दुःखाचा रंग पसरला

Submitted by द्वैत on 7 November, 2020 - 08:03

दुःखाचा रंग पसरला

दुःखाचा रंग पसरला
क्षितिजावर संध्याकाळी
आभाळ भाबडे आले
मायेने उतरून खाली

लाटांवर हलती नावा
स्वप्नांचा दूर किनारा
कळवून खुशाली गेला
माघारी ओला वारा

पसरून पंख आशेचे
उडतात मुक्याने पक्षी
भगव्या पिवळ्या पटलावर
अलवार सरकते नक्षी

चाहूल लागली आता
येणाऱ्या अंधाराची
का रुतून बसली जाणे
वाळूत पाऊले माझी

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages