना पाठीत मार,गालगुच्चा घे असं करीत होती. ते दोघं अमित आणि आनंद खुपच अस्वस्थ झालेले दिसत होते. नेहाला असं काही बघायला मिळेल याची कल्पनाच नव्हती.सकाळीच कल्पनाला पीपल्स मॅनेजर म्हणून ॲवार्ड मिळाले होते. आणि आता हे असे द्रुष्य पाहून नेहाला काही सुचेनासे झाले.

त्यानंतर नेहाला कल्पनावर पाळत ठेवायचा जणू छंदच जडला. नेहाने या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरवले. भरपूर शोधाशोधी,खोदाखोदी तिने केली.यात तिला बरीच धक्कादायक महिती हाती आली.

कल्पना टिम मध्ये फक्त नवीन लग्न झालेल्या मुलांना रिक्रुट करते. ती टिम मध्ये मुलींना घेत नाही. ती बोलताना नेहमीच टाळ्या दे, मांडीवर थापट, पाठीवर मार, गालगुच्चे घे असं करत असते. ती पार्टीज मध्ये काही निवडक मुलांना शेवटपर्यंत थांबून घेते. ती कामात मात्र चोख आहे. तिला चांगल्याप्रकारे काम करून घेता येतं.मात्र तिच्या टिम मध्ये लोक जास्त काळ टिकत नाहीत.

नेहाने अमित आणि आनंदचीही महिती काढली. ते दोघे अगदी कुटूंबवत्सल, कोणाच्या अध्यात ना मध्यात असे होते. अर्थातच ते कल्पनाच्या वागण्याला त्रासले होते आणि नवीन प्रोजेक्टच्या शोधात होते.

आता नेहाला काही सुचेना. एक मन तिला दुर्लक्ष करायला सांगत होतं आणि एक मन लढायला.

तिने नवर्याला सर्व हकिगत सांगितली. त्याला तिचे कौतुक वाटले. मात्र त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पध्दतीने निर्णय घ्यायचे ठरवले.

त्यांचा कोणताही महत्वाचा निर्णय घ्यायची पध्दत म्हणजे काय करायची इच्छा आहे हे वहीच्या पानावर मोठ्या अक्षरात लिहायचे आणि चक्क दोन भाग पाडून त्याचे फायदे-तोटे लिहायचे.

तिला एकतर लढायचे कसे हेच माहित नव्हतं. पण कल्पनाच्या टीम मधल्या मुलांवर अन्याय होऊ नये ,त्यांचे शोषण होऊ नये हे मनापासून वाटत होतं . त्यात तिची मॅनेजर आदिती कल्पनाची प्रिय मैत्रिण होती. हे तिला उपयोगी ठरणार होतं का अडथळा ठरणार होतं याचा अंदाज तिला बांधता येत नव्हता. नेहाचे तसंही या कंपनीत दिड वर्ष झाले होते. या दिड वर्षात २ इन्क्रिमेंटस्, २ सर्टिफिकेशन्स न् किरकोळ ॲवार्डस तिने पदरी पाडून घेतली होती. आणि तिच्या स्वभावाप्रमाणे बाहेर अप्लाय करायला तिने ॲालरेडी सुरूवात केली होती. त्यामुळे तिने हा लढा द्यायचं ठरवलं असतं तर तिचे फारसे नुकसान झाले नसते. मात्र काही मुलांची आयुष्ये त्यामुळे आनंदी, तणावरहित झाली असती.

म्हणूनच तिने लढायचे ठरवले.

https://www.maayboli.com/node/77224

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली.
पन नां तुमी भाग लय छोटे टाकताय.

कथाविषय छान आहे.
पण अजून खूप खुलवण्यास वाव वाटतोय. पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!!

धन्यवाद शब्दसखी, जेम्स बॅान्ड, अज्ञातवासी.
तुमच्या सुचनेप्रमाणे पुढचे भाग जास्त खुलवून लिहायचा प्रयत्न करीन.

वाचतेय. पंगे घेणं , किडे करण रोजच्या वापरातले शब्द आवडले Lol

रच्याकने, ऑफिसमध्ये मध्ये दर एक दोन महिन्यांनी POSH (प्रेव्हेंशन ऑफ सेक्शुअल हर्रासमेंट) च ट्रेनिंग करतो ते आठवलं, त्यात साधारण असेच काही प्रसंग असतात आणि तुम्ही काय कराल साठी विविध पर्याय असतात .

वाचतेय. पंगे घेणं , किडे करण रोजच्या वापरातले शब्द आवडले Lol
-धन्यवाद. हे पण बारकाईने बघितल्याबद्दल.

रच्याकने, ऑफिसमध्ये मध्ये दर एक दोन महिन्यांनी POSH (प्रेव्हेंशन ऑफ सेक्शुअल हर्रासमेंट) च ट्रेनिंग करतो ते आठवलं, त्यात साधारण असेच काही प्रसंग असतात आणि तुम्ही काय कराल साठी विविध पर्याय असतात -ही खरचं चांगली बाब आहे.
धन्यवाद श्रध्दा, अंजली.