अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बबड्या पैसा- पैसा करत असतो, मग श्रीमंत राजेंना एवढा का पाण्यात पाहतो? अशा लोभी मुलाने खरंतर, आईची इच्छा नसतानाही जबरदस्तीने लग्न करून दिलं असतं राजेंशी....

(झीम वाले आता कोरोनामुळे चांगलेच ढेपाळलेत म्हणा.. त्यांचा नंबर एव्हाना सोनी मराठी वाल्यांनी घेतलाही असेल..!) >>>>>> नाही, सध्या स्टार प्रवाह ने मागे टाकलेय झीमला टिआरपी मध्ये. सध्या ते चॅनेल नम्बर वन आहे टिआरपीमध्ये म्हणे.

असो... झीम ची जिरली हेही काही कमी नाही. काहीही दाखवण्याचे चांगले फळ मिळाले. डबडा, आसा, रार्धिका, गुरुनाथ, असली भंकस सुरु असल्यावर चॅनेल घसरणार होताच... घसरला ते बरं झालं..!!

This week all top5 slots are taken by star pravah....star pravah completely dethroned zee marathi

Top 5 marathi channels in week 40 (Mah/Goa)

1. STAR Pravah - 318029

2. Zee Marathi - 278336

3. Colors Marathi - 132239

4. Zee Talkies - 95510

5. Fakt Marathi - 64878

Top 5 marathi shows in week 40 (Mah/Goa)

1. STAR PRAVAH RANG MAZA VEGLA - 4653

2. STAR PRAVAH PHULALA SUGANDH MATICHA - 4564

3. STAR PRAVAH SAHKUTUMB SAHPARIVAR - 3859

4. STAR PRAVAH SUKH MHANJE NAKKI KAY ASTA - 3822

5. STAR PRAVAH MULGI ZALI HO - 3654

Edited by Rajpatil12 - 9 hours ago

सतीश राजवाडे मुख्य झाल्यावर साधारण वर्षभराने star प्रवाहने भरारी घेतलेली दिसतेय.

मी सुख म्हणजे नक्की काय असते बघत होते पण मध्ये ते गौरी अनिल लग्न मुर्खपणा लांबवत नेल्याने gap घेतलीय. आता जयदीप गौरी लग्न होईल दोन चार दिवसांत तेव्हा बघेन.

बाकी बघत नाही म्हणा पण झी म खाली आलं बरं झालं. किती पकवतात तरी प्रेक्षक बघतात त्यामुळे काहीही दाखवायला मोकळे होते, किमान आता जमिनीवर येतील हे बघून.

आता यापुढे बारा आठवडे trp येणार नाहीये ना, त्यामुळे समजायचं नाही पुढचे.

त्या फेक टिआरपी घोटाळयात फक्त मराठी चॅनेलचेही नाव होते.

फुलाला सुगन्ध मातीचा ' दिया और बाती हम' चा रिमेक आहे. कॉपी टू कॉपी फ्रेम आहे

सुख म्हणजे नक्की काय असत हिन्दीत येतय साथ निभाना साथिया- २ म्हणून.

फ्रेम टू फ्रेम कॉपी म्हणायचंय का सुलू तुम्हाला Happy फक्त मराठीचे नाव वाचून आश्चर्य वाटले होते. आई कुठे काय करते पहिल्या पाचात नाही Uhoh झी मराठीला स्पर्धा निर्माण झाली ते बरे झाले. त्या ससा कासव गोष्टीतला ससा झाला झी मराठीचा, अति आत्मविश्वास.

आई कुठे काय करते पहिल्या पाचात नाही >>> मलाही आश्चर्य वाटले. खुप छाने ही शिरेल, हल्ली घरुन काम असल्याने मम्मीच्या सगळ्या शिरेली दिसतात पण ही आवडली, अरुचे आताचे वागणे अगदीच पटले नाही तरी आवडले. फक्त तिने त्या अनिरुद्ध ला धडा शिकवायल हवा असे वाटले.

