अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निवेदिता सराफ ना करोनाची लागण झाली आहे>> म्हणजे सिरियल संपतेय बहुतेक... Uhoh

नाही म्हणाजे त्या बर्‍या होऊन काम सुरु करे पर्यंत त्यांची रिप्लेसमेंट मिळणं अगदी अवघड ठरेल.. इतका मठ्ठपणा आणि निर्बुद्धपणा कॅमेर्‍यासमोर दाखवणारी दुसरी रिप्लेसमेंट मिळणं शक्यच नाही.. ती शोधण्यापेक्षा सिरियल बंद करणं परवडेल.

काल मी बोल्ले मम्माला, या वेळेत IPL बघु आपण, पण हे नको, एकवेळ भैताड राधिका परवडली पण आसा नको>>>>> आसा भयाण आहे. स्वतःच्या कार्ट्याला पाठिशी घालते. काल वैतागुन शेवटी शुभ्रा पण त्या टकल्याला बबड्या म्हणाली. ( टकल्या म्हणजे बबड्याच. )

आसावरी ला कोरोना झाला आहे त्यामुळे शुटिंग थांबलं असेल... सद्ध्य नवीन सिरियल चे प्रोमो दिसत आहे. किती वाजता येणार माहित नाही.
मानबा संपते की अग्ग्गंबाई कोणास ठाऊक.

चिन्मयी मानबा ला अमरत्व देऊन कसे चालेल.. किती GF दाखवाव्या लागतील गुरूच्या.. ४ वर्षात 4 झाल्या ..राधिका .. २ शनाया १ माया..

श्रवु, तो जख्ख म्हातारा होऊन एखादी जख्ख म्हातारी त्याची ५० वी GF ही दाखवतील हे झी वाले. एवढी महा बोअर सिरियल अजून फरफटवतायत म्हणजे एवढ्यात संपवायचे नाहीत ना ते. त्यातूनच परमेश्वराला प्रेक्षकांची दया आली तर बघू. Proud
ही सासूबाईवाली सिरियल पण आता बबड्याभोवतीच जास्त फिरायला लागलेय. चढाओढच जणू. बोअर करण्याची प्रेक्षकांना.

आसावरी ला कोरोना झाला आहे त्यामुळे शुटिंग थांबलं असेल... >>>>>>> सध्या आसावरी स्पेशल दाखवतायत. निवेदिता घरुन बोलतेय सेटवरच्या लोकान्शी. आजोबाही दाखवले फोनवरुन बोलताना.

मागच्यावेळी पाहिल. बबडया आता गुरुच्या मार्गावर जातोय. सॉनयाची (तुपारे) एन्ट्री झालीये ' वो' म्हणून.

हि सॉन्या Singing superstar ( सोनी मराठी) मधून इव्हिक्ट झाली मागच्या आठवडयात.

सुभाची नवीन सिरियल येतेय कलर्स मराठीवर " चन्द्र आहे साक्षीला' चिन्मय माण्डलेकर लेखक आहे आणि दिग्पाल लान्जेकर निर्माता.

अरे बापरे... कलर्स Uhoh

सोनी मराठी जरा चॅलेंजींग वाटतो हल्ली... झी ने लवकरात लवकर मानबा, अग्गंबाई, नंदीबैल सारख्या शिरेलीतुन सुटका करुन नाही घेतली तर मग कठीण आहे यांचं.

अरे बापरे... कलर्स >>>>>>> काय झाल डिजे? Uhoh

सोनी मराठी जरा चॅलेंजींग वाटतो हल्ली... झी ने लवकरात लवकर मानबा, अग्गंबाई, नंदीबैल सारख्या शिरेलीतुन सुटका करुन नाही घेतली तर मग कठीण आहे यांचं. >>>>>>++++++++१११११११११ बाकीचे मराठी चॅनल्स झीमपेक्षा पुढे गेलेत चान्गल्या कन्टेन्टच्या बाबतीत.

