परदेशातून भारतात कमीत कमी खर्चात पैसे कसे पाठवावे?

Submitted by साधना on 31 October, 2020 - 11:38

माझी मुलगी ऑनलाईन जर्मन व मराठी भाषेचे वर्ग घेते. तिचे काही विद्यार्थी परदेशात आहेत.

यातल्या काही लोकांची तिथल्या भारतीय बँकेत खाती आहेत. ते फी खात्यातून ट्रान्सफर करतात तेव्हा मुलीच्या खात्यात एकही रुपया कट न होता सगळे पैसे येतात. बँकेचा जो एक्सचेंज रेट असतो त्याप्रमाणे पैसे मिळतात.

ज्यांची अशी खाती नाहीत त्यांच्याकडून मुलगी paypal ने फी घेते. इथे त्रास असा आहे की paypal स्वतःचा एक्सचेंज रेट वापरते जो बँकेपेक्षा कमी आहे आणि वर कमिशनही जास्त घेते. तिचा यामुळे दुहेरी तोटा होतो.

मला या संदर्भात खालील माहिती हवी:

1. Paypal पेक्षा जास्त चांगली व्यवस्था आहे का जिथे बँकेचा नेहमीचा रेट मिळेल व कमिशन वाजवी असेल?

2. स्टेट बँकेची किंवा अन्य भारतीय बँकेची काही सोय आहे का ज्यायोगे परदेशस्थ भारतीयांचे त्या बँकेत अकाउंट नसतानाही भारतात पैसे पाठवण्याची सोय उपलब्ध होऊ शकते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ICICI Bank Money2India and Skrill.com. बघा. ICICI कदाचीत खाते नसतानाही पैसे पाठवण्याची सुविधा देते.
या दोनही उत्पादनांची हल्लीची माहिती नाही, त्यामुळे फक्त नावे सांगत आहे. तुम्ही खात्री करुन घ्या.

Payoneer, Transferwise दोन्ही कंपन्या पेपॅलपेक्षा अल्पदरात सुविधा देतात. पण त्यांचे अकाऊंट उघडणे कटकटीचे आहे. तेवढा धीर ठेवला तर पुढे सोय छान होते. तुम्ही जिथे असता तिथे ह्या कंपन्या सुविधा देतात का?
(ही कुठल्याही कंपनीची जाहिरात, रेकमेंडेशन, इ इ किंवा हेच करा तेच करा आग्रह नाही. हा एक पर्याय आहे एवढच.)

अभि_नव धन्यवाद.

सीमंतिनी, मुलीने आजच एकीला Transferwise वरून पैसे पाठवायला सांगितले आहे. तिला अजून काही पर्याय आहेत का हे हवेय. Transferwise ची फी खूप कमी आहे व बहुतेक बँक टू बँक ट्रान्सफर होते. आता फी आली की कळेल किती गेले ते. तुलनेत पेपल खूप महाग आहे.

आम्ही सध्या आमच्या गावी आंबोलीला मुक्काम ठोकून आहोत, अजून सहा सात महिने तरी हलणार नाही इथून. Happy Happy
ऑनलाईनला काही प्रॉब्लेम नाहीय इथे.

पेपॅल वेगवान आहे. म्हणजे इतरांनी पैसे जमा केले की अगदी दुसर्‍या मिनीटाला आपण काढू शकतो. असा वेग जेव्हा गरजेचा असेल तर पेपॅल चांगले आहे. ट्रान्सफरवाईज बहुतेक वेळा १-२ दिवस घेते.

साधना, मी पण पे पॅलचा ऑप्शन सुचवणार होते. पैसे ट्रान्स्फर करताना ‘फ्रेंड्स अँड फॅमिली‘ हा ऑप्शन वापरल्यास कमिशन कट होणार नाही.
झूम (Xoom) वरुन ट्रान्स्फर करुन बघितल्यास?

हो, paypal खूप वेगवान आहे, पैसे पाठवले हा मेसेज व पैसे दोन्ही एकत्रच येतात Happy

पण सध्या इतक्या वेगाची गरज नाहीय, 2 दिवस लागले तरी चालण्यासारखे आहे.

फ्रेंड्स अँड फॅमिली फक्त अमेरिकेत फ्री आहे, जर्मनी टू इंडिया किंवा इतर आंतरराष्ट्रीय व्यवहारात कमिशन तितकेच पडते जे इतरांना द्यावे लागते.

