महाराष्ट्र राज्याचे मंत्री अन त्यांचे खातेवाटप

Submitted by चंपक on 16 November, 2009 - 00:36

महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ अन त्यांच्या खात्यांची यादी :
http://maharashtra.gov.in/english/government/MinisterEng.pdf

संदर्भासाठी: महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ अन त्यांच्या खात्यांची यादी, मंत्र्यांची यादी, सचिवांची यादी, पत्रव्यवहाराचे पत्ते आदी सविस्तर माहिती, अन राज्याच्या कारभाराचे अनेक निर्णय खालील संकेतस्थळावर उपलब्ध असतात.
http://maharashtra.gov.in/

महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळाची खातेनिहाय ओळख...
सौजन्यः दैनिक प्रहार http://www.prahaar.in/prasangik/15131.html

अशोक चव्हाण, मुख्यमंत्री नगरविकास, सांस्कृतिक, गृहनिर्माण
छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम
कॅबिनेट मंत्री
खाते
नारायण राणे महसूल आणि खार जमीन. मदत व पुनर्वसन तसेच भूकंप पुनर्वसनाचा अतिरिक्त कार्यभार
आर. आर. पाटील गृह
डॉ. पतंगराव कदम वने
सुनील तटकरे वित्त व नियोजन
अजित पवार ऊर्जा आणि जलसंपदा
राधाकृष्ण विखे-पाटील परिवहन, बंदरे. विधी व न्याय मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
जयंत पाटील ग्रामविकास
हर्षवर्धन पाटील सहकार, पणन, संसदीय कार्य
गणेश नाईक राज्य उत्पादन शुल्क आणि अपारंपरिक ऊर्जा
बाळासाहेब थोरात कृषी, जलसंवर्धन. शालेय शिक्षणाचा अतिरिक्त कार्यभार
प्रा. लक्ष्मणराव ढोबळे पाणी पुरवठा व मलनि:स्सारण
जयदत्त क्षीरसागर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
मनोहरराव नाईक अन्न व औषधे
डॉ. विजयकुमार गावित वैद्यकीय शिक्षण, फलोत्पादन आणि पर्यटन
शिवाजीराव मोघे सामाजिक न्याय, भट्क्या विमुक्त व इतर मागासवर्गीयांचे कल्याण
रामराजे निंबाळकर जलसंपदा (कृष्णा खोरे)
बबनराव पाचपुते आदिवासी विकास
राजेश टोपे उच्च व तंत्रशिक्षण
राजेंद्र दर्डा उद्योग
नसीम खान वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक कल्याण आणि औकाफ
सुरेश शेट्टी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पर्यावरण, राजशिष्टाचार, क्रीडा व युवक कल्याण खात्याचा अतिरिक्त कार्यभार
हसन मुश्रीफ कामगार
नितीन राऊत पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्यविकास
सुभाष झनक महिला आणि बाल कल्याण
अनिल देशमुख अन्न व नागरी पुरवठा
राज्यमंत्री
रणजीत कांबळे ग्रामविकास, फळबाग, जलपुरवठा आणि स्वच्छता
विजय वडेट्टीवार जलस्त्रोत, संसदीय व्यवहार, वित्त, नियोजन आणि ऊर्जा यांचा अतिरिक्त भार
भास्कर जाधव नगरविकास, वने, बंदरे, खार जमीन, संसदीय व्यवहार, क्रीडा आणि युवक कल्याण, माजी सैनिक कल्याण
पद्माकर वळवी आदिवासी विकास, कामगार
प्रकाश सोळंके महसूल, पुनवर्सन कार्य, भूकंप पुनर्वसन, सहकार, पणन, वस्त्रोद्योग
सचिन अहिर गृहनिर्माण, झोपडपट्टी विकास, दुरुस्ती आणि बांधकाम, नागरी कमाल जमीनधारणा, उद्योग, खाण, सामाजिक न्याय, अमलीपदार्थ विरोधी आणि पर्यावरण
अब्दुल सत्तार अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक बांधकाम
फौजिया खान सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क, सांस्कृतिक व्यवहार, राज्यशिष्टाचार, शालेय शिक्षण, महिला आणि बालकल्याण, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, अल्पसंख्याक विकास (औकाफसह)
रमेश बागवे गृह (नागरी), गृह (ग्रामीण), अन्न व औषधे प्रशासन आणि कारागृह आणि राज्य अबकारी खात्याचा अतिरिक्त भार
वर्षा गायकवाड वैद्यकीय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण, पर्यटन आणि विशेष सहाय्य
गुलाबराव देवकर कृषी, पशुपालन, दुग्ध विकास, मत्स्य, जलसंवर्धन, रोजगार हमी योजना, रोजगार आणि स्वयंरोजगार, वाहतूक, भटके, विमुक्त व ओबीसी कल्याण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम माहिती. यातले जे उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, अर्थशास्त्र इ. चे मंत्री आहेत त्यांची त्या जागा भूषवण्याची काय योग्यता आहे, म्हणजे शिक्षण, अनुभव इ., याची काही माहिती आहे का कुठे लिहीलेली?

झक्की असते ना तुम्ही म्हणता ती माहिती. पण ती माहिती उघडपणे देत नाहीत ते. कारण त्याची लाज वाटते त्यांना. उदा. अमुक खात्यांसाठी किती खोके पोचवले साहेबांकडे, किती वेळा जोडे उचलले अमुकरावांचे, किती 'माल' सप्लाय केला पनवेलवरून, सातवीत असतांना कॉपी केल्यामुळे कसे शाळेतून काढून टाकले, ईंग्रजी वाचतांना कागद सरळ आहे की उलटा हे न कळणे, किती आमदार बैल कडबा टाकून आपल्या गोठ्यात बांधले आहेत, किती उपद्रवमूल्य आहे, पक्षविष्ठा शिरसावंज्ञ मानून किती कळ काढली, अशी माहिती असते आणि अशी योग्यता असते.