बाकी ' सुखी माणसाचा सदरा' मला ' श्रीमन्त दामोदरपन्तासारखी' वाटतेय प्रोमोवरुन. म्हणजे भरतने एखाद्या विशिष्ट माणसाचा सदरा घातला तर तो त्या माणसासारखा वागू- बोलू लागेल. ही कॉन्सेप्ट किता वेळा वापरलीये केदारने भरतबरोबरोबरच्या नाटक- सिनेमात. का पुन्हा तेच तेच?

आसावरी आता तिच्या अभिजित आचारया ची प्रॉपर्टी हड़पायच्या कटाच्या आड येनार्या शुभ्रा चा काटा काढेल अस वाटतय.

ती शुभ्रा तर रडूबाई झालीये आता. दुसरी आसावरी झालीये तिची. काय तर म्हणे आता तर आसाही नीट बोलत नाही तिच्याशी, अबोला धरलाय. माझा त्या घरात जीब गुदमरतोय. वगैरे वगैरे. एवढा जीव गुदमरतोय हिचा तर का नाही ते घर सोडत? कुणासाठी थाम्बलीय ती तिकडे?

काय झाल डिजे?>> कलर्स आणि स्टार प्रवाह च्या शिरेली कधीच बघितल्या नाहीत... अंगावर येणार्‍या वाटल्या होत्या त्यामुळे बुकेतुन कलर्स आणि स्टार प्रवाह काढुन टाकले. सोनी मराठी फार सुपर फाईन वाटतोय हल्ली.

माझा त्या घरात जीब गुदमरतोय. वगैरे वगैरे. एवढा जीव गुदमरतोय हिचा तर का नाही ते घर सोडत? कुणासाठी थाम्बलीय ती तिकडे?>>>
फक्त अभिजीत आचार्या साठी. असावरी चा डाव तिला लक्षात आला असावा. आपण घर सोडून गेलो तर ह्या मायलेकाना मोकळं रान मिळेल आणी आचार्या ची प्राॅपर्टी हडप करून त्याला कुठे गायब करतील हे कळणार ही नाही. हे लक्षात आलं असावं तिला.

त्या भागातला तिचा काळा ड्रेस मस्त होता. बुद्धाचे चित्र बॉर्डरला असणा रा. काळा प्लाझो आणि ती फॅन्सी ओढणी. निजो ची पण साडी मस्त. गावावरून एस टीतून आली आहे असे काही वाटत नाही. कायम अगदी तश्या तश्या तश्या...

काय झाल डिजे?>> कलर्स आणि स्टार प्रवाह च्या शिरेली कधीच बघितल्या नाहीत... अंगावर येणार्‍या वाटल्या होत्या त्यामुळे बुकेतुन कलर्स आणि स्टार प्रवाह काढुन टाकले. सोनी मराठी फार सुपर फाईन वाटतोय हल्ली. >>>>>>> सोनी मराठीवरची हम बने तुम बने बघायची पूर्वी, पण आता कन्टाळवाणी झालीये ती सिरियल आता.

स्टार प्रवाहवर सध्या तरी एक सेन्सिबल सिरियल वाटतेय- ' आई कुठे काय करतेय'

सध्या कलर्स मराठीवरची 'सुन्दरा मनामध्ये भरली' बघतेय. हलकी फुलकी आहे. सगळयान्नी छान काम केलय. कुणी बघतय का हि सिरियल?

फक्त अभिजीत आचार्या साठी. असावरी चा डाव तिला लक्षात आला असावा. आपण घर सोडून गेलो तर ह्या मायलेकाना मोकळं रान मिळेल आणी आचार्या ची प्राॅपर्टी हडप करून त्याला कुठे गायब करतील हे कळणार ही नाही >>>>>>> राजेला एक मोठी बहीण आहे ना, तिला फोन करायचा ना शुभ्राने? बादवे, शनिवारच्या एपिसोडमध्ये शुभ्राची आई आलेली दिसली आसाकडे. एपिसोड बघितला नाही त्यामुळे ति का आली तिथे ते कळल नाही. शुभ्राला न्यायला आली होती का?