रेझर पे आणि ccavenue हे दोन पर्याय ओळखीत एक जण वापरतात - पेपाल पेक्षा दोन्ही मध्ये कटकट कमी असं त्यांचं मत आहे

Post मध्ये एक आहे
कायतरी मोठा कोड असतो , तो सांगितला की पैसे मिळतात

Xoom पन पेपॅलची कम्पनी आहे. झूमवरुन ५०० युएस डॉलरपेक्षा जास्त पैसे पाठवले तरच फी पडत नाही. रेमिटलीचेही दर चान्गले असतात.

एका परदेशातील सर्वसाधारण ग्राहकाच्या दृष्टीकोनातूनः
ही काय कटकट आहे ? तुम्हाला पैसे पाठवायला मी कशाला अजून मुद्दाम नविन अकाऊंट काढायचं? इतरांसारखे तुम्ही झटपट क्रेडीट कार्ड ने का नाही पैसे घेत? आणि वर मी कशाला कमिशनचे पैसे देऊ? त्यापेक्षा सरळ जे लोक क्रेडिट कार्ड घेतात असेच सेवादाते शोधलेले बरे. फारफार तर मी पेपॅल वापरीन.

नवीन भारतीय विक्रेत्या सेवादात्याच्या दृष्टीकोनातूनः
मी जास्त ग्राहक मिळवण्यासाठी इतके कमी पैसे फी ठेवलीय. आणि हे क्रेडीट कार्ड किंवा पेपॅल यांना अजून ३-४ % कमीशन कशाला देऊ? आणि अजून पुन्हा चलनबदलासाठी मला १० पैसे जास्त रेट लावतायत. ते काही नाही त्यांना सरळ भारतीय बँकेच्या थ्रू किंवा इतर सेवा वापरून पैसे पाठवायला काय जातं?

मुरलेल्या आणि यशस्वी भारतीय विक्रेत्या सेवादात्याच्या दृष्टीकोनातूनः
जेंव्हा आपण दारावर भाजी विकत घेतो , तेंव्हा तो भाजीवाला, मार्केटयार्ड ते आपलं घर याचा पेट्रोलचा खर्च वेगळा लावत नाही. किंवा त्याला विजेचे बील येते त्याचे वेगळे पैसे लावत नाही. तसे लावले तर कुणी देणार नाही. सध्याच्या काळात क्रेडीट कार्ड चे कमीशन किंवा चलन बदलातला फरक हा पेट्रोल खर्च किंवा विजेच्या बीलासारखा आहे.
मी काय करतो . माझी मूळ फी जर १०० रू असेल तर मी यासगळ्या खर्चांसाठी १०% ग्रुहीत धरून ११० रू सांगतो. आणि वर हे पण सांगतो मी क्रेडिट कार्ड , पेपॅल , गुगल पे सगळे घेतो. माझा असा अनुभव आहे की परदेशी ग्राहकांना नवी अकाऊंट उघडा किंवा कमीशन कमी हवे असेल तर इकडे जा असल्या झंझटी नको असतात. मी त्यांना मला इतकं कमीशन लागतं, हा फरक चलनबदलात लागतो हे काही सांगतच नाही आणि ते अगदी सहज ११० द्यायला तयार होतात.
आणि जे ग्राहक फक्त ३-४% टक्के कमीशन वाचावे म्हणून नवीन बँकेत अकाऊंट उघडायला, हे सगळे करायला तयार असतात, ते तितकेच , दुसर्‍या कुणीतरी ९० रू त सेवा देतो म्हटले की लगेच तिकडे जातात. असे ग्राहक मला नसले तरी चालेल. म्हणून माझा दर सरसकट ११० रु. लावतो.

अजय +१. हेच लिहिणार होतो. कसेही पैसे द्या सांगायचे आणि ५ १० टक्के वाढवून चार्ज करायचे.

भारतीय ग्राहक ५-१०% वाचवण्यासाठी जास्त झंझटी करायला सहज तयार होतो.
परदेशी ग्राहक झंझटी वाचवण्यासाठी ५-१०% जास्त द्यायला सहज तयार होतो.
(पण त्याला मूळ फी इतकी, कमीशन इतके जाणार हे सांगायचे नाही. एकूण रक्कमच सांगायची. कारण ते समजावून घेणे ही पण एक झंझट असते.)