हा या आठवड्याचा टीआरपी आहे.बँन न्यूज चँनेलसाठी आहे.मालिकेच्या टीआरपीवर नाही. >>> असं होय, मला वाटलं सर्वांसाठी. तेही बरोबर म्हणा, मालिकेचा कशाला करायचा ban. धन्यवाद.

आई कुठे काय करते पहिल्या पाचात नाही >>> आधी होता बहुतेक याला trp. उलट आता जास्त मिळायला हवा ती नायिका सक्षम सशक्त होत चाललीयना, youtube वर प्रोमोज बघितले होते.

फुलाला सुगन्ध मातीचा ' दिया और बाती हम' चा रिमेक आहे>>>> ३ -४ वर्षांपूर्वी सुद्धा स्टार प्रवाहवरच अशी सिरीयल होती सेम. नाव नाही आठवत आता. अतिशा नाईकने सासूचा रोल केला होता, जिजीचा.

फुलाला सुगन्ध मातीचा ' दिया और बाती हम' चा रिमेक आहे>>>> ३ -४ वर्षांपूर्वी सुद्धा स्टार प्रवाहवरच अशी सिरीयल होती सेम. नाव नाही आठवत आता. अतिशा नाईकने सासूचा रोल केला होता, जिजीचा ,--
"तेजस्विनी"

फुलाला सू मध्ये नायक नक्की काय करत असतो, म्हणजे प्रोमो मध्ये तो पूजेची परडी विकताना दाखवला होता आणि आता हलवाई झाला का? नायिकेच्या आई वडिलांचा अपघात झाला होता म्हणजे बॉम्बस्फोट, ते वाचले की गेले. नक्की काय ष्टोरी आहे.

फ्रेम टू फ्रेम कॉपी म्हणायचंय का सुलू तुम्हाला >>>>>>> हो हो तेच.

आजचा सासूबाईचा एपिसोड पाहिला का कुणी? आसावरी बबडयाविरोधात गेली खर्या मन्गळसूत्रासाठी. बबड्या ला चांगलंच झापला. मी माझ्या सुनेच्या बाजूने उभी राहीन, जो पर्यंत तू खरं मंगळसूत्र बनवुन आणत नाहीस तो पर्यंत शुभ्ररा मंगळसूत्र घालणार नाही असा बोलली.

हा चमत्कार कसा काय झाला?

थांबा! तिला आहे सवय मधेच असे वागायची (आठवते? तिने डबड्याच्या कानाखाली दिली होती ते) पण नंतर लगेच ती माती खाते :-Pआणि परत येरे माझ्या मागल्या!

TRP घसरुन पार डब्यात जायला लागला की आसावरीला हे भले विचार सुचत असतील. बबड्याला वठणीवर वगैरे आणण्याचे. लोकं पुन्हा आशेने सिरियलकडे वळले काहीतरी बरं होईल या आशेने, की पुन्हा आसावरी बबड्या भक्त व्हायला मोकळी. फसवे प्रोमोज् हा अविभाज्य घटक झालाय टिव्ही सिरियल्स चा.
स्टार प्लस आणि स्टार प्रवाह तर साटंलोटंच खेळतायत. इकडची सिरियल तिकडे कॉपी, तिकडची इकडे. मराठीत मिस्टर बजाज बघायला मिळाला नाही म्हंजे मिळवलं.

