शोध ‘दादर पश्चिम, मुंबई ४०००२८’ चा;व्हाया माहिम’..

Submitted by Nitin Salunkhe on 4 October, 2020 - 05:22

मी ‘दादर’ हे नांव कसं पजलं आणि जुनं दादर नेमकं कुठं होतं, यावर एक शोध निबंध लिहिला आहे. त्याची लिंक इथे दिली तर चालेल का? लेख माझ्या ब्लाॅगवर जाऊन वाचावा लागेल.

समूहाच्या नियमात हे बसत असेल तरच मी लेखाची ओळख आणि ब्लाॅगची लिंक देऊ शकेन

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार कोणी आलं नाही का हो तुमच्या ब्लॉग वर? नवीन असताना एक दोनदा जाहिरात केलीत ते ठीक वाटलं आता दर लेखावर तिकडे या तिकडे या असे आमंत्रण देणारे वेगवेगळे धागे येणार का? एकच
' माझ्या ब्लॉग वर नवा धागा आला आहे ' शीर्षकाचा धागा काढा. का आता मायबोलीवर ही असले 'क्लिक बेट' वाचायला लागणार आहेत?

एशियाटिक सोसायटीने नुकतीच सादर केलेली जुन्या मुंबईचे नकाशे व त्यातून मिळणारी माहिती याविषयीची व्याख्याने फारच उद्बोधक होती.

मायबोलीवरही जाहिराती येत आहेत. इथे लेख वाढले तर मायबोलीला उत्पन्न मिळेल. दहापैकी एखादा लेख इकडेच दिलात तर आनंदच आहे. बाकी तुमची इच्छा.

नितीन सर, तुमच्या ब्लॉग बद्दल एक धागा काढून तिथे नव्या लेखाबद्दल अपडेट करु शकता. तसेच ब्लॉग बद्दल, तुमच्या कार्याबद्दल याच लेखात माहितीही देऊ शकता. एका ओळखी प्रमाणे. म्हणजे धोरणातही बसेल आणि लोकांना ज्यांना वाचायचा असेल त्यांना तिथे जाऊन वाचताही येईल,

सोहा, लिंक्स अजून ओपन आहेत का ते पाहायला हवे. Paid होती व्याख्याने. कदाचित फीस भरून अजूनही मिळू शकतील. पण लिंक्स फारच कमी वेळासाठी ओपन असायच्या.
सध्याही हडप्पा उत्खननाला 100 वर्षे झाल्याच्या निमित्ताने एक अत्यंत माहितीपूर्ण अशी व्याख्यानमाला चालू आहे. खरे तर संपत आलीय. उशीरा भाग घेतलेल्यांना मागच्या व्याख्यानांच्या लिंक्स स्वतंत्रपणे पाठवतात ते. पण अर्थात ही माला archaeology व आनुषंगिक शाखां संबंधी आहे.

दादर 'पश्चिम' लिहिलेला काय बुवा लेख म्हणून वाचायला आले तर पचकाच झाला.
दादर हे दादर असतं, शुद्ध स्वच्छ दादर मुंबई 28.
मूळ दादरकर दादर 'पश्चिम'लिहीत नाहीत कधीच.
टिळक ब्रिज पल्याड दादर पूर्वेला राहणाऱ्यांना मुद्दाम दादर 'पूर्व' असं लिहावं लागतं Wink

इकडे येऊन स्वतःच्या ब्लॉगची लिंक म्हणजे inbox for price सारखं झालं.

नितिन सर, मी वाचला लेख तुमच्या ब्लॉगवर जाऊन. तुम्ही घेतलेली मेहेनत व तुमची या विषयाप्रती असलेली उत्सुकता नक्कीच दिसून येते तुमच्या ब्लॉगवरील लेखातून.

माझा (फुकट) सल्ला असा की तुम्ही लेख इथेही संपूर्ण लिहा व त्याखाली ब्लॉगची लिंक द्या. तुमच्या मागल्या लेखावर ब्लॉगवर ३ अभिप्राय आहेत, त्यातले दोन तुमचे स्वतःचे आहेत. या लेखावर जो २ ऑक्टोबरला प्रकाशित केला आहे त्यावर अजून एकही नाही.
तुलनेने तुमच्या मायबोलीवरील लेखांवर अधिक प्रतिसाद आहेत. जर इतर माध्यमांवर/प्लॅटफॉर्म्सवर तुमचे लेख अधिक संख्येने वाचले जात असतील तर इथे मायबोलीवर तुम्हाला लिहिण्याची नक्कीच गरज नाही.
मात्र तसे नसेल अथवा तुमचा उद्देश हा अधिकाधिक लोकांपर्यंत आपला लेख पोचवणे असा असेल तर तुम्ही इथे संपूर्ण लेख + तुमच्या ब्लॉगची लिंक नक्की देऊ शकता.

नितिन सर, मी वाचला लेख तुमच्या ब्लॉगवर जाऊन. तुम्ही घेतलेली मेहेनत व तुमची या विषयाप्रती असलेली उत्सुकता नक्कीच दिसून येते तुमच्या ब्लॉगवरील लेखातून. >> +१. मला आवडला लेख नि त्यातली माहिती. तुमचे दारद बद्दल घेतलेले असंप्शन पण तार्कीक वाटले.