भारतातून परदेशात नुकतेच गेलेले भारतीय (सुरुवातीच्या ५-८ वर्षात) , भारतीय ग्राहकांसारखेच असतात. पण तेच परदेशात १०-१२ वर्षांवर रहात असले तर ते परदेशी ग्राहकांसारखे असतात.

फारतर भारतीय चलनात दिलेत/ वायर केलेत तर एक दर डॉलर मध्ये केलेत तर दुसरा दर.
अमेरिकन बँकेच्या साईट वरून वायर करणे बऱ्यापैकी सोपे आहे, ज्यायोगे कमिशन ग्राहक भरून रोख रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. कोणाला ते करायचच असेल तर ते करतील.
बहुसंख्य लोकं चार पैसे जास्त गेले तरी चालेल पण पेपाल (गूगल पे, अमेझॉन पे, व्हिसा कार्ड ट्रान्स्फर) सारख्या रेप्युटेड साईटवर भरवसा ठेवतील. पैसे पाठवताना बरीच वैयक्तिक माहिती विचारली जाते आणि माहीत नसलेल्या साईट/ देशातील बॅंकांच्या साईट वर भरवसा ठेवायला लोक काकू करतील.

>अमेरिकन बँकेच्या साईट वरून वायर करणे बऱ्यापैकी सोपे आहे.
नाही . हे बँकेवर आणि कुठे पैसे पाठवायचे त्यावर अवलंबून आहे. गेल्याच महिन्यात मी अमेरिकन बँकेतून पैसे वायर केले तेंव्हा मी कशासाठी , कुणाला वायर करतोय , पैशाची अफरातफर आहे का? अतिरेक्यांशी संबंध आहे का? कुणी परदेशातले मला फसवते आहे का अशा बर्‍याच चौकशांमधून जावे लागले. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन दिवस वायर अडवून ठेवली (अर्थात हे माझ्या सुरक्षेसाठीच होते) काही बँंका वायरसाठी बरीच फी घेतात ते वेगळेच. एकूणात ग्राहक म्हणून मला ही मोठी झंझट वाटली.

माझे ICICI मधे ३० वर्षे खाते आहे. पण त्यांच्याच परदेश ते भारत Money transfer सुविधेचा वापर करायला गेलो तर असे लक्षात आले की हा वेगळा धंदा आहे. त्यांनी परत खूप खोलात खाजगी माहिती विचारायला सुरुवात केली. मी म्हटले , ही महिती तुमच्याकडेच ३० वर्षे खाते आहे , KYC current आहे, त्यातून घ्या तर म्हणे, नाही . मला ती वेगळी परत द्यायला पाहिजे. माझी खूप चीडचीड झाली आणि मी त्यांंची Money transfer सुविधा वापरायचा विचार सोडून दिला. एखाद्या सेवादात्याने मला भारतीय बँकेच्याच मनी ट्रान्स्फर नेच पैसे पाठवा म्हणले तर मी सरळ दुसर्‍याला धंदा देईन.

जगभरच्या कुठल्याही सेवादात्याला पेपॅल वापरून पैसे देणे हा माझा आजकाल पहिला पसंतीक्रम आहे. पेपॅलच्या मागे क्रेडीट कार्ड जोडले आहे पण या सुविधेमुळे तुमचे क्रेडिट कार्डही शेअर करण्याची गरज नाही. दुसरा पसंतीक्रम क्रेडीट कार्डने पैसे देणे.

आम्ही यातून गेलो आहोत. माझी मोठी मुलगी संस्कृत शिकते आहे गेले सहा महिने. तिच्या शिक्षिकेला कामाची खूप गरज होती म्हणून सहज लावलेला क्लास लेकीला संस्कृतची आवड निर्माण झाली म्हणून अजूनही सुरू आहे.
आमचे भारतात बँक खाते आहे पण त्यात अनंत अडचणी होत्या. त्यामुळे आम्ही आमच्या जवळच्या नातेवाईकांना फी भरायला सांगितले आहे. पण अर्थात फी अवाच्या सववा नाही! हा पर्याय उपलब्ध नसता तर आम्ही REMIT WORLD सारखी service वापरून $100 फी असेल तर पाठवताना $105 पाठवले असते...म्हणजे त्या बाईना त्यांच्या फी एव्हढे पैसे मिळाले असते.