स्टार प्रवाह बद्दल इथेच एका धाग्यावर अशा कमेंट दिसल्या अन तरिहि हा चॅनेल नंबर१ टीआर्पी खेचत असेल तर कमाल आहे बुवा -

"स्टार प्रवाह नवीन सुरू होणार्या मालिकांचे प्रोमो सध्या सुरू असलेल्या प्रत्येक मालिकेच्या प्रत्येक ब्रेकमध्ये दाखवून दाखवून हैराण करतात. तसेच सुरू असलेल्या मालिकेतील विशेष प्रोमोही मूळ भाग प्रक्षेपीत झाल्यावरही दाखवत असतात. कित्येकदा प्रोमोवर दाखवल्याप्रमाणे मालिकेत घडतच नाही, वेगळेच नवीन सुरू होते, तरीही तिकडे तोचतो प्रोमो दाखवणे सुरूच असते. ह्यावरून वाहिनीत काम करणारे, वाहिनी प्रमुख व निर्माते स्वतःच्याच वाहिनीवरच्या मालिका बघतात की नाही अशी शंका येते."

अमा @तुमची मते फार स्पष्ट असतात. तस ही लग्न कराव की नाही हे आपल्या स्वतः हा चा माता वर आहे. पण लग्न यशस्वी होणार का नाही कोणी सांगू शकत नाही. पुढच्या माणूस नीट हवा आणि योग्य ही हवा असतो.

अमा @तुमची मते फार स्पष्ट असतात. तस ही लग्न कराव की नाही हे आपल्या स्वतः हा चा माता वर आहे. पण लग्न यशस्वी होणार का नाही कोणी सांगू शकत नाही. पुढच्या माणूस नीट हवा आणि योग्य ही हवा असतो. >>>>> गल्ली चुकली की काय?

ओएम जी, मी लोकांच्या संसारावर कश्याला जजमेंट करेन. राहुद्या हो त्यांना सुखात. पण सीरीअल मध्ये दाखवले आहे तितके ते सोपे व सुपर फिशिअल पण नाही इतकेच.

इथे सगळे रोज नवे नवे होते. आज वेडिं ग अ‍ॅनिवर्सरई. मग शुभ्रा तयार वगैरे वगैरे. मग लगेच मंसु ड्रामा. तिथे ती शेजारीण तिचे मला कळ लंय काय लोच्या आहे ते एक्स्प्रेशन शंभरदा तरी देते व कमाल भोचक पणा करते. मग लगेच वयस्कर जोडप्याचे पार्टिंग. तरी ती एकदम सुरेख सुरेख. तो सीन नक्की बघा. राजे एक लेदर बॅग घेउन आलेले येताना मॅन पर्स पण जाताना नेली नाही. त्यांच्या चेहर्‍यावर भाव
दु:ख व्यक्त होते. पण आसवरी एकदम बोटॉक्स फ्रोझन इमोशन. सहा महिन्यात एक च एक्स्प्रेशन घेउन वावर्ते. पण दोघींच्या साड्या सुरेख आहेत

मग लगेच आसावरीला आपण चुकीच्या माहितीवर विशवास ठेव्ला हे कळते. मग लगेच प्रेम परत चालू डबे पाठवणे चिठ्ठ्या वगैरे. तो रंग पुना आला वगैरे वगैरे. मग लगेच अधिक मास वाण. हे खरेतर अधिक मासात हवे होते. निजो करोना मुळे पुढे ढकलले गेले असावे.

ह्यात पण दोघींच्या सुरेख सुरेख साड्या व शुभ्राचा काळा ड्रेस पण लै भारी. तिने प्रमोशन नाकारले हे कळ ले. फारच बा णेदार व्यक्तिमत्व
मग लगेच उखाणॅ घास भर्वणे. राजे परत विरघळले. तो रंग पुन्ह आला. ही त्यांच्या घरी गेली राहायला तर अर्धे प्रश्न सुटतील.
व सोहम शुभरा पण स्वतःचे रिलेशन सुधारू शकतील. पण ते होणे नाही.

सोहम व राजेचे जमत नाही ते तिच्या लक्षात येत नाही का? पन क्युट आहे दिसायला वर काही झाले की खाणे घेउन येते.

अमा... Lol
तो रंग पुन्हा आला.......
कैच्याकै दाखवितात व पुढे पुढे भाग नेतात...अति बोर. त्या राजेनाही कणा म्हणून नाही.....

Pages