व्हिसल ब्लोअर-१

Submitted by मोहिनी१२३ on 9 November, 2020 - 13:09

तिची ती गेल्या ८ वर्षातील चौथी कंपनी.अर्थात आयटी मध्ये बेटर प्रॅास्पेक्टस करिता कंपनी बदलणे काही नवीन नाही. या कंपनीत ती कशी आली ह्याची एक वेगळीच सुरस कथा होती.

ती कोण तर आपली कथानायिका नेहा आणि कथास्थळ पुणे.

२ वर्षांपुर्वीची गोष्ट. नेहाने नवर्याशी विचारविनिमय करून ६ महिन्यांचा ब्रेक घेतला होता. आधीची कंपनी दीर्घकालीन रजा द्यायला तयार होती. पण तिला कंटाळाच आला होता. त्यांनी घेतलेले होम लोन नुकतेच संपल्याने तिच्या नवर्याची तिने ब्रेक घ्यायला काहीच हरकत नव्हती.तिला या कंपनीत तिच्या एका मॅनेजरचा सांगता येत नाही आणि सहन करता येत नाही अशा प्रकारचा त्रास ही होत होता.

तिने हा ब्रेक समाजसेवा , वाचन , आप्त-स्नेहींच्या भेटी अशा तिच्या आवडत्या गोष्टींत व्यतीत केला.आणि ६ महिन्यांनी परत एकदा जॅाब मार्केट मध्ये उतरायला ती सज्ज झाली.

जॅाब गॅप असल्यामुळे तिला आधीपेक्षा कमी पगाराची नोकरी स्विकारावी लागली. मात्र चांगली एमएनसी असल्यामुळे कुरकुरत का होईना तिने ती स्विकारली. या कंपनीने नेहाला पुण्यातीलच क्लायंट कंपनी मध्ये कामाला पाठवले.

क्लायंट कंपनी युएस बेस्ड होती. नेहा लवकरच तिथे रूळली . भरपूर प्रोजेक्टस, भरपूर काम , नवीन टेस्टिंग टिम्स ग्रुम करणे, नवनवीन लोक टेस्टिंग मध्ये घेणे, वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टींग अजमावून बघणे,ॲाडिट्स ,क्वालिटी रिव्ह्यिुज अशा विविध अंगाने तिचे काम वाढत होते. तिला मजा येत होती. क्लायंट कंपनीत काम करत असल्याने तिला अनेक सिनिअर्सना, मॅनेजरांना उत्तरे द्यायला लागायची. या सगळ्यात कंपनीत काय घडतेय, काय चाललयं याची कल्पना तिला आजिबात नसायची.

अचानक एके दिवशी वेगवेगळ्या मॅनेजर्सचे ॲप्रिसिएशन मेल्स तिच्या मेलबॅाक्स मध्ये धडकू लागले. CC तिची व्हेंडर कंपनी आणि आख्खं जग. ती एकदम गांगरून गेली. यातील काही मॅनेजर्स काळे की गोरे हे ही तिला ठाऊक नव्हते.दिवसभर सर्वांची रसवंती ओथंबून वहात होती. या सर्वांत कल्पना नावाच्या मॅनेजरचा टिपिकल जार्गन असलेला मेल नेहाच्या चांगलाच लक्षात राहिला . ही कल्पना तिच्या समोरच बसायची.आणि तिच्या क्युबिकल मधुन सारखा हा-हा,ही-ही, टाळ्यांचे आवाज यायचे.

या दिवसभर चाललेल्या मेल्सची परिणीती तिने ही क्लायंट कंपनी दुप्पट पगारावर जॅाइन करण्यात झाली.

आता नेहाचे काम ,जबाबदार्या अजुन वाढल्या. तिला कल्पना आणि तिच्या टिम बरोबरही काम करायला लागायचे. का कोणास ठावूक तिला कल्पनाचे वागणे, बोलणे खुप बेगडी, काही वेळा लाडिक वाटायचे. कल्पना नेहाच्या डोक्यात जायला लागली होती.

https://www.maayboli.com/node/77219

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नावातच दिल जीत लिया वगैरे फीलिंग आलीय. आजच सुरु केली आहे वाचायला!
व्हिसल ब्लोवर्स / ब्लोअर्स हे मला Computer Securities मध्ये झालेले आहे. ENTC ला join झाल्यापासून लई बोअर जीवन जगतोय Wink
डिप्लोमात माझा FAV Subject होता Securities आणि त्या खालोखाल OS. [७५ होते दोन्ही मध्ये(माझ Highest Scoring एवढच होत)]
फक्त एकच वाटतय की व्हिसल ब्लोवर्स ची माहिती बाकीच्या सामान्य लोकांना देखील घेता येईल अश्या दृस्ष्टीने देखील
"होऊन जाऊद्या !"
सुरवात छानच झालीय.