अजयने लिहिले आहे तसे विचार बरेचदा येऊन गेले आहेत आणि आम्ही भारतातून खरेदी केली नाही असेही झाले आहे.

फ्रीलान्सिंग मध्ये दर कसा ठरवावा हा खरं तर स्वतंत्र धाग्याचा विषय. व्यवसायाचा प्रकार, व्यवसायातील अनुभव, स्थळ, काळ इ नुसार आडाखे बदलतात. ग्राहकाला सोयीचे पडेल ते करू द्यावे ह्याला प्रचंड अनुमोदन. तेव्हा पेयोनियर, ट्रान्स्फरवाईज, गुगल पे इ सर्व प्रकारची खाती लागतात. या बहुतेक कंपन्या तुमची ओळख पटवून मगच खाते देतात. ती प्रक्रिया कटकटीची आहे. पण ते केलं की नंतर सेवाग्राहकाला खाते लागतेच असे नाही. सेवादात्याने लिंक पाठवायची व ग्राहक क्रेडीट कार्डाने/त्यांच्या खात्याने पैसे भरतात. त्यांना जे सोयीस्कर असेल ते करू द्यावे. त्यांना काय सोयीचे हे सेवा देण्याआधीच विचारावे म्हणजे शेवटी गोंधळ उडत नाही.

माझ्या वैयक्तिक बाबतीत बोलायचे तर सेवाग्राहकाने अमुक ढमुक कंपनीतर्फे पैसे पाठवू सांगितले म्हणून मी खाते काढले असे घडत गेले. मी नवीन व्यवसायिक आहे (५-१० वर्षे गटात). अजून "काही सेवाग्राहक गेले तरी चालतील" अशी परिस्थिती नाही आणि काही वेळा माणसे सांभाळावी लागतात. उदा: एखादी नवीन व्यवसाय करणारी ग्राहक कंपनी असते. अतिशय प्रॉमिसिंग लाँग टर्म क्लायंट असते. अशा वेळी दर रू ११० सांगायचा पण त्यांना जर सवलतीची अपेक्षा असेल तर अशा पद्धतीने पैसे पाठव मग ३%-५% सूट देवू शकते म्हणता येते. सूट देण्यापूर्वी आपला 'ओव्हरहेड' किती आणि तो कुठे कमी करता येतो ते पक्कं ठावूक पाहिजे.
(ही कुठल्याही कंपनीची जाहिरात, रेकमेंडेशन, इ इ किंवा हेच करा तेच करा आग्रह नाही. हा एक पर्याय आहे एवढच.)

पेपाल मध्ये तुम्ही पेपाल चा रेट न वापरता बँकेचा रेट वापरा अशी सेटींग करू शकता. पेपाल पर्सनल अकाऊंट वापरले तर पूर्ण पैसे मिळतात. फक्त $ टू Rs जो कट होईल तेवढाच होईल (जनरली तो मार्केट रेट पेक्षा २.५ रुपयांनी कमी असतो). बिजनेस अकाऊंट transactions साठी साधारण ७% खर्च होतात.
payoneer चा अजून एक ओप्शन आहे पण वेळ्खाऊ आणि साधारण ५-६% कट तिकडेही होतात.

अजय, सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सीमंतिनी, तुझ्या अनुभवाबद्दलही आभार.

इतर सर्व प्रतिसादकांचेही आभार. खूप चांगली माहिती मिळतेय.

मुलीला जर्मनीचे पहिले विद्यार्थी मिळाले तेव्हा तिला त्यांचे वर्ग दोनतीन महिन्यात संपतील असे वाटले. परदेशी विद्यार्थी मिळतील हा विचार केला नव्हता त्यामुळे प्रायसिंगचा फारसा विचार न करता फी सांगितली गेली. तासांवर फी ठरलेली व सुरवातीला फारसे तास होत नव्हते त्यामुळे महिन्याला 2-3 युरो कमिशनात गेले तरी फारसे दुःख होत नव्हते. नंतर शिकणे वाढले आणि आठवड्याच्या तासांची संख्याही वाढल्यावर जास्त पैसे जायला लागले आणि दुःख होऊ लागले Happy