त्या भागातला तिचा काळा ड्रेस मस्त होता. बुद्धाचे चित्र बॉर्डरला असणा रा. काळा प्लाझो आणि ती फॅन्सी ओढणी. निजो ची पण साडी मस्त. >>>>>>> +++++१११११११११

फालतूपणा. एवढा नालायक निघावा आसावरीसारख्या बाईचा मुलगा? आणि शुभ्राचा चॉइस एवढा चुकावा? सगळे मूग गिळून बसतात बबड्या तडफडायला लागला की. असा सुधारणार का तो?

सध्या कलर्स मराठीवरची 'सुन्दरा मनामध्ये भरली' बघतेय. हलकी फुलकी आहे. सगळयान्नी छान काम केलय. कुणी बघतय का हि सिरियल?>> न्युज चॅनेल्वर ब्रेकमधे प्रोमो बघताना छान वाटते ही सिरियल पण मी सद्ध्या कलर्स मराठी अन स्टार प्रवाह बुकेतुन काढुन टाकलंय त्यामुळे नाही बघत ही सिरियल.

कधी आमच्याकडे मामा-मामी, काका-मावशी, सासु-सासरे रहायला आले तर त्यांच्यापैकी कोणीतरी कलर्स / स्टार प्रवाह लावुन तिथल्या सिरियल्स बघायचे तेव्हा तिथल्या एखाद-दुसरी सिरियल वर वर पाहिली आहे परंतु या दोन चॅनेल वरच्या मालिकांमधे सफाईदारपणा दिसला नाही. शिवाय त्यांच्या घरातील कारस्थाने, राजकारण बघता ते झीम पेक्षा फारच बालीश वाटतात Proud (झीम वाले आता कोरोनामुळे चांगलेच ढेपाळलेत म्हणा.. त्यांचा नंबर एव्हाना सोनी मराठी वाल्यांनी घेतलाही असेल..!)

एवढा नालायक निघावा आसावरीसारख्या बाईचा मुलगा?>>> बबड्याला पैशाशिवाय काही दिसत नाही आणि आसावरीला बबड्याशिवाय. दोघेही सारखेच आहेत. शुभ्रा आणि राजे मात्र पुरते फसलेत. आता तर वाटते त्यांना पण तसेच पाहिजे.

इतका त्रागा करुनही सिरीयल बघताच ना तुम्ही सगले. Lol हेच हवंय त्यांना.
माझ्या डोळ्यात शुभ्रीचं जाडेपण खुपत नाही कारण सध्या रोहित शर्माची टम्मी डोळ्यात खुपतेय Lol

आता अवांतर चाललंच आहे तर..
शुभ्रीची आई ही 'रंग माझा वेगळा' मध्ये सौन्दर्या इनामदार ची पण आई दाखवली आहे,अर्थात तीथे आत्महत्या केल्याने तिचे तिथले काम सम्पले असावे
आसा ची बिल्डिंग मधली मैत्रीण 'रंग माझा..' मध्ये इनामदारांच्या हॉस्पिटलमध्ये प्रमुख नर्स आहे
एकाच वेळी ,वेगळ्या सिरीयल आणि वेगळ्या चॅनेल वर तेही.. !!

शुभ्रीची आई ही 'रंग माझा वेगळा' मध्ये सौन्दर्या इनामदार ची पण आई दाखवली आहे,अर्थात तीथे आत्महत्या केल्याने तिचे तिथले काम सम्पले असावे>> Biggrin

एकाच वेळी ,वेगळ्या सिरीयल आणि वेगळ्या चॅनेल वर तेही.. !! >> दुसर्‍या-तिसर्‍या फळीतील कलाकारांना कुठेही काम करण्यासाठी मुभा असते..

Pages