पण या अनुभवावरून शहाणे होऊन तिने आता इतरांना परदेशी चलनात फी सांगताना कमिशन घालून फी सांगायला सुरुवात केली. बाकी क्वालिटी मिळत असेल तर परदेशी भारतीय फीबाबत घासाघीस करत नाहीत हा अनुभव तिलाही आला Happy

ट्रान्सफरवाईज सगळ्यात उत्तम. काही देशातुन भारतात पाठवताना, त्या देशाचा. कामाच्या वेळात २ मिनिटे लागतात (सिंगापुर ), काही मधे १ तास (अमेरिका) तर काही देशात दोन दिवस लागतात. सुट्टीच्या दिवसात १ working day जास्त लागतो
अगदी $१० पण पाठवता येतात. किती पैसे. पाठवायचे, किती पैसे मिळणार, दर किती आहे आणि फी किती लागनार याची माहिती पहिल्या पानावरच असते. त्यामुळे व्यवहार पुर्णतः पारदर्शी असतो. एकदा अकाउंट उघडल्यावर आणि ज्याना पैसे पाठवायचे त्याचे नाव अ‍ॅड केल्यावर पध्धत पण खुप सोपी आहे. पे पाल किंवा बाकी कुठल्याही सुविधा पेक्षा transferwise सोपे वाटते. चांगली अ‍ॅप , तसेच काही देशात transferwise चा QR Code प्ण बॅका ओळाखतात आणि काही सेकंदात व्यवहार होतो.
यात आणखी एक सुविधा आहे. जर दर जास्त असेल तर काही तासा साठी लॉक करु शकता. जर जास्त पैसे पाठवायचे असल्यास याचा फायदा गेता येतो.

https://transferwise.com/in
ह्या कंपनीला कमी वेळात चांगला ब्रॅड बनण्याचा अवार्ड मिळाला आहे. एका वित्तीय संस्थेच्या मते गेल्या वर्षात ह्या ब्रॅड ची किंअत ५ बिलियन डॉलर झाली आहे.
काही भारतियानी https://www.singx.co/singx/ नावाची कंपनी पण चालु केली आही . सध्या ही कंपनी फक्त सिंगापुर वरुन पैसे पाठवते. ह्या कंपनीने पण काही वेळातच आपला चांगला ब्रॅड बनवला आहे. ह्यात पण क्युआर कोड स्कॅन करुन काही सेकंदात व्यवहार करता येतो.

transferwise.com कडे भारत, USA, Euro Zone, UK, UAE, Australia , Singapore , Hongkong सारख्या अनेक देशाची मान्यता आहे.

ही जाहिरात नाही आणि ह्या दोन्ही कंपन्याची सेवा वापरण्याचे सोडुन माझा ह्या कंपन्याशी कसलाही संबध नाही.

मस्तच चाललं आहे ऐशु चं फॉरीन स्टुडंट म्हणजे
तिचे लेखन वाचले होते. एकदम शांत समंजस मुलगी वाटते........... +1.

हीच गोष्ट वाणी / किराणा दुकानदार लोक करत होते. त्यांचे गिऱ्हाईक महिनाभर माल नेऊन खात्यावर मांडून ठेवायला सांगतात. मग पुढच्या महिन्यात दहा तारखेनंतर बिलाचा भरणा करतात. याचा हिशोब म्हणून त्यांनी अगोदरच मालाचच्या किंमती वाढवलेल्या असतात. पण याच दुकानांत रोखीने खरेदी करणाऱ्यांचे नुकसान होते.

पंचवीस तीस वर्षांपूर्वी फ्रीज, टीवी खरेदीवर लोन @झीरो परसेंट सुरू करण्यात आले आणि पंचवीस टक्क्यांनी किंमती मार्कअप केल्या.

आज ट्रान्सफरवाईज वरून पैसे ट्रान्सफर केले गेले. Paypal च्या तुलनेत कमिशनमध्ये 70 टक्के सेविंग झाले.

सगळ्या प्रतिसाददात्यांचे मनापासून आभार.

धन्यवाद mi_anu, देवकी व निरु. एका वर्षात चांगला जम बसलाय तिचा.

Online training दिल्यावर paypal मधून पैसे receive करण्यासाठी कोणता purpose code वापरावा?